हुरहुर
परवाच
दुचाकीवर ऑफर पाहीली. जुनी गाडी दया नविन घ्या. चांगली किंमत मिळत होती. नविन गाडी
पाहून मस्त वाटली. वाटलं आता आपली गाडी जुनी झाली आहे. सारखी कुरकुर करत असते. सतत
काहीना काही खर्च निघतो. विकून टाकावी. आणि नविन फीचर्सची घ्यावी. एडव्हान्स
असणारी.
मी
माझी जुनी गाडी घेउुन गेलो. गाडीची तपासणी केल्यानंतर चांगली किंमत ठरली. व्यवहार
फायदयाचा होता. थोडं बरं वाटलं. जास्त पैसे दयावे लागणार नव्हते. पण का कुणास ठाऊक
हृदयाच्या आत खोलवर कुठेतरी काहीतरी गमावण्याचं रितेपण वाटून गेले. काय होतय मला.
असं का बरं होतय. नवीन गाडी येणार आहे. तिच्या स्वागताची उत्सुकता तर आहेच. पण मग
जुनी भंगार झालेली गाडी आपल्याकडून जाताना उगाचच असं रितेपण, हुरहुर का बरं
वाटावी.
भाडयाची खोली सोडून स्वत:चा फ्लॅट मध्ये
जाताना जुन्या शेजाऱ्यांना सोडून जाताना असंच होते. मोबाईल बदलताना तीच गत. खरच
आपण गुंततो का त्या वस्तुमध्ये, वास्तुमध्ये लोकांमध्ये. की मनामध्ये. मुंबईमध्ये
नवीन बस आली. पण जुनी पुर्वीची बस भंगारात निघाली. काही प्रवाशांनी तिला अखेरचा
निरोप दिला. असं करावंस का वाटले असेल त्यांना. हुरहुर.....
माणूस सोडून गेल्यावर हुरहुर लागतेच पण
निर्जीव वस्तुंचाही आपल्याला लळा लागतो? जुनं ऑफीस सोडताना, जुने सहकाऱ्यांचा विरह होत असताना.
जाणवते ती हुरहुर...
आवडता
नट, नटी गेल्याची बातमी वाचताना, पाहताना मन ऊगाच हुरहुरते...रोजची लोकल बदलली तरी
मनात होते ती ......
पाळलेला
कुत्रा, मांजर किंवा कोणताही प्राणी मृत झाला अथवा सोडून दिला काही दिवस तरी लागते
ती हुरहुर... आजी, पणजीने लावलेले झाड वादळात मोडून पडले, तोडावे लागले. मनात उठते
हुरहुर..
खरचं
आपण जुन्यात अडकून बसतो का? नव तर हवं असते, पण मग जुने सोडताना हे मन का हुरहुरते. म्हातारा
बैल मेल्यावर शेतकऱ्याला येत रितेपण आणि हुरहुर.
......आणि
सर्वात जास्त चटका लावणारी पण तरीही वारंवार मनात येणाऱ्या आठवणी सोबत येते ही
हुरहुर. पहिलं प्रेम. प्रेयसी, प्रियकर. सफल न झालेले प्रेम. आणि तिची
हुरहुर......
हुरहुर
एक सुखद हवीहवीशी वाटणारी भावना आहे. नेमकी कुठं बरं उत्पन्न होत असेल हृदय की मन.
हे जीवंतपणाचे लक्षण आहे की, संवेदनशील मनाचे लक्षण आहे हुरहुर... तुम्हाला पण अशी
हुरहुर जाणवते का? नक्की कॉमेंट्स करा आणि आपले अभिप्राय कळवा......

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा