सहज थोडंसं....*
तिचं makeup करणं , ब्रँडेड कपडे घालणं , सण समारंभात मुरडणं सारं सारं बंद होतं ...
अन् अचानक ती सर्वांना
"गबाळी” भासू लागते. तरीही ती त्याकडे लक्ष देत नाही कारण तिचं मातृत्व
तिला तसं करू देत नाही... अजूनही तिला मुलांची
जबाबदारी असते....!!!!
हळूहळू पुरुषवर्गाला अशी गबाळी बायको माहेरी जाण्यात सुख वाटू
लागत....
तिचं साधेपणही खुपायला
लागतं...काही मंडळींना इतर बायका सुंदर वाटायला लागतात... अन कर्तव्य बजावणारी बायको
आणि मुक्त फिरणाऱ्या बायका यात तुलना सुरू होते...
पण तरीही ती याकडे दुर्लक्ष
करून मुलांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करते... आतून ती मनाला काळजीने स्वतःच वाळवी बनुन
पोखरत असते.... !!
आणि तिची पस्तिशी उलटते अन् अचानक ती अतिशय सुंदर भासू(
?) लागते....
तिचे टॅलेंट नजरेत दिसू लागते.., तिचं आधुनिक राहणीमान , सुरेख
hairstyle , नितळ त्वचा , मनमोकळं हसणं ,
वागणं ,घरातला सहज सुंदर
वावर.., विविध स्पर्धा जिंकणं , रेसिपीत आवड निर्माण करणं, सर्वात मिसळणं... सारं सारंच सुंदर वाटू लागतं..!
पण खरंच ती चाळिशीतच सुंदर दिसते का????
खरं तर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना होणारी तिची फजिती कमी
होते, बाळाच्या शी शु तुन ती मुक्त होते
... ,टोमण्यांना उत्तर देण्याची धमक तिच्यात येते , सारं गेलेलं आयुष्य नव्याने उभारण्याची
इच्छा जागृत होते ... अन् मनापासून तिला स्वतः साठी जगावसं वाटतं...!!!
पुनः तरुण व्हावंसं वाटतं...ती गबाळी, गावंढळ कधीच नसते फक्त
कर्तव्य पार पाडायला प्राधान्य दिलं होतं हे तिला कळून चुकतं अन् “ती कात टाकते”... . इतकं सहज सोपं गणित आहे ते....
मला वाटतं ... नवं
स्त्री जातक बाळ ते वयस्कर आजी सर्वच सुंदर असतात ... होतो तो
आजूबाजूच्या दृष्टीकोनात बदल ...!
कॉलेज ची अल्लड तरुणी सुंदर नसते का??
पतींची वाट बघत असणारी घायाळ हरिणी सुंदर नसते का???
चंदेरी बट * सावरीत अन तोल जाऊ नये म्हणून तुरुतुरु चालणारी आजीबाई
सुंदर नसते का???
झाडाला फुल येण्यासाठी सुद्दा काही काळ जाऊ द्यावा लागतो
.. मग इतक्या प्रचंड बदलातून जाणारी स्त्री
एका रात्रीत कशी बरं बदलेल???
आणि तिने स्वतः च्या
दिसण्यावरच भर दिला तर बाळाचं संगोपन तितकं चांगलं होइल का??
म्हणूनच बायको गेली माहेरी वगैरे फालतू , रिकामटेकडे जोक्स तर
तिच्या बाईपणाचाच अपमान आहेत....त्यातून शरीरातील कमी होणारे कॅलशियम, hermonal
changes अन् बदलते moods सांभाळून ती बदलून घेते स्वतःला ...
चाळीशीत *
तिचा आत्मविश्वास वाढलेला असतो म्हणून ती या वयात छान दिसते
.. पण दृष्टी स्वच्छ असेल तर ती all time smart दिसते ..
माझ्या सर्व smart*मैत्रिणींना व त्यांना समजून घेणाऱ्या मित्रांना
सलाम