मुलं टिपकागदा सारखी असतात
लहान मुल अनुकरणशील
असतं . त्याच्या
आजूबाजूच्या माणसांच्या वागण्या
.. बोलण्याच ते अनुकरण करीत असतं . आमचा छोट्या
बोलायला लागला तेच फर्ड हिंदी
; कारण त्याला सांभाळणारी
ताई हिंदी भाषिक होती . पुढे
ताई लग्न होऊन गेली आणि छोट्या हिंदी पूर्णपणे विसरला
. तो "" मिनी तुला सांगितलं , तुनी न्हाई
ऐकलं "' असं काहीतर निराळच
बोलायला लागला . त्याला
सांभाळायला आता एक मावशी येत होत्या !!!मुलं
टिपकागदा सारखी असतात ... सर्वकाही टिपत जातात . काय टिपायचं आणि काय नाही त्यांना समजत नाही .
आमचा
सगळ्यात छोटा बच्चू जेव्हां
अमेरिकेतून इकडे आला तेव्हां जेमतेम
दीड वर्षाचा पण झाला नव्हता . . त्याला धड त्याची भाषाही
बोलता येत नव्हती
तर आमची काय येणार . पण आम्ही सर्वच मराठी बोलत होतो ---- वातावरण पण मराठी
; परत जाई पर्यंत
तो " हो , नाही , बेटा
, शाब्बास , दे , घे " असे
बरेच सोपे सोपे शब्द बोलायला
शिकला होता .
त्याच्या देशात परत गेल्यावर , विमानतळावर त्याच्या
बाबाने ट्रोली वर सर्व ब्यागा ठेवल्या
... आणि .. वरचीच एक ब्याग निसटली
.. सगळ्या ब्यागा
अस्ताव्यस्त पणे खाली कोसळल्या .बच्चू
आधी त्या सावरायला
धावला ... हे आपल्या आवाक्यातल
नाही हे कळल्या
बरोबर , कमरेवर दोन्ही
हात ठेऊन उत्स्फूर्तपणे ओरडला
... "" आयचा घो ! ""
अमेरिकेच्या राजधानीची
भूमी , त्याने सणसणीत
मराठमोळ्या वाक्याने दणकाऊन
टाकली . आम्ही अवाक !! आणि आम्हाला
वाटत होत की ह्याला मराठी येत नाही
! पण चांगलंच
येत होत की
... नेमक्या वेळेला
नेमकं वाक्य !
तो काहीतरी
वेगळ बोलला आहे , हे आम्ही त्याला चेहऱ्यावरून
पण दर्शवलं नाही
. पुन्हा तो ते वाक्य कधीच बोलला
नाही . पण मला कळेना हा शिकला कुठून ?
. तसे आमच्या घरचे कोणी अगदी
धुतल्या तांदळा सारखे नाहीत
! पण
मुलां समोर काय बोलायचं काय नाही , येव्हढ
नक्कीच त्यांना कळत . सात
आठ महिन्या नंतर कधीतरी tv बघत असताना
माझ्या डोक्यात प्रकाश
पडला .
ही मंडळी
आली तेव्हां , "
शिक्षणाच्या आयचा घो
" हा सिनेमा
लागला होता . त्याचं
निराळ कथानक जरा घरात चर्चिल गेलं होत
.. त्या
वेळेला चालू असणाऱ्या
एका रियालिटी शो मध्ये , त्यातलं
गाण म्हटलं गेलं होत ... tv
वर आणखीन पण काही त्यावर
कार्यक्रम झाले होते
... बस इतकंच ! आम्ही सतत जे त्याला
शिकवत होतो ; त्यातलं
चिमूटभर त्याने उचललं
होत .... आणि पंधरा
वीस मिनिटं ऐकलेल्या
चर्चेतले मात्र नेमके शब्द उचलून
, नेमक्या वेळी .. नेमक्या
परिस्थितीत वापरून पण मोकळा झाला होता !!
मुलं म्हणजे
ना ... अगदी टिपकागदा
सारखी असतात ... काय
टिपायचं ... आणि
.. काय नाही
... त्यांना ... कळतच नाही ....... !!!!!!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा