Pages

बुधवार, १० एप्रिल, २०१९

निवड


निवड 

एका सावळ्या,जरा स्थूल, डुलत डुलत चालणाय्रा...
मोठ्या फ्रेमचा चष्मा आणि त्यामुळे 25 एक स्थळांकडून नकार मिळालेल्या तिला त्याने सहजी होकार दिला...!

आणि सगळ्यांनाच 4.5 रिस्टलपेक्षा जास्त भूकंपाचा धक्का बसला..

"अरे ती नुसती B.com.. तू M.B.A. ??"

"असे ना का?.. मला पण degree घ्यावी लागलीच ना पण??"

"हो पण..Engg ..ची.. "

"असू देत की...तिला commarce ची आवड असेल."

"अरे पण तुला दुसरी छान मुलगी मिळेल ना!"

"ही काय वाईट आहे? मला आवडलीय ती!"

"पण आम्हाला कुणालाच नाही आवडली.."

घरचे नाक मुरडून म्हणत होते... पण तो ठाम होता..

"Engg is what who gets the solution from any situation..... आत्ता अशी दिसतीय म्हणून म्हणताय.. थोड्या वर्षांनी सगळे म्हणाल...तुझी आवड चुकली नाही म्हणून..."
आणि सगळ्यांकडं दुर्लक्ष्य करून त्यानं तिच्या गळ्यात माळ घातली...

पहिली चार पाच वर्ष जशी जातात तशीच गेली... सणवार, 2 मुलं... एकमेकांना समजून घेणं...घरच्यांशी संबंध balance करणं वगैरे वगैरे...

...मग तो काळ आला.. की दोन्ही मुलं शाळेत जाऊ लागली.. आणि तिला जरा स्वतःसाठी वेळ मिळू लागला..
आणि हीच ती इनिंग होती... जेव्हा त्याने बॅटिंग चालू करायचं ठरवलं...
त्याने जाणलं होतं.. तिला आपल्या दिसण्याचा complex आहे... त्यामुळे थोडा confidance कमी...
ह्यावर काम केलं की बास आहे...

आणि काम सुरू झालं... घरबसल्या account ची कामं तिला सांगणं, त्यातील सल्ला विचारणं, काही refferance शोधायला सांगणं...मग तिलाच एखादं पूर्ण काम देणं.... आणि ह्यात कुठे जास्त चिडचिड न करणं...
आणि..plan यशस्वी ठरू लागला... तिचा confidance वाढला.कमावत्या बाईचा डौलदारपणा तिच्याकडं येऊ लागला. ती आता घराबरोबरच स्वतःच्या राहण्याकडं, दिसण्याकडं लक्ष देऊ लागली... gym ला जाऊ लागली.. माफक मेकप, आणि योग्य dress यामुळे आपण छान दिसतो हे तिला कळून चुकलं.. frame less आणि नाजूक चष्मा आला.. एलिझाबेथ केसांचा कट आला... आणि ती छान दिसू लागली..
चार जणांच्यात सहजी बोलू लागली.. स्वतःची मत मांडू लागली... भिशी, किटी पार्टी ला जाऊ लागली..
मुलांच्या शाळेत भांडू लागली.. त्यांच्या activities मध्ये लक्ष देऊ लागली..

All was going smoothly now...
आणि ती अधिकाधिक आश्वासक दिसू लागली...ती आता चाळिशीला पोहोचली होती... तरी तिचा तरतरीतपणा वाढत होता..

लग्नाला पंधरा वर्ष झाली... आणि त्यावर्षीच्या महिला मासिकाच्या स्पर्धेत 'फोटोजेनिक फेस' चं अॅवार्ड मिळालं
त्या कार्यक्रमात ती भरभरून बोलत होती..म्हणाली..
" प्रत्येक स्त्री ही सुंदरच असते... फक्त तिला तिच्या कोषातून बाहेर पडून फुलपाखरू होण्यासाठी योग्य वेळ द्यावा लागतो....
आणि हे माझे उद्गार नाहीत.. माझ्या नवय्राचे आहेत.. एखाद्या रोपावर प्रेम केलं की तेही बहरतं.. मग बायको तर जीतं जागतं उदाहरणच आहे...ती का नाही फुलणार...??"
आणि पुढे म्हणाली, " तेव्हा FB वर ladies photo ना like करणाय्रांनी आपल्या बायकोलाही दिवसातून एकदा तरी like comment द्या...म्हणजे ती अजून छान दिसेल..."आणि खळखळून हसली...दृष्ट लागावी अशी!

.....आणि त्याच्या घरच्यांना मान्य करावं लागलं
की खरंच त्याची निवड चुकली नव्हती..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा