सुधा_मूर्ती
"इन्फोसिस फाउंडेशन'च्या प्रमुख आणि "गेट्स फाउंडेशन'च्या
सार्वजनिक आरोग्यविषयक उपक्रमाच्या सदस्य या पदांवरून त्यांनी केलेले कार्य स्तिमित
करणारे आहे. खरेतर, "इन्फोसिस' या आज जगविख्यात असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील
कंपनीची उभारणी सुधाताईंनी एक गृहिणी या नात्याने केलेल्या सुमारे दहा हजार रुपयांच्या
बचतीतून झालेली आहे. नारायण मूर्ती हे आवर्जून अनेकदा या बाबीचा उल्लेखही करतात.
सुधा कुळकर्णी-मूर्तींचा जन्म १९ ऑगस्ट, इ.स. १९५० ; शिगगाव,
कर्नाटक येथे झाला.त्या एम.टेक.आहेत. टेल्को या कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या
महिला अभियंत्या होत्या. कॅलटेक (अमेरिका) ह्या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास
कुळकर्णी यांच्या, तसेच जयश्री कुळकर्णी-देशपांडे (प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरु
राज देशपांडे यांच्या पत्नी) ह्यांच्या भगिनी आहेत. त्यांना रोहन व अक्षता ही अपत्य
आहेत.
सुधा मूर्ती यांनी नऊपेक्षा अधिक कादंबर्या लिहिलेल्या आहेत.
त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत.त्यांच्या 'ऋण ' या कानडी कथेवरील पितृऋण हा
मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
सामाजिक कार्य करताना सुधाताईंनी प्रपंचही नेटका केला आहे. त्यांची
जीवनशैली कमालीची साधी आहे. मध्यंतरी त्या कोल्हापुरात आल्या, तेव्हा सहकाऱ्याबरोबर महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्या होत्या.
येताना त्यांनी देवळाबाहेर बसलेल्या बाईकडून आठ आण्याचे आवळे आणले! नारायण मूर्ती हे
आवर्जून विचारले, "हे काय! एवढीच खरेदी?' त्या हसून उद्गारल्या, "मी शॉपिंग
करतच नाही!' काही वर्षांपूर्वी हरिद्वारला गंगास्नानासाठी त्या गेल्या होत्या. प्रिय
वस्तूचा त्याग करावा, असा संकेत तेथे असतो. सुधाताईंनी त्याक्षणी शॉपिंग बंद केले ते
कायमचेच.
साधी पांढऱ्या रंगाची साडी त्या परिधान करतात.
रंगीत कपड्यांची त्यांना आवडच नाही.
सुधा मुर्ती ह्या प्रसिध्द अशा १०,००० कोटीचा व्याप असलेल्या
इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा असुन दरवर्षी त्या २५० कोटी पेक्षा जास्त रक्कम देणगी
म्हणून दान करतात. तरीही अतिशय साधी राहणी ठेवण्याकडे त्यांचा खास कटाक्ष असतो...
सुधा मुर्ती नेहमी ज्या साड्या घालतात.
त्या साड्या कमी किंमतीच्या असतात...
पर्स २०० ते ४०० रुपयाची असते..
मनगटी घड्याळ वेळ बघता अाली म्हणजे फार झाले म्हणून घड्याळही
साधे सुधे ८००—९०० रुपयाचे असते.
मोबाईल ७ ते ८ हजाराचा ..
फेसबुक, व्हाटसअॅप मध्ये १५—१५ दिवस लक्ष घालत नाही.
पायातील चप्पल सुध्दा महागडी नसते.
कोणत्याही ब्रॅन्डेड वस्तु वापरत नाही.
घरातील सर्व कामे स्वत:च करतात.
नातेवाईक व मित्रपरिवार यांचे घरातील सर्व लग्न व
दु:खद प्रसंगी हजर राहतात.
सुधा मुर्तींचा जेथेही प्रवेश होतो.
तेथील अहंकारी नजरा क्षणार्धात लाजेने खाली झुकतात..
हजारो कोटीची सम्राज्ञी असलेल्या सुधा मुर्तींचा साध्या राहणीमानातला
वावर सर्वांना अचंबित करुन सोडतो,
अापण कोण अाहे हे विसरुन इतरांना मोठेपणा देत ही बाई जेव्हा सर्वांची
स्वत:हून पुढे जाऊन अास्थेने चौकशी करु लागते तेव्हा मी मी म्हणणार्यांचा अहंकार क्षणार्धात
गळून पडतो..!
राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कारासाठी प्रसिद्ध साहित्यिक व सामाजिक
कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांची झालेली निवड अत्यंत उचित अशीच आहे. शिक्षण, विज्ञानप्रसार,
साक्षरता प्रसार, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत झोकून देऊन सातत्याने कृतिशील राहिलेल्या
सुधाताई हे विलक्षण चैतन्याने भारलेले व्यक्तिमत्त्व आहे. मराठी-कन्नड-इंग्लिश भाषांतील
असंख्य अप्रतिम पुस्तकांच्या वाचकप्रिय लेखक म्हणून त्या प्रसिद्ध आहेतच; पण त्याहून
अधिक मोलाचे त्यांचे सामाजिक कार्य आहे. सुधा मूर्तींनी सामाजिक कार्याचे जे टोलेजंग
डोंगर उभे केले आहेत, ते पाहिल्यावर "साहित्यिक सामाजिक कार्यात उतरत नाहीत' असे
बोलण्याची हिंमत कुणाला होणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा