वारा फिरला..तारू फिरलं....#संगीताशेंबेकर
मॉर्निंग वॉक ला पिक्युलियर
कॅरेक्टरिस्टिकस भेटतात...थांबून गप्पा ठोकायचा
नसतातच मोस्टली चेहेरेच ओळखीचे असतात..बस मानेने
हाय हॅलो चालतं.... आपली जायची वेळ चुकली कि वेगळा सेट भेटतो....एक चेहरा मात्र कायम
साधारण सेम वेळेला भेटायचा ..खूप चुणचुणीत असल्याचा त्याचा दावा असायचा....तो जरा दोन
मिनिटे थांबून आम्ही डिस्पर्स व्हायचो असलो कि जवळ येत काहीतरी बातमी सांगायचा ..तो सांगायला लागला एकदा "ग्रीन
टी ".... बेस्ट...मी फार छान हेल्दी होत चाललोय....बघाच मला ..आम्ही चार राऊंड
मारू तर हा सहा मारे ..आणि खूप सुरस बोलला...आम्ही सार्यांनी दाद दिली ...मग महिनाभराने
म्हणायला लागला...ग्रीन टी ने "अमुक"..नुकसान होतं सो मी आता अमुक पावडर
खातोय....
आणि मग कळालं कि "टू मॅच ऑफ इन्फर्मेशन "ने आपण सारेच
अर्धमेले झालोय....इतक्या पॅथीज चा बदा बदा मारा चालतो आपल्यावर हल्ली कि जीव घाबरतो ...कुणी
सांगे अमुक करा आणि पहा मला कसा फायदा झाला..कुणी तमुक...सोबत पुराव्याला लेख आणि नीट
माहितीही असते सोबत ...आणि आपण पार भंजाळून जातोय....
आपल्या म्हणून उत्साहाची आणि एनर्जीची एक नक्कीची लेव्हल
आपल्याला नीट माहित असते तसे तसे आहार
विहार धोरण आपण बदलत्या वयाप्रमाणे नक्कीच अभ्यासावे आणि आत्मसात करावे...पण आपले जीवशास्त्रीय सत्य आपण फार बदलू शकत नाही ....काहीतरी तात्पुरतं
करून बदलले तरीही ते अयोग्यच ..दोन पाच वर्षांनी पूर्ववत होणारे बदल घातक ....किंवा
निराशा देऊ शकतात आपल्याला कि आपण कसे झालो होतो आणि आता पुन्हा कसे झालो....
निसर्गाने वर्ण ..वजन ..चण..आपल्याला नेमून पाठवलंय आपल्या पालकांच्या
वैशिष्ट्यांमधून निवडून....त्या साऱ्याचा आदर करावाच ...त्वचा वजन यांची सगळया वयात
नक्कीच काळजी घ्यावी पण सारेच त्या पातळीवर सारखे नाहीत याची नीट माहिती घेतच....एखादयला
कोरफड सूट होईल एखाद्याला नाही ...आपली स्व अभ्यासाची तयारी हवी....अगदी सक्खे बहिणी
बहिणी भाऊ भाऊ पण गोरे काळे सावळे गव्हाळ असतात ...त्याला नक्कीच काही कारण असते
..आपण आपले जे जे आहे ते जपावे पण त्यापुढे जाऊन अट्टाहास करूच नये कि आपण तंतोतंत
योग्यच असावे...कारण असे कुणी नसते...
स्वच्छता....निगा ..काळजी घ्यावी ...नसती कॉम्पिटिशन मात्रं नसावी....
"भला उसकी साडी मेरी साडीसे सफेद क्यू"..??....यातून
बाहेर यावे ....
"नेबर्स एनव्ही
ओनर्स प्राईड ..." असं काही नसतं ..
आपली लाइफस्टाइल....आपल्या शक्यतांमध्ये नीट गुंफावी ..अशक्याला
धरायला जाणे अत्यंत निराशा देते ...
जे आपलं नैसर्गिक .. तेच आपलं....
खूप भडीमार माहिती तंत्रज्ञाचा टाळावा....."सगळ्यांना सगळे
"माहित असणे खूप गरजेचे नसते....
"नो लेस "
हे छान ............म्हणजे मग वारा फिरेल तसं आपलं तारू फिरणार नाही ....स्टेडी असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा