लेख : अपयश शिकायला हवे
Ravikant Kadam (Life coach & Trainer)
यश सर्वांनाच हवे असते आणि ते मिळाल्यावर खूप आनंद मिळतो हेही
खरे. यश म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्रत्येकाचे उत्तरही भिन्न असणार
हेही खरेच , परंतु थोडा बारीक विचार केला तर आपल्याला यश हे सहजासहजी प्राप्त होत नसते
, यशापेक्षा अपयश मात्र सहजासहजी मिळते आणि जास्त प्रमाणात आणि जास्त वेळा मिळते ,
अपयश मिळाल्यानंतर बहुतांश लोक दुःखी होतात आणि यश मिळाल्यावर आनंदी होतात , सर्वसाधारणपणे
हाच फॉर्म्युला सगळीकडे चालू असतो. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेत नाहीत की अपयश ही
गोष्टच मुळी अस्तित्वात नसते (हे पूर्णपणे माझे वैयक्तिक मत आहे आणि हे मी पुढे सिद्ध
करून दाखवत आहे) अपयश ही गोष्टच अस्तित्वात नाही कारण खरी समज ही आहे की अपयश हे अपयश
नसून तो एक प्रयोग असतो , शास्त्रज्ञ नवनवीन शोध लावतात आणि त्यांना अनेक प्रयोग करावे
लागतात त्यांनी जर असा विचार केला की 10 प्रयोग केले पण सारखेसारखे अपयश मिळत आहे तर
काय होईल याची कल्पना करून पाहा बरेच शोध लागले सुद्धा नसते. जीवन म्हणजे एक प्रयोगशाळा
आहे आणि मरेपर्यंत प्रयोग करत राहणे हेच आपल्या हातात आहे , एडिसनने एकाच शोधासाठी
हजारो प्रयोग केल्याचे सर्वांनाच माहीत आहे , तर मूळ मुद्दा असा आहे की आपणही महान
शास्त्रज्ञांसारखा दृष्टिकोन बाळगला आणि आपण जे काही करत असू ते प्रयोग ,
experiment म्हणून पाहिले तर खरी समज येईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा