व्हाट्सअँप आणि मेसेज
आपण सकाळी उठतो आणि
आपापल्या ग्रपवर गुड मॉर्निंग चे मेसेज, इमेजीस पाठविण्याचा धडाकाच लावतो. मग पाठोपाठ
सुविचारांची जणू स्पर्धाच लागते. जे बोट कापलं तरी घाबरतात ते लढ्याच्या गोष्टी फॉरवर्ड
करतात. जे कारमधून फिरतात ते सायकलचे महत्व सांगतात. जे आई बापाजवळ राहत नाहीत त्यांना
मातृ-पितृ महिम्याचे भरते येते. मग हे पाठवा बॅलन्स येईल, ते पाठवा दिवस चांगला जाईल,
हे पाठवा आणि पहा काय जादू होते, ते पाठवा आणि पहा कसा धनलाभ होतो. आणि या आंतरजालात
आपण सुशिक्षित म्हणवून घेणारेही कसे फसत जातो तेही कळत नाही.ग्रुपवर नसणाऱ्या व्यक्तीलाही
प्रत्येक ग्रुपवर शेकडो शुभेच्छा देतो. आपल्याच वाढदिवसाच्या आपणच शुभेच्छा देतो.
या सगळ्यात आपल्या ग्रुपच्या निर्मिती मागचा
हेतूच आपण विसरून जातो. आपण ग्रुपवर करत असलेल्या
गोष्टींचे आत्मपरिक्षण होणे गरजेचे आहे.
कांही ग्रुपवर पर्सनल
चॅटींग तासन् तास चालते. जेवणाच्या, पार्टीच्या चर्चा होत राहतात. आपल्या या पोस्ट
इतरांना किती त्रासदायक ठरत असतील याचा साधा विचारही आपण करत नाही.
मग संध्याकाळी पुन्हा तत्वज्ञानाचे डोस सामुदायिकरित्या
पाजण्याचे काम सुरू होते व शेवटी पुन्हा गुड नाईटच्या ईमेजीसचे वादळ.
मित्रांनो यात आपला आणि इतरांचा किती वेळ आणि पैसा
खर्च होतो याचा आपण विचारही करीत नाही.
यापुढेतरी फक्त आपल्या ग्रुपच्या निर्मितीमागचा
हेतू ध्यानात ठेवूनच पोस्ट टाकूया. पुनरावृत्ती टाळूया. राग नसावा ही विनंती...
✅1 : Whatsapp चा उपयोग
चांगल्या कामासाठी करा... Data Free अमुक Free तमुक free असे msg पाठवू नका. या जगात
काहीच free मिळत नाही. असे msg पाठवून आपण आपल्या अल्पबुद्धीचा परिचय देत असतो.
✅ 2 :"हा मेसेज
दुस-या ग्रुप मध्ये पाठवा आणि जादू बघा काही फरक जाणवेल." अशा प्रकारचे मेसेज
forward करुन आपण किती बालीश आहात हे ग्रुपला दाखवु नका...
✅ 3 : पुरुष तसेच स्त्रियांना
मारहान केलेले pictures, videos सेंड करुन समाजात हिंसाचार पसरवुन आपल्यावर आई-वडीलांनी
केलेल्या संस्कारांना मातीमोल करु नका....
✅ 4: जातीचा अभिमान
सर्वांना असतो, Whatsapp वर धर्मप्रेम गाजवु नका तर थोरांच्या विचारांचे पालन करा,
महापुरुषांची बदनामी करु नका...
✅ 5: विनाकारण
Whatsapp वर वेळ वाया घालवु नका, आपल्या Carrer ला तसेच कामधंद्यांना प्राधान्य द्या
Whatsapp च्या माध्यमातून आपल्याला काही फायदा घेता येेतो का ते पहा...
✅ 6 : उगाचच देवादिकांच्या
नावाचे मेसेज 11 जनांना पाठवा, आई बापांच्या
वा देवाच्या नावाने शपथा घालणे असे करन तुमच्या अंधश्रद्धेचे प्रदर्शन थांबवा...
✅ 7: Whatsapp चा वापर
चांगल्या कामासाठी करा... दुसऱ्यांना मनस्ताप होईल असं काहीच Share करु नका. नक्कीच
Whatsapp चे खरे महत्व तुम्हाला कळेल...
✅ 8: अमक्या तमक्याची
कागदपत्रे सापडली, अमका मुलगा सापडला, (2-2, 4-4 वर्षापूर्वीची), हा मेसेज फॉर्वड करा
मला WhatsApp कडून पैसे मिळतील यातील गांभिर्य ओळखा हे सर्व खोटे मेसेज असतात. खात्री
शिवाय फॉर्वड करू नका..
✅ 9: उगीच जुनाट तेच
तेच मेसेज, शायऱ्या, सुविचार टाकून तुम्ही रिकामटेकडे आहात हे दाखवू नका, तुमच्या सुविचारांची
लोंकाना गरज नाही, सर्वजण आपापल्या कामात व्यस्त आहेत त्यांना रोज रोज बोअर करू नका..
✅ 10: प्रत्येक छोट्या
मोठ्या सणाला, गोष्टीला शुभेच्छा देत बसू नका, द्यायच्या असतील तर भेटून किंवा फोन
करून द्या,, सर्व लोकांना माहिती आहे की उगीच फॉरवर्ड टच करून एकावेळेस हजारो लोकांना
पाठवता येते त्यात आपुलकी नसते...
🙏वरील पध्दत वापरली तर तुमचा अन् इतरांचा
बहुमूल्य वेळ वाचेल.
वेळ कोणासाठी थांबत
नाही ... आणि एकदा गेलेली वेळ परत येत नाही..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा