येत्या काही वर्षांमधे एक आधीची पिढी हे जग सोडणार आहे. कटू असलं
तरी सत्य आहे, कारण जगरहाटी कोणी थांबवू शकत नाही. या पिढीतले लोक थोडे वेगळेच आहेत.
सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे..
स्नान केल्याशिवाय, तुळशी ला पाणी दिल्याशिवाय काही न खाणारे..
रोज सकाळी सकाळी खड्या आवाजात स्तोत्र मंत्र म्हणत पूजा करणारे..
संध्याकाळी सगळे सोबत रामरक्षा, भीम रूपी, शुभंकरोती म्हणणारे..
रोज संध्याकाळी मंदिरात एखादी फेरी मारणारे...
राम जन्म, कृष्ण जन्म उत्साहात साजरे करणारे...
भिंतीवर, झाडावर चढून आंब्याची पाने आणून तोरण करणारे...
गौरी, गणपती, महालक्ष्मी दिवशी Colony मधून सकाळी सकाळी फुले
वेचून आणणारे...
दिवसभर वेगवेगळ्या प्रकाराचे हार करणारे...
पिण्याचे पाणी नळावरुन भरून आणणारे...
पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे...
रस्त्यातून भेटणाऱ्याची आस्थेने चौकशी करणारे...
दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार करणारे...
अन्न धान्य वाया जाऊ नये म्हणून बेतानेच स्वयंपाक करणारे आणि
उरले तर गरीबाला देणारे किंवा दुसरे दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे...
बाहेर न खाणारे...
६० - ७५ जाणांचा पंच पक्वान्नाचा स्वयंपाक स्वतः एकटा घरी करणारे...
दिवाळीचा सर्व फराळ घरीच करणारे...
नरक चतुर्दशी ला सकाळी ४ वा उठून बॉम्ब लावून सगळ्याना उठवणारे...
पाहूणे-रावळ्यांची स्वतःची गैरसोय असूनही पाहूणाचार करणारे...
पर्यटनाबरोबरच तीर्थयात्रा करणेही न विसरणारे...
आपापले सण लक्षात ठेवून साधेपणे साजरे करणारे...
अमावस्या, एकादशी, अधिक महिना लक्षात ठेवणारे...
भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी त्याच्यावर सोडणारे (आणि त्यामुळे
कठीण परिस्थितीतही मनःस्वास्थ्य टिकवणारे),
व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे...
जूना झालेला चष्मा, तुटला तर चिकटवून, जुनी चप्पल फाटली तर शिवून
आणि जुना बनियन गलितगात्र होईपर्यंत वापरणारे...
उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुटून मसाला घरी बनवणारे...
४ - ५ कुटुंब एकत्र येऊन लोणची, मसाले करणारे...
फक्त ३ / ४ कपड्याचे जोड वापरणारे...
फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे...
खिशातला पैसा जपून वापरणारे आणि गरजेपुरतेच अन्न खाणारे...
जुन्या कॅटेगरी मधील आमच्या सारखे लोक आता हळूहळू कमी होत जाणार
आहेत. आपल्या आजूबाजूला किंवा घरात असे कोणी असतील तर त्याची चौकशी करा, काळजी घ्या.
कारण ते जातील तेव्हा एक महत्वाची शिकवण त्यांचेबरोबर जाईल.
समाधानी, साधे, अर्थपूर्ण , दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची
काळजी करणारं जीवन जगायचं असतं ही शिकवण जगातून नाहीशी होईल.
त्यानंतर फक्त राहील स्वार्थ, अविश्वास, चैन, असंवेदनशील मने,
भकास कोडगेपणा आणि मोबाईलवरचे कृत्रीम अगत्य !!!!!
खूप लिहिण्यासारखं आहे.. साध्या पुरे
-- पुष्कर हेमंत जोशी / संकल्पना
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा