सर्व प्रथम सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण आपणां
सर्वांना सुख-समृध्दी, भरभराटी तसेच आरोग्यमयी जावो हीच सदिच्छा.
अंधार म्हणजे अज्ञान, दु:ख, मनाची मरगळ. हया सगळयावर मात
म्हणजे प्रकाश. सुर्यापासून आपल्याला जो प्रकाश मिळतो, तो असतो ही मरगळ दुर करणारी
निसर्गाची देणगी. म्हणून अंधाररुपी दु:खावर मात करण्यासाठी अंधारानंतर प्रकाश येत
असतो. प्रकाशाचा उत्सव म्हणजे दिवाळी.
दिवाळी म्हणजे केवळ नवनवीन खरेदी नाही तर उत्साह आणि
आनंदाची अनुभूती. मनातला राग, निराशा जाळून टाकून नव्या दमाने नव्या उत्साहाने
आपले जीवन उजळणारा सणांचा राजा.
पण...... ही दिवाळी सर्वांसाठी सारखी नसते. कुणाच्या
नशीबी एखादा दु:खाचा प्रसंगही आला असू शकतो. किंवा कुणी चिंतेने दु:खी असतो.
आजूबाजूला होणारी आतषबाजी आणि नवनवीन खरेदी, जल्लोश पण तो आपल्याला झेपत नसल्याने
आलेली निराशा, हताशपणाही असू शकतो. आपण एक सुज्ञ नागरीक आणि चांगल्या मनाचे माणूस
म्हणून का असेना थोडीशी मदत करावी. आणि आनंद द्विगुणीत करुया.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा