Pages

सोमवार, १५ एप्रिल, २०१९

निसर्ग काय सांगतो



कोण बरोबर आणि कोण चूक हे कसं ठरवायचं?

वाद घालणं हे आयुष्यच 1 अंग आहे. आयुष्यात 1 दा पण वाद न घातलेला माणूस नसेल. आई वडील ,भाऊ बहीण ,नवरा बायको, सासू सून ,नणंद भावजय ,मालक नोकर, शेजारी पाजारी, नातेवाईक. असा वाद कोणाशीही होऊ शकतो. वाद माणूस कशा साठी घालतो तर त्याला स्वतःला त्याच अस्तित्व साबीत करायचं असत.
खूप वेळा वाद इतके विकोपाला गेलेले असतात की कोणीही माघार घेताना दिसत नाही. मोठी माणसं तर आजकाल  अस बोलताना दिसतात की कोण बरोबर आणि कोण चूक हे कोण ठरवणार . तस पण इथे लोकशाही आहे आणि संविधान प्रत्येकाला त्याचे अधिकार देतो . आजकाल स्त्री आणि पुरुष असा भेद केलेला बायकांना नाही आवडत . प्रत्येकांनीच आपापली आपल्याला योग्य आणि सोईस्कर पद्धत अवलंबलेली आहे.
1 पिढी नेहमी दुसऱ्या पिढीला नाव ठेवताना दिसते. सध्या तर नवीन पिढी बरोबर जुळवून घेताना मोठ्यांची फारच दमछाक होताना दिसतीये. त्यातून अनेक वेळा वादाचे प्रसंग येतात.
कधी कपडे घालण्या वरून वाद होतात, तर कधी खान्यावरून होतात तर कधी राहण्यावरून होतात.
कधी कधी काही गोष्टींचं समर्थन केलं जातं. आणि आम्हीच कसे बरोबर आहोत हे सांगितलं जातं. काही वाद हे तात्विक असतात, काही गहन असतात, काही अस्तित्वा साठी असतात, काही दुसऱ्या साठी असतात, आणि काही विनाकारण असतात जे असमंजस पणाचा आविष्कार असतात, काही विकोपाला जाणारे, काही आयुष्यभर तोंड न पाहणारे, काही ती व्यक्ती समोर आली की डोक्यात तिडीक आणणारे तर काही पोटात सुरा खुपवासावा असे वाटणारे वाद असतात.  काही वाद आयुष्यातून उठवतात आणि काही आयुष्य पण संपवतात.

पण मग याला करायचं काय ????? यात कोण बरोबर आणि कोण चूक हे कसं ठरवायचं ?साधी साधी जगण्याची सूत्र बरोबर आहेत की नाही हे कसं जाण्याचं?.....

खरचं बघायला गेलं तर हे प्रश्न खूप अवघड आहेत. एखादी गोष्ट चूक की बरोबर आहे हे बघायला रोज कोणता तराजू मिळणार आपल्याला . आपण मीच कसा बरोबर आहे हे सांगण्यात आपली इतकी शक्ती घालवलेली असते की आपण चूक आहोत हे आपल्या कधी कधी लक्षातच येत नाही.
 पण एक गोष्ट खरी  सांगू का ....... तर आपण चूक कि बरोबर याच उत्तर काही दिवसांनी काळच आपल्याला देत असतो.  पण तितके दिवस आपण थांबायचं का?
तर त्याच उत्तर नाही अस आहे ........
भांडण तर होतच राहणार .पण आपण ज्या साठी भांडत आहोत ती गोष्ट निसर्गाला धरून आहे की नाही ते बघणं जास्त महत्वाचं आहे.
आपण जगताना निसर्ग काय सांगतोय . तो कस जगायला शिकवतोय याच्या मुळाशी जाण महत्वाचं आहे. कारण निसर्ग हा मोठ्ठा जज्ज आहे. तुम्ही चूक आहे की बरोबर हे तोच ठरवू शकतो. तुम्ही जगताना चुकलात तर त्याची शिक्षा तो तुम्हाला नक्कीच देतो. निसर्गा सारखा मोठा समीक्षक कोणीही नाही. तुम्ही निसर्गाला धरून राहिलात तर तुमची जीत हि ठरलेली आहे. तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध राहिलात तर तुमची हार हि निश्चित आहे.... चुकीचा वाद समोरच्या बरोबर असलेल्या माणसाला एखाद वेळेस नामोहरम करून तुम्हाला जिंकण्याचा आनंद देईलही पण निसर्ग तुम्हाला नंतर हारवेल हे नक्की. तस तर प्रत्येक व्यक्तीला ती चूक आहे की बरोबर हे तिच्या अंतरातम्याला माहीत असत....
पण हा उपाय जर प्रत्येकांनी अवलंबला तर कित्येक वाद कमी होतील. कितीतरी भांडण संपतील. माघार घेणं सोपं होईल.....1 दा तरी प्रयोग करून बघा. कारण यात मानसिक समाधान जास्त आहे....

मित्रांनो अशाच प्रकारचे छान छान लेख वाचण्यासाठी व share  करण्यासाठी आपल्या मोबाइल मध्ये अँप करा 
DOWNLOAD 

शुक्रवार, १२ एप्रिल, २०१९

'Healthy WOMEN'.......



खास महिलांसाठी वाचनात आलेला सुंदर व उपयुक्त संदेश*    ✍✍                                                                                                          'Healthy WOMEN'.......

वाढत जाणारे वजन, दुखणारे गुडघे, पित्ताचा त्रास, कंबरदुखी, पाळीचा त्रास, कमी हिमोग्लोबिन, दम लागणे, टाचा प्रचंड दुखणे, रात्री झोप न येणे, अनामिक दडपण जाणवणे, केस गळणे, भेगा पडणे, त्वचा कोरडी कोरडी होत जाणे अशा असंख्य तक्रारी शरीरात मुक्कामी येऊ लागतात.

या तक्रारींपासून लांब जाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते पण खरंच यासाठी वेळ कुठून आणायचा? हाच यक्षप्रश्न सुटत नसतो.

या सगळ्या fire fighting lifestyle मध्ये जर आपलं निरोगीपण टिकलं तर आणि तरच या अष्टभुजा नारायणीचा वरदहस्त मिळून Super woman होता येईल!

Energy boosting:

पाव किलो खारीक पावडर, पन्नास ग्रॅम खायचा डिंक एकत्र करून हे mixture 2 चमचे दुधात mix करून आपल्यासाठी रोज सकाळी खाण्यासाठी cerelac तयार करता येईल.

दोन वेळा शतावरी कल्प दुधातून घेऊन ही energy level maintain ठेवता येईल.

बस्स पांच मिनिटंवाला नाश्ता with देशी अंदाज:

नाश्ता compulsory प्रकारात घेऊन त्यासाठी मेतकूट भात, तुपसाखर पोळी, लोणी-साखर पोळी, राजगिरा लाही व दुध, लाह्यांचे पीठ व ताक, नाचणी पेज किंवा खीर,भाकरी भाजी, पुलाव, थालीपीठ, उपमा, शेवई उपमा यासारखा अस्सल देशी menu नक्की करायचा.

ओट्स, कॉर्नफ्लेक्स, packed juices, बेकरी पदार्थ, शिळे पदार्थ, मॅगी यांना ठामपणे "NO" म्हणायचे.

किचन क्लिनिक:

फोडणी करतांना हिंग, मेथी दाणे, हळद, कडीपत्ता पानांची पावडर भरपूर वापरून हाडांचे विकार आणि पाळीचा त्रास दूर सरतील.

एक वेळेच्या जेवणात वरण, भात, तूप, लिंबू हे combination आणि लोखंडी कढईत भाजी म्हणजे anaemia ला bye bye
ज्वारीची भाकरी व फळभाजी नक्की केली की पचनाच्या तक्रारी चक्क गायब.

कणकेत चिमूटभर चुना add करून, कडीपत्ता चटणी, जवस चटणी, तीळ चटणी, शेवगा भरपूर वापरून हाडांना strong ठेवता येईल.

Fitness मंत्र :

सकाळी थोडासा वेळ दिर्घश्वसनासाठी देऊन फुफ्फुस पोटांच्या स्नायूंचा व्यायाम सहजच होईल. सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी जेवणाआधी 2 तास. दिवसभर वापरायची चप्पल ही चामड्याची घेऊन रोज त्यावर एरंड तेलाचा कापसाचा बोळा फिरवून ती चप्पल दिवसभर वापरून टाचदुखी ला कायमचा निरोप देऊया.

==============
सगळ्यांना आपण आनंदी ठेवतोच पण स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या मित्र-मैत्रिणी शोधून खूप हसूया.

आपल्यात लपलेल्या सुप्त गुणांना, मनाच्या खॊल कप्प्यात दडलेल्या आवडीला या निमित्ताने वर काढूया. स्वतःची ओळख घडवून आणत, निरामयतेच्या वाटेने जाता जाता "फिरुनी नवे जन्मेन मी" हे promise स्वतःशीच करूया !

वैद्य सौ दिप्ती धर्माधिकार

थकवा

थकवा 

थकवा असा सहज येत नाही. त्याचं कर्जासारखं आहे. कर्ज घेणं गैर नाही, पण ते वेळेवर फेडावं लागतं, नाहीतर माणूस त्या व्याजातच बुडतो आणि कर्जबाजारी होतो. थकव्यातही तसंच घडतं. शरीराचा, मनाचा, बुद्धिमत्तेचा वापर आपण करतो, तिला वेळच्या वेळी पोषण दिलं, विश्रांती दिली, उत्तम विसावा दिला तर तिची झीज भरून निघते. जर ते केलं नाही तर थकवा जात नाहीच, उलट वाढतच जातो.

थकवा येणं बंद करता येणार नाही. पण, ज्यांची शारीरिक,मानसिक क्षमता उत्तम आहे, अशांना थकव्याचा प्रतिकार करता येतो. पण आजकाल असं दिसतं की, आपण ही क्षमताच वाढवत नाही. योग्य आहार-योग्य विहार आणि योग्य व्यायाम यापासून आपल्यापैकी अनेकजण शेकडो मैल लांब आहेत. सुधारणा होणार कशी?

अगदी शंभर वर्षांपूर्वीच्या काळात जायला नको. पण, साधारण २५ वर्षं मागं जाऊन पाहू. स्वयंपाक घरात यंत्रं नव्हती. ताक करताना रवई वापरली जात असे, पाटा-वरवंटा रोजच्या वापरात होता, शेंगादाण्यांचा कूट किंवा चटण्या मिक्सरमध्ये होत नसत. खलबत्ता सर्रास वापरला जात होता. लोणची, पापड, मसाले उन्हाळ्यात घरोघरी होत असत, घरातल्या बायका या गोष्टी स्वत: लक्ष घालून करत असत. शारीरिक कष्ट होत असत, पण आहाराचा दर्जा उत्तम होता. हाॅटेलात जाऊन जेवणं किंवा ऊठसूठ बाहेरचं खाणं हे उडाणटप्पूपणाचं लक्षण समजलं जात होतं. त्यामुळे, खाण्या-पिण्याची तंत्रं टिकून होती.

गरीब असो किंवा श्रीमंत, कोणत्याही घरी गेलात की तांब्या-पितळेची भांडी असायची. आमटीची कढई लोखंडाची असायची. डायनिंग टेबलाची पद्धत नव्हती. खाली मांडी घालून जेवायला बसत असत. काट्या-चमच्यानं जेवत नसत. जवळपास घरोघरी दुधदुभतं भरपूर होतं. दूध, ताक, लोणी, घरचं कढवलेलं शुद्ध तूप हे पदार्थ मुबलक प्रमाणात आहारात होते. बेकरीच्या पदार्थांना स्वयंपाकघरात मज्जाव होता. स्वयंपाकाकरिता घाण्याचं तेल वापरलं जायचं. चार-चार दिवसांचं शिळं अन्न घरात ठेवण्याची रित नव्हती. पण आता घरोघरी फ्रिज ओसंडून वाहत असतात.

मेतकूट-तिखट लावलेला कच्चा चिवडा, कच्चे किंवा भाजके शेंगदाणे, फुटाणे, वाटाणे असं खाणं अगदी सहज व्हायचं. प्रत्येक पदार्थाचा एक विशिष्ट सीझन होता. तेव्हाच तो पदार्थ घरी व्हायचा. अक्षय्यतृतीयेच्या आधी आंब्याला हातसुद्धा लावू देत नसत आणि पहिला पाऊस पडला की आंबा बंद. पुन्हा नाव काढायचं नाही. गुळांबा आणि साखरांबा हे पदार्थ घरी केलेत असं तर मी गेल्या १५ वर्षांमध्ये पाहिलंच काय, ऐकलंसुद्धा नाही. कैऱ्या, बोरं, आवळे, करवंदं, जांभळं, चिंचा ही फळं भरपूर खाल्ली जात होती. आताची किती मुलं ही फळं भरपूर खातात?

सातवी-आठवीत शिकणाऱ्या मुला-मुलींना काकवी माहित नाही. गव्हाचा चिक माहित नाही. उडदाच्या पापडलाट्या माहित नाहीत. घरात केचप, साॅस, जॅम, मेयाॅनीज, नटेला च्या बाटल्या असतात, पण मधाची बाटली नसते. तूप कढवल्यावर त्याच पातेल्यात केलेला भात आताच्या शाळकरी मुलांना माहितच नाही. दर गुरूवार किंवा शनिवारचा नारळ घरात आला की खोबऱ्याच्या वड्या व्हायच्याच. डबाभरून केल्या तरी चार दिवसांत संपायच्या. मग पुन्हा नवीन करायच्या. हाळीवाचे लाडू, डिंकाचे लाडू असायचे. आता मुलांच्या आहारातून हे पदार्थच गायब झालेत. एकूण कुटुंबातूनच या पदार्थांना गायब करण्यात आलंय. मुंजीतले भिक्षावळीचे लाडू अतिशय पौष्टिक असतात, आता भिक्षावळीतल्या लाडवांपेक्षा भिक्षावळीतल्या साडीलाच महत्व आलंय.

वाॅशिंग मशीन्स नव्हती, कपडे हातानंच घासावे लागत,धुवावे लागत. प्रत्येकजण आपापले कपडे स्वत: धूत असे. ती सवय घराघरात होती. आता मात्र ही सवय नामशेष होत चालली आहे.
माणसं शक्यतो पायी चालत, सायकल वापरत. शाळेत पायी चालत जायचं आणि यायचं, हा शिरस्ता होता. सकाळ-संध्याकाळ ग्लासभर दूध प्यायल्याशिवाय सुटका नसायची. कितीही कंटाळा आला तरीही, मुंज झाल्यावर दररोज संध्या करावीच लागे आणि तिन्हीसांजेला रामरक्षा-भीमरूपी तर अनिवार्य होतं. शक्यतो कुणीच परान्न घेत नसत. प्रवासातही घरची शिदोरी सोबत असायची.

शालेय वयातल्या मुलांचे थकव्याचे प्रश्न तर गंभीर आहेत. पण त्याला कारणंही अनेक आहेत. त्यातली बहुतांश कारणं राहणीमानाशीच संबंधित आहेत. स्वच्छ, सुती आणि सैलसर कपडे वापरणाऱ्या व्यक्ती पहा आणि तंग, चित्रविचित्र रंगाचे,भडक कपडे घालणाऱ्या व्यक्ती पहा. त्यांच्या व्यक्तिमत्वातला फरक सूज्ञांच्या लगेच लक्षात येईल. आता तर शाळांचे गणवेशही चित्रविचित्र रंगांचे आणि मळखाऊ असतात, त्या रंगांमध्ये उत्साही वाटणार तरी कसं?
रोज संध्याकाळी मैदानावर खेळणं व्हायचं. अगदी पावसातही !

रात्री अंगणात किंवा गच्चीवर मुलं एकत्र झोपत असत. रात्रभर जागरणं करण्याची परवानगी नव्हती. जेवणंही रात्री आठाच्या सुमारास उरकलेली असायची. पण, जेवण स्वयंपाकघरातच असायचं. टीव्ही बघत खायची पद्धत नव्हती. आताही जेवणं रात्री आठ वाजता होतात, पण टीव्हीवर पाताळयंत्री बायकांच्या सीरीयल्स पाहत पाहत !

या सगळ्या आयुष्यात आराम असा नव्हताच, पण आनंद मात्र भरपूर होता. एकमेकांना देण्यासाठी माणसांकडे पैसा नव्हता, पण वेळ मात्र भरपूर होता. आता आपल्याकडे वेळच नाही, स्वत:साठीही आणि इतरांसाठीही ! आयुष्यं आताइतकी गतिमान नव्हती, पुष्कळ संथ होती. पण, त्यामुळं थकवा नव्हता. “लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा हे तत्व माणसं दैनंदिन आयुष्यात वापरत होती. आणि त्यामुळंच, त्यांना आयुष्य जगता आलं. आपली आयुष्यं नुसती धावपळ करण्यातच जातायत..! अतिशय मोठ्या महत्वाकांक्षांपासून माणसं स्वत:ला अगदी जाणीवपूर्वक दूर ठेवायची. राहणीमानातला साधेपणा हेही थकव्यापासून दूर असण्याचं एक प्रमुख कारण असावं.

लोकांच्या आयुष्यात एकटेपणा नव्हता. बहुतांश वेळ इतरांबरोबरच जायचा. प्रत्येकाच्या आजूबाजूला माणसांचा वावर असायचा. हेवेदावे, रूसवेफुगवे होते पण त्यातही स्पष्टता होती. कारण काही लपवालपवी करण्यासारखं नव्हतंच. बंद दारं नव्हती. दारांना कुलुपं नव्हती. शेजारी एखादा पदार्थ केला तरी त्यातला वाटीभर घरी यायचाच. त्यात प्रेमही होतं आणि रितही होती. माणसं सांभाळण्याकडे एकूणच कल होता. त्यामुळं, टार्गेट्स चा ससेमिरा नव्हता. मानसिक अशांतता नव्हती. चिंतेचे भुंगे नव्हते. रात्री शांत झोप लागू शकत होती. भरपूर मित्रमंडळी, स्नेहीसोबती, शेजारी यांच्या सहवासात कठीण परिस्थिती पचवण्याचं बळ अंगी यायचं. धीर यायचा. पण, प्रायव्हसीच्या नादात हे सगळं आपण तोडून टाकलं आणि एकट्यानंच चालायचं ठरवलं. सगळ्या पातळ्यांवर आपण एकटेच लढायला लागलो, थकवा तर येणारच !

आपल्या हातून घडत असलेल्या , प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होणाऱ्या अनेक चुका यात नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण या थकव्याविषयी आणखी सविस्तरपणे निश्चितच बोलू शकू, चर्चा करू शकू.

©मयुरेश डंके
मानसतज्ञ,

बुधवार, १० एप्रिल, २०१९

निवड


निवड 

एका सावळ्या,जरा स्थूल, डुलत डुलत चालणाय्रा...
मोठ्या फ्रेमचा चष्मा आणि त्यामुळे 25 एक स्थळांकडून नकार मिळालेल्या तिला त्याने सहजी होकार दिला...!

आणि सगळ्यांनाच 4.5 रिस्टलपेक्षा जास्त भूकंपाचा धक्का बसला..

"अरे ती नुसती B.com.. तू M.B.A. ??"

"असे ना का?.. मला पण degree घ्यावी लागलीच ना पण??"

"हो पण..Engg ..ची.. "

"असू देत की...तिला commarce ची आवड असेल."

"अरे पण तुला दुसरी छान मुलगी मिळेल ना!"

"ही काय वाईट आहे? मला आवडलीय ती!"

"पण आम्हाला कुणालाच नाही आवडली.."

घरचे नाक मुरडून म्हणत होते... पण तो ठाम होता..

"Engg is what who gets the solution from any situation..... आत्ता अशी दिसतीय म्हणून म्हणताय.. थोड्या वर्षांनी सगळे म्हणाल...तुझी आवड चुकली नाही म्हणून..."
आणि सगळ्यांकडं दुर्लक्ष्य करून त्यानं तिच्या गळ्यात माळ घातली...

पहिली चार पाच वर्ष जशी जातात तशीच गेली... सणवार, 2 मुलं... एकमेकांना समजून घेणं...घरच्यांशी संबंध balance करणं वगैरे वगैरे...

...मग तो काळ आला.. की दोन्ही मुलं शाळेत जाऊ लागली.. आणि तिला जरा स्वतःसाठी वेळ मिळू लागला..
आणि हीच ती इनिंग होती... जेव्हा त्याने बॅटिंग चालू करायचं ठरवलं...
त्याने जाणलं होतं.. तिला आपल्या दिसण्याचा complex आहे... त्यामुळे थोडा confidance कमी...
ह्यावर काम केलं की बास आहे...

आणि काम सुरू झालं... घरबसल्या account ची कामं तिला सांगणं, त्यातील सल्ला विचारणं, काही refferance शोधायला सांगणं...मग तिलाच एखादं पूर्ण काम देणं.... आणि ह्यात कुठे जास्त चिडचिड न करणं...
आणि..plan यशस्वी ठरू लागला... तिचा confidance वाढला.कमावत्या बाईचा डौलदारपणा तिच्याकडं येऊ लागला. ती आता घराबरोबरच स्वतःच्या राहण्याकडं, दिसण्याकडं लक्ष देऊ लागली... gym ला जाऊ लागली.. माफक मेकप, आणि योग्य dress यामुळे आपण छान दिसतो हे तिला कळून चुकलं.. frame less आणि नाजूक चष्मा आला.. एलिझाबेथ केसांचा कट आला... आणि ती छान दिसू लागली..
चार जणांच्यात सहजी बोलू लागली.. स्वतःची मत मांडू लागली... भिशी, किटी पार्टी ला जाऊ लागली..
मुलांच्या शाळेत भांडू लागली.. त्यांच्या activities मध्ये लक्ष देऊ लागली..

All was going smoothly now...
आणि ती अधिकाधिक आश्वासक दिसू लागली...ती आता चाळिशीला पोहोचली होती... तरी तिचा तरतरीतपणा वाढत होता..

लग्नाला पंधरा वर्ष झाली... आणि त्यावर्षीच्या महिला मासिकाच्या स्पर्धेत 'फोटोजेनिक फेस' चं अॅवार्ड मिळालं
त्या कार्यक्रमात ती भरभरून बोलत होती..म्हणाली..
" प्रत्येक स्त्री ही सुंदरच असते... फक्त तिला तिच्या कोषातून बाहेर पडून फुलपाखरू होण्यासाठी योग्य वेळ द्यावा लागतो....
आणि हे माझे उद्गार नाहीत.. माझ्या नवय्राचे आहेत.. एखाद्या रोपावर प्रेम केलं की तेही बहरतं.. मग बायको तर जीतं जागतं उदाहरणच आहे...ती का नाही फुलणार...??"
आणि पुढे म्हणाली, " तेव्हा FB वर ladies photo ना like करणाय्रांनी आपल्या बायकोलाही दिवसातून एकदा तरी like comment द्या...म्हणजे ती अजून छान दिसेल..."आणि खळखळून हसली...दृष्ट लागावी अशी!

.....आणि त्याच्या घरच्यांना मान्य करावं लागलं
की खरंच त्याची निवड चुकली नव्हती..

अपयश शिकायला हवे


लेख : अपयश शिकायला हवे
Ravikant Kadam (Life coach & Trainer)

यश सर्वांनाच हवे असते आणि ते मिळाल्यावर खूप आनंद मिळतो हेही खरे. यश म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर प्रत्येकाचे उत्तरही भिन्न असणार हेही खरेच , परंतु थोडा बारीक विचार केला तर आपल्याला यश हे सहजासहजी प्राप्त होत नसते , यशापेक्षा अपयश मात्र सहजासहजी मिळते आणि जास्त प्रमाणात आणि जास्त वेळा मिळते , अपयश मिळाल्यानंतर बहुतांश लोक दुःखी होतात आणि यश मिळाल्यावर आनंदी होतात , सर्वसाधारणपणे हाच फॉर्म्युला सगळीकडे चालू असतो. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेत नाहीत की अपयश ही गोष्टच मुळी अस्तित्वात नसते (हे पूर्णपणे माझे वैयक्तिक मत आहे आणि हे मी पुढे सिद्ध करून दाखवत आहे) अपयश ही गोष्टच अस्तित्वात नाही कारण खरी समज ही आहे की अपयश हे अपयश नसून तो एक प्रयोग असतो , शास्त्रज्ञ नवनवीन शोध लावतात आणि त्यांना अनेक प्रयोग करावे लागतात त्यांनी जर असा विचार केला की 10 प्रयोग केले पण सारखेसारखे अपयश मिळत आहे तर काय होईल याची कल्पना करून पाहा बरेच शोध लागले सुद्धा नसते. जीवन म्हणजे एक प्रयोगशाळा आहे आणि मरेपर्यंत प्रयोग करत राहणे हेच आपल्या हातात आहे , एडिसनने एकाच शोधासाठी हजारो प्रयोग केल्याचे सर्वांनाच माहीत आहे , तर मूळ मुद्दा असा आहे की आपणही महान शास्त्रज्ञांसारखा दृष्टिकोन बाळगला आणि आपण जे काही करत असू ते प्रयोग , experiment म्हणून पाहिले तर खरी समज येईल.

आपल्याला जास्त करून अपयश येत राहते आणि आपल्याला अपयशाला सामोरे जायला शिकवले जात नाही , त्यामुळे अनेक तरुण डिप्रेशनमध्ये जातात तसेच नवखे उद्योजकसुद्धा अपयश आल्यामुळे अगदी खचून जातात , साधे नापास झाल्यामुळे आत्महत्येसारख्या घटना सर्रास घडतात , याचे मूळ कारण म्हणजे आपल्याला अपयश शिकवले जात नाही , अपयश समजून घ्यायला शिकवले जात नाही , यश मिळवण्यासाठी आधी अनेकवेळा अपयश येऊ शकते हेच बऱ्याच जणांना माहिती नसते. अपयश हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे त्याच्याशी मैत्री केली पाहिजे कारण यश जेवढे धडे शिकवत नाही तेवढे कठोर धडे अपयश शिकवत असते. अपयश समजून घ्या,यश खूप सोपे वाटेल. माझ्यासाठी तर अपयश म्हणजे प्रयोग आणि विविध प्रकारचे प्रयोग करत जीवन जगण्याचा आनंद घेत राहणे हेच जीवनाचे उद्दिष्ट

अशी असावी आशा !!


अशी असावी आशा !!

       एकदा सहज मला कुणीतरी विचारलं, माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या ? त्यावर मी त्याला एका शब्दात, एकच उत्तर दिलं, 'आशा'. यावर विचारणारा स्वतःच विचारात पडला. त्याला आशा होती, की मी त्याच्या प्रश्नावर, अन्न, वस्त्र, निवारा वैगेरेसारख्या पुस्तकी पठडीतल्या गरजांचे उच्चारण करीन, किंवा फार-फार तर या त्रिकुटापुढं 'शिक्षण' नावाचं एखादं शेपूट जोडीन. मात्र अफसोस! त्याचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आणि मला त्याने परत विचारलं, की असं नेमकं कसं ? त्यावर मग मी त्याला माझ्या जन्माची एक गोष्ट सांगितली.

       खूप खूप लक्ष वर्षांपूर्वी, जेव्हा माझा जन्म अगदी मानवी उत्क्रांतीच्याही खूप अगोदर, एक रानटी माकड वजा माणूस म्हणून झाला होता. की जेव्हा मी पूर्णपणे रानटी आयुष्य जगत होतो. तेंव्हा एक दिवस अचानक मला खूप भूक लागली होती. भुकेने अतिशय व्याकूळ होऊन मी त्या रानात, अन्नाचा शोध घेत होतो. मात्र दुर्भाग्यवश, मी पूर्णपणे असफल होत चाललो होतो. मात्र तरीही मी भटकंती सोडली नव्हती. चालून चालून अगदीच मरणासन्न अवस्था झाली होती. दिवसाची रात्र आणि रात्रीची पहाट, पुन्हा दिवस, पुन्हा रात्र हे दिनचक्र नेमान चालूच होतं आणि त्यालाच आदर्श मानून मी न थकता चालतच होतो. एक वेळ अशी आली, की प्रचंड भूकेने अंगात त्राण उरला नाही. त्यामुळे मी अचानक झोकांडी खात खाली कोसळलो आणि एका उतारावरून खाली घरंगळत जाऊन एका मोठ्या धुडावर आदळून थांबलो. कसाबसा मी उठून बसलो आणि अतिभूकेने मी त्या काळ्याकुट्ट धुडाला कचाकच तोडू लागलो; आणि काय आश्चर्य ! ते काळेकुट्ट धूड मला रुचकर लागू लागले. तसा मी देहभान विसरून त्यावर तुटून पडलो. पोटातली अग्नि शमल्यावर, मी जेव्हा तृप्तीचा ढेकर देत मान वर केली, तेंव्हा मला लगेच आढळून आले, की तिथं सर्वकाही काळेकुट्टच आहे. मला समजायला उशीर लागला नाही, की ती वणवा लागून गेल्यानंतरची रानवस्था होती आणि ते धूड, धूड नसून आगीत खरपूस भाजलेला बैल होता, जो मी फस्त केला होता.

       या भटकंतीमुळे मला आता फळ आणि कंदमुळे झांबलत बसण्याची आवश्यकता नव्हती आणि हाच आनंद घेऊन मी पाण्यासाठी नव्याने भटकंती सुरू केली....
 हे जेंव्हा मी त्याला सांगितले, तेंव्हा त्याने मला पुन्हा प्रश्न केला, मग पुढे पाणी मिळाले की नाही ? आता मात्र मला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खरंच पाण्याची आवश्यकता होती. म्हणून मी त्याला वीस रुपये देऊन एक बिसलरी आणायला पाठवले.

       आता मात्र आपण मूळ विषयाकडे येऊया. मी आधीच सांगितल्याप्रमाणे 'आशा' माणसाची मूलभूत गरज आहे आणि हे विधान अगदीच खरं आहे. मी मान्य करतो, की अन्न-वस्त्र-निवारा, या मूलभूत मानवी गरजा होऊ शकतात. मात्र याआधी मानवाला आशेची गरज असते. जर मानवी मनात आशाच नसेल तर तो वरीलपैकी कोणतीही गरज पूर्ण करू शकत नाही. जर मी भुकेला असतांना असफल झाल्यावर आशा सोडून बसलो असतो, तर मी संपलो असतो, अथवा कंदमुळे आणि फळच कुरतडत बसलो असतो. जर मी पाण्याची आस सोडून भटकंती थांबवली असती, तर मी त्याला बिसलरी आणायला कधीच पाठवू शकलो नसतो.

       शेवटी मुद्दा काय आहे ! तर आशा ही कोणत्याही कृतीची जननी आहे. माणूस आपला प्रत्येक श्वास कुठल्या-ना-कुठल्या आशेनेच घेत असतो. त्यामुळे अशा संपली की माणूस संपला. आशा ही माणसासाठी इंधन म्हणून काम करते. प्रत्येकवेळी जगण्याला एक नवं बळ देते. आयुष्याला छानसा वेग देण्याचं काम करते. त्यामुळे आशावादी असन म्हणजेच यशस्वी असणं किंवा यशाच्या वाटेवर असणं होय !

       मात्र आजकाल निराशावादी सूर चोहीकडेच ऐकायला मिळतात. अभावातून निराशा वाढीस लागणे बरोबर नाही. वास्तवात अभावातूनच आशा जन्म घेते आणि यशापर्यंत जाण्याचा मार्ग तयार करते. म्हणून सर्वांनी आशावादी राहणं, हीच यशाची मागणी आहे.

फुलपाखरासारखा आनंद



नक्की  वाचा   👈    

   आनंद  हा फुलपाखरासारखा आहे .पकडण्यासाठी  मागे  धावला  की लांब  उडुन जातो  तुमच्या  अजिबात  हाताला  लागत  नाही  आन शांतपणे  बसला  तर अलगद तुमच्या  खांद्यावर  येऊन  बसतो . लहानपणातले आपले  आनंदाने  भरलेले  कप्पे  एक एक  उलगडून पाहू . गावी   आई दुपारी  घरात झोपलेली आसायची.बाहेर  शेंगा  वाळत घातलेल्या  असतात  गारीगारवाला यायचा  त्याला ओंजळभर शेंगा  द्याच्या दुपारच्या  उन्हात  देवळात बसून  गारीगार खायचो .कबड्डी खो-खो ,खेळणे ,बिना का गीतमाला ,टी.व्ही. वरच छायागीत ऐकायचं  .मधमाशी जशी छोटा छोटा  मध गोळा करते तसे आनंदाचे क्षण   टिपायला हवेत. तरुण पिढीला  वाटते  खूप पैसे  कमावले आपण सुखी होणार .वयाच्या  पन्नाशीपर्यत मी प्रचंड  काम करणार ,नंतर  मी आनंदात  जगणार हा विचार खूप चुकीचा  आहे .....कारण अस आसत तर श्रीमंत  माणस सुखी आणि गरीब माणस दुःखी  असती पण  तसं  नसते  गरीब  सुध्दा  आनंदात  जगतात  ."" अमृताचे घट भरले तुझ्या  दारी का वणवण फिरशी बाजारी ?""नवीन जमान्यात  मोबाइल चांगला  घेतला आहे .खूप सुंदर  फोटो काढले computer  वर  डाउनलोड केले .पण आठवणी  काढून  पुन्हा  पाहायला  वेळ  नसतो .तर आनंद  शोधावा नाही  तर टिपावा लागतो .शेंगा खाण्यासाठी  पाच सहा मित्र चांदण्यात बसतात .मध्येच भाजलेल्या शेंगाचा ढीग ठेवला  असतो . सर्व जण शेंगा  खात असतात . शेंगेचा एक  दाणा आपल्या हातून  निसटून  फोलाच्या ढीगात पडातो .तो दाणा शोधण्यासाठी  आपला बराच  वेळ जातो .तोपर्यंत समोरचा शेंगाचा ढीग  संपत आलेला असतो .एका शेंगदाण्यासाठी आपण आनंदाचे कित्येक  दाणे खायचे राहिलेले  असतो  विचारसरणीत बदल करून  पाहिलं  की पेरु तसेच  उगवत  . दुसऱ्याच्या  जीवनात आनंद  पेरला तर आपल्या जीवनात  आनंद  मोठ्या प्रमाणात  निर्माण  होणार . हा निसर्गाचा  नियम  आहे.दुसऱ्याला  आनंद  दिला तर फार  मोठे मानसिक  सुख मिळते .आयुष्यात  चांगले  काम कोणी  केले  अस म्हणाले  तर मी हा शब्द  शेवटी  ठेवा  त्या ऐवजी  ""आम्ही "" हा शब्द  वापरा.

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा