"ढ" मुलगा
पत्रलेखक आपल्या
अवतीभवती तर नाही ना.???
-------
(सर्व सुजाण पालक व
संवेदनशील शिक्षकांसाठी समर्पित..!)
----------------------------------------
पत्रलेखन:
१२वी मध्ये शिकणाऱ्या
एका "ढ"
विद्यार्थ्याचे आपल्या
वडीलास पत्र.!
-----------------------------------------
प्रति,
तीर्थरूप पप्पास,
साष्टांग दंडवत..!
पप्पा आज पत्र लिहायला घेतले, परंतू नेमकी कुठून
सुरवात करावी.? तेच कळत नाही. हिंमत करतो आणि पत्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो .
पप्पा.! माझा दहावीचा
निकाल लागला, आणि मला ८२% टक्के मार्क्स मिळाले . खरं सांगतो मला खूप आनंद झाला होता,
परंतू मला तो व्यक्त करता आला नाही.
कारण मला दहावीला ८२%
मार्क्स पडले आणि तुमच्या दोघांच्याही नजरेत मी गुन्हेगार झालो... 'ढ' झालो..!
तुम्हीच काय पण माझ्यावर
जीवापाड प्रेम करणारी माझी आईही पण खूप नाराज झाली. कारण तुम्हा दोघांनाही माझ्याकडून
९०% च्यावर मार्क्स पाहिजे होते, ते मी मिळवू शकलो नाही .
मला एक प्रसंग चांगला
आठवतो, मला दसऱ्याचा ड्रेस घेण्यासाठी आपण दुकानात गेलो होतो. मी मला आवडलेला एक ड्रेस
बाजूला काढला आणि तुम्हाला दाखवला . तुम्ही एकदम माझ्यावर चिडलात आणि जोरात ओरडलात
"मूर्खां लाज
नाही वाटत.!" ८२% मार्क घेतो आणि दोन हजार रुपायाचा ड्रेस घेतोस ?"
पप्पा.! अगदी खरं सांगतो,
मला खूप वाईट वाटलं होतं ! मला तत्क्षणी ड्रेसची किंमतच माहीत नव्हती, खरे तर मी रंग
आवडला म्हणून ड्रेस पसंद केला होता. पण असो , पुन्हा मला आवडीचे कपडे कधीच घ्यावेसे
वाटले नाहीत. त्यावेळेस पासून मी कधीही
" आवड सांगत नाही", फक्त तुम्ही घेतलेले कपडे घालतो.
मी नको म्हणत असतांनाही
तुम्ही मला Science side ला प्रवेश दिला. मला तुमच्या अपेक्षेप्रमाणे मार्क्स पडत नाहीत,
पण मी प्रयत्न करत राहतो. तरीही माझ्या सरांनी त्या दिवशी खूप छान समजून सांगितलं
!
आमचे सर म्हणाले, सर्वच
मुलं मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला कशी लागतील, परंतू तुम्ही ते समजून घेत नाहीत .
आमचे सर मला खूप खूप
आवडतात, कारण ते त्यांचा विषय तर छान शिकवतातच पण अधून मधून खूप छान संस्कार करतात
.
त्या दिवशी सर बोलता
बोलता म्हणाले, जग फक्त जिंकलेल्याचं स्वागत करतं ! हार-तुरे, मान-सन्मान फक्त जिंकणाऱ्याच्या
वाट्याला येतात. पराभव झाल्यावर, हरल्यावर, कुणीही जवळ घेत नाही.
म्हणून मित्र हो.!
जीव तोडून अभ्यास करा, प्रचंड मेहनत करा आणि यशस्वी होण्याचा प्रयत्न करा..!
आणि एवढ्यावरही तुमच्या
वाट्याला अपयश आलं, तुम्ही जर हारलात तर खचून जाऊ नका. शांतपणे घरी जा.
सर्व जगाने जरी दरवाजे
बंद केले, तरी तुमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे असतील ! सगळं जग जरी तुमचा धिक्कार
करत असेल, तरीही आईवडील तुम्हाला नक्की जवळ घेतील, ते हृदयाला कवटाळतील आणि म्हणतील
"बाळा तू काही काळजी करू नकोस!" "एक दिवस तू नक्की जिंकशील "
!
आणि दुर्दैवाने तसं
नाही झालं, तरीही काही काळजी करू नका , तुमच्या आई वडिलांनी जरी तुम्हाला दूर लोटलं,
घराचे दरवाजे बंद केले, तरीही काळजी करू नका, या गरीब शिक्षकाच्या घराचा दरवाजा तुमच्यासाठी
सदैव उघडा असेल !
कळत नकळत अनेक विद्यार्थ्याच्या
डोळ्याला धारा लागल्या आणि कडकडून सर्वांनी टाळ्या वाजवल्या .....
आपल्याला बाप मिळाला
म्हणून.
खरं सांगतो पप्पा,
तेंव्हा पासून मला माझे सर खूप जवळचे वाटतात. आणि मला आता अपयशाची भीती वाटत नाही
!
पप्पा "ढ"
मुलाला बाप आणि माय आता खरंच मिळणार नाही का हो ?
आपला,
लाडका नसलेला
"ढ" मुलगा
जीवन हे विफलच असायचे,
हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना, असे सारा वेळ वाटते.मानवांचे
प्रयत्न,आकांक्षा,वैर,मैत्री-सगळीच कशी उन्हाळ्याच्या वावटळीने उडविलेल्या पाचोळ्यासारखी
क्षुद्र, पोरकट भासतात; पण त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी ते प्रयत्न केले,आकांक्षा बाळगल्या,त्या
व्यक्ती अविस्मरणीय ठरतात, हृदयाला कायमचा चटका लावतात, प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट
परीपाकाकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रयस्थ वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो. त्या
व्यक्तीलाही तो जाणवला असला पाहिजे, हे महाभारत वाचताना इतक्या तीव्रतेने जाणवते कि,
त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वतःची व्यथा होते.त्या व्यक्तीच्या द्वारे सबंध
मानवतेचे दु:ख आपल्याला खुपत राहते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा