"फाइंडिंग सेल्फ"
पूर्वी सर्कस मध्ये एका गोलात एक माणूस फटफटी चालवून दाखवायचा...कधी
कधी दोन असायची माणसे ..आपले निरनिराळे खेळ प्राण्यांचे आणि विदूषकाचे पाहून झाले कि एक गंभीर वातावरण तयार
केलं जायचं...आणि अंधार केला जायचा....आणि सूचना यायच्या कि जीव मुठीत धरून मी ते पाहायचे....गोलात
जाताना तो माणूस आपल्याला म्हणजे प्रेक्षकांना बाय वगैरे करायचा
आणि थोडं अधिक वाईट वाटायचं..सं..एक माणूस
राजीखुशीने जातोय ते धाडस करायला म्हणून...तरीही पुढची काही मिनिटे श्वास रोखून
आपण ते पाहायचो....मला तो अंधार आणि फटफटीचा
कर्कश्य आवाज आणि ते कर्तब आज लाईफ लेसन शिकताना.आठवते ...
निरनिराळ्या टप्प्यांवर सगे सोयरे...समाज यांच्याशी आपल्या समजुतीची
फारकत होतंच असते...कधी घरी दारी ठीक असतं तर कामाच्या ठिकाणी वातावरण बिघडतं....कधी
कामाने समाधान मिळतं तर घरी काही निखळतं...कधी सगळं सुरळीत असताना मोठं संकट जसं कि घरफोडी...जवळच्या
नातेवाईकाचा अपमृत्यु ..अशा अनेक घटनांनी जगण्याची सर्कस गंभीर वळण घेते...
आणि मन त्या मृत्यू गोलातल्या मनासारखे गरगर फिरू लागते ...त्या
गोलात थांबण्याची सोय नाही कारण वेग कमी झाला कि कोलमडते तो स्वार ... आणि एक आक्रन्दन सुरु होतं आतल्या आत....रोजच्या
आयुष्यात मुद्दाम बसून सांगू असे कुणी जुळलेले
सूर असतीलच असं नसतं....जगरहाटी सांत्वन करून बाजूला झालेली असते...
आता त्या मोट्ठ्या गोलात फटफटीवर बसलेल्या आपल्या गरगर फिरणाऱ्या
मनाला धरून आणण्याचे काम आपल्याकडे लागतं...
आणि हे दिसून येत नाही ...तेव्हाच "फाइंडिंग सेल्फ"
चा धडा गिरवायला सुरवात करावी लागते...
आणि सापडलेल्या आपल्या मनाला एका नव्या पॅराशूट ला बांधायला लागतं... पॅराशूट अवकाशात हवेशी संधान बांधत बांधत दिशेच्या तत्वावर
चालतं.... दिशा आणि वेग हवेवर सोडावा लागतो...आणि मग एका तालावर ते हेलकावे घेऊ लागतं..मनाच्या
या अवस्थेतच झालेल्या "लॉस"..चं निरीक्षण शक्यं असतं....आणि मग तारतम्याने ...हळू हळू फटफटी शांत
होते आणि पुन्हा एकदा "फाईन लँडिंग" साठी मन सज्ज होतं.... पॅराशूट मधेही भीती असतेच कि ते कशात अजून गुरफटलं तर मग अंतच....तरीही
मृत्युगोलात म्हणजे एका साच्यातच त्याला फिरवत राहण्यापेक्षा एक निराळा आसरा म्हणून मोकळ्या हवेत सोडायची तयारी
दाखवावीच लागते ..कारण तरच थोड्या अंतरावरच्या
संधी...मार्ग मनाला दिसतात आणि होप्स संपण्याच्या भीतीपासून लांब जात पुन्हा जगण्याकडे कल येत जातो....
जगण्याच्या सर्कशीत आपले मन हे मृत्युगोलात फिरत ठेवायचे कि पॅराशूट
ला बांधून निराळे आयाम शोधायचे ..हा प्रश्न
आयुष्य बऱ्याचदा विचारतच राहते ..चॉईस आपण
करायचाय दोस्त.... फाइंडिंग सेल्फ..... इज अ बेटर चॉईस.........#संगीताशेंबेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा