बिरबलाची चातुर्यकथा
-
एकदा एक चित्रकार दरबारात आला. त्याने एक सुंदर व्यक्तिचित्र सोबत आणले होते. बादशाहने
दरबाराचा सल्ला मागितला. काही विघ्नसंतोषी मानकरी सल्ला देते झाले की, "हे चित्र
शहराच्या चौकात ठेवून दवंडी पिटावी. जनतेला चित्रात ज्या चुका वाटतील तिथे खुण करावी."
झाले! संध्याकाळपर्यंत संपूर्ण चित्र लोकांनी खुणा करून विद्रूप केले होते. चित्रकार
बिचारा रडकुंडीला आला. त्याने बिरबलाला गाठले. बिरबल महाशयांनी त्याला एक सामान्य चित्र
काढायला सांगितले. ते चित्र चौकात ठेवून पुन्हा दवंडी दिली गेली की, "ज्या कुणाला
या चित्रात चूक आढळेल ती त्यांनी दुरुस्त करावी." त्या दिवशी त्या चित्राच्या
जवळपास कोणी फिरकले नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा