EMI वर मोबाईल घेताय तर वेळेवर हप्ता भरा नाहीतर मोबाईल बंद होऊ शकतो.
सध्या बाजाराम apple, samsung सारख्या
कंपन्यांकडून महागडे स्मार्ट फोनची क्रेज आहे. त्यामुळे नव नवीन फीचर्सचे मोबाईल
घेण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. आता सर्वांना रोख रकमेने विकत घेणे शक्य
नव्हते. त्यामुळे विविध वित्तीय कंपन्यांनी फोन घेण्यासाठी कर्जाची सोय उपलब्ध
करुन दिली आहे. फोनवर सगळे व्यवहार होत असतात. जसे फोनद्वारे पैसे देणे-घेणे,
बँकांची स्टेटमेंट, इ.जुन्या फोनमध्ये नवीन अपडेटेड ॲप सपोर्ट करीत नाहीत.
त्यामुळे बऱ्याचदा फोन चांगला असूनही नवीन घ्यावा लागतो. आता नवीन घेतच आहोत तर
जरा लेटेस्ट चांगला फोन घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो. पण तो जरा महाग असतो.
त्यावर पर्याय कर्जाचा असतो.
वित्तीय कंपन्या अशा फोन
विक्रेत्यांकडे सहज लोनची सोय उपलब्ध करुन देण्यात येते. अर्थात त्यांचा हा
व्यवसाय असतो. गिऱ्हाईकांना 0% लोन सुविधा, कमीत कमी डाऊन पेमेंट सुविधा इ. आकर्षक
आलोभने दाखविली जातात. प्रत्यक्षात फ्री काहीच नसते. सणासुदीला जसे दसरा, दिवाळी,
गणेशोत्सव, स्वातंत्रयदिन, पाडवा अशा सणाला तसेच पावसाळी ऑफर अशा प्रकारे आकर्षक
जाहीराती आपल्याला आढळतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा