Pages

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

चला अभ्यास सोप्पा करूया

चला अभ्यास सोप्पा करूया 


तुमचं वय कांहीही असू देत,तुम्ही जर विद्यार्थी असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

जानेवारी महिना संपत आला आहें. मार्च, एप्रिल,मे हे परीक्षांचे महिने जवळ येत आहेंत. अनेकांचे धाबे दणाणले असणार. वाया गेलेला / घालवलेला, काळ आपल्यालाच वाकुल्या दाखवतोय असा भीतिदायक भास ही तुमच्या पैकी अनेकांना होत असणार. स्मरणशक्ती चे अभ्यासवर्ग घेतांना विद्यार्थ्याचे हे अनुभव मला नेहमीच ऐकायला मिळतांत.

खरेंतर जो परिश्रम, सातत्य व एकाग्रतेने केला जातो तोच खरा अभ्यास. तरीही कांही गोष्टींकडे थोडं नीट लक्ष दिलं तर शाळा कॉलेजचीच नव्हें तर ..... आयुष्याची परीक्षा सुद्धा चांगल्या मार्कांनी पास होणें सहज शक्य आहे.

कोणतीही परीक्षा द्यायचा निर्णय एकदां झाला कीं इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अभ्यासलाच अग्रक्रम दिला गेला पाहिजे. ह्याचा अर्थ असा नव्हें कीं रात्रंदिवस, उठता बसता .... फक्त अभ्यास एके अभ्यासच करायचा आहें.
पण विषयवार वाचन, लेखन, मनन हे नियमितपणे झालेच पाहिजे.

💠    विद्यार्थ्याने सर्वप्रथम स्वतःचे ध्येय निश्चित करायचे असतें. जोपर्यंत तुमचे शिक्षण घेण्या मागचे उद्दिष्ट तुम्ही नक्की करणार नाही, तोपर्यंत अभ्यासा साठी लागणारी प्रेरणा ही तुमच्यांत येणार नाही.

ह्यानंतर महत्वाचे म्हणजे स्वतःची दिवसभरांतील एकवेळ निश्चित करावी. मात्र एकदां अभ्यासाची वेळ ठरवली कीं ती चुकू देवू नये.  ह्यावेळी भरपेट जेवू नये, तसेंच अर्धपोटी / उपाशीपोटी ही राहू नये. असे पदार्थ खाण्यात ठेवावेत जे उष्मांक तर देतील पण शरीरांत जडपणा आणणार नाहीत. मन आणि शरीराला पोषण देणाऱ्या पदार्थांचेच सेवन करावें. उदा. ताजे सात्विक अन्न, जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश, सॅलडस, शक्य असेल तर थोडा सुकामेवा, तीळ, शेंगदाणे,(शिजवून घेतलेली) मोड आलेली कडधान्यें, फळें इत्यादींचा समावेश असावा. तळलेले पदार्थ फास्टफूड / जंकफूड, कोल्ड्रिंक्स तर  उत्तम मार्क्स घेण्याची ईच्छा असणाऱ्यांनी वर्ज्यच समजावेत.

💠   स्वतःच्या अभ्यासाचा एक विषयवार टाईमटेबल तयार करून घ्यावा. ह्यांत नावडता विषय सर्वांत अगोदर तर आवडता विषय सगळ्यांत शेवटी ठेवावा. ( एरव्ही आपण नेमकं ह्या उलट करतो.) कोणत्याही विषयाला सलग 2 - 3 तास कधींच देवू नये. तासाभराच्या आत एक टॉपिक पूर्ण करावा. नंतर थोडा ब्रेक घ्यावा. त्यानंतर दुसरा विषय किंवा टॉपिक अभ्यासाला घ्यावा. झोप घालावण्या साठी चहा, कॉफी चालेल पण ह्या पेयांचा अतिरेक मात्र टाळावा. ह्या काळांत पोषकद्रव्ये असलेला, व्हिटॅमिन्स, खनिजें व कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा. पाणी भरपूर प्यावे.

💠   अधुन मधुन सर्व शरीराला व्यायाम म्हणून चालणें, फिरणें, खेळणे 🏀⚽🚴 असावें. अभ्यासाचा वेळ मात्र पूर्णपणे TV, Mobile free असावा. ह्यावेळी सुद्धां सोशल नेटवर्किंग साईट्स शिवाय राहत येत नसेल तर मात्र कांही खरें नाही. अभ्यास करतांना टेबल खुर्चीचा / जमिनीवरील भारतीय बैठकीचा वापर करावा.
बऱ्याच लोकांना अंथरुणावर बसून / पडून  अभ्यास करण्याची संवय असतें. ही पद्धत चुकीची आहे. ही संवय तुम्हाला असेल तर ती आधी सोडा. जिथे बसून अभ्यास करायचा ती जागा खोली देखील स्वच्छ, प्रदूषणमुक्त असावी. 
परिक्षार्थींची झोपही पूर्ण व्हायलाच हवी. बरेचदा विद्यार्थी / विद्यर्थिनी पेपरच्या अगदी ऐन वेळेपर्यंत वाचत असतांत पण तसें करू नका. पेपरच्या आदल्या रात्रीही तुम्ही जागरण न करता  छान झोप घ्यायची आहें. 
💠    अभ्यासाला बसताना .....वही, पेन, पेन्सिल, खोडरबर, स्केल व पाण्याची बॉटल हाताशी ठेवावें. असें केलें नाही तर ह्यापैकी एकेका वस्तु साठी उठावे लागल्याने अपेक्षित एकाग्रता सतत ब्रेक होत राहील.
आतां प्रत्येक chapter वाचल्यानंतर , त्यातील महत्वाच्या मुद्द्यांच्या नोट्स लिहून काढाव्यात.  आवर्जून सांगतेय कीं भाषा स्वतःची असावी. शब्द स्वतःचे असावेत. महत्वाचे "दिशादर्शक" शब्द अधोरेखित करावेत. न समजलेलें words/ theorems/ phrases/ formulas/ methods हे सगळे वेगळें लिहून काढून आत्मसात करावेत. लिहिलेले मुद्दे न बघतां आठवण्याची संवय करावी. मागील परीक्षांचे प्रश्नसंच मिळवून ते सोडवावेत. हे प्रश्नसंच सोडविण्याच्याही कांही पद्धती आहेत. 
💠    केलेल्या अभ्यासाची एक उजळणी पहिल्या 24 तासांत तर दुसरी 72 तासांत व तिसरी 7 दिवसांत करावी. जमले नाही तरी प्रयत्न सुरू ठेवावेत. विद्या / ज्ञान परिश्रमानेच साध्य होतें. एक छोटीशी मुंगी सुद्धा तिच्या जिद्द व चिकटीनेच जीवन संघर्षांत यशस्वी होतें, तर आपण कां नाही ? 
 सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पॉझिटीव्ह अर्थात सकारात्मक विचार ठेवावेत. हे मला जमेलच ही भावना ठेवावी. अपयश आलें तरी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने सराव चालुच ठेवावा. 
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर चांगल्या गोष्टी शिकवणारे कांही लोक भेटत असतांतच. त्या सर्वां विषयी आदराची भावना असावी. अगदी आई, वडिल गुरुजनां पासून ते पार एकाद्या अनोळखी हितचिंतका पर्यंत ..... सर्वांविषयी !
मदत करणाऱ्यांवर हक्क गाजवण्याची, रागावण्याची भूमिका तर अगदी चूकच.
ह्या बाबीं तसेंच चिकाटी आणि मानसिक स्थिरतेचा अभाव .... ह्या उणीवा आयुष्याची परीक्षा पास होण्याच्या मार्गातील अडथळे आहेंत. 
💠    सरसकटपणे आपली सर्वांची स्मरणशक्ती अप्रशिक्षित (untrained) असतें. तिला प्रशिक्षित (trained) केलें की अभ्यास सोप्पा. त्या साठी माझ्या कार्यशाळेत विविध तंत्रांचा यशस्वीरित्या वापर केला जातो. एक छोटासा प्रयोग तुम्हीही करून बघा : 
एका टेबलवर 10 - 15 वस्तु लावून ठेवायला कोणालातरी सांगा. आतां तुम्ही ह्या वस्तुंना एकदाच कांही सेकंद बघा. आतां वस्तूंकडे अजिबात न बघता, सर्व वस्तु ज्या क्रमाने लावल्यात, त्याच क्रमाने लिहून काढण्याचा प्रयत्न करा. वस्तु आणि क्रम बिनचूक लिहिता येईपर्यंत हा प्रयोग रिपीट करत रहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा