Pages

बुधवार, १० एप्रिल, २०१९

"मनातील आवाज"

"मनातील आवाज"


नदीच्या किनाऱ्यावरील एका झाडावर एक माकड त्याच्या मैत्रीण माकडीणसह गप्पा मारत बसलेले होते.
अचानक आकाशवाणी सुरू झाली...
"जो कोणी आकाशवाणी संपल्या संपल्या ह्या नदीच्या पाण्यात उडी मारेल तो राजकुमार किंवा राजकुमारी बनून बाहेर येईल... "

आकाशवाणी सुरूच असते. माकड,माकडीण ऐकत असतात. मनात विचारांचे थैमान सुरू असते....
काय करू...?
काय करू.... ?
काय करू... ?

दोघे विचार करत असतात. आकाशवाणी संपते, तेवढ्यात माकडीण नदीच्या पाण्यात उडी मारते...
माकड ओरडतो,
"वेडी झालीस का?
असं कुठे घडतं का ? आकाशवाणी खोटी ठरली तर...."

तेवढ्यात पलिकडून माकडीण एक सुंदर राजकुमारी बनून बाहेर येते. ती माकडाला म्हणते,
" अरे माकडा, आकाशवाणी जरी खोटी ठरली असती, तरी मी पाण्यातून बाहेर येऊन माकडीणच राहिली असते;
पण एक संधी घेतल्यामुळे आता मी राजकुमारी झाली आहे.

संधी असून फक्त विचारच करत बसल्यामुळे किंवा निर्णय न घेतल्यामुळे आज तु माकडच राहिलास.
संधी दररोज मिळत नाही. तू संधी ओळखू न शकल्यामुळे, शंका घेत बसल्यामुळे आणि अतिविचारी स्वभावामुळे माकडच राहिलास....!!!!"

#तात्पर्य :
आपल्या हातात वेळ कधीच नसते. असते ती केवळ संधी. मिळालेल्या आयुष्यात वेळ कितीतरी संधी देत राहते. आपण स्वतः हे ठरवायचे कि कोणती संधी घ्यायची आणि कोणती सोडायची.
तुम्हाला मिळालेल्या संधीचे सोने करा ही सदिच्छा.

मित्रांनो, "मनातील आवाज"ही आकाशवाणी सारखाच असतो. जीवनात आपणही आलेली प्रत्येक संधी साधून संधीचे सोने करावे; अन्यथा माकडाप्रमाणे विचार करीत फांदीवरच बसून 'माकड' बनून राहावे लागेल..

भूतकाळात जगणाऱ्याला भविष्य नसत


भूतकाळात जगणाऱ्याला भविष्य नसत © डॉ.कृष्णा सपाटे

भूतकाळात जगणाऱ्याला भविष्य नसत

बऱ्याचदा आपण आपल्या भूतकाळाला इतकं घट्ट चिकटून बसलेलो असतो की कोणताही समाधानकारक प्रसंग घडला नाही की आपण जुन्या खपल्या काढत बसतो.
माझ्याबरोबर असं झालं,
माझ्यावर अन्याय झाला,
मला जे हवं ते कधीच मिळालं नाही,
माझ्या वाट्याला कमीपणाच आला,
सगळे घाव मलाच झेलावे लागले,
माझ्या जागी दुसरं कोणी असत तर त्याला हे जमलंच नसत ....असं बरंच काही.

हे सगळं डोक्यात घोळत असताना एक अन्याय आपण स्वतःवर करत असतो, तो म्हणजे आपण स्वतःचा वर्तमानकाळ हिरावून घेत असतो आणि भविष्यकाळाची वाट लावत असतो. "कोळसा कितीही उगाळाला तरी काळाच" तसंच आपला भूतकाळ कितीही उगाळला तरी त्यात बदल थोडाही बदल होणार नसतो.
   
बऱ्याच जणांचं आयुष्य शेवटाला पोहचत, त्यातून वेगवेगळे ताणतणाव निर्माण होऊन सुखी जीवन जगायचं राहून जात आणि दोष मात्र दुसऱ्याच्या माथी मारून आपण नामानिराळे राहतो. यावर साधा उपाय आपणाला कधीच सुचत नाही की या जगात कोणीच परफेक्ट नसत, प्रत्येकाकडून चुका होतातच.
त्यावेळी सगळं आपल्याला वाटेल तसंच घडायला हवं असा अट्टाहास काय कामाचा? व्हायचं ते होऊन जात यातून आपल्या हाती फक्त निराशा पडते, जवळच्या माणसांना आयुष्यभरासाठी आपण मुकतो, वर्तमानातील जीवनाबरोबर भविष्य कलुषित होऊन बसत. भूतकाळातील चांगल्या आठवणीे काढून त्यातून प्रेरणा घेऊन सुंदर जग प्रत्येकाने का बनवू नये?

माझ्याकडं काहीच चांगलं नाही म्हणून आपण आयुष्यभर टिपे गाळत असतो, पण कधी मनातून तर्कबुद्धीने विचार केला तर सगळं काही आपल्यातच आहे याची जाणीव होते. उत्तुंग अशी व्यक्तिमत्वे अभ्यासली की कळत कधी काळी त्यांच्याकड काहीच नव्हतं. माणसाला लाभलेलं अनमोल धडधाकट शरीर ही त्याला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. प्रत्येक अवयवाची किंमत काढायची म्हटली तरी आपण कोट्यधीश आहोत याची जाणीव नक्कीच आपल्याला होईल.

ज्यांना रहायला घर नाही, घालायला चांगले कपडे नाहीत आणि खायला 2 वेळच जेवण नाही अशा लोकांशी कधी आपली तुलना करून बघा म्हणजे मग कळेल आपल्या दुःखांची मूळ खूपच छोटी आहेत. म्हणून आपण त्यांच्यासारखं व्हावं असं माझं मुळीच मत नाही तर आपण आपल्यापेक्षा प्रत्येक क्षेत्रात जे कोणी श्रेष्ठ लोक आहेत त्यांचा आदर्श नक्कीच घ्यायला हवा, आपण त्यांच्यासारखा बनण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा.

बऱ्याच जणांना सगळं आयत मिळत त्यांना त्या गोष्टीची किंमत नसते, पण मग आपण आपलं वेगळंपण कधी सिद्ध करणार? स्वतःची वेगळी ओळख कधी निर्माण करणारं? असे प्रश्न ज्या दिवशी तुमच्या मनात येईल त्यावेळी तुमच्या आयुष्यात सुवर्ण सकाळ उगवल्याशिवाय राहणार नाही, फक्त इच्छा हवी संकटाशी दोन हात करण्याची, नियतीच्या डोळयात डोळे घालून बघण्याची. त्यावेळी रडका भूतकाळ मावळलेला असेल आणि लखाखता वर्तमानकाळ उदयास आलेला असेल.


वाचन का आवश्यक आहे !


वाचन का आवश्यक आहे !

एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा !

श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्‍यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो.

जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे आणि जगाचा आता र्‍हास होणार आहे तो टी.व्ही मोबाईलमुळे.

पुस्तक वाचनारा माणूस कधीही व्यसन करत नाही आणि टी.व्ही मोबाईल हेच मुळी व्यसन आहे.

वाचनामुळे ज्ञानात भर पडते, टि.व्ही मोबाईल मुळे माणूस Adicted होतो.

टी.व्ही साठी मोबाईल साठी नेटवर्क लागते, वाचनासाठी फक्त माणूस जागेवर लागतो.

वाचन करणारी माणसं मनाने विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात.

वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढणे, हृदय विकाराचा झटका येणे अशा गोष्टी संभवत नाहीत. या उलट जास्त टी.व्ही. मोबाईल वापरणारेच विविध रोगांना बळी पडत असल्याचे समोर येत आहे.

टी.व्ही मोबाईलमुळे मन शांतीचा भंग होतो तर वाचनामुळे भंग झालेली मनस्थिती शांत होते.

वाचन करणारा माणूस लवकर झोपतो लवकर उठतो. टी.व्ही मोबाईल चक्कर मध्ये अडकणारे उशिरा झोपतात नी उशिराच उठतात. परिणामी शरीर संपदेसह श्रीमंतीही नष्ट होते. लवकर निजे लवकर उठे अशी एक म्हण प्रचलित आहे.

वाचन करणारा पुढे उद्योजक होतो तर वाचन न करणारा नोकरीवरच थांबतो.

वाचन करणारा चार तासच काम करून करोडपती होतो तर वाचन टाळणारा बारा तास काम करून गरिबीतच मरतो.

काही महाभाग तर नोकरी लागली की, जगातील मी एकटाच सिकंदर, आता मलाच सारे काही कळते, अशा  नंदनवनात वावरून वाचनच बंद करतात.

वाचनामुळे माणूस नम्र होतो तर टी.व्ही मुळे माणूस भांडखोर नी मोबाईलमुळे आत्मकेंद्री होतो.

जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते तेच खरे पुस्तक आणि जे कृती करायला लावते तेच खरे वाचन.

आपल्या आयुष्यात दोन गोष्टींचा प्रभाव पडतो एक मित्र आणि एक पुस्तक, पुस्तकालाच आपला मित्र बनवा.

टी.व्ही बघणारे प्रवास करतात, तर वाचन करणारे ध्येय गाठतात. टी.व्ही मोबाईलमुळे थकवा येतो तर वाचनामुळे तरतरी.

जिथे वाचन होते तेथे विचार होतात आणि जेथे विचारांचे स्वातंत्र्य नाही तेथे गुलामी येते. वाचनामुळे ध्येय ठरवीता येते आणि गाठताही येते.

तुमच्या ध्येयावरून तुमची लायकी पारखली जाते आणि तुम्ही किती मोठे ध्येय ठरविता ते तुम्ही कोणते पुस्तक वाचता यावर अवलंबून असते.

ज्यांना आयुष्यात कोणतेही ध्येय नसतं तेच लोक पुस्तक वाचत नाहीत आणि ध्येयाविना जगणे म्हणजे बिगर पत्त्याचे पत्र पोस्टात टाकणे होय. पुस्तक चाळणे वेगळे आणि वाचनं वेगळं.

जगात जेवढे  लोक उपास मारीने मेलेत त्यापेक्षा जास्त लोक पुस्तक वाचन न झाल्यामुळे मेलेत. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातुन संपत्ती निर्माण होत असते.





वारा फिरला..तारू फिरलं...


वारा फिरला..तारू फिरलं....#संगीताशेंबेकर

मॉर्निंग वॉक  ला पिक्युलियर कॅरेक्टरिस्टिकस  भेटतात...थांबून गप्पा ठोकायचा नसतातच मोस्टली चेहेरेच  ओळखीचे असतात..बस मानेने हाय हॅलो चालतं.... आपली जायची वेळ चुकली कि वेगळा सेट भेटतो....एक चेहरा मात्र कायम साधारण सेम वेळेला भेटायचा ..खूप चुणचुणीत असल्याचा त्याचा दावा असायचा....तो जरा दोन मिनिटे थांबून आम्ही डिस्पर्स व्हायचो असलो कि जवळ येत काहीतरी बातमी  सांगायचा ..तो सांगायला लागला एकदा "ग्रीन टी ".... बेस्ट...मी फार छान हेल्दी होत चाललोय....बघाच मला ..आम्ही चार राऊंड मारू तर हा सहा मारे ..आणि खूप सुरस बोलला...आम्ही सार्यांनी दाद दिली ...मग महिनाभराने म्हणायला लागला...ग्रीन टी ने "अमुक"..नुकसान होतं सो मी आता अमुक पावडर खातोय....

आणि मग कळालं कि "टू मॅच ऑफ इन्फर्मेशन "ने आपण सारेच अर्धमेले झालोय....इतक्या पॅथीज चा बदा    बदा   मारा चालतो आपल्यावर हल्ली कि जीव घाबरतो ...कुणी सांगे अमुक करा आणि पहा मला कसा फायदा झाला..कुणी तमुक...सोबत पुराव्याला लेख आणि नीट माहितीही असते सोबत ...आणि आपण   पार भंजाळून  जातोय....

आपल्या म्हणून उत्साहाची आणि एनर्जीची एक नक्कीची  लेव्हल  आपल्याला नीट  माहित असते तसे तसे आहार विहार धोरण आपण बदलत्या वयाप्रमाणे नक्कीच अभ्यासावे आणि आत्मसात करावे...पण आपले जीवशास्त्रीय  सत्य आपण फार बदलू शकत नाही ....काहीतरी तात्पुरतं करून बदलले तरीही ते अयोग्यच ..दोन पाच वर्षांनी पूर्ववत होणारे बदल घातक ....किंवा निराशा देऊ शकतात आपल्याला कि आपण कसे झालो होतो आणि आता पुन्हा कसे झालो....
निसर्गाने वर्ण ..वजन ..चण..आपल्याला नेमून पाठवलंय आपल्या पालकांच्या वैशिष्ट्यांमधून निवडून....त्या साऱ्याचा आदर करावाच ...त्वचा वजन यांची सगळया वयात नक्कीच काळजी घ्यावी पण सारेच त्या पातळीवर सारखे नाहीत याची नीट माहिती घेतच....एखादयला कोरफड सूट होईल एखाद्याला नाही ...आपली स्व अभ्यासाची तयारी हवी....अगदी सक्खे बहिणी बहिणी भाऊ भाऊ पण गोरे काळे सावळे गव्हाळ असतात ...त्याला नक्कीच काही कारण असते ..आपण आपले जे जे आहे ते जपावे पण त्यापुढे जाऊन अट्टाहास करूच नये कि आपण तंतोतंत योग्यच असावे...कारण असे कुणी नसते...
स्वच्छता....निगा ..काळजी घ्यावी ...नसती  कॉम्पिटिशन मात्रं  नसावी....
"भला उसकी साडी मेरी साडीसे सफेद क्यू"..??....यातून बाहेर यावे ....
 "नेबर्स एनव्ही ओनर्स प्राईड ..." असं काही नसतं ..
आपली लाइफस्टाइल....आपल्या शक्यतांमध्ये नीट गुंफावी ..अशक्याला धरायला जाणे अत्यंत निराशा देते ...
जे आपलं नैसर्गिक .. तेच आपलं....

खूप भडीमार माहिती तंत्रज्ञाचा टाळावा....."सगळ्यांना सगळे "माहित असणे खूप गरजेचे नसते....
"नो  लेस " हे छान ............म्हणजे मग वारा फिरेल तसं आपलं तारू फिरणार नाही ....स्टेडी असेल.

स्ट्रगलच संपला राव !




स्ट्रगलच संपला राव !

सेल्फ स्टार्टर बाईक आल्या पासून
हमारा बजाज तिरकी करून स्टार्ट करण्याचा आयुष्यातील  स्ट्रगलच संपला राव ...!!

एलईडी टीव्ही आल्यापासून
वुडन बॉक्स टीव्ही चे प्रक्षेपण बंद झाल्यावर "हमे खेद है ! वाचत प्रक्षेपण पुन्हा सुरू होण्याची वाट बघायचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव...!!!

डिटीएच आल्यापासून
कौलावर चढूनअँटेना फिरवत टीव्ही वरले चित्र दिसते का रे भो ? असे ओरडून विचारण्याचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव ...!!!!

मोबाईल फोन आल्या पासून ..
रात्री दहानंतर एसटीडी बूथसमोर रांगेत उभे राहून आपल्या अमेरिकेतील मुलाची खुशाली काय ..काय ..करत विचारण्यात पल्स वर लक्ष ठेवत बिलाची चिंता करण्याचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव ...!!!!

पेटीएम आल्यापासून...
हॉस्टेल रूमवर मनी ऑर्डर ची वाट बघत महिनाअखेर चे दोन दिवस भेळ भत्ता खाऊन काढायचा आयुष्यातला स्ट्रगलच संपला राव !!!

इमेल आल्यापासून..
गावाकडून येणाऱ्या पत्राची वाट बघत आख्खी दुपार लोळून काढण्याचा आयुष्यातला स्ट्रगलच संपला राव ..!!

गुगल आल्यापासून...
एखाद्या संदर्भावर लावलेली पैंज जिंकण्यासाठी रात्र रात्र लायब्ररीतले दिवे जाळून पुस्तके चाळून काढण्याचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव !!!

गुगल मॅप आल्यापासून ....
मुंबईच्या रस्त्यावर हजार वेळा विचारूनही पत्ता हमखास चुकण्याचा आयुष्यातला स्ट्रगलच संपला राव!!!

व्हाट्सअप आल्यापासून...
कामावरून सुटल्यावर मित्रांच्या कट्टयावर जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीचा आयुष्यातील स्ट्रगलच संपला राव!!!

खरं सांगू ?? हे शिंचं ग्लोबलायझेशन आल्यापासून....
माणसं सोडून यंत्राशी जमवून घेण्याचा आयुष्यातील मोठाच स्ट्रगल सुरू झाला ना राव !!!!

टायटॅनिक


टायटॅनिक बुडाले तेव्हा जवळजवळ तीन जहाजे त्याच्या जवळपास होती.

त्यापैकी एक सॅम्पसन म्हणून ओळखले जात असे. ते टायटॅनिकपासून 7 मैल दूर होते आणि त्यांनी धोका दर्शविणारा पांढऱ्या उजेडाच्या आकाशात उडवलेल्या दारूगोळ्याना पाहिले, परंतु ते जहाज बेकायदेशीरपणे सीलची शिकार करत होते व जर टायटॅनिकच्या मदतीला गेलो तर पकडले जावू म्हणून ते मागे वळून टायटॅनिक च्या उलट दिशेने निघून गेले

हे जहाज आपल्यापैकी त्या लोकांच प्रतिनिधित्व करतात जे लोक आपल्या स्वत: च्या पापामध्ये इतके व्यस्त आहेत आणि कोणीतरी गरजवंत आहे त्याला आपली गरज आहे हे ओळखू शकत नाही ...!

दुसरे जहाज कॅलिफोर्निया होते. हे जहाज टायटॅनिकपासून फक्त 14 मैलांवरच होते, पण ते चोहोबाजूंनी हिमनगांनी वेढलेले होते त्यावरिल कप्तानाने बाहेर बघितले आणि संकटात सापडल्याचा इशारा देणाऱ्या पांढऱ्या फ्लेयर्स पाहिल्या, परंतु परिस्थिती अनुकूल नव्हती आणि अंधारलेली होती म्हणून त्याने परत जाण्याचा निर्णय घेतला व झोपी गेला व  क्रूंनी स्वत: ला असे समजावण्याचा प्रयत्न केला की काहीही झाले नाही....
हे जहाज आपल्यातील त्या व्यक्तींच प्रतिनिधीत्व करतात  जे आता काही करू शकत नाही  परिस्थिती योग्य नाहीत आणि त्यामुळे कोणाला मदत करण्यापूर्वी परिस्थिती अनुकूल होईपर्यंत ते प्रतीक्षा करतात

शेवटचे जहाज होते कार्पाथिया होता. टायटानिकपासून 58 मैल दूर दक्षिणेकडील दिशेने धावणारी हे जहाज... त्यांनी रेडिओवर टायटँनिक वरील हलकल्लोळ, रडणे,मदतीचा आक्रोश  ऐकला,  या जहाजाचा कप्तानाने गुडघे टेकून, ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि मग पुर्ण वेगाने जहाज चालू केले आणि सभोवतालच्या पसरलेल्या हिमनगातून मार्ग काढत हे जहाज टायटॅनिक जवळ पोहोचले व हेच ते जहाज होते ज्याने टायटॅनिक वरिल 705 जणांना  वाचवले.

                   🌎 🌍 🌏

# बोध....

अडथळे आणि जबाबदारी टाळण्यासाठी कारणे नेहमी असतील, परंतु जे लोक ते स्वीकारतात ते नेहमी त्यांच्या चांगल्या कृत्याने जगाच्या हृदयात स्थान मिळवतात....!
व जग नेहमी त्यांना त्यांच्या चांगुलपणामुळे अंतःकरणात स्थान देते

मला खरोखर इच्छा आहे की आम्ही सर्वांनी कार्पेथियन प्रमाणे जीवनात जगावे...
ना की Sampsons आणि Californians प्रमाणे जीवन व्यतीत करावे


विड्याचे पान



विड्याचे पान शास्त्रोक्त व वैज्ञानिक महती..!!
--------------------------------------------------
(Betel Leaf)

बारीक नाजूक छान दिसणारा वेल पाने गुळगुळीत, चमकदार, लांब देठची, हृदयाच्या आकाराची एक टोक असणारी. एका आड एक पाने येतात पेराला मुळे फुटतात.
हा वेल पुढे वाढत जातो.
-----------------------------------------------
विड्याच्या पानाच्या उत्पतिची कथा
----------------------------------------------
समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. तरी थोडे अमृत शिल्लक राहिले. मोहिनीने उरलेले अमृत जवळच उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंताजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृता मधून वेळ उगवली नागाप्रमाणे खुन्तावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवीगार पाने असलेली वेळ पाहून देवांना आनंद झाला व तिला नागवेल असे म्हटले.भोजन झाल्यावर देव देवता पानाचा विडा आवडीने खाऊ लागले. देवाला महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली

 १)खाण्यासाठी जी पाने पिकलेली मधूर स्वादाची लहान पातळ असतात ती उत्तम औषधी गुणधर्म. रुची वाढवणारे, कांतीदायक, कफनाशक, सारक, शक्तीवर्धक, वायूनाशक, पोटसाफ ठेवणारे, पाचक, पित्तकारक, शरीरशुध्दी करणारे.सर्वसामान्य उपाय सारखे नाक गळत असल्यास पानाचा एक चमचा रस घेउन थोडा कोमट करुन मधाबरोबर खाल्यास बरे वाटते.

२) सारखा कफ पडतो व छाती भरलेली असते अशा वेळी विड्याच्या पानांचा रस व अडूळसा रस असे मधामधून घेतले तर उतार पडतो.

३)गोडाधोडाचे जेवण झाल्यावर विडा खाल्यास पचन व्यवस्थित होते.

४)नियमितपणे साधा घरगुती विडा खाण्यास ठेवला तर शौचास साफ होते.

५)विड्याची पाने वाटून जखमेवर पोटीस लावले तर दोन दिवसात जखम भरते.

६)पान खाल्याने तोंडाची अरुची चिकटपणा व दुर्गंधी जाते.
पानात असणारा तिखटपणा जंतुनाशक असतो. त्यामुळे पान नुसते चावून खाल्ले तरी दात व तोंडासाठी ते उत्तम असते. शिवाय असे करणे दात किडिला प्रतिबंध करते.पानात चुना, कात घातल्यास ते त्रिदोषाहारक होते मन प्रसन्न करते.

७)लहान मुलांच्या पोटफुगीवर नागवेलीच्या पानाचा रस व मध यांचे मिश्रण चाटवले तर मुलांचे अपचन दुर होते.

८) पानातील कॅल्शिअम शरीरामध्ये सहजतेने शोषले जात असल्याने विड्याचे पान जरुर खावे.

-------------------------------------------------
विड्याची पाने आणि त्याचं शास्त्रोक्त महत्व :
-------------------------------------------------

१) या विड्याच्या पानाच्या टोकास "लक्ष्मी" चा वास असतो.
२) विडयाच्या पानाच्या उजव्या बाजूस "ब्रम्हदेवांचा" वास असतो.
३) या विडयाच्या पानाच्या मधोमध "सरस्वती देवीचा" वास असतो.
४) विडयाच्या पानाच्या डाव्या बाजूस "पार्वतीदेवीचा" वास असतो.
५) या विडयाच्या पानाच्या लहान देठा मधे "महाविष्णूचा" वास असतो.
६) विडयाच्या पानाच्या मागीलबाजूस "चंद्रदेवता" वास
असतो.
७) या विडयाच्या पानाच्या सर्व कोपऱ्या मधे "परमेश्वरा" चा वास असतो.
८) विडयाच्या पानाखाली "मृत्युदेवते"चा वास असतो.
(या कारणाने ताम्बूलसेवन करतांना बुडाचा भागकाढून मग सेवन करण्याची पद्धत).
९) विडयाच्या पानाच्या देठात "अहंकार देवता आणि दारिद्र्य लक्ष्मी" राहतात.
(म्हणूनच पान सेवन करतांना देठ काढून देतात. अहंकार आणि दारिद्रय लक्ष्मी येऊ नये याअर्थी..)
१०) विडयाच्या पानात मध्यभागा नंतर मन्मथाचा वास असतो.

यासर्व देवतांचा विडयाच्या पानामधे वास असल्यामुळे ताम्बूलास इतके महत्त्व आहे.
पूर्व किंवा उत्तरदिशेस पानाचे टोक येईल असे ठेऊन देवास नैवेद्य दाखवावा.
कोणा कडेही तांबूल दिल्यास ते देवापुढे ठेवून नमस्कार करून मगंच तो उपभोगावा.
मंगळवारी, शुक्रवारी कोणत्याही कारणे विडयाची पाने घरा बाहेर जाऊ देऊ नयेत.
हिरवीगार आणि मस्त हस्ताकार असलेली कोवळी पाने नैवेद्यास ठेवावीत आणि तांबूल म्हणून द्यावीत

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा