आपला प्राथमिक उद्देश काय जीवनाचा तर आनंदित राहण्याचा,,,, पण आपण आनंदित राहत नाही, हे केवळ आपल्यालाच वाटत कि आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून आहे आणि दुसरेच आपल्याला आनंदी राहू देत नाहीत (क्या कहेंगे लोग, क्या कह रहे है लोग)
स्वतःला आनंदित ठेवणं खूप सरळ आहे पण दूर हि तितकंच आहे, नाही का???? काय तर शेवटी आपल्याला आनंदित राहायचं आहे मग त्यासाठी रोकतय तरी कोण???? लोकांच्या
complaints असतात की नाही नाही तो असं करतोय माझ्यासोबत, ती अशी करतेय माझ्यासोबत😒
पण fact तर ही असते कि,, आपल्याला वाटत त्यांनी त्यांचं मनचाही काम नाही करावं पण आपल्याला मात्र आपलं मनचाह काम करायचं असतं,,, आता ही एक मोठी समस्या आहे,,, हे होणं शक्य नाही कारण स्वातंत्र्याची धारा दोन्ही बाजूने वाहत असते.
जर कुणी तुम्हाला शारीरिक त्रास देत असेल तर त्यासाठी अनेक मदतसंस्था आहेत,, पण इथे कुणीच तुम्हाला शारीरिक रुपात त्रास देत नाहीय,, समोरचे लोक त्यांच्या मनानुसार काम करतायेत, त्यांच्या मनानुसार बोलतायेत...... तर मग तुमच्यामध्ये त्रास कोण निर्माण करतंय? "तुम्ही स्वतः".
आपला आनंद हा केवळ आपल्यावर, आपल्या मनस्थितीवर, आपला जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो जो कि आपल्या स्वतःच्या मालकीचा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा