Pages

रविवार, ७ डिसेंबर, २०२५

मी कोण आहे?

 मी कोण आहे?

who i am

#motivationmarathi #selfawareness #selfgrowth #innerpeace #mindsetshift #deepthoughts #knowyourself #personalitydevelopment

          बऱ्याचदा गप्पा मारताना प्रत्येक जण एकमेकांविषयी, त्यांच्या स्वभावा विषयी बोलत असतो. आपले नातेवाईक, आपला बॉस, मित्र आप्तेष्ट, भेटणारे विविध प्रकारचे लोक. आपला नातेवाईक किंवा बॉस, प्रवासात, अपघाताने भेटणासरे लोक. किंवा गर्दीतले माणसे. भेटणारा व्यक्ती कसा आहे? याबद्दल आपण एकमेकांना आपले मत मांडत असतो. जसे की तो किंवा ती खुप दयाळू आहे. फ्री माईंडेड आहे. मदतगार आहे. इ. कधी कधी किंवा बहुतांशी त्या विरुध्द. म्हणजे तो किंवा ती फार रागीट आहे. स्वार्थी आहे. हेकेखोर आहे. हट्टी आहे. घमेंडखोर आहे. इत्यादी इत्यादी.

         समोरचाही त्याला दुजोरा देत असतो. अरे हो मला असा अनुभव आला किंवा हो ती तशी वागली. इ. समोरच्या माणसाचे मोजमापच आपण करीत असतो. हे झाले ओळखीच्या माणसांबद्दल. अनोळखी व्यक्ती भेटली कि, त्याची देहबोली, पोषाख, चेहऱ्यावरचे भाव यावरुन एक अंदाज बांधत असतो. की ही व्यक्ती अशी असू शकते. म्हणजे रागीट किंवा मैत्री पूर्ण. इ.

          हवा असलेला चेहरा समोर आला की आपलाही चेहरा खुलतो. अंगात उत्साह संचारतो. तेच नको असलेली व्यक्ती दिसली तरी हयाच्या एकदम विरुध्द घडते. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकी व्यक्तीला आपण एक लेबल लावून टाकतो. एकदा लेबल लावले की त्याच्याशी/तिच्याशी कोणत्या प्रकारे बोलायचे हे ठरते. म्हणजे त्या व्यक्तीला दुखवून चालणार नसेल तर सांभाळून बोलावं लागते. तेच एखादयावर सुडच उगवायचा असेल तर मात्र मुद्दामहून आपण तसे बोलतो. म्हणजे व्यक्तीनुसार आपण कसे बोलायचे ते ठरवतो.

         पण कधी विचार केलाय का? आपण जसे प्रत्येकाला लेबल लावतो, तसे आपल्यालाही लेबल लागलेले असते. पण ते स्वत:ला कधीच दिसत नाही. कारण ते दुसऱ्याच्या मनात असते. मग आपण कसे आहोत? मी चांगला आहे कि वाईट आहे. इतर काय म्हणत असतील मलाअसे विचार येतात. कधी स्वत:चे परिक्षण केलय का? मी कसा/कशी वागतो/ते. माझे नातेवाईक, मित्र यांचे माझ्याबद्दल काय मत असतील?

        माणूस म्हणून जन्म घेतल्यानंतर माझा स्वभाव कसा आहे? मी खरच प्रेमळ आहे कि, रागीट आहे? मी आयुष्य एन्जॉय करतोय/तेय की, ढकलगाडी करतोय/करतेय. या जगात येण्याचा माझा उद्देश काय आहे? रोज उठून कामाला जुंपायचे, EMI फेडायचे की, दिवस मजेत घालवायचा? हया प्रश्नांची उत्तरे शोधायला गेलात तर तुम्हाला तुमचा मी सापडेल? खरा मी. मीपणा नव्हे. ही गफलत नको.

CLICK HERE
                                                                               (Disclosure : As an Amazon associate I earn from qualifying purchase)

         मग त्यासाठी काय बरे करावे? एखादया शांत ठिकाणी बसून हया प्रश्नांची उत्तरे शोधा. काहीवेळ स्वत:साठी फक्त स्वत:साठी दया. तिथे कुणीही म्हणजे कुणीही नसेल. अगदी जवळची व्यक्ती सुध्दा नसेल. फक्त आणि फक्त स्वत:शीच संवाद. जिथे तुम्हाला शांत वाटेल. कुणीही डिस्टर्ब करणार नाही. अशा ठिकाणी बसा. आणि सुरु करा स्वसंवाद. आज पर्यंत दुसऱ्यांना लेबल खुप लावली आता स्वत:साठी कोणते लेबल आहे ते पाहून घ्या. तुम्हाला तुमच्यातला मी भेटेल. जो कोणत्याही लेबलशिवाय जन्माला आला होता. जगात आल्यानंतर ईच्छा, अपेक्षांच्या ओझ्याखाली झुकलेला/लेली दिसेल. जेंव्हा जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा तेंव्हा स्वत:मधील खरा मी शोधण्याचा प्रयत्न करा. एकदा का तो मी सापडला तर त्याला काय आवडते? म्हणजे आपली आवड काय आहे तीही कळेल.

          रोज आपण एक बुरखा घेऊन वावरत असतो. म्हणजे एक आई किंवा बाप म्हणून. मुलगा/मुलगी, सुन, जावई, एक बॉस किंवा कर्मचारी म्हणून. एक मित्र किंवा एक सेल्समन. इत्यादी इत्यादी. अनेक बुरखे घेऊन आपण वावरत असतो. पण तो किंवा ती खरा मी नसतोच /नसतेच. खरा मी आत आत असतो जो शोधण्यासाठी खोलवर जावे लागते. लोकांसाठी असणारा मी आणि प्रत्यक्ष असणारा मी यात किती अंतर आहे. कि जसा मी आतून आते तसाच मी बाहेरच्या जागतही आहे. कोण आहे मी? निसर्गाचा एक घटक म्हणून की कसा आहे? कसं जगायला मला आवडेल? काय मला आवडेल? केवळ बाहय देखाव्या शिवाय असणार आतला मी कसा आहे? समजा माझ्यावर कोणतेही बंधन नाहीत, अपेक्षा नाहीत, ओझ नाही तर मी कसा असेल. काय गुण आहेत माझ्यामध्ये? काय अवगुण आहेत? रागीट आहे, तापट आहे. खरोखरच मी असा आहे का, कि हया जबाबदाऱ्या पेलता पेलता माझा स्वभाव बदलला आहे? बघा मिळतोय का  तुमच्यातला खरा मी’? सापडला तर तो जपा तुमच्यातच. 

            त्याच्याशी गप्पा मारा. त्याच्यावर नका लादू अपेक्षांचे ओझे. हया निसर्गाचा अविश्कार आहे तो, कोणत्याही लेबल शिवाय, कोणत्याही मोहमाया शिवाय, निरागस आणि निरपेक्ष. पुर्वी नाही का आपले ऋषी मुनी जंगलात जाऊन तपश्चर्या करायचे. ते काय होतं. त्यांच्यातला मी चा शोधच तर होता. ज्ञान म्हणजे मी. स्वत:चे ज्ञान म्हणजे मी. असा मी प्रत्येकाला निवांत समयी सापडायला हवा. कारण जगासमोर वावरताना असलेला मी आणि आतुन असलेला खरा मी हयात अंतर आहे. आपली स्वत:ची ओळख हया मी मध्ये आहे. तो सापडला ना तर खुप बरं वाटेल. हलकं वाटेल. त्याचा तिरस्कार करु नका. त्याला झिडकारु नका. कारण तोच खरा मी आहे. बाकी सारे हया रंगमंचावरील मुखवटे आहेत. मुखवटयाखालचा मी तुम्हाला नक्की सापडेल. आणि भेटतच राहील. कदाचित लोकांना भेटलेला तुमच्यातला मी आणि तुम्हाला स्वत:ला भेटलेला तुमच्यातला खरा मी हया मध्ये खुपच अंतर असेल.


CLICK ON IMAGE

लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि कमेंटस करा.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी कोण आहे?

  मी कोण आहे ? #motivationmarathi #selfawareness #selfgrowth #innerpeace #mindsetshift #deepthoughts #knowyourself #personalitydevelopment ...

आणखी पहा