Pages

शुक्रवार, ५ एप्रिल, २०१९

"गणित आयुष्याचे"

"गणित आयुष्याचे"

भारतीयांचे सरासरी आयुर्मान ७० वर्षे 
(सन २०१७ च्या शासकीय आकडेवारीनुसार)

आता आयुष्याचे गणित पाहू..

३६५ × ७०  = २५,५५० दिवस

वयाची पहिली २.५ वर्षे - सभोवतालातून शिक्षण
३६५ × २.५ = ९१२ दिवस

वय वर्षे २.५ ते २१ -  बालवाडी ते पदवी शिक्षण.
३६५ × १८.५ = ६७५२ दिवस

वय वर्ष २१ ते २३ - २ वर्षे पदव्यूत्तर शिक्षण
३६५ × २ = ७३० दिवस

वय वर्ष २३ ते ५८
३६५ × ३५ = १२,७७५ दिवस

वय वर्ष ५८ ते  ७०
३६५ × १२ = ४३८० दिवस

आयुष्याचे एकूण दिवस = २५,५५०

आयुष्याचे एकूण तास = ६,१३,२००

काम
प्रत्यक्ष कामाचे तास = वय वर्ष २३ ते ५८
३६५ × ३५ = १२,७७५ दिवस
३५ वर्षातील एकूण रविवार दरसाल ५२ × ३५ =१८२० दिवस
३५ वर्षातील एकूण सुट्या दरसाल किमान २० × ३५ = ७०० दिवस
प्रत्यक्षात कामाचे दिवस =
१२, ७७५ - १८२० - ७०० = १०,२२५ दिवस
प्रत्यक्षात कामाचे तास रोज ८ तास याप्रमाणे
१०, २२५ × ८ = ८१, ८०० तास
आयुष्याचे एकूण तास - ६,१३,२००
प्रत्यक्ष कामाचे तास - ८१,८००
आयुष्यभरातील प्रत्यक्ष कामाची टक्केवारी = १३ पुर्णांक ३४

झोप
आयुष्याचे एकूण दिवस = २५,५५० × किमान ८ तास
(आळस - दुपारची वामकुक्षी - कामाच्या ठिकाणच्या डुलक्या वगळता)
२,०४,४०० तास
अर्थात आयुष्यातील ८५१६ दिवस
आयुष्यभरातील झोपेची टक्केवारी = ३३ पुर्णांक ३३

रोजची वैयक्तिक नित्यकर्मे
(जेवण-अंघोळ इत्यादी)
आयुष्याचे एकूण दिवस = २५,५५० × किमान २ तास
५१,१०० तास
२१३३ दिवस
आयुष्यभरातील नित्यकर्मावरील वेळेची टक्केवारी = ८ पुर्णांक ३३

आयुष्यभरातील प्रत्यक्ष कामाची टक्केवारी = १३ पुर्णांक ३४ + आयुष्यभरातील झोपेची टक्केवारी = ३३ पुर्णांक ३३ + आयुष्यभरातील नित्यकर्मावरील वेळेची टक्केवारी = ८ पुर्णांक ३३ = ५५%

मग १०० - ५५ = ४५ % अर्थात ११, ४९७ दिवस म्हणजेच २,७५,९४० तास जातात कुठे?

आजारपण, कामावर जाण्यायेण्यासाठी खर्च होणारा वेळ, मनोरंजन, वाचन, व्यायाम, शुभाशुभ कार्ये यावर ४५ टक्यांपैकी जरी ५० % वेळ खर्च होतो असे गृहित धरले तरी १,३७, ९७० तास अर्थात ५७४८ दिवस खर्च होतात.

आयुष्यातील २२ पुर्णांक ५० टक्के अर्थात १,३७, ९७० तास अर्थात ५७४८ दिवस कुठे खर्च होत आहे?

आयुष्याच्या प्रत्यक्ष कामाच्या वेळेची टक्केवारी = १३ पुर्णांक ३४

आयुष्यातील वायफळ वेळ वाया जाण्याची टक्केवारी = २२ पुर्णांक ५०

आयुष्यातील १,३७, ९७० तास अर्थात ५७४८ दिवस "नसत्या वायफळ चर्चा-राजकारण-एकमेकांची उणीधुणी- जात-पात-पक्ष-निष्ठ-नेता-निवडणूका-निकाल" यावर वाया घालवल्यावर कसे होणार? कसे बनणार यशस्वी? कसा करणार आपला देश प्रगती? कसा होईल आपला देश महासत्ता?

आयुष्यभरातील एकूण वेळेपैकी केवळ १३ पुर्णांक ३४ टक्के वेळ कामधंदा करून सामान्य मध्यमवर्गीय व्यक्ती किमान वनबीएचके फ्लॅट, एक चारचाकी गाडी, पंचवीस तीस लाख फिक्स डिपाॅझीट आणि साधारणपणे देशाला १०,००,००० रूपये कर भरतो.

तर आयुष्यातील वायफळ वेळ वाया जात असलेल्या २२ पुर्णांक ५० टक्के वेळेपैकी १३ पुर्णांक ३४ टक्के वेळ योग्य कामासंबधी सार्थकी लावल्यास जास्त पैसे साठवून व जास्त कर भरून स्वतःची व देशाची दुप्पट प्रगती करू शकेल. तसेच उरलेला वेळ पर्यटन, छंद, प्रत्यक्ष समाजसेवा यावर खर्च केल्यास आयुष्याच्या क्षितिजावर सुवर्णसूर्योदय निश्चितच उगवेल.

मग नक्कीच.. नव्हे आपोआपच होऊ आपण महासत्ता..

आता कसे वागायचे ते आपले आपणच ठरवावे..

श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा