अबोल माणूस- एक निर्जन
बेट......! क्लीन कम्युनिकेशन इज एॅन आर्ट....!
आपल्या जन्माच्या वेळीही
खणखणीत टाहो फोडून या जगात येणारा माणूस इतर प्राण्यांहून वेगळा ठरतो ते त्याला
निसर्गाने वरदान म्हणून दिलेल्या वाणी आणि वाचेने....ही त्यालाच दिलेली विशेषता आहे
कि त्याची जगाची समज जशी जशी वाढेल तशी तशी त्याला वाचेच्या मदतीने शब्द आणि वाक्य
रचना करता येते.....हत्ती .. घोडे ...वाघ सिंह या सगळ्या प्राणीमात्रात आणि त्याच्यात
इथे पहिली प्रगतीची फारकत होते.... आपल्या
शास्त्रात वाणीला "ब्रम्ह"..म्हटलं आहे....शब्द कधीच लोप पावत नाहीत....निसर्गात
चिरंतन राहतात... ध्वनी कानाने ऐकून त्याची वाचा आणि वाणी होणे हे प्रगत लक्षण आहे
...मानवाच्या मेंदूचे.
वाणी आणि वाचा याचा वापर जरी आपल्याला उपजत असला तरी कालमानाप्रमाणे
प्रत्येक माणूस त्याचा वापर निरनिराळा करताना दिसतो...जन्मापासून कळण्याच्या वयापर्यंत
उस्फुर्त असलेला हा प्रवास विचारांचे अडसर आले कि ठरतो कसा होणार ते...समज मग विचार
आणि मग स्वभाव जडण घडण...या पायर्यांनी पुढे जाणारा हा प्रवास बोलका आणि अबोल...मोकळी
वाणी कि दबका मितभाषी माणूस होणार हे ठरतं....स्वानुभव ...आजूबाजूचे वातावरण ...आणि
माणसाने माणसाला बोलण्याचे केलेलं मार्गदर्शन....याचा पहिला प्रभाव पडतो...मग पुढे
जाऊन बोलणे आणि त्याला मिळणार प्रतिसाद हे
ठरवतो कि त्याची बोलण्यात प्रगती होणार कि वाचा वापरायलाच तो माणूस घाबरणार....आणि तिथेच एक गाठ पडते....माणूस जेव्हा
शब्दांचा आधार घ्यायला घाबरतो तिथे त्याची उस्फुर्त विचार निर्मिती निराळा मार्ग घेते....वाचेला
विचारांचा आणि समजुतींचा अडसर येतो....बोलणे म्हणजे चूक ही धारा बनते ..एकतर अशी व्यक्ती
अगदी अबोल होते किंवा कटू बोलणारी होत जाते....तिथे रोखतो आहोत निसर्ग आपण हे त्या
व्यक्तीला कळते पण ते पत्करून ती अबोलपणा स्वीकारते
...अव्यक्त राहणे सुरक्षित वाटू लागते ... काम होतंय ना रोजचं..? मग कशाला बोलायचं..?
अशा मताचा पगडा ठाम होत जातो मनात....आणि मग ती व्यक्ती मनातही काही गोष्टी विचार करणे थांबवते....कुणी
काही बोललेच तरच ती काही बदल करते आपल्यात अन्यथा..चलने दो ...तत्वावर आयुष्य पुढे जातेच.... आम्ही अबोल असू
तर राहू देत आमचं काही अडत नाही.....हे ठाम होत जातं....पण अशा व्यक्तीच्या आजूबाजूच्या
व्यक्ती जर विरुद्ध ऊर्जेच्या निघाल्या तर
तिथे मग अडथळ्यांची शर्यत सुरु होते....अबोल आई आणि बोलकी मुले....अबोल वडील व बोलकी
आई...अबोल भाऊ व बोलकी बहीण...अशा जोड्या दिसतात आपल्याला...नवरा बायको या नात्यात
मात्र या सिद्धीचा कस लागू शकतो.... अबोलपणा हा निर्जन बेटा सारखा
असतो....तिथे सगळं असतं....पण नेमकी वर्दळ हरवलेली असते....आपली वाचा आणि वाणी जर आपल्याला
योग्य जागी मदत करत नसेल आणि हे आपल्याला जाणवत असेल तर यावर नक्कीच काही बदल होत जातो
पण जर लक्षात आलंच नाही किंवा लक्षात येऊनही मान्य केलंच नाही तर मात्र तो माणूस समृद्ध
असूनही आपल्या माणसांच्या मनाच्या स्टेशनवर
पोचत नाही....समोर दिसतो..जाणवतो..पण स्वच्छ वाणीचा माणूस जसा पारदर्शी नाती निभावत दुसऱ्यांनाही चांगले भाव देऊ शकतो तसा हा
माणूस देऊ शकत नाही....मनातले विचार जर शब्दात वापरू शकत नसू आपण तर नक्कीच कुठेतरी
वायरिंग अपूर्ण राहते आणि हवी ती ऊर्जा निर्माण होत नाही.....ऊर्जेचा नियमच आहे इथून
समोर गेली तर समोरून येते....म्हणजे यावी तरच ऊर्जेचे वर्तुळ पूर्ण होते....अन्यथा उदासीन ऊर्जा राहते तिथे......एका हरवलेल्या निर्जन
बेटासारखी.....! आपण माणूस आहोत....कुठल्याही
मार्गाने नीट व्यक्त झालो तर शरीराने आणि मनाने हेल्दी राहता येतं..... नक्कीच समृद्ध बेट होऊ....ऊर्जा छान वापरू....आणि सुदृढ राहू....क्लीन कम्युनिकेशन इज एन आर्ट....!
.शुभास्ते पंथानः..... #संगीताशेंबेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा