Pages

रविवार, २४ मे, २०२६

देश विदेश

      देश विदेश   


   

Vatican city

जगातील आकारमान व लोकसंख्याच्या दृष्टीने सर्वात लहान असणारा देशाचे नाव आहे व्हॅटीकन सिटी. इटली हया देशाच्या अगदी जवळ म्हणजे एक पाऊल इटलीत तर दुसरे पाऊल व्हीटीकन सिटीत एवढा लहान देश आहे. हा देश इटली बरोबर झालेल्या करारानुसार दि.11 फेब्रुवारी 1929 रोजी स्वतंत्र झाला आहे. हया देशात जास्त काळ राहण्यास व नागरिकत्व घेण्यास मनाई आहे. तेथील चर्चमधील सेवा करणाऱ्या लोकांनाच नागरीकत्व देण्यात येते. केवळ त्या देशातील आई-वडील आहेत व जन्म घेतला म्हणून नागरीकत्व मिळत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे सन 2013 च्या आकडेवारी नुसार एकूण 572 व्हॅटीकन नागरीकांपैकी महिला नागरिकांची संख्या केवळ 30 होती. सन 2002 पासून या देशाने स्वतंत्र स्वत:ची  नाणी व चलनी नोटा काढल्या आहेत. प्रमुख उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे पर्यटनातून मिळणारे उत्पन्न. येथील प्रसिध्द म्युझियम कडून उत्पन्न मिळते. त्याचप्रमाणे टपाल तिकिटे, नाणी, स्मरणिका, इ. मधून उत्पन्नाची साधने आहेत. येथील हवामान भुमध्यसागरी असल्यामुळे थंड आहे. जुलै महिन्यात कमाल तापमान 24 अंश से. पर्यंत जाते. ऑक्टोबर ते मे महिन्यात पाऊस पडतो. आकारमान कमी असल्यामुळे येथे विमानतळ नाही. मुख्य रस्ता 1.05 कि.मी. लांब, 0.85 किमी रुंद आहे. येथील टपाल सेवा सर्वात कार्यक्षम व तत्पर समजली जाते. जगप्रसिध्द मोनालिसा चित्र काढणारा चित्रकार लिओनार्दो याच देशातला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

डिलीवरींग हॅप्पीनेस

  डिलीवरींग हॅप्पीनेस              सर्वसाधारण माणसाला तुम्हाला आनंद कधी होईल असं विचारलं तर तो उत्तर देईल खूप पैसा मिळाल्यानंतर. होय कुणीतरी...

आणखी पहा