आयुष्याची बॅलन्स शीट
नवीन आर्थिक वर्ष
सुरु झाले . मार्च एंडिंगची धावपळ होती . सगळे हिशेब पूर्ण करायचे होते . अनेक खाती
बंद केली, सुरु केली , काही पूर्ववत केली .सगळी धावपळ रात्रीच संपली .
मग उशिरा अगदी
शांतपणे बसून आणखी एक बॅलन्स शीट तयार करायची इच्छा झाली . ही बॅलन्स शीट होती, आयुष्याची
. बराच वेळ हिशेब लावण्याचा प्रयत्न केला तर, असं लक्षात आलं की, प्रेम, स्नेह, माया,
भावना आत्मियता, जिव्हाळा, कर्तव्य निष्ठा, बंधुभाव ही सगळी खातीच गायब आहेत. शिवाय
जी शिल्लक आहेत, त्या खात्यांवर बरयाच दिवसांत काही व्यवहारच झालेला नाही .
स्वतःलाच विचारून
पाहिलं, इतक्या वर्षात या खात्यांकडे का बरं दुर्लक्ष झालं असेल ? कुठला भ्रम होता,
कसला अहंकार ? आयुष्य धावपळीचं झालंय हे खरंच. पण निदान ही खाती सुरु ठेवण्या इतका
तरी वेळ काढायला हवाच होता ना. बँकेत जसं एखादया अकाउंटवर काहीच व्यवहार झाले नाहीत,
तर बंद करतात, तसं तर आपल्या आयुष्यात होणार नाही ना..!!
मंडळी अजूनही वेळ
गेलेली नाही, विसरून गेलेली, व्यवहार न झालेली ही प्रेमाची नात्यांची खातीही सुरु करुन
पहा. अहो, पुढच्या वर्षापर्यंत तुमच्या आयुष्याची बॅलन्स शीट नाही सुंदर झाली तर पहा
..!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा