एख्याद्याच्या सहवासाने,बोलण्याने बरं वाटत. दुःखाला सामोरे जाण्याला हिम्मत येते. स्वतः मधील सुप्त शक्तीची जाणीव होते. आणि मग पुन्हा एकदा नव्या उमेदीने आपण जीवन जगायला, संकटांना सामोरे जायला तयार होतो. या ब्लॉग च्या माध्यमातून मला आवडलेले विचार तुमच्याशी शेअर करून हीच भूमिका निभावण्याची प्रयत्न करीत आहे.
Pages
सोमवार, १ एप्रिल, २०१९
हाही क्षण निघून जाईल
शनिवार, ३० मार्च, २०१९
उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!
वपुर्झा..
वपुर्झा..
माणूस जन्मभर सुखामागं, ऐश्वर्या मागं धाव धाव धावतो. पण ह्या
धडपडीत तो सुखी नसतो, आणि धडपड यशस्वी ठरून, हवी ती वस्तु मिळाल्यावरही तो सुखी नसतो.
ह्याचं कारण तो निर्भयता शिकत नाही. नेहमी माणसाला कशाची ना कशाची सातत्याने धास्ती
वाटत राहते. तो जर निर्भय व्हायला शिकला तर जीवनातली गोष्ट नव्याने समजेल. माणसं, नद्या,
डोंगर, समुद्र, सगळ्यांचा अर्थ बदलेल. आकाशाकडे सगळेच बघतात. पण त्रयस्थासारखं! म्हणूनच
ते जरा भरून आलं किंवा विजेचा लोळ कोसळतांना दिसला की माणसं पळत सुटतात. आकाशाकडे पाहायचं
ते आकाश होऊन पाहावं म्हणजे ते जवळचं वाटतं. ‘विराट’ ह्या शब्दाला अर्थ तेव्हा समजतो. ‘अमर्याद’ शब्द पारखायचा असेल तर समुद्र पहावा.
‘विवधता’ शब्द समजून घ्यायचा असेल तर ‘माणूस’ पहावा. पण तोही कसा, तर आतुन आतुन पहावा.
मग माणसांची भीती उरत नाही. अगदी हलकटातला हलकट माणूस देखील हलकट म्हणून आवडतो. जीवनावर,
जगावर, जगण्यावर असं प्रेम केलं म्हणजे सगळं निर्भय होतं. उपमा द्यायची झाली तर मी
विजेचीच उपमा देईन. पॄथ्वीची ओढ निर्माण झाली रे झाली की ती आकाशाचा त्याग करते. पॄथ्वीवर
दगड होऊन पदते. पण पडण्यापासून स्वत:ला सावरत नाही आणि तेजाचाही त्याग करीत नाही. प्रेम
करताना माणसानं ही असं तुटून प्रेम करावं. डोळे गेले तरी चालतील पण नजर शाबूत हवी.
स्वर नाही सापडला तर नाही, पण नाद विसरणार नाही, पाय थकले तरी बेहत्तर पण ‘गतीची’ ओढ टिकवून धरीन, ही भूक कायम असली की
झालं! आयुष्यात ही भूक जिवंत ठेवावी आणि निर्भयतेने पुरी करीत राहावं.
आईची माया
शुक्रवार, २९ मार्च, २०१९
" पदर "
कृतज्ञतेची शक्ती
न सांगितलेली प्रेमकहाणी....
रत्नदुर्ग किल्ला व त्यावरील शिवसृष्टी रत्नागिरी जिल्हयात पर्यटनासाठी एक छान स्पॉट
रत्नदुर्ग किल्ला व त्यावरील शिवसृष्टी रत्नागिरी जिल्हयात पर्यटनासाठी एक छान स्पॉट Ratnadurg Fort, Bhagvati port, Ratnagiri ...
आणखी पहा
-
कोकण रेल्वे मार्गावर खास उन्हाळयासाठी कोकणात समर स्पेशल गाडयांचे वेळापत्रक konkan railway summer special timetable दि.03.05.2026 रोजी सु...
-
ताणाताण......... मनाची. बापरे.......... कधी काय बातमी समोर येईल काही सांगताच येत नाही.......आज आल्या आल्या टि. व्ही. लावला तर...
-
मराठीची अवखळ वळणे .... ज्यांना तोंडावर " बोलून टाकणं " जमत नाही ते पाठीमागे " टाकून बोलत " राहतात . शहाणा माणूस...