Pages

lifestyle लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
lifestyle लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ४ जुलै, २०२६

आपण स्वप्न का पाहतो?

 

आपण स्वप्न का पाहतो? – स्वप्नांमागचं विज्ञान, रहस्य आणि काही आश्चर्यकारक गोष्टी

sleeping women


"काल मला एक विचित्र स्वप्न पडलं..."

हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो किंवा स्वतःही बोलतो. कधी आपण आकाशात उडत असतो, कधी परीक्षेला जातो पण प्रश्नपत्रिका समजत नाही, तर कधी अनेक वर्षांपूर्वीची एखादी व्यक्ती अचानक स्वप्नात भेटते.

पण कधी विचार केला आहे का... स्वप्नं पडतात तरी का? ती फक्त मेंदूचा खेळ आहे का? की त्यामागे काही खोल विज्ञान आणि रहस्य दडलं आहे?

चला, स्वप्नांच्या अद्भुत जगात एक फेरफटका मारूया.


😴 स्वप्न म्हणजे नेमकं काय?

आपण झोपेत असताना मेंदू पूर्णपणे बंद होत नाही. उलट, झोपेच्या काही टप्प्यांमध्ये तो खूप सक्रिय असतो. या काळात आपल्या आठवणी, भावना, कल्पना आणि अनुभव एकत्र येऊन जे चित्रपट तयार होतात, त्यालाच स्वप्न म्हणतात.

म्हणजेच स्वप्न हा आपल्या मेंदूने तयार केलेला एक अनुभव असतो.


🧠 स्वप्न का पडतात? विज्ञान काय सांगतं?

शास्त्रज्ञ आजही यावर संशोधन करत आहेत, पण काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. मेंदू आठवणी जतन करतो

दिवसभर आपण जे काही पाहतो, ऐकतो आणि अनुभवतो, त्यातील महत्त्वाच्या गोष्टी मेंदू झोपेत व्यवस्थित साठवतो.

याच प्रक्रियेदरम्यान काही आठवणी एकमेकांत मिसळतात आणि स्वप्न तयार होतात.


२. भावना व्यक्त करण्याचा मार्ग

कधी एखादी गोष्ट मनात दडपून ठेवली असेल, ताण असेल किंवा खूप आनंद झाला असेल तर त्याचं प्रतिबिंब स्वप्नात दिसू शकतं.

म्हणूनच परीक्षा जवळ आली की विद्यार्थ्यांना अभ्यासाची स्वप्नं पडतात.


३. कल्पनाशक्तीचा खेळ

स्वप्नात अशा गोष्टी घडतात ज्या प्रत्यक्ष आयुष्यात अशक्य असतात.

उदा.

  • पक्ष्यासारखं उडणं
  • पाण्यावर चालणं
  • अचानक अदृश्य होणं

कारण झोपेत मेंदूवर वास्तवाचे बंधन नसते.


🌙 REM Sleep म्हणजे काय?

आपल्या झोपेचे अनेक टप्पे असतात.

त्यातील एक टप्पा म्हणजे REM (Rapid Eye Movement).

या वेळी

✔ डोळे बंद असूनही वेगाने हालचाल करतात.

✔ मेंदू अत्यंत सक्रिय असतो.

✔ याच टप्प्यात सर्वाधिक स्वप्नं पडतात.

माणूस एका रात्रीत साधारण ४ ते ६ वेळा REM झोपेत जातो.


😮 आपल्याला स्वप्नं आठवत का नाहीत?

शास्त्रज्ञांच्या मते प्रत्येक व्यक्ती रोज ४ ते ७ स्वप्नं पाहते.

पण सकाळी उठल्यावर बहुतेक स्वप्नं विसरली जातात.

कारण जागं होताना मेंदू नवीन माहिती स्वीकारण्यात व्यस्त होतो.


🌍 जगभरातील स्वप्नांविषयीच्या श्रद्धा

प्राचीन काळापासून स्वप्नांना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे.

🇮🇳 भारत

पुराणांमध्ये काही स्वप्नांना शुभ आणि काहींना अशुभ मानलं आहे.

🇪🇬 इजिप्त

इजिप्तमध्ये स्वप्नं ही देवाचा संदेश मानली जात होती.

🇬🇷 ग्रीस

ग्रीक लोक स्वप्नांमधून भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत.


😲 काही आश्चर्यकारक तथ्ये

✅ जन्मापासून आंधळ्या असलेल्या व्यक्तींनाही स्वप्न पडतात.

✅ प्राण्यांनाही स्वप्न पडतात.

कुत्रा झोपेत पाय हलवतो किंवा हलके भुंकतो, हे त्याचं स्वप्न असू शकतं.

✅ आपण स्वप्नात नवीन चेहरा तयार करू शकत नाही.

स्वप्नात दिसणारी प्रत्येक व्यक्ती आपण आयुष्यात कधी ना कधी पाहिलेली असते.


😱 वाईट स्वप्नं का पडतात?

ताण, चिंता, भीती, ताप, औषधांचा परिणाम किंवा मानसिक तणाव यामुळे वाईट स्वप्नं पडू शकतात.

अशा वेळी

  • नियमित झोप
  • ध्यान
  • मोबाईलचा कमी वापर
  • शांत वातावरण

यांचा फायदा होतो.


💭 स्वप्नं खरंच भविष्य सांगतात का?

याबाबत कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

कधी कधी योगायोगाने काही घटना जुळून येतात आणि आपल्याला वाटतं की स्वप्न खरं ठरलं.

विज्ञानाच्या दृष्टीने मात्र स्वप्नं ही आपल्या मेंदूतील आठवणी, भावना आणि कल्पनांचा संगम मानली जातात.


💤 चांगली झोप आणि चांगली स्वप्नं

जर तुम्हाला शांत झोप हवी असेल तर...

✔ दररोज ठराविक वेळी झोपा.

✔ झोपण्यापूर्वी मोबाईल टाळा.

✔ हलकं जेवण करा.

✔ मन शांत ठेवण्यासाठी पुस्तक वाचा किंवा ध्यान करा.


🌟 निष्कर्ष

स्वप्नं म्हणजे एक गूढ, सुंदर आणि अद्भुत जग आहे.

त्यामागे विज्ञान आहे, मानसशास्त्र आहे, भावना आहेत आणि थोडंसं रहस्यही आहे.

कदाचित म्हणूनच माणूस हजारो वर्षांपासून स्वप्नांचा अर्थ शोधत आहे.

आज विज्ञानाने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, पण अजूनही काही स्वप्नं अशी आहेत जी आपल्या कल्पनाशक्तीला आव्हान देतात.

कदाचित... प्रत्येक स्वप्न आपल्या मनाने आपल्यालाच सांगितलेली एक छोटी गोष्ट असते.

रविवार, १५ मार्च, २०२६

मनातलं गाव

 मनातलं गाव

मनातलं गाव


सद्या इराण, इस्त्राईल व अमेरिका अण्वस्त्र युध्द सुरु आहे. शहरांमध्ये गॅस सिलेंडर तुटवडा झाल्याच्या बातम्या सतत चॅनेलवर सुरु आहेत. सोशल मिडीयावर मिम्स टाकल्या जात आहेत. अनेक हॉटेल बंद करावे लागले आहेत. तसेच उर्वरित बंद होण्याच्या मार्गावर आहेत. काहीजण चुलीचा पर्याय म्हणून वापर करु लागले आहेत. अक्षरश: टाळेबंदी होण्याची वेळ आली असल्याचे संकेत मिळत आहेत.

            छोटया मोठया शहरांमध्ये हाहाकार उडाला आहे. सिलेंडर मिळाला नाही तर काय करायचे या विचाराने पहाटे ऊठून गॅस एजन्सी समोर रांगा लावून लोक उभे आहेत. काही ठिकाणी रांगा लावूनही सिलेंडर मिळत नसल्याने लोकांमध्ये आपापसात तंटे होताना दिसत आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी चुली पेटवायला सुरुवात केली. पण मोठमोठया सोसायटया आणि उच्चतम इमारती यांचे काय?

              हीच परिस्थीती कोरोनामध्ये आली होती. आपण कितीही विकासाची फुशारकी मारली तरीही परावलंबी आहोत हे वेळोवेळी सिध्द होत आहे. पैसा कमवण्यासाठी कितीही धावपळ केली तरी थकलेल्या जीवाला निवांतपणा हा गावातच मिळतो. ज्यांनी जन्मत: गावचं पाहिले नाही त्यांना नाही कळणार. पण ज्यांनी गावाचं जीवन अनुभवले आहे, त्यांना हयाची जाणीव आहे.

                तिकडे कोकणासारख्या हिरवळीत ग्रामीण जीवन मात्र नित्यनियमाने सुरु आहे. पुर्वीही होतं आताही आहे आणि पुढेही राहील. कारण कोकणातील खेडी स्वयंपुर्ण आहेत. म्हणजे इथे गरजा कमी आहेत. ग्रामीण भागातल्या जनतेची स्पर्धा इतर जगाशी नाही. पोट भरण्यापुरते जेवण मिळतंय तेही स्वत: पिकवलेलं. वेगवेगळया ऋतुत तयार होणारा रानमेवा अर्धे पोट भरतो. मग अगदी नदी किंवा समुद्रातील मासे असोत किंवा जंगलातील करवंद, जांभूळ, आंबा, फणस, अळू, कण्हेरी, अटकं, नीवं अशी कितीतरी नावे आहेत.

               रानाता लाकूटफाटा आहे. मॉलची गरजच नाही.  गरजा सिमीत पण निसर्गाशी संलग्न. त्यामुळे अजुनही डोंगराळ भागात डॉक्टरांचे दवाखाने नाहीत. चायनीज, बेकरी पदार्थ, बाहेरचे जेवण, वातानुकुलीत एंत्रे, महागडे कपडे, श्रीमंतीचे प्रदर्शन, फुशारकी, हया गोष्टींना इथे थारा नाही. इथे फक्त निसर्गाच्या संपर्कात निसर्गाशी जुळवून घेत जीवन जगता येतं. खरचं जगता येत.

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

सोशल मिडीया आणि आपण: ‘लाईक्स’ च्या दुनियेत हरवलेले आपले ‘लाईफ!’

 सोशल मिडीया आणि आपण: लाईक्स च्या दुनियेत हरवलेले आपले लाईफ!’

social media


           रस्त्याने जाता जाता एक मोबाईलचे स्क्रीन गार्ड विकणारा फेरीवाला दिसला. त्याच्याकडे सद्या कोणीही गिऱ्हाईक नव्हते. आजुबाजूला लोक येत जात होते. तो खाली मान घालून बसला होता. मोबाईलमधील रीळ बघण्यात दंग होता. पुढे बघितल तर भाजीवाला भाजी गिऱ्हाईकाला भाजी पिशवीत भरता भरता भाजीवर ठेवलेल्या मोबाईलमध्ये रीळ बघत आहे. गिऱ्हाईकाला पटकन पळवण्याच्या मानसीकतेत. मनात विचार आला काय हे वेड लावून ठेवलंय संगळयांना. खऱ्याखुऱ्या जगापेक्षा त्यातील माणसापेक्षा आजकाल आपल्याला आभारी जगच अधिक प्यारे झालेय का?

             लहान मुलांपासून तर आजी आजोबां पर्यंत जो तो गुंतलेला. आजच्या डिजीटल युगात आपली सकाळ सुर्योदयाने कमी आणि व्हाटस्अप नोटीफीकेशनने जास्त होते. डोळे उघडल्या उघडल्या आपण देवाचे दर्शन घेतो की नाही माहित नाही पण मोबाईलचे दर्शन मात्र नक्की घेतो.

सोशल मिडीयाने जग जवळ आणले हे जरी खरे असले, तरी आपल्या शेजारी बसलेल्या माणसाला विसरत चाललो आहेात का? हा विचार करण्याची आता वेळ आली आहे.

1.      स्टेटसच्या नादात स्थिती विसरलो का? status

हल्ली एखादया छान हॉटेलमध्ये गेल्यावर पदाथ जिभेला लागण्यापूर्वी तो कॅमेऱ्यात कैद होतो. चव कशी आहे यापेक्षा फोटोला लाईक्स किती मिळतील, यातच आजचा आनंद सामावलेला दिसतो. तीच गत एखादया सुंदर ठिकाणी गेल्यावर तिथला आनंद उपभोगण्यापेक्षा फोटो आणि रीळमध्येच सगळे अडकलेले. आपण नक्की कोणासाठी जगतोय? स्वत:साठी की फॉलोअर्सना दाखवण्यासाठी?

2.      स्क्रॉलींगचे चक्रव्युह- scrolling

फक्त 5 मिनीटे रील बघतो असे म्हणून आपण मोबाईल हातात घेतो आणि कधी तासभर निघून जातो, हे कळतही नाही. प्रत्येकाला आयुष्य हे वेगवेगळे दिलेले आहे. जेवढे काही आयुष्य आहे त्यातील सुंदर क्षण अनुभवण्यापेक्षा हया आभासी जगासाठी आपण आपला वेळ फुकट घालवत आहोत याची जाणीवही नसते. हे एक असे चक्रव्युह आहे ज्यातून बाहेर पडणे प्रत्येकाला कठीण जात आहे. यामुळे आपली एकाग्रता कमी होत चालली आहे आणि कामाचा वेगही मंदावला आहे.

3.      तुलना: दु:खाचे मुळ कारण

दुसऱ्याचे फिरण्याचे फोटो, नवीन गाडी किंवा महागडे कपडे बघून आपल्याला वाटू लागते की आपलेच आयुष्य किती नीरस आहे. पण लक्षात ठेवा, सोशल मिडीयावर प्रत्येकजण फक्त त्याचे बेस्ट व्हर्जन दाखवत असतो, पडद्यामागचा संघर्ष आणि दु:ख कोणीच पोस्ट करत नाही. सोशल मिडीयावर दाखविलेले व्हिडीओ खरच सगळे सत्य असतात का? मुळात व्हिडीओ का पोस्ट केला आहे? खरचं काहीतरी द्यायला की काहीतरी कमवायला?

4.    डिजीटल डिटॉक्सची गरज

मोबाईल पूर्णपणे सोडून द्या असे कोणीच म्हणणार नाही. पण दिवसाला काही वेळ नो गॅजेट झोन असायला हवा. कितीही म्हटले तरी जगा बरोबर जावंच लागतं. पण काही प्रमाणात आटोक्यात ठेवू शकतो ना. हे जग सोडण्यापूर्वी जे जे काही पहायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे तो कधी घेणार. सतत मोबाईल वापरामुळे झोप अशांत होते. त्यामुळे काही सवयी आपल्याला लावून घ्याव्यात.

·         जेवताना मोबाईल बाजूला ठेवा

·         झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास स्क्रीन बंद करा

·         आभासी मित्रांपेक्षा प्रत्यक्ष भेटणाऱ्या मित्रांना वेळ द्या

 

निष्कर्ष : social media

सोशल मिडीया हे एक उत्तम साधन आहे, जर ते मर्यादित वापरले तर! आपण सोशल मिडीयाचे मालक व्हायचे की गुलाम, हे आपल्याच हातात आहे. मोबाईल लॉक करा, बाहेर पडा आणि खऱ्या जगाचा आनंद घ्या. कारण खऱ्या आयुष्यात फिल्टर्स नसतात, पण तरीही ते खूप सुंदर असते!

 तुम्ही दिवसातला किती वेळ सोशल मिडीयावर घालवता? कमेंटसमध्ये नक्की सांगा.

पृथ्वी गोलच का आहे? – विज्ञान, इतिहास आणि काही आश्चर्यकारक तथ्ये

  पृथ्वी गोलच का आहे? – विज्ञान, इतिहास आणि काही आश्चर्यकारक तथ्ये "पृथ्वी सपाट असती तर काय झालं असतं?" हा प्रश्न कधीतरी प्रत्ये...

आणखी पहा