यशस्वीतेचे रहस्य 💪🏼💪🏼
एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरचा
सूचना फलक वाचून आश्चर्य चकित होत होता.
"तुमची या कंपनीमधील प्रगती रोखणाऱ्या व्यक्तीचा काल मृत्यु
झाला आहे, त्याच्या अंत्ययात्रेत नक्की सामिल व्हा. "
सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकाऱ्या बद्दल वाईट
वाटलं.
पण नंतर उत्सुकता वाढली, माझी प्रगती रोखणारा नक्की कोण????
यासाठी प्रत्येकजण शवागारात जाऊन तिथे बांधून ठेवलेल्या तिरडी जवळ जाऊ लागला.
नीट डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फारले, शरीर स्तब्ध झाले,
तोंडातून शब्द फुटेना.
कारण त्या शृंगारलेल्या तिरडीवर एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण
त्यात स्वतःला बघत होता.
तिरडी च्याजवळच एक फलक ठेवला होता,
"या जगात तुम्हाला जर कोणी तुमच्या प्रगती पासून रोखु शकत
असेल तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतःच आहात"
कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टीमधून
पळवाट काढणे ,दुसऱ्याला नाहक विरोध, त्याची बदनामी हे फक्त तुम्ही फक्त स्वतः च्य अधःपतना
साठी करत असता.
तुमचे आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत
नाही.
ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःला बदलता तेव्हाच.
आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसऱ्याला कितीही दोष दिला तरी तुमची
परिस्थिती बदलणाार नाही.
दुसऱ्याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल?
तुम्ही तेव्हाच मोठे होवू शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचं
ठरवाल. अन्यथा या जगात आणि जन्मात तुम्हाला मोठे अथवा लहान, यशस्वी किंवा अपयशी करणे
कुणालाही शक्य नाही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा