आधार ...
मित्राची आई 2/3 आठवडे आजारी आहे . म्हणून शनिवारी त्यांना बघायला
मित्राच्या घरी गेलो होतो .
आईच त्याच सर्वस्व . आई आजारी असल्यामुळे हां अस्वस्थ झालेला
. दोन आठवडे बिझीनेस सोडून आई जवळच थांबला .मला कळल म्हणून गेलो बघायला .
मोठा फ्लैट आहे . दोन बेडरूमचा . आई साठी वेगळी बेडरूम आहे .
मित्राचे वडील किमान 25 वर्षापुर्वी मरण पावलेले .
घरी गेल्यावर वहिनीने सांगितले आई त्यांच्या बेडरूम मध्ये झोपल्या
आहेत . मी बेडरूम मध्ये गेलो तर आई त्यांच्या बेडवर झोपल्या होत्या आणि मित्र खाली
चटई टाकून काहीतरी वाचत पसरला होता .
मला बघुन उठला आणि आईला हाक मारली आणि महेश आलाय म्हणून सांगितल
. मी हलकेच त्याला सांगितल झोपु दे त्यांना . थोड्या वेळाने उठव .
मी पण त्याच चटईवर खाली बसलो . मी बेडरूम न्याहाळत होतो . त्याने
त्याच्या आईची बेडरूम मस्त सजवली होती . स्वतंत्र कपाट . TV . पुस्तका साठी कपाट .
भिंतीवर डीझाईन आणि बरच काही .
हे सगळ बघताना मला एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे . त्याच्या आईने
अंगावर जे Blanket घेतल होत त्याला सहज दिसतील अशी बऱ्यापैकी मोठी अशी दोन छिद्र होती
. Blanket बऱ्यापैकी जून पण दिसत होत . मी सहज Blanket वरुन हात फिरवला .
मित्राने मी विचारण्या अगोदरच सांगितले . हे Blanket माझ्या वडिलांचे आहे . आई
गेली 25 वर्ष रोज अंगावर घेऊन झोपते . तिच्यासाठी तो आधार आहे .
पंचवीस वर्ष तिने याच आधारावर काढली . वडील गेल्यावर खचली होती
. पण या Blanket च्या रुपात तिला आधार भेटला .
या आधारावर तिने तिची
नोकरी , माझ शिक्षण , येणाऱ्या अड़ीअडचणी तिने याच आधारावर सोडवली . आजही माझे वडील
आम्ही या Blanket च्या रुपात जिवंत ठेवले आहेत .
मलाही वडिलांची आठवण
आली की हे Blanket जवळ घेऊन बसतो ... अस म्हणत त्याने त्या Blanket ला मुठीत गच्च पकड़ल
.
त्या गच्च मुठी कड़े बघुन त्याचे वडील त्याच्या अजूनही किती जवळ
आहेत हे मला जाणवल .
आधार वास्तव असो अथवा आभासी ...
पण माणसाला उभारी घ्यायला बळ देतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा