टिव्हीचा रिमोट कोणाच्या हातात- घरातलं सर्वात मोठं
राजकारण!
भारतात घराघरात एक राजकारण असतं- आणि ते म्हणजे टीव्हीच्या रिमोटचं!
पंतप्रधान बदलले तरी चालतील, पण रिमोटचा मालक बदलला की
घरात खळबळ माजते.
रिमोट हा असा विषय आहे की जो हातात असेल त्याची सत्ता
चालते.
“कोणता चॅनेल
लावायचं?” हा प्रश्न
म्हणजे एकदम लोकशाही संकटच!
आईला सिरीयल, वडिलांना बातम्या, आणि मुलांना कार्टून
किंवा क्रिकेट.
शेवटी टीव्हीवर असतं- सगळयांच्या मनाविरुध्द काहीतरी.
रिमोटच्या सत्तेचे तीन मुख्य प्रकार
1.
आईची सत्ता
:
रिमोट हातात घेतल्यावर
सिरीयल सुरु होते.
बाकी घरचे लोक “पुन्हा तेच!” म्हणत सोफ्यावरुन उठतात.
पण आईचं एकच वाक्य- “मी दिवसभर
काम करते, थोडा वेळ माझा!”
झालं, बाकी कुणी बोलत
नाही!
2.
वडिलांचं
राजकारण:
बातम्या पाहताना ते
म्हणतात, “देशात काय चालचं ते समजलं पाहिजे!”
पण न्युजपेक्षा जास्त
वादविवाद आणि जाहिरातींमुळे बाकी लोक कंटाळतात.
तरीही वडील म्हणतात – “सगळं
बघायलाच लागतं!”
3.
मुलांची क्रांती :
शनिवार - रविवार म्हणजे मुलांचं राज्य!
कार्टून, क्रिकेट, आणि YouTube- सगळं
त्यांचच.
बाकी सगळे फक्त बघत
बसतात, जणू टीव्हीवर नाही तर मुलांवरच लाईव्ह शो चाललाय!
रिमोट हरवला
की सगळयांची एकजूट
जेंव्हा रिमोट सापडत
नाही, तेंव्हा सगळे घरचे एकत्र येतात- “अरे कुणी बघितलास का?” तो मिळेपर्यंत एकजुटीचं वातावरण असतं,
पण मिळताच पुन्हा सुरु
होतं रिमोटचं युध्द!
निष्कर्ष
टीव्हीचा रिमोट हा छोटा
दिसतो, पण त्यात मोठं पॉवर असतं.
तो घरात शांतता ठेवू
शकतो किंवा गोंधळ माजवे शकतो.
म्हणून पुढच्या वेळी
टीव्हीवर काय लावायचं हा वाद सुरु झाला की,
फक्त लक्षात ठेवा – रिमोट
महत्वाचा नाही, साथ महत्त्वाची!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा