Pages

बुधवार, ३ एप्रिल, २०१९

मृदगंध.


मृदगंध.

काल दुपारी दारावर एक माठ विकत घेतला,
जुना माठ किंवा डेरा पाणी थंड करत नव्हता....सो हा घेतला,
नवीन माठ घेतल्यावर त्यात पाणी भरून दोन दिवस भिजवत ठेवायचा व मगच नंतर तो वापरायला घ्यायचा असा आमच्या आईचा शिरस्ता होता,त्याप्रमाणे मी ह्यात पाणी भरून एक बाजूला ठेऊन दिला,
तर कालपासून ह्यातून एक अप्रतिम असा मातीचा सुगंध अकख्या घरभर पसरलाय,तो गंध इतका छान आणि हवाहवासा वाटला की भाच्याला व मुलीला मी म्हणालो, की आजकाल जग इतकं अडवांस झालंय की कोणतीही गोष्ट आपण स्टोअर करून ठेवू शकतो, किंवा रेकॉर्ड करून ठेवतो जसं की आवाज,गाणी,फोटो....व्हीडिओ, इ ई.
पण सुगंध किंवा गंध मात्र आपण साचवून ठेऊ शकत नाही अथवा आवडलेला सुवास एखाद्या डबीत बंद करून ठेऊ शकत नाही,त्यामुळेच तो हवाहवासा वाटतोय,
मनात विचार केला वेगवेगळ्या नात्यांचं पण असंच असतंय त्यांना आपण बंदिस्त करायचा प्रयत्न केला तर त्यातील गोडवा किंवा हवाहवासा भाव शिल्लक राहतच नाही....!
त्यांना मोकळं सोडलं तरच भावनिक पातळीवर एकमेकांचा सहवास हवासा वाटतो,
 पत्नी,मित्र,मैत्रिणी,भाऊ,बहीण अशा सगळ्या नात्यांमध्ये जर गोडवा टिकवायचा असेल तर ती नाती बांधून स्टोअर करायचीच नाहीत,त्यांचा आहे तोवर छान सहवास ठेवायचा,तो गंध कधी उडून जाईल काय माहीत??
बंधनं न टाकता त्या नात्यातून येणारा छान सुगंध आयुष्यातल्या उन्हाळ्यातली रखरखीत दुपार सुगंधित गार व संस्मरणीय केल्यावाचून राहणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी कोण आहे?

  मी कोण आहे ? #motivationmarathi #selfawareness #selfgrowth #innerpeace #mindsetshift #deepthoughts #knowyourself #personalitydevelopment ...

आणखी पहा