लोक तूम्हाला बोलणारच!
तुम्ही लोकांपासून दूर रहाल तर लोक म्हणतील तुम्ही खुप गर्विष्ठ
आहात. तुम्ही खुप खर्च कराल तर लोक म्हणतील, तुम्ही उधळ्या आहात. तुम्ही खर्च कमी कराल
तर लोक म्हणतील , तुम्ही चेंगटच आहात.तुम्ही सतत खरे बोलाल तर लोक तुम्हाला फटकळ म्हणतील,
तुम्ही इतराची स्तुती कराल तर लोक तुम्हाल. संधी साधू म्हणतील. तुम्ही विरोध करु इतरांच
मताचे खंडण कराल तर लोक तुम्हा उर्मठ म्हणतील. तुम्ही इतरांच सहन कराल तर लोक भित्रा
म्हणतील. लोकांना निरपेक्षपणे मदत कराल , तर लोक तुम्हाला बावळट म्हणतील. जर तुम्ही
प्रमाणिक वागलात तर लोक तुमचा वापर करतील. पण तूम्ही खंबीर राहीलात तरच तुम्हाला लोक
सलाम करतील. एक वेळ कलंदर बनून जगा। जग हे काही तरी म्हणणारच आहे.
पत्नी पतीला म्हणते,..
एखादी वस्तू स्वस्त आणल्यास... तुम्हाला सगळे फसवतात... महाग आणल्यास...
तुम्हाला कुणी आणायला
सागितलं होत?
जेवणाचं कौतुक केल्यास, मी दररोजच करते.
नावं ठेवल्यास...
तुम्हाला मेलं माझं कौतुकच
नाही कशाचं...
एखाद काम केल्यास...
एक काम कधी धड करत नाही...
ते न केल्यास...
तुमच्या भरवशावर राहिले
तर एकही काम होणार नाही...
आणि शेवटच
मी आहे म्हणून टिकले नाहीतर दूसरी असती तर पळून गेली असती
शांत रहाण्याचा प्रयत्न
करा.
तुमच जीवन तुमच्यासाठीच जगा. जीवन खुप सुंदर आहे. पण ते तुम्हाला
कळाले तर.
आनंदी जगा, लोक काय तरी म्हणणारच!
म्हणून लोकांचा विचार सोडा. मजेतच जगा!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा