Pages

बुधवार, १० एप्रिल, २०१९

स्ट्रगलच संपला राव !




स्ट्रगलच संपला राव !

सेल्फ स्टार्टर बाईक आल्या पासून
हमारा बजाज तिरकी करून स्टार्ट करण्याचा आयुष्यातील  स्ट्रगलच संपला राव ...!!

एलईडी टीव्ही आल्यापासून
वुडन बॉक्स टीव्ही चे प्रक्षेपण बंद झाल्यावर "हमे खेद है ! वाचत प्रक्षेपण पुन्हा सुरू होण्याची वाट बघायचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव...!!!

डिटीएच आल्यापासून
कौलावर चढूनअँटेना फिरवत टीव्ही वरले चित्र दिसते का रे भो ? असे ओरडून विचारण्याचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव ...!!!!

मोबाईल फोन आल्या पासून ..
रात्री दहानंतर एसटीडी बूथसमोर रांगेत उभे राहून आपल्या अमेरिकेतील मुलाची खुशाली काय ..काय ..करत विचारण्यात पल्स वर लक्ष ठेवत बिलाची चिंता करण्याचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव ...!!!!

पेटीएम आल्यापासून...
हॉस्टेल रूमवर मनी ऑर्डर ची वाट बघत महिनाअखेर चे दोन दिवस भेळ भत्ता खाऊन काढायचा आयुष्यातला स्ट्रगलच संपला राव !!!

इमेल आल्यापासून..
गावाकडून येणाऱ्या पत्राची वाट बघत आख्खी दुपार लोळून काढण्याचा आयुष्यातला स्ट्रगलच संपला राव ..!!

गुगल आल्यापासून...
एखाद्या संदर्भावर लावलेली पैंज जिंकण्यासाठी रात्र रात्र लायब्ररीतले दिवे जाळून पुस्तके चाळून काढण्याचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव !!!

गुगल मॅप आल्यापासून ....
मुंबईच्या रस्त्यावर हजार वेळा विचारूनही पत्ता हमखास चुकण्याचा आयुष्यातला स्ट्रगलच संपला राव!!!

व्हाट्सअप आल्यापासून...
कामावरून सुटल्यावर मित्रांच्या कट्टयावर जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव!!!

खरं सांगू ?? हे शिंचं ग्लोबलायझेशन आल्यापासून....
माणसं सोडून यंत्राशी जमवून घेण्याचा आयुष्यातील मोठाच स्ट्रगल सुरू झाला ना राव !!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा