आनंदाच्या झाडाखाली "🌷
" देव
तुझे भले करो "
🕉 God
Bless You...
गोष्ट तशी खूप साधी
अन् सोपी आहे. बघा असं ..कधी-कधी खूपदा आपण असहाय ठरतो..काही Situations मधे! .. जसं
की कुणी आजारी असतं.. आपण काहीच करू शकत नसतो.. पण आतून काही करावंस मात्र वाटत असतं..
हे मी एक उदाहरण दिलंय पण अशी असहायता तुम्ही अनेक प्रकारे अनुभवत असाल अनेक ठिकाणी..
जिथे तुम्हाला स्वतःची लिमिट कळते, फार काही करता येण्यासारखं नसतं.. अशावेळी काय करायचं..?
तर मनातल्या मनात..त्या परिस्थिती मधील व्यक्तीला म्हणावं
"God bless u"!
तुम्ही म्हणाल यानं
काय होईल?.. खूप काही होऊ शकतं.. एक प्रकारे हा दुआ आहे, चांगली व्हायब्रेशन्स पाठवताय तुम्ही कोणालातरी !!! त्यामुळे
तुम्हालाही एकप्रकारे मनः शांती मिळते की मी काहीतरी चांगलं केलंय आणि बाकी मनापासून
दिलेला दुआ, भावना या पोचतात त्या व्यक्तीपर्यंत ! त्या व्यक्तीला याचा फायदाच होतो.
शिवाय आपल्या मनातली असहायता कमी व्हायला मदत मिळते, मन शांत होतं !
कधी आपलंच मन
अस्वस्थ असतं. ते त्रास देतं आपल्याला.. अस्वस्थतेची कारण काहीही असू शकतील.. पण असं
होतं किनई...? ..त्याही वेळी.. बस्स म्हणावं स्वतःलाच .. "God bless u!"
आणि बघा निदान त्या वेळेपुरत जे शांत होणं आवश्यक असतं ते होऊ
शकतं.. Again हा एक दुआ आहे. मनापासूनचा !
मग तो कुणासाठीही असो...
पोचणारच.. अगदी आपल्याला सुद्धा !!!
कधी-कधी मनात
Negetive Feelings तयार होत राहतात.. मग ती Jelousy असेल किंवा , दुसऱ्याच
Negative चिंतन करण, नावं ठेवणं असेल अथवा अजून काही नकारात्मकता.. दुसऱ्याबद्दल असं
काही Negative मनात येताक्षणी त्या व्यक्तीला मनातल्या मनात
" God bless u"
म्हणा !.. तुम्ही हे
करून पाहा.. नकारात्मकता हळुचपणे निघून जाईल मनातून.. आणि परत एकदा निर्मल आणि
Positive भावना खळाळून वाहायला लागतील..त्या व्यक्ती बद्दलची नकारात्मकता कमी व्हायला
मदत मिळेल.. नकारात्मक चिंतन हळूहळू कमी होत जाईल.
पहा ! गोष्ट करून बघण्याची आहे , प्रयोगाची आहे, हे उपयोगी
नाही , असं म्हणण्यासाठी तरी हा प्रयोग करून पहावा लागेल.. त्यात सातत्य हवं, Pure भावना बाळगून हे म्हणायला हवं..
प्रश्न कोणती भाषा वापरली,
शब्द वापरले हा नसून.. त्या क्षणी स्वतःच्या मनात चाललेल्या त्रासाबद्दल विचारांबद्दल Awearness असणं महत्वाचं.. तुम्हाला काही वेगळे
शब्द म्हणावे वाटले तर म्हणा , हरकत नाही..
पण मनापासूनच्या दुआ महत्वाचा.. मग तो स्वतःसाठी,
इतरांसाठी अगदी कुणाहीसाठी असू द्यात..
खूपदा मला रस्त्यात असणाऱ्या काही कुत्र्या, मांजराची
अथवा एखाद्या जखमी असणाऱ्या प्राण्यांची पक्ष्यांची दया येते .. मी आत्ता काहीच करू शकत
नाही ही खंत वाटते.. तेंव्हा मी आवर्जून
God bless u म्हणते अगदी मनापासून.. कधी-कधी भिकाऱ्याचं निरागस बाळ.. पाहून
अस्वस्थ वाटतं.. अनेकदा असं होतं रस्त्याच्या कडेला कुणाची गाडी सुरू होत नसते, तो
बिचारा माणूस प्रयत्न करत असतो.. मी रस्त्यात ट्रॅफिक मध्ये जर काही मदत करूच शकत नसेन..
तर पटकन दुआ मागते..
"God bless u म्हणते..या शब्दांना खूप अर्थ आहे, Power आहे,
चांगलं चिंतन आहे. कधी स्वतःलाच काही त्रास होत असेल तब्बेत ठीक नसेल तर त्यावेळीही
मी हा मंत्र म्हणते.. हो मंत्रच! कारण नेहमी वापरते, स्वतः साठी आणि इतर सगळ्यांना
दुआ पाठवत राहते..कुठंतरी मनाच्या कोपऱ्यात एक समाधान उरतं..
मनाची असहायता कमी होते, स्वतःच्या भावनां विषयक, जागरुकता राहते..
सगळ्यात महत्त्वाचं... कुणासाठी काही करायची मनातली इच्छा पूर्ण होते.. मला हा मंत्र गवसला.. खूप उपयोग होतोय.. म्हणूनच
तुम्हाला सांगितलंय
God bless u all.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा