Pages

सोमवार, ८ एप्रिल, २०१९

मौजे,खुर्द आणि बुद्रुक म्हणजे काय

                   मौजे,खुर्द आणि बुद्रुक म्हणजे काय



मौजे,खुर्द आणि बुद्रुक म्हणजे काय असा प्रश्न नेहमी पडायचा. याचा नेमका अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर पुढील माहिती समोर आली.

गांवाला ‘मौजे असंही आता पर्यंत म्हणत. हा शब्द विशेषतः पोस्टाच्या पत्त्यात असायचा हे मला पक्क आठवतयं. तर मित्रांनो, ‘मौजे हा शब्द ‘मौजअ वा ‘मौझा या मुळ अरबी शब्दावरून आला असून त्याचा ‘अरबी अर्थ ‘गांव असाच आहे.

खुर्द हा असाच एक फारसी भाषेतला शब्द. याचाही अर्थ गांवच परंतू लहान गांव. ‘खुर्द शब्दाचा आणखी एक अर्थ आहे आणि तो म्हणजे ‘सुटे किंवा किरकोळ पैसे. मोठ्या गावाच्या शेजारी वसलेली लहान वा किरकोळ वस्ती म्हणजे ‘खुर्द.

बुद्रुक हा शब्द ‘बुजुर्ग या फारसी शब्दाचा अपभ्रंश असून ‘बुजुर्ग म्हणजे मोठा किंवा थोर हे आपल्या सर्वांना माहित आहे..मुख्य किंवा मोठ गांव म्हणजे ‘बुद्रुक. शेजारी वसलेली किरकोळ वसती म्हणजे ‘खुर्द..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा