एक पिढी
एक पिढ़ी आता
"पन्नाशी" ओलांडुन "साठी" कडे चाललिये,
ह्या आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने
खूप मोठा बदल पाहिला
आणि पचवला.
आणि या पिढीची एक मोठी
अडचण म्हणजे ही पिढी कायम उंबरठ्यावर राहिली.....
बोरू/ टांक पासून सुरवात
करून, ही पिढी आता, स्मार्ट फोन, लेपटॉप, पीसी, सराईतपणे हाताळत आहे.
ज्या पिढीच्या बालपणी
सायकल सुद्धा भाग्यानेच मिळत असत,
आता ह्या वयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही
पिढ़ी अवखळ तर कधी गंभीर.
... खूप भोगलेली आणि
खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित....
टेप रेकॉर्डर, पॉकेट
ट्रान्झिस्टर ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती.
मार्कशीट आणि टिव्हीच्या
येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही
अशी ही शेवटची पिढी.
कुकरच्या रिंग्स, टायर,
असल्या गोष्टी घेऊन लहानपणी गाडी गाडी खेळणं
यात त्यांना काही ही कमीपणा वाटला नव्हता.
"सळई जमिनीत रूतवत
जाणं" हा काही खेळ असू शकतो का ?
पण होता....
'कैऱ्या आणि पेरू तोडणं'
ही यांच्या साठी चोरी नव्हती,
आणि ...
कुठल्याही वेळी कुणाचंही
दार वाजवणं या मध्ये कसलेही ईथीक्स तुटत नव्हते.
मित्राच्या आईने जेवू
घालणं यात कसलाही उपकाराचा भाव नसायचा
आणि
त्याच्या बाबांनी ओरडणं
किंवा रागावणं यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी.
वर्गात किवा शाळेत
स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचमत बोलणारी ही पिढी.
पण गल्लीत कुणाच्याही
घरात काहीही असलं तरी वाट्टेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी.
चंदू बोर्डे, नाडकर्णी,
वाडेकर, गावस्कर नंतर कपिलदेव,रवि शास्त्री यांच्या बॅटिंग बरोबर मोठी झालेली ही पिढी.
*कपील, कुंबळे, बेदी,
वेंकट, प्रसन्नां च्या बोलिंग वर
आणि
पेस, भूपती, स्टेफी
ग्राफ, अग्गासी, सॅम्प्रसच्या टेनिस वर,
अन राज कपूर, देव आनंद, मधुबाला, दिलीपकुमार, नूतन
आणि नंतर बऱ्याच नवीन
कलाकारांवर,
अगदी अमिताभ, आमिर,
माधूरी वर वाढलेली ही पिढी*
भाड्याने VCR आणुन
४-५ पिक्चर्स पैसे गोळा करून एकत्र पाहणारी ही मित्रांची पिढी.
लक्ष्या-अशोक च्या
निर्व्याज विनोदावर हसलेली,
नाना, नसिरुद्दीन शाह,
ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, अमरीशपुरी, वर्षा, निवेदिता, विनय
आपटे, संजय मोने, सतीश पुळेकर ते अगदी कुशल बद्रिके, भाऊ कदम ,अमृता, सोनाली पर्यंत
कलाकार पाहिलेली ही पिढी....
दूरदर्शन वर 'स्वरूप
सम्पत-सतीश शाह' ची विनोदी टीवी मालिका "ये
जो है जिंदगी" दर शुक्रवारी रात्रि 9 वाजता आवर्जून बघणारी पिढी,
अमोल पालेकर च्या चितचोर
आणि गोलमाल मध्ये त्याच्या वर जीवापाड प्रेम करणारी पीढ़ी...
कितीही शिकलं तरी
'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही' यावर कायम चा विश्वास ठेवणारी...
'शिक्षकांचा मार खाणं'
यात काहीही गैर नाही
फक्त
घरी कळू नये कारण
'घरात परत धुतात' ही भावना जपणारी पिढी.
मग
ज्यांच्या पालकांनी
शिक्षकांवर कधी ही 'आवाज चढवला नाही' अशी पिढी.
वर्गात कितीही धुतलं
तरी
दसऱ्याला शिक्षकांना सोनं देणारी
आणि
आज इतक्या वर्षानी
सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता खाली वाकून पाया पड़णारी ही पिढी कमालीची आहे..
पंकज उधासच्या *'तुने
पैसा बहोत कमाया इस पैसेने देस छुडाया' या ओळीला डोळे पुसणारी,
जगजीत सिंगच्या गझल्स
ऐकत अगदी शून्यात गुम होणारी ही पिढी...
दिवाळीच्या पांच दिवसांची
कथा माहित असणारी
लिव्ह इन तर सोडाच,
लव मॅरेज म्हणजे फार मोठं डेरिंग समजणारी ही पिढी,
अहो शाळेत आणि महाविद्यालयात
पण मुलींशी बोलणारी मुले ऍडव्हान्स समजली जाणारी पिढी.
आपल्या राष्ट्रावर
आज ही अतूट प्रेम करणारी पिढी...
शिवबाच्या शिवनेरी
पासून सिंहगड पर्यन्तच्या शूरतेच्या गोष्टी लक्षात ठेवणारी पिढी...
पुन्हा डोळे झाकुया
?
*दहा, वीस....... ऐंशी,
नव्वद...........
पुन्हा जुना आठवणीचा
सुवर्ण काळ
गेले ते दिवस
राहिल्या त्या आठवणी.
....असं न समजणारी
सुज्ञ पिढी,
कारण आजचे दिवस
हेच उद्याच्या आठवणी
असणार
असं मानणारी पिढी....!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा