Pages

सोमवार, १ एप्रिल, २०१९

" किचन मधला गॅलिलिओ "


तुम्हाला सांगतो समस्त नवरे मंडळींच्या कुंडलीत सर्वच्या सर्व बारा घरात ठाण मांडून बसलेला एक नंबरचा उधळपट्टी करणारा ग्रह म्हणजे....बायको.

आता परवाची गोष्ट... घरात पावभाजी केलेली...झकास झाली होती हो....होणारच, कारण सोबत खाण्याचा कांदा-लिंबू मी कापून दिला होता.. असो ...

तर जेवण झालं...बघतो तर काय ही एवढी भरमसाठ पाव भाजी उरलेली...इनमीन आम्ही घरात अडीच माणसं... या दोन फुल बायका आणि मी अर्धा एकमेव पुरुष.. आता अडीच माणसांना किती भाजी लागणार...या बाईने एक आख्खं गावं जेवलं एवढी भाजी केलेली.. या बाईच्या हाताला जरा सुद्धा  काटकसर नाहीच....एवढी भाजी केली होती जणू त्या पावभाजीने मला अभ्यंगस्नान घालणार आहे...का माझं फेशल करायचं होतं कुणास ठाऊक??....

पोरीला म्हंटल चुपचाप उद्या डब्यात न्यायची...म्हाळशीला म्हंटल तू ही उद्या हीच खा...अजिबात नाटक नकोय..

तरीही बरीच उरली..

बरं आता एवढ्या भाजीचं करायचं काय हा प्रश्नच....या बाबतीत माझं डोकं जरा जास्तच चालतं बरं का...तसा या बाबतीत मी खूप हुशार ...जरा विचार केला आणि डोक्यात ट्यूब पेटली.. म्हंटल या भाजीची एक गंमत करूयात....

मला सुट्टी होती, कामाला लागलो...ही भाजी मिक्सर मधून जरा बारीक पातळ करून घेतली.. अगदी रवाळ अशी..

मग एक परातीत थोडं मक्याचं पिठ, थोडं अंदाजाने मैदा आणि कणिकेचे पिठ घेतलं... त्यात या भाजीचं मिक्सर मधून काढलेले द्रावण ओतलं, त्याला जरा मीठ,मिरची, मसाला लावून जरा ग्लॅमर आणलं आणि मस्त कणिक मळल्यासारखं मळून घेतलं...

थोडं तेल लावून ते पाच दहा मिनिटं एकजीव होऊ दिलं... मग त्याला गोल पोळ्यासारख्या लाटून त्याचे शंकरपाळे किंवा त्या नाचोज सारखे तुकडे केले...मग गॅसवर कढईत तेल तापवून छान खमंग तळुन घेतले..

चांगले डबा भर तयार झाले....पोरीला नाहीतरी संध्याकाळी काहीतरी चटक मटक खायला लागतंच....ती क्लासवरून आली आणि तिला खायला दिलं पण काय आहे हे सांगितलच नाही...कुरकुरीत, चटकदार, एकदम टेस्टी खाऊन पोरगी खुश झाली..

असलं भन्नाट झालं म्ह्णून सांगू की विचारू नका.. अगदी व्यसन लागल्यासारखं एक खाल्लं की आपोआप दुसरं खायची इच्छा व्हायची...

संध्याकाळी उशिरा माझे मित्र खंड्या आणि बडी गप्पा मारायला आले....त्यांना तर एवढं भारी लागलं की विचारू नका.. या क्रिस्पी चटपटीत चवी बरोबर खंड्या-बडी बरोबरच्या गप्पा चांगल्याच रंगल्या...रात्रीचे बारा कधी वाजले कळलंच नाही...

बारा वाचले तसा या म्हाळसाचा दिवस बदलला अन मेंदूचा काटा सटकला...आली ओरडतं.. 'काय वेळ काळ आहे का नाही?' ..बिचारे खंड्या आणि बडी घाबरून पळत आपापल्या घरी गेले....असो.

करून पहा भन्नाट लागतातं...पोरांना मात्र सांगायचं नाही बरं का...कार्टीला अजून माहीत नाही...जाता येता चरतेय मजेत....

कुलकर्ण्यांचा " किचन मधला गॅलिलिओ " प्रशांत

तळटीप - हा सगळा पावभाजी क्रिस्पी बनवायचा घाट म्हाळसाबाईचा, मी आपला आपल्या नावावर खपवला इतकंच....(कोणाला सांगू नका)...हे असं बायकोचं क्रेडिट ढापायला मला खूप आवडतं...

माणूस आणि लेबल


माणूस आणि लेबल
          ----------------------------------------
          मानव हा सदैव अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकलेला प्राणी आहे. त्याच्या बद्दल ठोस असे काहीच सांगता येत नाही. किंबहुना बदलणाऱ्या परिस्थिती नुसार तो ही सतत बदलत असतो, नव्हे तर त्याला  सुद्धा बदलावेच लागते. ते झालेले नवे बदल म्हणजे जगण्याची नवी उमेद किंवा आयुष्यातली वेगवेगळी स्थित्यंतरे असू शकतात. या मायाजालात कायम राहिल अशी एक ही गोष्ट नाही. प्रत्येक दिवसानंतर भेसूर रात्रआरंभ आहे आणि प्रत्येक रात्री नंतर पुन्हा दिवसाचा लख्ख प्रकाश आहे. निसर्गाची ही अगाध किमया अशीच शतकानुशतके चालत आलेली आहे आणि पुढे ही असेच असणार आहे. असे असताना माणूस तरी एकसंध कसा काय राहू शकेल. जगण्याच्या धडपडीत आणि जगणे सुसह्य करण्यासाठी त्याला सुद्धा वेळोवेळी असेच बदल करणे क्रमप्राप्त आहे. उद्या तो काय करेल हे त्याचे भाकित त्याला सुद्धा करता येणार नाही. किंबहुना तसे सांगून त्या विरूद्ध वागणे सुद्धा गैरच ठरेल.
          आयुष्याचा पट हा असाच अनिश्चिततेच्या वारूळात अडकलेला आहे. प्रत्येकाच्या जगण्याच्या विभिन्न परिभाषा असतात आणि आयुष्य व्यतीत करताना कसे जगायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायला हवे. आणि या  सगळ्या बाबींचा विचार केला गेल्यास त्याने ही एखाद्या व्यक्तीला  ठराविक शिक्का मारायची किंवा लेबल लावायची घाई करू नये. त्याच्या त्या बदलामागे विशिष्ट प्रकारची परिस्थिती कारणीभूत असू शकते याचा विचार होणे आवश्यक आहे. प्रत्येक परिस्थिती मागे काही तरी कारण असल्या शिवाय तसे घडून येत नाही आणि याकडेच डोळेझाक होते. बदलणे हा निसर्गाचा स्थायीभाव आहे आणि यावर विजय मिळवणे अतिशय कठीण आहे. जगण्याची धडपड करत असताना आपण फक्त चांगले वागून त्या कठीण असलेल्या गोष्टींचा प्रभाव कमी करायचा आणि आयुष्य आनंदात व्यतीत करायचे एवढेच आपल्या हातात आहे.

हाही क्षण निघून जाईल

हाही क्षण निघून जाईल


एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल.मला कायम आनंदी ठेवेल.
अखेर एका फकिराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.कळाल्यावर दुष्ट  प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार.  त्या क्षणी त्याला फकिराच्या अंगठीची आठवण आली.ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते,

"This too shall pass "
 म्हणजे
"हाही क्षण निघून जाईल"

केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले.सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला. ते परतले.राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला.  विजयाचा जंगी समारंभ चालू असताना, नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति-उत्साहित न होता प्रशांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले,
" महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे." राजा म्हणाला, " नाही, आता मला माझ्या मंत्राचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही राहात नाही, दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले आहे.म्हणून दुःखात खचू नये, सुखात नाचू नये."

This too shall pass !
हे क्षणही निघून जातील.
ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्लीच इथे दिलेली आहे.

ही कथा पासवर्ड आहे आनंदी आयुष्याचा.

शनिवार, ३० मार्च, २०१९

उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!


उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!

उष्ण व थंड पदार्थ

कलिंगड             - थंड
सफरचंद             - थंड
चिकू                     - थंड
संत्री                     - उष्ण
आंबा                    - उष्ण           
लिंबू                    - थंड
कांदा                    - थंड
आलं/लसूण          - उष्ण
काकडी                 - थंड
बटाटा                   - उष्ण
पालक                   - थंड
टॉमेटो कच्चा         -  थंड
कारले                   - उष्ण
कोबी                    - थंड
गाजर                   - थंड
मुळा                     - थंड
मिरची                   - उष्ण
मका                     - उष्ण
मेथी                     - उष्ण
कोथिंबीर/पुदिना    - थंड
वांगे                      - उष्ण
गवार                  - उष्ण
भेंडी साधी भाजी    -  थंड
बीट                     - थंड
बडीशेप                 - थंड
वेलची                   - थंड
पपई                     - उष्ण
अननस                 - उष्ण
डाळींब                 - थंड
ऊसाचा रस बर्फ न घालता               - थंड
नारळ(शहाळ) पाणी - थंड
मध                  - उष्ण
पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर)             - थंड
मीठ                     - थंड
मूग डाळ               - थंड
तूर डाळ               - उष्ण
चणा डाळ             - उष्ण
गुळ                     - उष्ण
तिळ                    - उष्ण
शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण
हळद                 - उष्ण
चहा                  - उष्ण
कॉफी                - थंड
पनीर                - उष्ण
शेवगा उकडलेला - थंड
ज्वारी                - थंड
बाजरी/नाचणी      -उष्ण
आईस्क्रीम          - उष्ण
श्रीखंड/आम्रखंड  - उष्ण
दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही)  - थंड
फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण
फ्रिज मधिल पाणी - उष्ण
माठातील पाणी   -   थंड
एरंडेल तेल      - अती थंड
तुळस         - थंड
तुळशीचे बी - उत्तम थंड
सब्जा बी  -  उत्तम थंड
नीरा           - थंड
मनुका      - थंड
पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण
हॉट ड्रिंक सर्व    - उष्ण
कोल्डरिंग सर्व    - उष्ण
मास/चिकन/मटण- उष्ण
अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड
उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .

वपुर्झा..

वपुर्झा..

माणूस जन्मभर सुखामागं, ऐश्वर्या मागं धाव धाव धावतो. पण ह्या धडपडीत तो सुखी नसतो, आणि धडपड यशस्वी ठरून, हवी ती वस्तु मिळाल्यावरही तो सुखी नसतो. ह्याचं कारण तो निर्भयता शिकत नाही. नेहमी माणसाला कशाची ना कशाची सातत्याने धास्ती वाटत राहते. तो जर निर्भय व्हायला शिकला तर जीवनातली गोष्ट नव्याने समजेल. माणसं, नद्या, डोंगर, समुद्र, सगळ्यांचा अर्थ बदलेल. आकाशाकडे सगळेच बघतात. पण त्रयस्थासारखं! म्हणूनच ते जरा भरून आलं किंवा विजेचा लोळ कोसळतांना दिसला की माणसं पळत सुटतात. आकाशाकडे पाहायचं ते आकाश होऊन पाहावं म्हणजे ते जवळचं वाटतं. ‘विराट ह्या शब्दाला अर्थ तेव्हा समजतो. ‘अमर्याद शब्द पारखायचा असेल तर समुद्र पहावा. ‘विवधता शब्द समजून घ्यायचा असेल तर ‘माणूस पहावा. पण तोही कसा, तर आतुन आतुन पहावा. मग माणसांची भीती उरत नाही. अगदी हलकटातला हलकट माणूस देखील हलकट म्हणून आवडतो. जीवनावर, जगावर, जगण्यावर असं प्रेम केलं म्हणजे सगळं निर्भय होतं. उपमा द्यायची झाली तर मी विजेचीच उपमा देईन. पॄथ्वीची ओढ निर्माण झाली रे झाली की ती आकाशाचा त्याग करते. पॄथ्वीवर दगड होऊन पदते. पण पडण्यापासून स्वत:ला सावरत नाही आणि तेजाचाही त्याग करीत नाही. प्रेम करताना माणसानं ही असं तुटून प्रेम करावं. डोळे गेले तरी चालतील पण नजर शाबूत हवी. स्वर नाही सापडला तर नाही, पण नाद विसरणार नाही, पाय थकले तरी बेहत्तर पण ‘गतीची ओढ टिकवून धरीन, ही भूक कायम असली की झालं! आयुष्यात ही भूक जिवंत ठेवावी आणि निर्भयतेने पुरी करीत राहावं.
~ वपु काळे | वपुर्झा..


आईची माया



पहिल्या पावसात बाळाचं अल्लडपणानं भिजणंआईनं ते खिडकीतून कौतुकानं पहाणंआता बास!!! नाहीतर आजारी पडशील म्हणून ओरडणंतरीपण बाळाचंb आपल्या चिमुकल्या ओंजळीत पावसाचं पाणि साठवणंसाठवलेलं पाणी आईच्या अंगावर उडवण,आईनं रागानं वटारलेले डोळे बघुन न बघितल्या सारखं करणंपुन्हा दंग होऊन चिमुकल्या पावलांनी पावसात थिरकणंआईनं ते खिडकीतून कौतुकानं पहाणंआता बास!!! नाहीतर आजारी पडशील म्हणून ओरडणंपावसातच बसुन कागदि होडया वाहत्या पाण्यात सोडणं,छत्री उलटी धरुन पडणाऱ्या गारा त्यात वेचण,एका हातात गारा आणि एका हातात होडी धरून, एका डॊळ्यानं बाळाचं आईकडं बघणंआईनं ते खिडकीतून कौतुकानं पहाणंआता बास!!! नाहीतर आजारी पडशील म्हणून ओरडणंपावसाचं थांबणं,चिंब भिजून बाळाचं घरात येणं,खोट्या रागानंच आईन एक धपाटा घालणं,बाळाचं नाराज होणं आणिपाचच मिनीटात आईला जाउन बिलगणं,लाडानच "आई भुक लागलीये" म्हणणंगरम दुधाच्या पेल्यातबिस्किट बुडवुन खाताना टेबलावरइवलुशी मांडी घालुन बसलेल्या बाळाचं गोंडस दिसणं,छोटसं नाक उडवत, तोंडात बिस्कीट ठेऊनबाळाचं आईकडं बघून हसणंअसच चाललं अनेक वर्ष...खिडकी तीच राहिली... आईची माया तीच राहिली...पाऊस तसाच पडत राहिला...पण बाळ मात्र बदलत गेलं...हेच बाळ आता मोठं झालय...खूप शिकून परदेशात गेलय....आई मात्र तिथच राहिलीये...इतके दिवस बाळात रमणारी आई ,आता दासबोध, ज्ञानेश्वरीत जीव रमवतीये,पहिला पाऊस येताच, त्याच खिडकीत येऊनपावसात नाचणाऱ्या बाळाला शोधतीये...पणबाळ आता मोठं झालय...खूप शिकून परदेशात गेलय....खिडकी तीच राहिली... आईची माया तीच राहिली...पाऊस तसाच पडत राहिला...पण बाळ मात्र बदललय...परदेशातच सेटल होण्याच्या गोष्टी करु लागलय,भुताच्या गोष्टी ऎकत, घरभर नाचत खाल्लेल्याआईच्या हातच्या वरण-भाताचा घास त्याला डाचू लागलाय,परदेशातला पिझ्झा-बर्गरच त्याला जास्त आवडू लागलायपा

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

" पदर "



स्त्रिचा पदर 🌹••
खुप छान मेसेज नक्की वाचा

    👉🏻 पदर  काय  जादुई  शब्द  आहे 
           हो  मराठीतला !

काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार  नाही.  एक  सरळ  तीन
             अक्षरी  शब्द.

       पण  केवढं  विश्‍व
   सामावलेलं  आहे त्यात....!!

 किती  अर्थ,
किती  महत्त्व...
 काय  आहे  हा  पदर.......?

साडी नेसणाऱ्या  स्त्रीच्या  खाद्यावर
रुळणारा  मीटर  दीड मीटर  लांबीचा
भाग.......!!

तो   स्त्रीच्या  लज्जेचं   रक्षण  तर
करतोच,
सगळ्यात  महत्त्वाचं  हे
कामच   त्याचं.
पण,
आणखी   ही
बरीच  कर्तव्यं  पार  पाडत  असतो.

 या   पदराचा   उपयोग  स्त्री  केव्हा,
    कसा  अन्‌  कशासाठी  करेल,
        ते  सांगताच  येत  नाही.

सौंदर्य  खुलवण्यासाठी सुंदरसा
पदर असलेली साडी निवडते. सण-समारंभात   तर   छान-छान
पदरांची जणू स्पर्धाच लागलेली
असते.
सगळ्या  जणींमध्ये चर्चाही
 तीच. .....!!

लहान  मूल  आणि
आईचा  पदर,
हे   अजब  नातं  आहे.
मूल  तान्हं
असताना आईच्या पदराखाली
जाऊन  अमृत  प्राशन करण्याचा
 हक्क   बजावतं. .....!!

जरा  मोठं  झालं,  वरण-भात  खाऊ
 लागलं,
की  त्याचं  तोंड  पुसायला
आई  पटकन  तिचा  पदर  पुढे  करते
....

मूल   अजून   मोठं   झालं,   शाळेत
 जाऊ  लागलं,  की  रस्त्यानं  चाल-ताना  आईच्या पदराचाच आधार लागतो.
एवढंच   काय,
जेवण
 झाल्यावर  हात  धुतला, की  टाॅवेल
ऐवजी  आईचा  पदरच  शोधतं आणी  आईलाही  या  गोष्टी   हव्याहव्याशा
वाटतात  मुलानं पदराला  नाक जरी
पुसलं,
तरी  ती  रागावत  नाही ...

त्याला  बाबा  जर रागावले, ओरडले
तर मुलांना पटकन लपायला आईचा पदरच  सापडतो.....!!

महाराष्ट्रात  तो  डाव्या खांद्या  वरून
 मागे   सोडला  जातो.....!!

तर  गुजरात,
मध्य प्रदेशात
उजव्या खांद्यावरून
पुढं मोराच्या.
 पिसाऱ्यासारखा   फुलतो ....!!

काही   कुटुंबात   मोठ्या   माणसांचा
 मान  राखण्यासाठी   सुना  पदरानं
चेहरा  झाकून  घेतात ..
 तर  काही  जणी  आपला   लटका ,
राग
दर्शवण्यासाठी मोठ्या
फणकाऱ्यानं पदरच   झटकतात !

     सौभाग्यवतीची  ओटी भरायची
ती  पदरातच  अन्‌  संक्रांतीचं   वाण
 लुटायचं ते  पदर  लावूनच.

बाहेर   जाताना   उन्हाची   दाहकता
थांबवण्यासाठी  पदरच  डोक्यावर
ओढला  जातो,
तर  थंडीत  अंगभर
पदर
लपेटल्यावरच छान  ऊब
मिळते....!!

काही   गोष्टी लक्षात   ठेवण्यासाठी
पदरालाच  गाठ  बांधली   जाते .
अन्‌ नव्या नवरीच्या
जन्माची गाठ ही नवरीच्या   पदरालाच,
नवरदेवाच्या  उपरण्यासोबतच
बांधली   जाते.....!!

पदर   हा   शब्द   किती   अर्थांनी
 वापरला  जातो  ना.....?

नवी.  नवरी नवऱ्याशी बोलताना
पदराशी चाळे करते,
पण संसाराचा
संसाराचा  राडा  दिसला,
की  पदर
कमरेला  खोचून
कामाला लागते

देवापुढं आपण चुका कबूल  करताना म्हणतोच  ना .....?
माझ्या   चुका  " पदरात "  घे.‘

मुलगी मोठी  झाली, की आई तिला
साडी   नेसायला   शिकवते,
 पदर
सावरायला शिकवते   अन्‌   काय
 म्हणते  अगं,
चालताना  तू  पडलीस
 तरी  चालेल. ....!!

पण,  " पदर "  पडू   देऊ   नकोस !
अशी आपली
भारतीय संस्कृती.

 अहो  अशा  सुसंस्कृत आणी सभ्य
मुलींचा विनयभंग तर  दुरच्  ती.
रस्त्यावरून चालताना लोकं
तिच्याकडे वर नजर करून  साधे पाहणार ही नाहीत..
 ऊलटे तिला वाट देण्या साठी  बाजुला सरकतील एवढी  ताकत  असते  त्या  "पदरात" ....... !!

ही आहे आपली भारतीय संस्कृती

🌺 स्त्री चा आदर करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा