"मनातील आवाज"
नदीच्या किनाऱ्यावरील एका झाडावर एक माकड त्याच्या मैत्रीण माकडीणसह
गप्पा मारत बसलेले होते.
अचानक आकाशवाणी सुरू झाली...
"जो कोणी आकाशवाणी संपल्या संपल्या ह्या नदीच्या पाण्यात
उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल... "
आकाशवाणी सुरूच असते. माकड,माकडीण ऐकत असतात. मनात विचारांचे
थैमान सुरू असते....
काय करू...?
काय करू.... ?
काय करू... ?
दोघे विचार करत असतात. आकाशवाणी संपते, तेवढ्यात माकडीण नदीच्या
पाण्यात उडी मारते...
माकड ओरडतो,
"वेडी झालीस का?
असं कुठे घडतं का ? आकाशवाणी खोटी ठरली तर...."
तेवढ्यात पलिकडून माकडीण एक सुंदर राजकुमारी बनून बाहेर येते.
ती माकडाला म्हणते,
" अरे माकडा, आकाशवाणी जरी खोटी ठरली असती, तरी मी पाण्यातून
बाहेर येऊन माकडीणच राहिली असते;
पण एक संधी घेतल्यामुळे आता मी राजकुमारी झाली आहे.
संधी असून फक्त विचारच करत बसल्यामुळे किंवा निर्णय न घेतल्यामुळे
आज तु माकडच राहिलास.
संधी दररोज मिळत नाही. तू संधी ओळखू न शकल्यामुळे, शंका घेत बसल्यामुळे
आणि अतिविचारी स्वभावामुळे माकडच राहिलास....!!!!"
#तात्पर्य :
आपल्या हातात वेळ कधीच नसते. असते ती केवळ संधी. मिळालेल्या आयुष्यात
वेळ कितीतरी संधी देत राहते. आपण स्वतः हे ठरवायचे कि कोणती संधी घ्यायची आणि कोणती
सोडायची.
तुम्हाला मिळालेल्या संधीचे सोने करा ही सदिच्छा.
मित्रांनो, "मनातील आवाज"ही आकाशवाणी सारखाच असतो.
जीवनात आपणही आलेली प्रत्येक संधी साधून संधीचे सोने करावे; अन्यथा माकडाप्रमाणे विचार
करीत फांदीवरच बसून 'माकड' बनून राहावे लागेल..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा