Pages

शनिवार, ३० मार्च, २०१९

उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!


उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!

उष्ण व थंड पदार्थ

कलिंगड             - थंड
सफरचंद             - थंड
चिकू                     - थंड
संत्री                     - उष्ण
आंबा                    - उष्ण           
लिंबू                    - थंड
कांदा                    - थंड
आलं/लसूण          - उष्ण
काकडी                 - थंड
बटाटा                   - उष्ण
पालक                   - थंड
टॉमेटो कच्चा         -  थंड
कारले                   - उष्ण
कोबी                    - थंड
गाजर                   - थंड
मुळा                     - थंड
मिरची                   - उष्ण
मका                     - उष्ण
मेथी                     - उष्ण
कोथिंबीर/पुदिना    - थंड
वांगे                      - उष्ण
गवार                  - उष्ण
भेंडी साधी भाजी    -  थंड
बीट                     - थंड
बडीशेप                 - थंड
वेलची                   - थंड
पपई                     - उष्ण
अननस                 - उष्ण
डाळींब                 - थंड
ऊसाचा रस बर्फ न घालता               - थंड
नारळ(शहाळ) पाणी - थंड
मध                  - उष्ण
पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर)             - थंड
मीठ                     - थंड
मूग डाळ               - थंड
तूर डाळ               - उष्ण
चणा डाळ             - उष्ण
गुळ                     - उष्ण
तिळ                    - उष्ण
शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण
हळद                 - उष्ण
चहा                  - उष्ण
कॉफी                - थंड
पनीर                - उष्ण
शेवगा उकडलेला - थंड
ज्वारी                - थंड
बाजरी/नाचणी      -उष्ण
आईस्क्रीम          - उष्ण
श्रीखंड/आम्रखंड  - उष्ण
दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही)  - थंड
फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण
फ्रिज मधिल पाणी - उष्ण
माठातील पाणी   -   थंड
एरंडेल तेल      - अती थंड
तुळस         - थंड
तुळशीचे बी - उत्तम थंड
सब्जा बी  -  उत्तम थंड
नीरा           - थंड
मनुका      - थंड
पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण
हॉट ड्रिंक सर्व    - उष्ण
कोल्डरिंग सर्व    - उष्ण
मास/चिकन/मटण- उष्ण
अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड
उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .

वपुर्झा..

वपुर्झा..

माणूस जन्मभर सुखामागं, ऐश्वर्या मागं धाव धाव धावतो. पण ह्या धडपडीत तो सुखी नसतो, आणि धडपड यशस्वी ठरून, हवी ती वस्तु मिळाल्यावरही तो सुखी नसतो. ह्याचं कारण तो निर्भयता शिकत नाही. नेहमी माणसाला कशाची ना कशाची सातत्याने धास्ती वाटत राहते. तो जर निर्भय व्हायला शिकला तर जीवनातली गोष्ट नव्याने समजेल. माणसं, नद्या, डोंगर, समुद्र, सगळ्यांचा अर्थ बदलेल. आकाशाकडे सगळेच बघतात. पण त्रयस्थासारखं! म्हणूनच ते जरा भरून आलं किंवा विजेचा लोळ कोसळतांना दिसला की माणसं पळत सुटतात. आकाशाकडे पाहायचं ते आकाश होऊन पाहावं म्हणजे ते जवळचं वाटतं. ‘विराट ह्या शब्दाला अर्थ तेव्हा समजतो. ‘अमर्याद शब्द पारखायचा असेल तर समुद्र पहावा. ‘विवधता शब्द समजून घ्यायचा असेल तर ‘माणूस पहावा. पण तोही कसा, तर आतुन आतुन पहावा. मग माणसांची भीती उरत नाही. अगदी हलकटातला हलकट माणूस देखील हलकट म्हणून आवडतो. जीवनावर, जगावर, जगण्यावर असं प्रेम केलं म्हणजे सगळं निर्भय होतं. उपमा द्यायची झाली तर मी विजेचीच उपमा देईन. पॄथ्वीची ओढ निर्माण झाली रे झाली की ती आकाशाचा त्याग करते. पॄथ्वीवर दगड होऊन पदते. पण पडण्यापासून स्वत:ला सावरत नाही आणि तेजाचाही त्याग करीत नाही. प्रेम करताना माणसानं ही असं तुटून प्रेम करावं. डोळे गेले तरी चालतील पण नजर शाबूत हवी. स्वर नाही सापडला तर नाही, पण नाद विसरणार नाही, पाय थकले तरी बेहत्तर पण ‘गतीची ओढ टिकवून धरीन, ही भूक कायम असली की झालं! आयुष्यात ही भूक जिवंत ठेवावी आणि निर्भयतेने पुरी करीत राहावं.
~ वपु काळे | वपुर्झा..


आईची माया



पहिल्या पावसात बाळाचं अल्लडपणानं भिजणंआईनं ते खिडकीतून कौतुकानं पहाणंआता बास!!! नाहीतर आजारी पडशील म्हणून ओरडणंतरीपण बाळाचंb आपल्या चिमुकल्या ओंजळीत पावसाचं पाणि साठवणंसाठवलेलं पाणी आईच्या अंगावर उडवण,आईनं रागानं वटारलेले डोळे बघुन न बघितल्या सारखं करणंपुन्हा दंग होऊन चिमुकल्या पावलांनी पावसात थिरकणंआईनं ते खिडकीतून कौतुकानं पहाणंआता बास!!! नाहीतर आजारी पडशील म्हणून ओरडणंपावसातच बसुन कागदि होडया वाहत्या पाण्यात सोडणं,छत्री उलटी धरुन पडणाऱ्या गारा त्यात वेचण,एका हातात गारा आणि एका हातात होडी धरून, एका डॊळ्यानं बाळाचं आईकडं बघणंआईनं ते खिडकीतून कौतुकानं पहाणंआता बास!!! नाहीतर आजारी पडशील म्हणून ओरडणंपावसाचं थांबणं,चिंब भिजून बाळाचं घरात येणं,खोट्या रागानंच आईन एक धपाटा घालणं,बाळाचं नाराज होणं आणिपाचच मिनीटात आईला जाउन बिलगणं,लाडानच "आई भुक लागलीये" म्हणणंगरम दुधाच्या पेल्यातबिस्किट बुडवुन खाताना टेबलावरइवलुशी मांडी घालुन बसलेल्या बाळाचं गोंडस दिसणं,छोटसं नाक उडवत, तोंडात बिस्कीट ठेऊनबाळाचं आईकडं बघून हसणंअसच चाललं अनेक वर्ष...खिडकी तीच राहिली... आईची माया तीच राहिली...पाऊस तसाच पडत राहिला...पण बाळ मात्र बदलत गेलं...हेच बाळ आता मोठं झालय...खूप शिकून परदेशात गेलय....आई मात्र तिथच राहिलीये...इतके दिवस बाळात रमणारी आई ,आता दासबोध, ज्ञानेश्वरीत जीव रमवतीये,पहिला पाऊस येताच, त्याच खिडकीत येऊनपावसात नाचणाऱ्या बाळाला शोधतीये...पणबाळ आता मोठं झालय...खूप शिकून परदेशात गेलय....खिडकी तीच राहिली... आईची माया तीच राहिली...पाऊस तसाच पडत राहिला...पण बाळ मात्र बदललय...परदेशातच सेटल होण्याच्या गोष्टी करु लागलय,भुताच्या गोष्टी ऎकत, घरभर नाचत खाल्लेल्याआईच्या हातच्या वरण-भाताचा घास त्याला डाचू लागलाय,परदेशातला पिझ्झा-बर्गरच त्याला जास्त आवडू लागलायपा

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

" पदर "



स्त्रिचा पदर 🌹••
खुप छान मेसेज नक्की वाचा

    👉🏻 पदर  काय  जादुई  शब्द  आहे 
           हो  मराठीतला !

काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार  नाही.  एक  सरळ  तीन
             अक्षरी  शब्द.

       पण  केवढं  विश्‍व
   सामावलेलं  आहे त्यात....!!

 किती  अर्थ,
किती  महत्त्व...
 काय  आहे  हा  पदर.......?

साडी नेसणाऱ्या  स्त्रीच्या  खाद्यावर
रुळणारा  मीटर  दीड मीटर  लांबीचा
भाग.......!!

तो   स्त्रीच्या  लज्जेचं   रक्षण  तर
करतोच,
सगळ्यात  महत्त्वाचं  हे
कामच   त्याचं.
पण,
आणखी   ही
बरीच  कर्तव्यं  पार  पाडत  असतो.

 या   पदराचा   उपयोग  स्त्री  केव्हा,
    कसा  अन्‌  कशासाठी  करेल,
        ते  सांगताच  येत  नाही.

सौंदर्य  खुलवण्यासाठी सुंदरसा
पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात   तर   छान-छान
पदरांची जणू स्पर्धाच लागलेली
असते.
सगळ्या  जणींमध्ये चर्चाही
 तीच. .....!!

लहान  मूल  आणि
आईचा  पदर,
हे   अजब  नातं  आहे.
मूल  तान्हं
असताना आईच्या पदराखाली
जाऊन  अमृत  प्राशन करण्याचा
 हक्क   बजावतं. .....!!

जरा  मोठं  झालं,  वरण-भात  खाऊ
 लागलं,
की  त्याचं  तोंड  पुसायला
आई  पटकन  तिचा  पदर  पुढे  करते
....

मूल   अजून   मोठं   झालं,   शाळेत
 जाऊ  लागलं,  की  रस्त्यानं  चाल-ताना  आईच्या पदराचाच आधार लागतो.
एवढंच   काय,
जेवण
 झाल्यावर  हात  धुतला, की  टाॅवेल
ऐवजी  आईचा  पदरच  शोधतं आणी  आईलाही  या  गोष्टी   हव्याहव्याशा
वाटतात  मुलानं पदराला  नाक जरी
पुसलं,
तरी  ती  रागावत  नाही ...

त्याला  बाबा  जर रागावले, ओरडले
तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच  सापडतो.....!!

महाराष्ट्रात  तो  डाव्या खांद्या  वरून
 मागे   सोडला  जातो.....!!

तर  गुजरात,
मध्य प्रदेशात
उजव्या खांद्यावरून
पुढं मोराच्या.
 पिसाऱ्यासारखा   फुलतो ....!!

काही   कुटुंबात   मोठ्या   माणसांचा
 मान  राखण्यासाठी   सुना  पदरानं
चेहरा  झाकून  घेतात ..
 तर  काही  जणी  आपला   लटका ,
राग
दर्शवण्यासाठी मोठ्या
फणकाऱ्यानं पदरच   झटकतात !

     सौभाग्यवतीची  ओटी भरायची
ती  पदरातच  अन्‌  संक्रांतीचं   वाण
 लुटायचं ते  पदर  लावूनच.

बाहेर   जाताना   उन्हाची   दाहकता
थांबवण्यासाठी  पदरच  डोक्यावर
ओढला  जातो,
तर  थंडीत  अंगभर
पदर
लपेटल्यावरच छान  ऊब
मिळते....!!

काही   गोष्टी लक्षात   ठेवण्यासाठी
पदरालाच  गाठ  बांधली   जाते .
अन्‌ नव्या नवरीच्या
जन्माची गाठ ही नवरीच्या   पदरालाच,
नवरदेवाच्या  उपरण्यासोबतच
बांधली   जाते.....!!

पदर   हा   शब्द   किती   अर्थांनी
 वापरला  जातो  ना.....?

नवी.  नवरी नवऱ्याशी बोलताना
पदराशी चाळे करते,
पण संसाराचा
संसाराचा  राडा  दिसला,
की  पदर
कमरेला  खोचून
कामाला लागते

देवापुढं आपण चुका कबूल  करताना म्हणतोच  ना .....?
माझ्या   चुका  " पदरात "  घे.‘

मुलगी मोठी  झाली, की आई तिला
साडी   नेसायला   शिकवते,
 पदर
सावरायला शिकवते   अन्‌   काय
 म्हणते  अगं,
चालताना  तू  पडलीस
 तरी  चालेल. ....!!

पण,  " पदर "  पडू   देऊ   नकोस !
अशी आपली
भारतीय संस्कृती.

 अहो  अशा  सुसंस्कृत आणी सभ्य
मुलींचा विनयभंग तर  दुरच्  ती.
रस्त्यावरून चालताना लोकं
तिच्याकडे वर नजर करून  साधे पाहणार ही नाहीत..
 ऊलटे तिला वाट देण्या साठी  बाजुला सरकतील एवढी  ताकत  असते  त्या  "पदरात" ....... !!

ही आहे आपली भारतीय संस्कृती

🌺 स्त्री चा आदर करा

कृतज्ञतेची शक्ती


कृतज्ञतेची शक्ती

एका श्रीमंत म्हाताऱ्याला वाटत माझा सांभाळ करणारी मुलं आज माझ्याकडे असती तर...
एका गरीबाला वाटत या म्हताऱ्या सारखा मी श्रीमंत झालो तर...
एका जाड्या स्त्रीला वाटत की आपण समोरच्या मुलींसारखं झिरो फिगर असतो तर...
झिरो फिगर असणाऱ्या मुलीला वाटत त्या स्त्रीच्या गळ्यात असणाऱ्या हिऱ्याचा हार माझ्या गळ्यात असता तर...
केस नसणाऱ्या टक्कल पडलेल्या माणसाला वाटत मला छान केस असते तर...
त्या स्त्री सारखी बायको मला बायको म्हणून मिळाली असती तर...

असे किती तरी जर तर आपण रोज आपण अनुभवत असतो आणि स्वतःला नाराज करून घेत असतो,दिवसाच्या शेवटी फक्त आपल्याला पाहिजे ते न मिळाल्याची नाराजी छळत असते.सुखी जीवनात ही अशी असमाधानाची बेट उगवत राहिली की मग आहे हेही गोड लागत नाही, सतत लक्ष जे आपल्याकडे नाही अशा गोष्टीवर केंद्रित होत. मग हळूहळू मनःशांती भंग होत जाते.

जर आपण एखाद्याला विचारलं की मनःशांती मिळविण्यासाठी तुम्ही काय कराल तर बऱ्याच जणांचं उत्तर असेल परदेशी दौऱ्यावर जाईल किंवा मला हवी ती गोष्ट करील.परंतु खर तर कोणत्याही तात्पुरत्या उपायाने कोणालाच मनःशांती मिळू शकत नाही.नवी गाडी घेतली,बंगला घेतला किंवा परदेशी टूरला जाऊन आलात तर खरंच आपण आनंदी असतो का? अशा गोष्टीने खरंच मनःशांती मिळते का? तर उत्तर असेल तात्पुरती. कारण ही सर्व क्षणिक सुख आहेत,जोपर्यंत  उपभोगतो तोपर्यंत समाधानी एकदा संपली की परत "येरे माझ्या मागल्या".

खरी मनःशांती मिळविण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगणं.जे काही तोडक मोडक तुमच्या जवळ असेल त्याबद्दल समाधानी असलं की मग दुःख दूर असतात.आहे ह्या क्षणाला मी श्वास घेतोय,दोन्ही डोळ्यांनी हे जग बघू शकतोय, पोटभर अन्न पोटात जातंय यासारखं आणखी कोणतं वेगळं सुखं मला श्रीमंत होण्याने, किंवा सर्व गुण संपन्न असण्याने मिळणार आहे? त्यामुळे जे आपल्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगली तर कोणीही आपली मनःशांती भंग करू शकत नाही.जास्तीत जास्त गोष्टी मिळवल्याने कधीच मनःशांती लाभत नसते उलट जास्तीच्या मागण्या वाढतात हे मात्र नक्की.

जी साधन ,माणस, मित्र व संपदा आपल्या जवळ आहे त्याबद्दल निःसंकोचपणे कृतज्ञता ठेवली तर आपण आपल्या अपेक्षा व इच्छाना मुरड घालतो ज्यामुळे अनावश्यक हव्यास गळून पडतो, जो कुठे तरी मागणी पुरवठा या गोष्टीला कारणीभूत असतो.लोक ज्या गोष्टी त्यांच्याकडे नाहीत त्याबद्दल सतत तक्रार करत राहतात, या तक्रारी मरेपर्यंत संपत नाहीत,तक्रारी जशा वाढत जातात तशा बऱ्याच गोष्टी मनाला पटत नाहीत मग तक्रारींच हे चक्र उत्तरोत्तर मोठमोठ होत जातं,ज्यात आपली मनःशांती नाहीशी होऊन जाते,जगण्याचा उद्देश हरवून बसतो.

सुखी आनंदी जीवनासाठी जे आपल्याकडे आहे त्यासाठी आभार मानून,वर्तमानात कृतज्ञतेने जगणं हेच मनःशांती टिकवण्याचा सर्वात सोप्पा उपाय आहे,जो भल्याभल्याना मरून ही कळलेला नसतो.

न सांगितलेली प्रेमकहाणी....



न सांगितलेली प्रेमकहाणी....
शब्दरचना:- अजय चव्हाण
तिला पहिल्यांदा कधी पाहीलं हे आता आठवतं नाही...पण ती दिसायची नेहमीचं...कदाचित तिची नि माझी वेळ एक असावी...मला अजुनही आठवतंयं जेव्हा पहिंल्यादा मला तिच्याबद्दल काहीतरी जाणवलं...
मी नेहमीसारखाच ठराविक रांगेत मेट्रोची वाट पाहत घाटकोपर स्टेशनला उभा होतो... सकाळची मस्त प्रसन्न वेळ, हवेतला गारवा थोडासा अंगाला झोंबतोय ...आजुबाजुला थोडी हालचाल आहेच पण त्यात इतरवेळी असते तशी चढाओढ नाहीये...एकदम शांतही नाहीये की, एकदम गडबडही नाहीये..कानातल्या हेडफोनमध्ये माझ्या आवडत्या गाण्याचे "आओगे जब तुम साजना, अंगना फुल खिलेंगें" सुर मनात फिल करतोय..सहज बाजुच्या रांगेत लक्ष जातं..समोरचं असलेल्या दोन इमारतीच्या फटीतुन वाट काढून कोवळी किरणे फलाटाच्या कडेला येऊन धडकू पाहतायेत...त्यातलीच काही किरणे तिच्या आंबुस- पिवळ्या पंजाबी सुटवर सांडलेली...मुळात पिवळा असलेला तिचा पंजाबी सुट सांडलेल्या किरणांमुळे सोनेरी भासतोय आणि हातभर असलेल्या गर्दीत ती जरा जास्तच उठून दिसतेय...हेच कारण असावं माझं लक्ष तिकडे जायला..ओढणी केसांवरून ओढून गळ्याभोवती व्यवस्थित सरकवलेली, एका हातात मॅचिंग पर्स, दुसर्या हातात मोबाईल, मी तिचं निरीक्षण करू लागलो... मेय बी तिला कळलं असावं... तिन झटकन वळून माझ्याकडे पाहीलं...बस् हीच ती वेळ तिची नजर माझ्या नजरेत कैद होण्याची..त्या नजरेत नक्कीच काहीतरी होतं.. काय होतं ते माहीत नाही पण मी वाहवत जात होतो...त्या सुरांचे परिणाम की, आणखी कसले ते नाही कळलं तेव्हा पण मनाच्या अंगणात नक्कीच तेव्हा फुले फुलली होती...
एव्हाना मेट्रो आली..आणि नेमकं मला तिच्या समोरच्या सीटवर जागा मिळाली...मी अजुनही तिच्याकडे पाहतोय..हे तिला कळतं होतं.. ती जाणुनबुजुन दुर्लक्ष करत होती....केसांवरची ओढणी तिने काढून केस मोकळे केले..अहाहा!...काय केस आहेत तिचे अगदी " इन जुल्फे के घने सायें में मै जिंदगी बिता लू "इतपत म्हणण्यापर्यंत...मी उगाचच घने सायें में हरवल्यासारख्या तिच्याकडे पाहतोय...गोरा उभट चेहरा,काळेशार पाणीदार डोळे, हनुवटीच्याखाली असलेला लोभस तिळ,खरंच ही म्हणजे माझ्या स्वप्नातलीच....इतकी सुंदर बरं नुसती सुंदरच नाही तर कसालाही कृत्रिम डामडौल नाही, राहणीमान एकदम साधं, कुठेच कसलाच "मी आहे" हा दिखावा नाही..खरंतरं मगाशी मेय बी मी तिच्या रूपाकडे आकर्षित झालो असेल पण खरंतरं तिच्या साधेपण्याच्या प्रेमात मी पडलो होतो... मी एकटक तिच्याकडे पाहत कसलातरी विचार करतोय हे ती मोबाईल समोर धरून चॅटिग करत असल्याचा आव आणत पाहत होती....इतक्यात "मरोळ नाका स्टेशन "अशी अनाऊसमेंट झाली तसा मी भानावर आलो आणि घाईघाईतच उतरलो...सरकत्या जिन्यावरून उतरत असताना वेळ आणि तो मेट्रोचा तिसरा डबा ह्याची नोंद माझ्या मनाने केली...मग त्याच वेळेला त्याच रांगेत बरेच दिवस "ती " दिसण्याची वाट पाहीली...पण नाहीच दिसली ती कधी....कदाचित कुठेतरी वरच्याला हे मंजुर नसावं असं समजुन मी ही तिचा विषय सोडून दिला तसंही म्हणतातच ना " मनासारखं झालं तर चांगलच आहे आणि नाहीच झालं तर अजुन चांगल आहे कारण ती ईश्वराची ईच्छा असते"
माझ्याबाबतीत नेहमी असं का होतं हा प्रश्न मला नेहमीच पडतो...म्हणजे बघा ना एखादी गोष्ट जेव्हा मला हवीहवीशी वाटते आणि ती मी मिळवण्याचा अटोकाट प्रयत्न करतो तेव्हा ती मला कधीच मिळत नाही पण तिच गोष्ट माझ्या ध्यानीमनी नसताना किंवा अपेक्षाच नसताना अलगद अगदी सहजतेने भेटते उदाहरण द्यायचं झालं तरं त्यादिवशीचीच गोष्ट तिच्या प्रेमात पडल्यानंतर तिला परत पाहण्यासाठी खुप प्रयत्न केला मी जवळपास साडेतीन आठवडे मी त्याच वेळेला त्याच रांगेत तीची वाट पाहीली तेव्हा नाही दिसली मला कधी ती..पण त्यादिवशी जेव्हा तिची वाट पाहणं मी सोडून दिलं होतं तेव्हा नेमकी मला "ती" दिसली...खरंतरं माझ्या मनातलं प्रेमाचं गुलाब कोमेजून गळूनच पडणार होतं तेवढ्यातच गारगार पाण्याच्या शिडकाव्याने ते पुन्हा टवटवीत झालं....मनात पुन्हा एक आशा निर्माण झाली...कदाचित त्या वरच्या रबला पण हेच हवं असेल...
सुट्टीचे दिवस वगळता हल्ली "ती" रोजच दिसते..मी नेहमीच पाहतो तिला एकटकं..तिच्याकडे पाहील्यानंतर हरखुनच जातो मी..आजुबाजुचा गोंगाट कानात घुसतचं नाही...कानात गुंजतात तेव्हा फक्त " आओगे जब तुम साजना अंगणा, फुल खिलेंगे" ह्या गाण्याचे सुर...मनातलं गाणं सालं हे संपतचं नाही...कधी कधी असं पिसासारखं हलकं हलकं वाटत...आकाशात उडतोय असा भास होतो...
" नैना तेरे कजरारे है, नैनो पे हम दिल हारे है..
अंनजाने है तेरे नैनो ने वादें किए कही सारे है"
जेव्हा जेव्हा माझे डोळे तिच्याकडे बघतात...तेव्हा तेव्हा माझे डोळे तिच्या डोळ्यांना हेच सांगत असतात..
तिला डे वनपासून माहीतेय मी तिच्याकडे पाहतो ते... तीही माझ्याकडे पाहते...बोलत काहीच नाही, हसतही नाही, ओळख असल्याच्या खाणाखुणाही नाही, पण तिचे डोळे माझ्या डोळ्यांना चांगले ओळखात....हे तिलाही माहीतेय ...शी कान्ट डिक्लाईन दॅट..
एक वर्ष झालं डोळ्यांनीच पाहतोय तिला...कधी कधी वाटतं समोर जाऊन सांगावं तिला मनातलं सारं...पण भीतीही वाटतेय..कसं सांगाव आणि कुठे सांगावं हा ही प्रश्न आहेच..पण प्रयत्न करायला काय हरकत आहे...अखेर थोडीशी हिंमत करून मी विचारायचं ठरवतो पण त्याअगोदर एक करायला हवं..तिचंसुद्धा मन बघायला हवं त्या अनुषंगाने दुसर्या दिवशी मी तिच्यासमोर जातचं नाही...ती त्याच रांगेत उभी आहे..तिलाही मला पाहण्याची सवय आहे का नाही हे पाहायचं...जसं तिला उशीर झाला की, मी थांबतो ती थांबते का हे बघायला हवं...हा विचार करून मी लांब उभं राहून ऑब्जर्व करतोय..बघु आता मला शोधते का..ती खरोखर मला शोधतेय..मला उशीर झाला असेल असं समजुन तिने चक्क दोन मेट्रो सोडल्या..
मला माझ्या प्रश्नाचं उत्तर न विचारताचं मिळालं..खुप आनंदी होतो मी त्या दिवशी..ह्रद्याच्या खिशात ढग भरले होते तेव्हा...एक उंच उडी मारून "याहु" करावसं वाटलं पण सावरलं स्वतःला...उद्या विचारूच असं ठरवून मी माझा प्रपोज एक दिवस पुढे ढकलला...
दुसर्या दिवशी मस्त एक गुलाब घेऊन त्याच रांगेत उभा राहीलो तिची वाट पाहतं....
ती नाही आली....
1 वर्ष 3 आठवडे 4 दिवस झाले...ती परत कधी दिसलीच नाही...एका पाऊलावर जग होतं माझं..एक पाऊलही मला पुढे टाकता आलं नाही...तेव्हा विचारलं असतं तर?? ह्या गोष्टी आता फक्त जर तरच्या झाल्या...आता काहीच अर्थ नाही ह्या गोष्टीला...तिला घेतलेलं ते गुलाब अजुन तसंच आहे माझ्या त्या कवितेच्या पानांवर....कोमजलं जरी असलं तरी त्यातल्या भावना अजुन तशाच आहेत न कळवलेल्या आणि त्या कवितेचे शब्देही आहेत तसेच तुझ्या आठवणीतले....
"एक मंद झुळुक कुठनशी येते..मन वाहवत जाते...नकळत एक नवे स्वप्नांकुर फुलते..मन उंच उंच भरारी घ्यायला लागते.. रोज एक नवी आस लागून राहते..कुठेतरी ती वाट संपते आणि आठवणीच्या पाऊलखुणा ठेऊन मन पुन्हा परतते..."
समाप्त....

आत्मविश्वास


एक व्यावसायिक कर्जात बुडाला होता आणि त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग त्याला सुचत नव्हता. Creditors (धनको) त्याच्या घरी वारंवार चकरा मारीत होते आणि पुरवठादार बिलाच्या रकमेचा तगादा लावून होते.

असाच तो एका बगिच्यातील बेंचावर डोके हातांनी धरून बसला होता. या कर्जाच्या सापळ्यातून वाचण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा, असे त्याला खूप वाटत होते. अचानक एक वृद्ध त्याच्यासमोर उभा झाला. मला वाटते तू खूप अडचणीत आहेस, मला वाटते मी तुला मदत करू शकतो. वृद्धाने त्याला नाव विचारले आणि एक चेक लिहून त्याच्या हाती दिला. हे पैसे घे. आजपासून बरोबर एका वर्षानंतर मला याच ठिकाणी भेट आणि त्यावेळी ही रक्कम मला परत करशील, असे म्हणून तो वळला आणि वेगाने दिसेनासा झाला.

व्यावसायिकाने हातातील चेककडे पाहिले. तो 5 लाख डॉलर्सचा होता. खाली सही होती जॉन डी. रॉकफेलर, जगातील सर्वांत श्रीमंतापैकी एक. या रकमेतून माझे कर्ज चुटकीसरशी संपेल, व्यावसायिक पुटपुटला. परंतु त्याऐवजी व्यावसायिकाने तो चेक न वटविता तसाच ठेवून दिला. आता आपल्याजवळ 5 लाख डॉलर्सची रक्कम केव्हाही तयार आहे, या आत्मविश्वासाने तो कामाला लागला. नव्या उमेदीने तो कारभार बघू लागला. त्याने आधीच्या करारांना पुन्हा वाटाघाटी करून फायदेशीर

करून घेतले आणि पैसे देण्याची मुदतही वाढवून घेतली. काही मोठे करार रद्द केले. काही महिन्यातच, तो कर्जाच्या सापळ्यातून बाहेर आला आणि पुन्हा कमाई करू लागला.

बरोबर एका वर्षानंतर तो त्याच बागेत न वटविलेला चेक घेऊन आला. ठरल्याप्रमाणे तो वृद्ध तिथे पुन्हा उपस्थित झाला.

व्यावसायिक त्याला त्याचा चेक देणार आणि आपली यशाची गाथा सांगणार तेवढ्यात एक नर्स तिथे धावत धावत आली आणि तिने त्या वृद्धाला घट्ट पकडले. चला, शेवटी तुला पकडलेच, ती ओरडून व्यावसायिकाकडे बघून ती नर्स म्हणाली, ययाने तुम्हाला जास्त त्रास तर नाही ना दिला? हा नेहमी मनोरूग्णालयातून पळून जात असतो आणि लोकांना सांगतो की मी जॉन रॉकफेलर आहे म्हणून. ङ्ख असे म्हणून तिने त्या वृद्धाला ओढत नेले. व्यावसायिक थक्क होऊन हे सर्व बघत होता. त्याला काहीच कळेनासे झाले. गेले वर्षभर आपल्याजवळ 5 लाख डॉलर्स रक्कम केव्हाही तयार आहे, या थाटात तो करार करीत होता. अचानक त्याच्या लक्षात आले की, त्याचे आयुष्य बदलवून टाकणारी ही किमया खऱ्या किंवा अस्तित्वात नसलेल्या त्या रकमेची नव्हतीच. तो त्याला नव्याने गवसलेला आत्मविश्वास होता. त्यानेच त्याला कर्जाचा डोंगर उपसण्याची शक्ती दिली होती.

तात्पर्य-आत्मविश्वासाने कोणतेही कार्य केल्यास यश हे हमखास मिळते.

शिमगो



हे बारा गावच्या,बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा टोरा, म्हातारे कोतारे, मिळान साजारो करतत, त्यांचो तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा आसात ता दूर कर रे म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

कोणी काय कोणावर वाकडा नाकडा केला आसात तर ता भायेरच्या भायर निघान जाऊं दे रे म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

कोणाक पाॅर हायत नसात तर त्याका पोरा होऊ दे, काम धंद्यात सर्वांका यश दे, पोरा टोराक शिक्षणात यश दे, कोणाचा लगिन जुळत नसात तर ता तुझ्या कृपेन जमानदे रे म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

हे देवा म्हाराजा आज जो काय महाराष्ट्रात दुष्काळ पडलो हा, त्याचो तू नाय नाट कर आणि तुझ्या कृपा दुष्टीने भरभरून पाणी दे रे म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

हे देवा म्हाराजा आणि जो काय आजकाल पोरीटोरींवर अत्याचार होतंत आणि जे करतत त्यांचो नाय नाट कर रे म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

ह्या बगा देवाक मी नारळ देऊन सगळ्यांच्या वतीने गाराणा घातलय.

चला आता सगळ्यांनी पाया पडा आणि शिमगो खेळाक येवा.

आपणा सर्वांना शिमग्याच्या मनःपुर्वक शुभेच्छा

हत्ती




एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला.

काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.

 वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली.

कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता.

 त्याने राजाला असा सल्ला दिला,"महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले,

सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला.

 त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.

ध्यानात ठेवा

निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.

 जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते ..

आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते....!

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा