Pages

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

चिं त न

  🔹  चिं   त   न  🔹

      आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवाफुगवा ‌अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसा झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी. झोपताना रागात झोपू नये.
      देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडला तर त्यावर आदल्या दिवशीच्या रुसव्याचे मळभ रहात नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची?  सतगुरू म्हणतात ज्याला सुखी व्हायचे आहे त्याने पहिली माघार घ्यायची.
      अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो spiritual progress ची आणखी एक पायरी चढला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रत्नदुर्ग किल्ला व त्यावरील शिवसृष्टी रत्नागिरी जिल्हयात पर्यटनासाठी एक छान स्पॉट

  रत्नदुर्ग किल्ला व त्यावरील शिवसृष्टी रत्नागिरी जिल्हयात पर्यटनासाठी   एक छान स्पॉट     Ratnadurg Fort, Bhagvati port, Ratnagiri        ...

आणखी पहा