इकिगाई....
वाचक
हो चांगली पुस्तके जीवन घडवतात. जीवनात परिवर्तन आणतात. पण अशी पुस्तके शोधणे थोडे
अवघड असते. एकतर माणसाकडे हल्ली वेळ कमी असतो. म्हणजे अगदी आजारी पडेपर्यंत वेळच
नसतो. पण हॉस्पीटलमध्ये मात्र वेळ जात नसतो. असो. आज मी तुम्हाला एका आरोग्य बरोबर
जीवनाची सांगड घालणाऱ्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे. काही लोकांनी ते पुस्तक वाचलेही
असेल, संग्रही ठेवले असेल. पण ज्यांनी अजून वाचले नसेल अगर माहित नसेल
त्यांच्यासाठी थोडसं.....
त्या
पुस्तकाचे नाव आहे इकिगाई......
हा
एक जापनीज शब्द आहे. हे पुस्तक म्हणजे कथा, कादंबऱ्या प्रमाणे काल्पनिक नसून अनुभव
व अभ्यासाच्या आधारे जापनीज लोकांच्या जीवनाचे गुपीत आहे. लेखकाने इकिगाई या जपानी
शब्दाचा अर्थ शब्दकोशा प्रमाणे न सांगता सतत व्यस्त राहण्यामध्ये आदंन. त्याचा
अर्थ जीवनाचा हेतू उमगणे व साध्य करणे असा केला आहे. प्रत्येक माणसाचा या मानवी
जीवनात येण्याचा काहीतरी कारण/हेतू असतो. त्याने तो शोधायचा असतो. काहींना आपला इकिगाई
सापडतो तर काही जण द्विधा अवस्थेत असतात. पण तुम्ही म्हणाल इकिगाई शोधून करायच काय?
जपान
मध्यल्या ओकिनोवा या बेटावरील असणाऱ्या गावात दर 1 लाख लोकसंखे पैकी 24.55 टक्के
लोक हे 100 पेक्षा जास्त वयोगटातील आहेत. आणि हे प्रमाण जागतिक वयोमानाच्या तुलनेत
कितीतरी जास्त आहे. ते पण ठणठणीत अवस्थेत. जपानी शब्दकोषात निवृती हा शब्दच नाही.
म्हणजे इथले लोक शेवटपर्यंत आपल्या आवडीच्या कामात व्यस्त असतात. तिथल्या लोकांमध्ये
गंभीर आजारांचे प्रमाण कमी आहे. आहे की नाही आश्चर्य. काय आहे त्यांची रहस्य.
जाणून घ्या. आपल्या प्रियजनांना सांगा. त्याचे अनुकरण करा. आणि आपल्या मित्रांनाही
सुचवा.
(Disclosure : As an Amazon associate I earn from qualifying purchase)







