Pages

रविवार, २४ मे, २०२६

देश विदेश

      देश विदेश   


   

Vatican city

जगातील आकारमान व लोकसंख्याच्या दृष्टीने सर्वात लहान असणारा देशाचे नाव आहे व्हॅटीकन सिटी. इटली हया देशाच्या अगदी जवळ म्हणजे एक पाऊल इटलीत तर दुसरे पाऊल व्हीटीकन सिटीत एवढा लहान देश आहे. हा देश इटली बरोबर झालेल्या करारानुसार दि.11 फेब्रुवारी 1929 रोजी स्वतंत्र झाला आहे. हया देशात जास्त काळ राहण्यास व नागरिकत्व घेण्यास मनाई आहे. तेथील चर्चमधील सेवा करणाऱ्या लोकांनाच नागरीकत्व देण्यात येते. केवळ त्या देशातील आई-वडील आहेत व जन्म घेतला म्हणून नागरीकत्व मिळत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे सन 2013 च्या आकडेवारी नुसार एकूण 572 व्हॅटीकन नागरीकांपैकी महिला नागरिकांची संख्या केवळ 30 होती. सन 2002 पासून या देशाने स्वतंत्र स्वत:ची  नाणी व चलनी नोटा काढल्या आहेत. प्रमुख उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे पर्यटनातून मिळणारे उत्पन्न. येथील प्रसिध्द म्युझियम कडून उत्पन्न मिळते. त्याचप्रमाणे टपाल तिकिटे, नाणी, स्मरणिका, इ. मधून उत्पन्नाची साधने आहेत. येथील हवामान भुमध्यसागरी असल्यामुळे थंड आहे. जुलै महिन्यात कमाल तापमान 24 अंश से. पर्यंत जाते. ऑक्टोबर ते मे महिन्यात पाऊस पडतो. आकारमान कमी असल्यामुळे येथे विमानतळ नाही. मुख्य रस्ता 1.05 कि.मी. लांब, 0.85 किमी रुंद आहे. येथील टपाल सेवा सर्वात कार्यक्षम व तत्पर समजली जाते. जगप्रसिध्द मोनालिसा चित्र काढणारा चित्रकार लिओनार्दो याच देशातला.

रविवार, ३ मे, २०२६

रत्नदुर्ग किल्ला व त्यावरील शिवसृष्टी रत्नागिरी जिल्हयात पर्यटनासाठी एक छान स्पॉट

 रत्नदुर्ग किल्ला व त्यावरील शिवसृष्टी रत्नागिरी जिल्हयात पर्यटनासाठी  एक छान स्पॉट

    Ratnadurg Fort, Bhagvati port, Ratnagiri



           हल्ली कोकणात पर्यटक व चाकरमानी मोठया संख्येने अगदी एक-दोन दिवसांच्या सुट्टीतही फिरायला येत आहेत. बऱ्यापैकी झालेले रस्ते आणि कोकणातील बीचेस, किल्ले,देवस्थाने अगदी फुलुन जातात. जिल्हयात असणाऱ्या वेगवेगळया ठिकाणामध्ये आणखी एक ठिकाणी भर पडली आहे. इतिहासातील शौर्याची आठवण करुन देणारे आणि पुलकित करणारे असे ठिकाण म्हणजे रत्नदुर्ग येथील शिवसृष्टी. रत्नागिरी शहरापासून थोडयाच अंतरावर रत्नदुर्ग हा किल्ला आणि त्यावर भगवती देवीचे मंदीर आहे. खाली भगवती बंदर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी उभारण्या आली आहे शिवसृष्टी. पण त्याचे सौंदर्य पाहण्यासाठी अंधार पडण्याची वाट बघावी लागेल. कारण अंधारात खुप छान सजावट व प्रतिकृती अगदया खऱ्या वाटतात.




            छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या इतिहासातील मोजके गड आणि त्यांचे सरदार यांची प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि त्यासमोर त्यांची थोडक्यात माहिती फलक लावले आहेत. क्यूआर कोड वापरुन त्याची माहिती इंटरनेटवरही उपलब्ध आहे.

            त्याचप्रमाणे शिवरायांचे विश्वासू व पराक्रमी सरदार बाजी प्रभू देशपांडे, कान्होजी आंग्रे यांचे पुतळे व थोडक्यात माहिती फलकावर दर्शविणेत आली आहे. तसेच युध्दनौकेची प्रतिकृती अगदी बारकाव्यांसह उभारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवकालीन खेडी कशी होती. तेथील लोकांचे राहणीमान, वेशभुषा, अ. बारकाव्यासह उभारण्यात आले आहे. हे सर्व पाहताना एक ते दीड तास सहज निघून जातो. बाहेर पडताना केवळ पर्यटन म्हणून नव्हे तर अभिमानाने छाती भरुन येते आणि इतिहासातील ती पाने डोळयासमोर येतात. एकदा नक्कीस भेट दयावी असे हे ठिकाण आहे.   

सोमवार, १६ मार्च, २०२६

कोकण रेल्वे मार्गावर खास उन्हाळयासाठी कोकणात समर स्पेशल konkan railway summer special

 कोकण रेल्वे मार्गावर खास उन्हाळयासाठी कोकणात समर स्पेशल गाडयांचे वेळापत्रक

konkan railway summer special


कोकणात जाण्यासाठी झालेली गर्दी लक्षात घेता अखेर कोकण रेल्वे प्रशासनाने विशेष उन्हाळी गाडी जाहीर केली आहे. कोकण रेल्वेवर धावणार विकली स्पेशल गाडी. उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी तसेच पर्यटकांसाठी कोकण रेल्वेने आणखी एका विशेष उन्हाळी गाडीची घोषणा केली आहे.

गाडी क्र.01106 ही गाडी आठवडयातून एकदा पनवेल ते मडगाव धावणार आहे. दि.17.05.2026 पासून ही गाडी दर रविवारी मडगाव येथून दुपारी 4.30 वा. सुटेल. ती दुसऱ्या दिवशी पहाटे 04.00 वा पनवेल येथे पोहोचेल.

गाडी क्र.01105 ही गाडी दि.18.05.2026 पासून ही गाडी दर सोमवारी पनवेल येथून पहाटे 5.45 वा. सुटेल. ती त्याच दिवशी सायंकाळी 6.10 मि. मडगाव येथे पोहोचेल.

या गाडीला थांबे – माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली,  विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम व करमाळी

या गाडीला एकूण  23 डबे आहेत. Three Tier AC - 03 Coaches, Sleeper - 11 Coaches, General - 07 Coaches






रविवार, १५ मार्च, २०२६

मनातलं गाव

 मनातलं गाव

मनातलं गाव


सद्या इराण, इस्त्राईल व अमेरिका अण्वस्त्र युध्द सुरु आहे. शहरांमध्ये गॅस सिलेंडर तुटवडा झाल्याच्या बातम्या सतत चॅनेलवर सुरु आहेत. सोशल मिडीयावर मिम्स टाकल्या जात आहेत. अनेक हॉटेल बंद करावे लागले आहेत. तसेच उर्वरित बंद होण्याच्या मार्गावर आहेत. काहीजण चुलीचा पर्याय म्हणून वापर करु लागले आहेत. अक्षरश: टाळेबंदी होण्याची वेळ आली असल्याचे संकेत मिळत आहेत.

            छोटया मोठया शहरांमध्ये हाहाकार उडाला आहे. सिलेंडर मिळाला नाही तर काय करायचे या विचाराने पहाटे ऊठून गॅस एजन्सी समोर रांगा लावून लोक उभे आहेत. काही ठिकाणी रांगा लावूनही सिलेंडर मिळत नसल्याने लोकांमध्ये आपापसात तंटे होताना दिसत आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी चुली पेटवायला सुरुवात केली. पण मोठमोठया सोसायटया आणि उच्चतम इमारती यांचे काय?

              हीच परिस्थीती कोरोनामध्ये आली होती. आपण कितीही विकासाची फुशारकी मारली तरीही परावलंबी आहोत हे वेळोवेळी सिध्द होत आहे. पैसा कमवण्यासाठी कितीही धावपळ केली तरी थकलेल्या जीवाला निवांतपणा हा गावातच मिळतो. ज्यांनी जन्मत: गावचं पाहिले नाही त्यांना नाही कळणार. पण ज्यांनी गावाचं जीवन अनुभवले आहे, त्यांना हयाची जाणीव आहे.

                तिकडे कोकणासारख्या हिरवळीत ग्रामीण जीवन मात्र नित्यनियमाने सुरु आहे. पुर्वीही होतं आताही आहे आणि पुढेही राहील. कारण कोकणातील खेडी स्वयंपुर्ण आहेत. म्हणजे इथे गरजा कमी आहेत. ग्रामीण भागातल्या जनतेची स्पर्धा इतर जगाशी नाही. पोट भरण्यापुरते जेवण मिळतंय तेही स्वत: पिकवलेलं. वेगवेगळया ऋतुत तयार होणारा रानमेवा अर्धे पोट भरतो. मग अगदी नदी किंवा समुद्रातील मासे असोत किंवा जंगलातील करवंद, जांभूळ, आंबा, फणस, अळू, कण्हेरी, अटकं, नीवं अशी कितीतरी नावे आहेत.

               रानाता लाकूटफाटा आहे. मॉलची गरजच नाही.  गरजा सिमीत पण निसर्गाशी संलग्न. त्यामुळे अजुनही डोंगराळ भागात डॉक्टरांचे दवाखाने नाहीत. चायनीज, बेकरी पदार्थ, बाहेरचे जेवण, वातानुकुलीत एंत्रे, महागडे कपडे, श्रीमंतीचे प्रदर्शन, फुशारकी, हया गोष्टींना इथे थारा नाही. इथे फक्त निसर्गाच्या संपर्कात निसर्गाशी जुळवून घेत जीवन जगता येतं. खरचं जगता येत.

मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

सोशल मिडीया आणि आपण: ‘लाईक्स’ च्या दुनियेत हरवलेले आपले ‘लाईफ!’

 सोशल मिडीया आणि आपण: लाईक्स च्या दुनियेत हरवलेले आपले लाईफ!’

social media


           रस्त्याने जाता जाता एक मोबाईलचे स्क्रीन गार्ड विकणारा फेरीवाला दिसला. त्याच्याकडे सद्या कोणीही गिऱ्हाईक नव्हते. आजुबाजूला लोक येत जात होते. तो खाली मान घालून बसला होता. मोबाईलमधील रीळ बघण्यात दंग होता. पुढे बघितल तर भाजीवाला भाजी गिऱ्हाईकाला भाजी पिशवीत भरता भरता भाजीवर ठेवलेल्या मोबाईलमध्ये रीळ बघत आहे. गिऱ्हाईकाला पटकन पळवण्याच्या मानसीकतेत. मनात विचार आला काय हे वेड लावून ठेवलंय संगळयांना. खऱ्याखुऱ्या जगापेक्षा त्यातील माणसापेक्षा आजकाल आपल्याला आभारी जगच अधिक प्यारे झालेय का?

             लहान मुलांपासून तर आजी आजोबां पर्यंत जो तो गुंतलेला. आजच्या डिजीटल युगात आपली सकाळ सुर्योदयाने कमी आणि व्हाटस्अप नोटीफीकेशनने जास्त होते. डोळे उघडल्या उघडल्या आपण देवाचे दर्शन घेतो की नाही माहित नाही पण मोबाईलचे दर्शन मात्र नक्की घेतो.

सोशल मिडीयाने जग जवळ आणले हे जरी खरे असले, तरी आपल्या शेजारी बसलेल्या माणसाला विसरत चाललो आहेात का? हा विचार करण्याची आता वेळ आली आहे.

1.      स्टेटसच्या नादात स्थिती विसरलो का? status

हल्ली एखादया छान हॉटेलमध्ये गेल्यावर पदाथ जिभेला लागण्यापूर्वी तो कॅमेऱ्यात कैद होतो. चव कशी आहे यापेक्षा फोटोला लाईक्स किती मिळतील, यातच आजचा आनंद सामावलेला दिसतो. तीच गत एखादया सुंदर ठिकाणी गेल्यावर तिथला आनंद उपभोगण्यापेक्षा फोटो आणि रीळमध्येच सगळे अडकलेले. आपण नक्की कोणासाठी जगतोय? स्वत:साठी की फॉलोअर्सना दाखवण्यासाठी?

2.      स्क्रॉलींगचे चक्रव्युह- scrolling

फक्त 5 मिनीटे रील बघतो असे म्हणून आपण मोबाईल हातात घेतो आणि कधी तासभर निघून जातो, हे कळतही नाही. प्रत्येकाला आयुष्य हे वेगवेगळे दिलेले आहे. जेवढे काही आयुष्य आहे त्यातील सुंदर क्षण अनुभवण्यापेक्षा हया आभासी जगासाठी आपण आपला वेळ फुकट घालवत आहोत याची जाणीवही नसते. हे एक असे चक्रव्युह आहे ज्यातून बाहेर पडणे प्रत्येकाला कठीण जात आहे. यामुळे आपली एकाग्रता कमी होत चालली आहे आणि कामाचा वेगही मंदावला आहे.

3.      तुलना: दु:खाचे मुळ कारण

दुसऱ्याचे फिरण्याचे फोटो, नवीन गाडी किंवा महागडे कपडे बघून आपल्याला वाटू लागते की आपलेच आयुष्य किती नीरस आहे. पण लक्षात ठेवा, सोशल मिडीयावर प्रत्येकजण फक्त त्याचे बेस्ट व्हर्जन दाखवत असतो, पडद्यामागचा संघर्ष आणि दु:ख कोणीच पोस्ट करत नाही. सोशल मिडीयावर दाखविलेले व्हिडीओ खरच सगळे सत्य असतात का? मुळात व्हिडीओ का पोस्ट केला आहे? खरचं काहीतरी द्यायला की काहीतरी कमवायला?

4.    डिजीटल डिटॉक्सची गरज

मोबाईल पूर्णपणे सोडून द्या असे कोणीच म्हणणार नाही. पण दिवसाला काही वेळ नो गॅजेट झोन असायला हवा. कितीही म्हटले तरी जगा बरोबर जावंच लागतं. पण काही प्रमाणात आटोक्यात ठेवू शकतो ना. हे जग सोडण्यापूर्वी जे जे काही पहायचं आहे, अनुभव घ्यायचा आहे तो कधी घेणार. सतत मोबाईल वापरामुळे झोप अशांत होते. त्यामुळे काही सवयी आपल्याला लावून घ्याव्यात.

·         जेवताना मोबाईल बाजूला ठेवा

·         झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास स्क्रीन बंद करा

·         आभासी मित्रांपेक्षा प्रत्यक्ष भेटणाऱ्या मित्रांना वेळ द्या

 

निष्कर्ष : social media

सोशल मिडीया हे एक उत्तम साधन आहे, जर ते मर्यादित वापरले तर! आपण सोशल मिडीयाचे मालक व्हायचे की गुलाम, हे आपल्याच हातात आहे. मोबाईल लॉक करा, बाहेर पडा आणि खऱ्या जगाचा आनंद घ्या. कारण खऱ्या आयुष्यात फिल्टर्स नसतात, पण तरीही ते खूप सुंदर असते!

 तुम्ही दिवसातला किती वेळ सोशल मिडीयावर घालवता? कमेंटसमध्ये नक्की सांगा.

सोमवार, १६ फेब्रुवारी, २०२६

अलार्मशी ‘कुस्ती’ की ‘मैत्री’ ? सकाळी लवकर उठण्याच्या 5 भन्नाट टिप्स!

 अलार्मशी कुस्ती की मैत्री’ ? सकाळी लवकर उठण्याच्या 5 भन्नाट टिप्स!

good morning
#marathitips #tipsoftheday 

                     “उद्यापासून पक्का 5 वाजता उठायचं! 

किंवा दरवर्षी अखेर संकल्प सोडतो, नविन वर्षात लवकर उठून व्यायाम सुरु करायचा. असं म्हणून आपण रात्री झोपतो. पण सकाळी 5 वाजता जेंव्हा अलार्म वाजतो, तेंव्हा आपलं मन आपल्याला हळूच सांगतं, अरे अजून 5 मिनिटं झोपला तर काय बिघडणार आहे? आणि ती 5 मिनीटं कधी 1 तासात बदलतात, हे आपल्याला कळतही नाही.

जर तुम्हीही अवस्था अशीच होत असेल, तर हे काही सोपे आणि प्रॅक्टिकलउपाय नक्की वापरून पहा:

1. अलार्म घडयाळ हाताच्या अंतराबाहेरठेवा

बहुतेक लोक मोबाईल उशीपाशी घेऊन झोपतात. अलार्म वाजला की डोळे न उघडता तो Snooze करणं सोपं जातं. त्याऐवजी, मोबाईल किंवा घडयाळ खोलीच्या अशा कोपऱ्यात ठेवा जिथे पोहचण्यासाठी तुम्हाला अंथरुणातून उठावं लागेल. एकदा का पाय जमिनीला टेकले की झोप उघडण्यास मदत होते.

2. रात्रीचं जेवण आणि स्क्रीन टाईम

लवकर उठण्याचं रहस्य रात्रीच्या सवयीत दडलं आहे. हल्ली लोकांची दिवसाची सुरुवात आणि शेटव हा मोबाईलच्या वापरानेच होतो.

·         रात्रीचं जेवण हलकं आणि झोपण्याच्या किमान 2-3 तास आधी घ्या.

·         झोपण्यापूर्वी 1 तास मोबाईल बाजूला ठेवा. मोबाईलचा निळा प्रकाश (Blue Light)  तुमची झोप पळवतो. त्याऐवजी एखादं पुस्तक वाचा. प्रेरणात्मक अथवा आरोग्याशी निगडीत पुस्तके ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्यातील तमुच्या आवडीनुसार विकत घेऊन वाचू शकता. 


3. का उठायचंय?’ याचं कारण स्पष्ट ठेवा

उठल्यावर नक्की काय करायचं आहे, हे रात्रीच ठरवा. जर तुमच्याकडे काही ठोस कारण नसेल (उदा. व्यायामाला जाणं, वाचन करणं किंवा शांतपणे चहा पिणं), तर तुमचं मन तुम्हाला पुन्हा झोपायला प्रवृत्त करेल. सकाळी उठल्यावर मिळणारा तो मी-टाईम’ (Me-Time) खूप सुखावह असतो.

4. खिडकीचे पडदे थोडे उघडे ठेवा

सकाळचा नैसर्गिक प्रकाश जेंव्हा खोलीत येतो, तेंव्हा आपल्या शरीराला आपोआप जाग येण्याचे संकेत मिळतात. सूर्याची पहिली किरणं तुमच्या चेहऱ्यावर पडली की उठणं अधिक सोपं आणि उत्साहवर्धक होतं.

5. स्वत:लाशिक्षा नाही, बक्षीस द्या.

सकाळी लवकर उठणं ही शिक्षा समजू नका, बक्षीस द्या

सकाळी लवकर उठणं ही शिक्षा समजू नका, आज मी लवकर उठलो तर स्वत:ला आवडणारा नाश्ता करेन किंवा छान गाणी ऐकेन असं स्वत:ला सांगा, सकारात्मक विचारांनी उठल्यास दिवसभर उत्साह टिकून राहतो.

थोडक्यात काय तर...

सकाळी लवकर उठणं ही एक सवय आहे, जी लागायला थोडा वेळ लागतो. पहिल्याच दिवशी यशस्वी झाला नाहीत तरी हरकत नाही, पण प्रयत्न सोडू नका, कारण, जो लवकर उठतो, तो जगाच्या दोन पावले पुढे असतो!

तुमचा अलार्म किती किती वेळा ‘Snooze’ होतो? कमेंटसमध्ये नक्की सांगा !


रविवार, ७ डिसेंबर, २०२५

मी कोण आहे?

 मी कोण आहे?

who i am

#motivationmarathi #selfawareness #selfgrowth #innerpeace #mindsetshift #deepthoughts #knowyourself #personalitydevelopment

          बऱ्याचदा गप्पा मारताना प्रत्येक जण एकमेकांविषयी, त्यांच्या स्वभावा विषयी बोलत असतो. आपले नातेवाईक, आपला बॉस, मित्र आप्तेष्ट, भेटणारे विविध प्रकारचे लोक. आपला नातेवाईक किंवा बॉस, प्रवासात, अपघाताने भेटणासरे लोक. किंवा गर्दीतले माणसे. भेटणारा व्यक्ती कसा आहे? याबद्दल आपण एकमेकांना आपले मत मांडत असतो. जसे की तो किंवा ती खुप दयाळू आहे. फ्री माईंडेड आहे. मदतगार आहे. इ. कधी कधी किंवा बहुतांशी त्या विरुध्द. म्हणजे तो किंवा ती फार रागीट आहे. स्वार्थी आहे. हेकेखोर आहे. हट्टी आहे. घमेंडखोर आहे. इत्यादी इत्यादी.

         समोरचाही त्याला दुजोरा देत असतो. अरे हो मला असा अनुभव आला किंवा हो ती तशी वागली. इ. समोरच्या माणसाचे मोजमापच आपण करीत असतो. हे झाले ओळखीच्या माणसांबद्दल. अनोळखी व्यक्ती भेटली कि, त्याची देहबोली, पोषाख, चेहऱ्यावरचे भाव यावरुन एक अंदाज बांधत असतो. की ही व्यक्ती अशी असू शकते. म्हणजे रागीट किंवा मैत्री पूर्ण. इ.

          हवा असलेला चेहरा समोर आला की आपलाही चेहरा खुलतो. अंगात उत्साह संचारतो. तेच नको असलेली व्यक्ती दिसली तरी हयाच्या एकदम विरुध्द घडते. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकी व्यक्तीला आपण एक लेबल लावून टाकतो. एकदा लेबल लावले की त्याच्याशी/तिच्याशी कोणत्या प्रकारे बोलायचे हे ठरते. म्हणजे त्या व्यक्तीला दुखवून चालणार नसेल तर सांभाळून बोलावं लागते. तेच एखादयावर सुडच उगवायचा असेल तर मात्र मुद्दामहून आपण तसे बोलतो. म्हणजे व्यक्तीनुसार आपण कसे बोलायचे ते ठरवतो.

         पण कधी विचार केलाय का? आपण जसे प्रत्येकाला लेबल लावतो, तसे आपल्यालाही लेबल लागलेले असते. पण ते स्वत:ला कधीच दिसत नाही. कारण ते दुसऱ्याच्या मनात असते. मग आपण कसे आहोत? मी चांगला आहे कि वाईट आहे. इतर काय म्हणत असतील मलाअसे विचार येतात. कधी स्वत:चे परिक्षण केलय का? मी कसा/कशी वागतो/ते. माझे नातेवाईक, मित्र यांचे माझ्याबद्दल काय मत असतील?

        माणूस म्हणून जन्म घेतल्यानंतर माझा स्वभाव कसा आहे? मी खरच प्रेमळ आहे कि, रागीट आहे? मी आयुष्य एन्जॉय करतोय/तेय की, ढकलगाडी करतोय/करतेय. या जगात येण्याचा माझा उद्देश काय आहे? रोज उठून कामाला जुंपायचे, EMI फेडायचे की, दिवस मजेत घालवायचा? हया प्रश्नांची उत्तरे शोधायला गेलात तर तुम्हाला तुमचा मी सापडेल? खरा मी. मीपणा नव्हे. ही गफलत नको.

CLICK HERE
                                                                               (Disclosure : As an Amazon associate I earn from qualifying purchase)

         मग त्यासाठी काय बरे करावे? एखादया शांत ठिकाणी बसून हया प्रश्नांची उत्तरे शोधा. काहीवेळ स्वत:साठी फक्त स्वत:साठी दया. तिथे कुणीही म्हणजे कुणीही नसेल. अगदी जवळची व्यक्ती सुध्दा नसेल. फक्त आणि फक्त स्वत:शीच संवाद. जिथे तुम्हाला शांत वाटेल. कुणीही डिस्टर्ब करणार नाही. अशा ठिकाणी बसा. आणि सुरु करा स्वसंवाद. आज पर्यंत दुसऱ्यांना लेबल खुप लावली आता स्वत:साठी कोणते लेबल आहे ते पाहून घ्या. तुम्हाला तुमच्यातला मी भेटेल. जो कोणत्याही लेबलशिवाय जन्माला आला होता. जगात आल्यानंतर ईच्छा, अपेक्षांच्या ओझ्याखाली झुकलेला/लेली दिसेल. जेंव्हा जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा तेंव्हा स्वत:मधील खरा मी शोधण्याचा प्रयत्न करा. एकदा का तो मी सापडला तर त्याला काय आवडते? म्हणजे आपली आवड काय आहे तीही कळेल.

          रोज आपण एक बुरखा घेऊन वावरत असतो. म्हणजे एक आई किंवा बाप म्हणून. मुलगा/मुलगी, सुन, जावई, एक बॉस किंवा कर्मचारी म्हणून. एक मित्र किंवा एक सेल्समन. इत्यादी इत्यादी. अनेक बुरखे घेऊन आपण वावरत असतो. पण तो किंवा ती खरा मी नसतोच /नसतेच. खरा मी आत आत असतो जो शोधण्यासाठी खोलवर जावे लागते. लोकांसाठी असणारा मी आणि प्रत्यक्ष असणारा मी यात किती अंतर आहे. कि जसा मी आतून आते तसाच मी बाहेरच्या जागतही आहे. कोण आहे मी? निसर्गाचा एक घटक म्हणून की कसा आहे? कसं जगायला मला आवडेल? काय मला आवडेल? केवळ बाहय देखाव्या शिवाय असणार आतला मी कसा आहे? समजा माझ्यावर कोणतेही बंधन नाहीत, अपेक्षा नाहीत, ओझ नाही तर मी कसा असेल. काय गुण आहेत माझ्यामध्ये? काय अवगुण आहेत? रागीट आहे, तापट आहे. खरोखरच मी असा आहे का, कि हया जबाबदाऱ्या पेलता पेलता माझा स्वभाव बदलला आहे? बघा मिळतोय का  तुमच्यातला खरा मी’? सापडला तर तो जपा तुमच्यातच. 

            त्याच्याशी गप्पा मारा. त्याच्यावर नका लादू अपेक्षांचे ओझे. हया निसर्गाचा अविश्कार आहे तो, कोणत्याही लेबल शिवाय, कोणत्याही मोहमाया शिवाय, निरागस आणि निरपेक्ष. पुर्वी नाही का आपले ऋषी मुनी जंगलात जाऊन तपश्चर्या करायचे. ते काय होतं. त्यांच्यातला मी चा शोधच तर होता. ज्ञान म्हणजे मी. स्वत:चे ज्ञान म्हणजे मी. असा मी प्रत्येकाला निवांत समयी सापडायला हवा. कारण जगासमोर वावरताना असलेला मी आणि आतुन असलेला खरा मी हयात अंतर आहे. आपली स्वत:ची ओळख हया मी मध्ये आहे. तो सापडला ना तर खुप बरं वाटेल. हलकं वाटेल. त्याचा तिरस्कार करु नका. त्याला झिडकारु नका. कारण तोच खरा मी आहे. बाकी सारे हया रंगमंचावरील मुखवटे आहेत. मुखवटयाखालचा मी तुम्हाला नक्की सापडेल. आणि भेटतच राहील. कदाचित लोकांना भेटलेला तुमच्यातला मी आणि तुम्हाला स्वत:ला भेटलेला तुमच्यातला खरा मी हया मध्ये खुपच अंतर असेल.


CLICK ON IMAGE

लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि कमेंटस करा.    

पृथ्वी गोलच का आहे? – विज्ञान, इतिहास आणि काही आश्चर्यकारक तथ्ये

  पृथ्वी गोलच का आहे? – विज्ञान, इतिहास आणि काही आश्चर्यकारक तथ्ये "पृथ्वी सपाट असती तर काय झालं असतं?" हा प्रश्न कधीतरी प्रत्ये...

आणखी पहा