दहीहंडी
मित्रांनो नुकताच दहीहंडीचा सण आपण अनुभवला. तरुणाईचा जल्लोष, उत्साह बघायला मिळाला. मीडिया दिवसभर तेच दाखवत होती. मागणी तसा पुरवठा. मोठं मोठ्या राजकीय नेत्यांनी दही हंडीचे आयोजन केले होते. त्यात सिने तारे, मालिका कलाकार बोलावण्यात आले होते. मोठं मोठ्या बक्षिसांचे आकडे टीव्ही वर सांगत होते. अनेक नृत्यांगना बेभान होऊन आपली कला सादर करीत होत्या. त्यामुळे गोविंदांना उत्साह वाटत होता. डीजे च्या तालावर तरुणाई थिरकर होती. कित्येक दिवस केलेल्या प्रॅक्टिसची किमया आज जगाला दाखवायला सज्ज होते. मेहनत, सांघिक भावनेने केलेले प्रयत्न आज फळाला येत होते. मेहनतीचं चीज झाल्या सारखा वाटत होतं.
त्याच वेळी टीव्ही वर बातम्यांच्या खाली लाईन ला बातमी वाचली. एका २०वर्षीय गोविंदाचा मृत्यू , ८८ जखमी. त्याच क्षणी मला समोरच्या टीव्ही वरची दृश्य बघून भीती वाटू लागली. एकीकडे हा जल्लोष त्या वेळी त्या मृत गोविंदाच्या घरी काय अवस्था असेल या कल्पनेनेच अंगावर काटा आला. जखमी, आयुष्यभर जायबंदी झालेल्यांच पुढे काय ?खरंच तरुणाईची रग दाखवायला हे सर्व आवश्यक आहे का ? कानठळ्या बसवणाऱ्या दुर्लक्ष करून केवळ सण अथवा धार्मिक पण सिद्ध होते का? आज राजकीय नेते कुठल्याही सणाचे इव्हेंट करून आपली ओळख किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पैसे अशा इवेन्टवर खर्च करतात. किती करतात त्याचा हिशोब नाहीच. पण त्यात वापरली जातेय ती तरुणाई ! त्यांच्या जीवावर बेतणारी .
नक्की काय साध्य होतं ? आयुष्यभर जायबंदी होणाऱ्यांचं नुकसान काही हजारात मोजले जाते. जीवानिशी जाणारा काही शाहिद होतं नसतो. त्यांच्या कुटुंबाचं काय? हे प्रश्न जल्लोषात पडत नाहीत तर, दुःखात पडतात.
आजही खेडे गावात बऱ्याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीने दहीकाला उत्सव साजरा केला जातो. आदल्या आदल्या दिवशी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमी ला रात्रभर पारंपरिक नाच गाणी करून साजरा केला जातो. त्यामुळे समाजात एकोपा वाढतो. शाळांमध्ये खूप छान पद्धतीने लहान मुले साजरा करतात. आता हाच बघा ना बोलका फोटो. खूप काही शिकवून जातो. सॅल्यूट त्या भारताला !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा