नक्की वाचा 👈
आनंद हा फुलपाखरासारखा आहे .पकडण्यासाठी मागे धावला की लांब
उडुन जातो तुमच्या अजिबात
हाताला लागत नाही आन
शांतपणे बसला तर अलगद तुमच्या खांद्यावर
येऊन बसतो . लहानपणातले आपले आनंदाने
भरलेले कप्पे एक एक उलगडून
पाहू . गावी आई दुपारी घरात झोपलेली आसायची.बाहेर शेंगा वाळत
घातलेल्या असतात गारीगारवाला यायचा त्याला ओंजळभर शेंगा द्याच्या दुपारच्या उन्हात
देवळात बसून गारीगार खायचो .कबड्डी
खो-खो ,खेळणे ,बिना का गीतमाला ,टी.व्ही. वरच छायागीत ऐकायचं .मधमाशी जशी छोटा छोटा मध गोळा करते तसे आनंदाचे क्षण टिपायला हवेत. तरुण पिढीला वाटते खूप
पैसे कमावले आपण सुखी होणार .वयाच्या पन्नाशीपर्यत मी प्रचंड काम करणार ,नंतर मी आनंदात
जगणार हा विचार खूप चुकीचा आहे
.....कारण अस आसत तर श्रीमंत माणस सुखी आणि
गरीब माणस दुःखी असती पण तसं नसते गरीब सुध्दा आनंदात
जगतात ."" अमृताचे घट भरले
तुझ्या दारी का वणवण फिरशी बाजारी
?""नवीन जमान्यात मोबाइल चांगला घेतला आहे .खूप सुंदर फोटो काढले computer वर डाउनलोड
केले .पण आठवणी काढून पुन्हा
पाहायला वेळ नसतो .तर आनंद शोधावा नाही
तर टिपावा लागतो .शेंगा खाण्यासाठी
पाच सहा मित्र चांदण्यात बसतात .मध्येच भाजलेल्या शेंगाचा ढीग ठेवला असतो . सर्व जण शेंगा खात असतात . शेंगेचा एक दाणा आपल्या हातून निसटून
फोलाच्या ढीगात पडातो .तो दाणा शोधण्यासाठी आपला बराच
वेळ जातो .तोपर्यंत समोरचा शेंगाचा ढीग
संपत आलेला असतो .एका शेंगदाण्यासाठी आपण आनंदाचे कित्येक दाणे खायचे राहिलेले असतो विचारसरणीत
बदल करून पाहिलं की पेरु तसेच
उगवत . दुसऱ्याच्या जीवनात आनंद
पेरला तर आपल्या जीवनात आनंद मोठ्या प्रमाणात निर्माण
होणार . हा निसर्गाचा नियम आहे.दुसऱ्याला
आनंद दिला तर फार मोठे मानसिक
सुख मिळते .आयुष्यात चांगले काम कोणी
केले अस म्हणाले तर मी हा शब्द
शेवटी ठेवा त्या ऐवजी
""आम्ही "" हा शब्द
वापरा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा