Pages

रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८

तेजोवलय (Aura)


तेजोवलय (Aura)



ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे,

मानवी शरीर universal life force  जीला प्राणशक्ती म्हणू शकतो अश्या ऊर्जेने बनलेले आहे.  या शक्तीमुळे जिवंत राहण्यासाठी, वाढ,  maintenance  आणि इतर अनेक क्रियांसाठी संपूर्ण शरीरात असंख्य घडामोडी आपोआप घडत असत्तात ज्याचा आपल्याला पत्ताही नसतो.  या क्रियांमुळे आपल्या शरीराभोवती एक ऊर्जा क्षेत्र (इलेक्ट्रो- मॅग्नेटिक फील्ड) सतत तयार होत असते.  आपल्या शरीरालागत ऊर्जेचे असणारे हे वलय म्हणजेच ऑरा किंवा तेजोवलय.  प्रत्येक सजीव जीवाला, मानव, प्राणी, वनसंपत्ती यांना तेजोवलय असते.   Quantum physics नुसार शास्त्रज्ञानी सिद्ध केल्या प्रमाणे सगळं विश्व ऊर्जेने बनलेलं आहे, आणि त्या सिद्धांता नुसार निर्जीव वस्तूंना ही तेजोवलय असते.

माणसाचे हृदय हे सर्वात जास्त उर्जाक्षेत्र निर्माण करत असते...आणि त्या खालोखाल मेंदू.
यामुळेच तुम्ही कधी बघितलं असेल, की एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रथमच भेटता तेव्हा काही बोलणं न होताही तुम्हाला वाटतं .. हा माणूस काही चांगला वाटत नाही.  किंवा ह्या उलट सुद्धा.. एखाद्याबद्दल त्याच्याशी न बोलताही प्रथम दर्शनी आपले अतिशय चांगले मत तयार होते.. याचे कारण आपले आणि त्याचे हृदय चक्र (अनाहत चक्र) जी तेजोवलये बाहेर सोडत असतात ती एकमेकांना स्पर्शतात आणि सूक्ष्म पातळीवर माहितीची देवाणघेवाण करतात.. आणि आपण त्याप्रमाणे त्याच्याशी आपले वागणे बोलणे ठरवतो.
 
मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विचार करण्याची शक्ती.. आपल्या मनात दिवसाला सरासरी 70000 विचार येतात.. विचार सुद्धा  ऊर्जा रुपातच उत्सर्जित होत असतात..  त्यांचा ही प्रभाव आपल्या तेजोवलयावर पडत असतो.  सकारात्मक विचारांमुळे आपले तेजोवलय नेहमी स्ट्रॉंग रहाते. जर आपण सतत निराशेच्या , द्वेषाच्या किंवा रागाच्या विचारात राहात असू तर आपल्या तेजोवलायवर त्यांचा विपरीत परिणाम होतो.   आपले विचार आपल्या भावनांना जन्म देतात..आणि त्यानुसार तेजोवलय बदलत राहाते..

जर दोन्ही हात पसरून आपण उभे राहिलो तर जो अंडाकृती आकार आपल्या शरीरासभोवती तयार होईल तेवढे सर्वसाधारण निरोगी माणसाचे तेजोवलय त्याच्या शरीराबाहेर सर्व दिशांनी  पसरलेले असते. या ह्ददीत आपली आवडती किंवा जवळची व्यक्ती आली तर आपल्याला आवडतं.. पण ज्यांच्या शी आपलं फारसं पटत नाही किंवा वर सांगितल्या प्रमाणे एखाद्या अनोळखी व्यक्तीबद्दल आपले प्रथमदर्शनी चांगले मत नाही अशी व्यक्ती आली , तर आपण नकळतच 2 पावलं मागे सरकतो.. कदाचित यावरूनच ,"keeping someone at arm' length" किंवा "2 पावलं दूर रहा " वगैरे वाकप्रचार निघाले असावेत.

तेजोवलय जर clean आणि strong असेल तर आपल्या आरोग्यावरच नव्हे तर सम्पूर्ण  आयुष्यावरच त्याचा चांगला परिणाम होतो.  तुमचं सगळं व्यक्तिमत्व दुसरयांवर प्रभाव पडणारं बनतं.. आपसी संबंध चांगले रहातात.. उच्च पदावरील व्यक्ती, अभिनेते, देशप्रमुख किंवा इतरही क्षेत्रातील अशा व्यक्ती ज्यांना  नेतृत्वगुण आणि mass  influence ची सवय असते  त्यांचे तेजोवलय खूप स्ट्रॉंग असते.

प्राचीन योग शास्त्रात देखील तेजोवलयाचं महत्व सांगितलं आहे.  आपण जर देवदेवतांची चित्र पाहिली तर त्यांच्या मस्तका भोवती गोल तेजस्वि प्रकाश दाखवलेला असतो.  ते तेजोवलय असते. उर्जास्वरूपात असल्याने साध्या डोळ्यांना तेजोवलय बघता येत नाही. पण काही विशिष्ठ पद्धतीने नियमित अभ्यास आणि सराव केला तर ते शक्य आहे. 

तुम्ही शब्दांनी, वागण्याने आपल्या भावना किंवा intentions  लपवू शकता .. पण तुमचे तेजोवलय काहीही लपवून ठेवत नाही.. तुमच्याबद्दलची सर्व माहिती तुमचं तेजोवलय देत असते.
आपण पाहिले की तेजोवलय उर्जास्वरूपात असल्याने ज्यांचे आज्ञाचक्र किंवा तृतीय नेत्र विकसित झाला आहे, जसे थोर संत, योगी, किंवा अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती, यांना ते सहज बघता येते.

1939 साली सायमंड कीर्लियन या एका रशियन शास्त्रज्ञाला इतर काही संशोधन करत असता अपघातानेच अशा  एका तंत्राचा शोध लागला ज्यायोगे त्याला मशिनद्वारे तेजोवलय बघता आले. त्याने त्या तेजोवलयाचे छायाचित्र (photograph) घेतले.  व तेजोवलयावर आणखी संशोधन करून Aura किंवा तेजोवलय खरोखर अस्तित्वात असते हे सिद्ध केले.  ह्या तंत्राला कीर्लियन फोटोग्राफी असे नाव पडले. 

भारतात प्राचीन काळी ऋषीमुनींना त्यांच्या यौगिक सामर्थ्याने तेजोवलयाचे सर्व ज्ञान होते व ते त्यांना सहज पहाता येत असे.  तेजोवलयाला सुद्धा विविध रंग असतात आणि त्या रंगांना अर्थ असतात, किंवा रंगांमधून आपल्याला तेजोवलयाबद्दल अधिक माहिती मिळते ह्याचे सखोल ज्ञान आपल्या अंतर्चक्षूंद्वारे त्यांना होते.  यावर अनेक पौराणिक आणि इतर ग्रंथांमध्ये माहिती उपलब्ध आहे. कीर्लियन फोटोग्राफीने घेतलेल्या तेजोवलयाच्या छायाचित्रात सुद्धा असे विविध रंग आढळून आले.  आणि अखेर आधुनिक विज्ञानाने तेजोवलयाचे अस्तित्व मान्य केले.   गुगल वर कीर्लियन फोटोग्राफी या विषयावर सर्व माहिती उपलब्ध आहे.

तुमचे तेजोवलय ही तुमची पर्सनल सिग्नेचर म्हणता येईल.  जो माणूस आंधळा आणि बहिरा आहे, तो सुद्धा त्याच्या जवळ येणाऱ्या इतर लोकांचे अस्तित्व बरोब्बर ओळखतो.. सांगू शकाल , कसे..?  कारण, देवाने दिलेल्या पंचेंद्रियां पैकी जेव्हा एखादे काम करत नाही तिथे बाकीची वइंद्रिये अतिसंवेदनशील होतात.  ही लोकं इतरांचे अस्तित्व त्यांच्या तेजोवलयावरून ओळखतात.  प्रत्येक माणसाकडे तेजोवलय बघायची, ते ओळखायची, त्याचा अर्थ जाणून घ्यायची जन्मजात क्षमता आहे. फक्त ती विकसित करावी लागते.

तेजोवलय clean आणि strong का ठेवावं..?कारण याचे  खूप फायदे आहेत.
1. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम रहातं.
2. आपलं आपल्या भावनां वर नियंत्रण रहातं. व्यक्तिमत्व balanced रहातं.
3. व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होतं. नातेसंबंध.. जो आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे.. ते छान रहातात.  सर्व आघाड्यां वर यशप्राप्ती होते.
4. तुमची intuitive power वाढते.
5. तुम्ही तुमच्या स्वतः च्या प्रकाशात रहाता. Victim होण्यापासून किंवा इतरांच्या प्रभावा पासून दूर राहता.

पहिल्या भागात बघितल्या प्रमाणे कुठल्याही interaction किंवा नातेसंबंधां मधे (personal, professional, social) ऊर्जेची देवाणघेवाण होत असते.  

अगदी दैनंदिन आयुष्यात बघायचं झालं तर आपण सकाळी उठून आवरून आपल्या ऑफिसला जायला निघतो..( घरातल्या कटकटी असतील तर त्याही आल्या ) जाताना रस्त्यात ट्रॅफीक मधे इतर वाहन चालकांबरोबर  वाद होतो..किंवा ट्रेन मध्ये गर्दीत उभे असताना कोणी ओळखीचा भेटतो आणि तो आपल्या अडचणींचा पाढा वाचतो..  ऑफीस मधे बॉस किंवा सहकाऱयां बरोबर अनबन होते..असं बऱ्याच लोकांशी आपलं interaction होत असतं.. सकारात्मक संवाद असेल तर ठीक पण बऱ्याचदा नकारात्मक बोलणं होतं आणि  लोकांच्या विचारां मधली, बोलण्यातली ऊर्जा आपल्या तेजोवलयामधे येते.. आपली त्यांच्याकडे जाते.  अशा प्रकारे तुम्ही जेव्हा रात्री घरी येता तेव्हा विचार करा की किती जणांची नकारात्मक ऊर्जा तुम्ही घेऊन येता.

खालील कारणां मूळे तेजोवलय संक्रमित किंवा दूषित होऊ शकतं..
1. नकारात्मक विचार,  भावना, शब्द, कृती, आपली किंवा इतरांचीही
2.भीती (social conditioning, beliefs)
3. Low self esteem, low self confidence, lack of self love.
4. कुसंगत
5. कोमा, ऑपरेशन, ऍक्सिडेंट, मानसिक धक्का
6. दुसऱ्याचे जाणीवपूर्वक फेकलेले वाईट विचार किंवा intentions
7.वाईट जागा, अपवित्र स्थळे
8. नशा, इतर वाईट सवयी
8. All internal and external factors beyond our control.

तेजोवलय दूषित असेल तर पुढील लक्षणे आढळतात..
1. अकारण भीती, सतत चिडचिड, राग, चिंता, मत्सर, depression.. Emotional imbalance.
2. Strained relationships
3. Accidents, अडचणी.
4. Imbalanced personality and life.
5. अनारोग्य

वरील लिस्ट वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की जशी आपण दररोज शरीराची स्वच्छता ठेवतो तसेच तेजोवलय clean ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.  कारण हे केलं नाही तर उर्जारूपात जो नकारात्मक कचरा तिथे साठत जातो, त्याने हळूहळू आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

तेजोवलय clean ठेवणं अतिशय सोपं आहे. आपल्या पूर्वजांनी यासाठी वागण्याचे खूप छान नियम,  रीतीरिवाज घालून दिले आहेत. आपण आजही त्यातील बरेचसे नियम पाळतो. बदलत्या काळानुसार काही पाळणं शक्य नसतं. पण तरीही आधुनिक जीवनशैलीशी सांगड घालून, याविषयीचे आवश्यक ज्ञान घेऊन, आपण काही छोटे बदल केले, नियम केले, तर आपण आपले तेजोवलय रोजच्या रोज नक्की cleanआणि strong  ठेवू शकतो.
तेजोवलय अंतर्गत आणि बाह्य अशा विविध गोष्टीनी प्रभावित होत असतं आणि त्यामुळे सतत बदलत असतं. दिवसभरात बऱ्याच घटना, गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यांच्यावर आपले नियंत्रण नसते. आणि आपले तेजोवलय संक्रमित होत राहाते. 

आपण आपले तेजोवलय खालील उपायांनी  रोजच्या रोज शुद्ध ठेऊ शकतो.

आपलंही अनेकदा असंच होतं.


आपलंही अनेकदा असंच होतं.



इतरांविषयी काहीही माहिती नसताना किंवा काहीही विचार न करताही आपण सर्रास तोंड उघडतो आणि मतांची ¨पक टाकतो. आपल्या नजरेतून इतरांचं वागणं बेततो. असं केलं तर आपल्याला कशी कळतील खरीखुरी माणसं?


चिमणीचे सगळे काम आटोपले,

ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की,

अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही.

तिला विलक्षण अपराधी वाटलं.

तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती.

ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता.

'गेला असेल कुठेतरी... येईल परत'

. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली.

मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता.

चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही …

कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची ……

तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं...

अनेक दिवस उलटले ...

चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना.

मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलं. मजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबली.

एवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला...

तो 'कावळ्याचा' आवाज होता. तो आवाज ऐकून चिमणीला कोण आनंद झाला. सारा थकवा, सारा शीण कुठल्या कुठे पळाला.

तिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली. पहाते तर काय!

कावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होता.

कावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलं. चिमणीला पाहून त्याला फार आनंद झाला. तो आनंदाने म्हणाला,

'या या चिमणाबाई. तुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. बोला, काय करू तुमच्यासाठी?'

कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळली. म्हणाली,
- 'तुला राग नाही आला माझा?'

- का यावा?

- मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?

- छे छे! प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं.. जसं तुझं होतं. तुला त्यात माझी गरज कधीच नव्हती माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलो. पण नंतर मला माझी चूक कळली. माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याच' घडल्या असत्या नाही का? आणि कुणाच्याही वस्तूवर, अधिकारावर, भावविश्वावर 'अतिक्रमण' करण चूकच नाही का? म्हणून मग मी स्वत:च वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.

- मला एकट करून? अरे, मला सवय झालीय आता तुझी.

- चिमणाबाई, या जगात एकट कोणीच नसतं. जेव्हा आपण एकट आहोत असं वाटतं ना तेव्हा तो एकांतच असतो आपला सोबती जो दाखवत असतो आपल्याला वाट आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची . मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये'

चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -

- चिमणाबाई, माझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो. तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब न करता.

चिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली आपल्या घरट्याकडे...

पण आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं....

आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय.

- म्हणजे ?

- म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या गावीच नसतं. ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊ, बहिण, मित्र, आई, वडील बऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात... त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही

. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो

'थांब मला जर करिअर करुदे.... थांब जरा मला आता घर घ्यायचय... थांब जरा मला आता कार घ्यायचीय … थांब जरा मला आता ….' आणि मग ही जंत्री वाढतच जाते.

त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते गावीही नसतं आणि जेव्हा भान येतं तेव्हा ….

आपण फार एकटे झालेले असतो.... !!

- आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर?

- वेळीच 'टकटक ' ऐकायला शिका.


वाचा, बघा तुम्हालाच कसं वाटतंय!

वाचा, बघा तुम्हालाच कसं वाटतंय! 


रात्रीच्यावेळी सुनसान रस्त्यावर, एखाद्या कुटुंबाची गाडी बंद पडलेली दिसली, तर थांबून मदतीची चौकशी तरी करून बघा. मदत पाहिजेच असेल असं नाही, पण त्यांना थोडा धीर तर निश्चितच  वाटेल.
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!

भरपूर ‘व्हर्च्युअल मित्र, मैत्रीण असण्याचा जमाना आहे हा, पण कधी एखाद्या खऱ्या मित्राने बरं वाटत नाहीये म्हणल्यावर त्याला ‘whatsapp’वर मेसेज मध्ये ‘Tc’ म्हणण्यापेक्षा सरळ त्याच्या घरी जाऊन ‘बरा हो लवकर म्हणून बघा. खरं प्रेम तर मित्राचंच असतं ना?
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!

हल्ली लग्न समारंभात प्यायच्या पाण्याची सोय एकाच ठिकाणी असते.
तिथे पाणी प्यायला गेलो तर भांडे भरून, नंतरच्या व्यक्तीला देऊन बघा
तहान तर सगळ्यांनाच लागते ना?
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!

नेहमीच्या हॉटेलमध्ये गेल्यावर सकाळच्या चहाची ऑर्डर द्यायच्या आधी वेटरला ‘गुडमॉर्निंग म्हणून तर बघा. त्याचा तर दिवस चांगला जाईलच.
पण नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!

दिवसभर ‘इडियट बॉक्सला सुट्टी देऊन, आपल्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहान मुलांनाही ऐकवा. पराक्रम तर अजूनही तेवढाच थोर ना? तुमचीही उजळणी होईल.
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!

गाडी चालवताना कुठलीशी वृद्ध व्यक्ती/मुलं रस्ता ओलांडण्यासाठी भांबावून थांबलेली दिसतात, दरवेळी गाडीतून नाही उतरता येत, पण निदान मागच्या गाड्यांना थांबवून आधी त्यांना रस्ता ‘क्रॉस करता येईल, एवढं तरी करून बघा. रस्ता तर चालणाऱ्याचाही असतो ना? फारतर १ मिनिट उशीर होईल पोचायला..
पण नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय !!

मुद्दाम हायवेवरच्या एखाद्या टिनपाट टपरीवर, अर्ध्या फळकुटाच्या बाकड्यावर बसून सकाळपासून दहा वेळा उकळ्या आलेला चहा पिऊन वयस्कर चहावाल्याला बघा तर उगाचच सांगून ‘मामा चहा १ नंबर झाला आहे बरंका
तो मनाशीच हसेल खुळ्यागत! पण लाजून म्हणेल, ‘पाव्हनं म्होरच्या टायमाला च्यात दुध वाईच वाढवून देतो, पर नक्की यायाच! जाताना त्याला शेकहॅण्ड करा न चुकता. व्यावसायिक तर तोपण आहे ना?
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!

स्वतःच्या जुन्या कॉलेजमध्ये, त्याच जुन्या मित्रांच्या बरोबर आपल्याच हक्काच्या ‘कट्ट्यावरपुन्हा एकदा विनामतलब तंगड्या हलवत, गाणी म्हणत बसून बघा. एखादी शिट्टी पण मारा दणकून खूप वर्षांनी ..
नव्याने तरुण व्हायला कोणाला नाही आवडणार?
नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!

आपल्याकडे कामाला असलेल्या माणसांच्या मुलांकरता कधीतरी स्वतःच्या मुलांसोबत एखादे छोटेसे खेळणे देऊन बघा. पैसे नाही लागत त्याला जास्त ..
पण नंतर बघा, तुम्हालाच कसं वाटतंय!

ऑफिसच्या केबिनमधे ‘रूम फ्रेशनर फसफसून मारण्यापेक्षा आपल्याच बाल्कनीतल्या कुंडीत लावलेले एखादे गुलाबाचे, चाफ्याचे फुल ठेवून बघा कधीतरी टेबलवर. खरा सुगंध तर तोच ना ?
नंतर सांगा, तुम्हालाच कसं वाटतंय!

डोरक्लोजरवाल्या दरवाजातून बाहेर पडल्यावर मागून येणाऱ्या ‘स्त्रीसाठी दरवाजा आवर्जुन उघडा ठेवा,
ती ‘स्त्रीआहे म्हणून नाही, पण तुम्ही ‘जंटलमन आहात म्हणून!

हे सगळं तुम्ही आधीपासूनच करत असाल तर क्या बात है!
पण नसाल करत तर नक्कीच करून बघा..
नंतर सांगा, तुम्हाला कसं वाटतंय!!
 एक चोवीस- पंचवीस वर्षाचा मुलगा आणि त्याचे बाबा ट्रेननं जात असतात. ट्रेन पळू लागते तशी झाडं पळू लागतात.

मुलगा जोरात ओरडतो, ‘बाबा, झाडं. झाडं पळताहेत. बाबा डोंगर पाहा.’ बाबा हसतात. उत्सुकतेनं त्याच्याबरोबर ती पळती झाडं पाहतात.

थोडय़ा वेळानं मुलगा परत ओरडतो. ‘बाबा धबधबा. बाबा, मला जायचंय अशा धबधब्याजवळ.


बाबा म्हणतात, ‘हो जाऊ. नक्की जाऊ.’

थोडय़ा वेळानं ट्रेनमधे प्लॅस्टिकची खेळणी विकणारा येतो. मुलगा सारी खेळणी उत्सुकतेनं पाहतो. ओरडतो. काही विकतही घेतो. शेजारी बसलेल्या एका माणसाला मात्र हा सारा प्रकार फार इरिटेट करतो. शेवटी न राहवून ते गृहस्थ या मुलाच्या बाबांना म्हणतातच, ‘तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे का नेत नाही या मुलाला. कसा वागतोय तो. एवढा तरणाताठा पोरगा. काळजी घ्या.’

बाबा हसतात. म्हणतात, ‘डॉक्टरकडूनच येतोय ना, नुकतंच डोळ्याचं ऑपरेशन झालं त्याचं, आता त्याला नीट दिसतंय. लहानपणापासून त्याला दृष्टी नव्हती, आता दिसायला लागलंय.’ एवढं ऐकून तो माणूस ओशाळतो आणि अधिक सवालजबाब न करता गप्पच होतो.


सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

हवे होते

हवे होते


एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला.
दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो.
काहीतरी दुसरे घेऊन बाहेर पडतो आपण.
परतताना मनात विचार येतो
तो ड्रेस घ्यायला हवा होता

सिग्नलला गाडी थांबते,
चिमुरडी काच ठोठावते.
गोड हसते, पण भिक मागत आहे
हे लक्षात घेऊन त्या हसण्याकडे फार लक्ष देत नाही आपण.
२-३ रुपये द्यावे असे मनात येते.
रेंगाळत सुटे शोधता शोधता ‘देऊ का नको हा धावा मनात सुरू असतो.
तेवढ्यात सिग्नल सुटतो,
गाडी पुढे घ्यायची वेळ येते.
थोडे पुढे गेल्यावर मन म्हणते,
सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला

जेवणाच्या सुट्टीत ऑफिसातला मित्र त्याच्या घरातला त्रास फार विश्वासाने सांगतो,
त्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात.
वाईट वाटते खूप, नशीब आपण त्या परिस्थितीत नाही असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळे होतो.
काही मदत हवी का?’ असे विचारायचे असूनही आपण गप्प राहतो.”
जेवणाची सुट्टी संपते.
तो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो.
क्षणभर स्वत:वर राग येतो, ‘मदत तर विचारली नाही
निदान खांद्यावर सहानुभूतीचा हात तरी ठेवायला हवा होता मी!’

असेच होते नेहमी,
छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात.
खरं तर या छोट्या गोष्टीच जगण्याचे कारण असतात.

गेलेले क्षण परत येत नाहीत,
राहतो तो ‘खेद, करता येण्यासारख्या गोष्टी न केल्याचा.

जगण्याची साधने जमवताना जगणेच राहून जात नाहीये ना ते ‘चेक करा.
आनंद झाला तर हसा, वाईट वाटले तर डोळ्यांना बांध घालू नका

चांगल्या गोष्टीची दाद द्या,
आवडले नाही तर सांगा,
घुसमटू नका.”

त्या त्या क्षणी जे योग्य वाटते ते करा.
नंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही.

आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या,
त्या छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात गुंफणे म्हणजेच जगणे.”

आवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली तर ‘लाईफ कसले?
आपल्यांच्या दु:खात डोळे नाही भरले तर ‘लाईफ कसले?
मित्रांच्या फालतू विनोदांवर पोट दुखेस्तोवर हसलो नाही तर ‘लाईफ कसले?
आनंदात आनंद आणि दु:खात दु:ख नाही जाणवले तर ‘लाईफ कसले?

अप्रूप


अप्रूप
 Click Here

 माणसाला ना, जे मिळत नाही तेच हवं असतं, अप्रूप असतं..
 सरळ केस असतील तर कुरळे छान वाटतात,
जाड असेल तर बारीक लोकांचं कौतुक असतं ,
 आणि ज्यांना भयंकर फिरायला आवडतं त्यांना कधी फारसं बाहेर पडायला होत नाही ..
 यालाच जीवन ऐसे नाव  !
 आता संसार हा दोन चाकी रथ आहे, दोन्ही चाकं एकाच दिशेत, एकाच वेगात चालली पाहिजेत,बरोबर ना ?
पण मग जोड्या जमतात त्या मात्र एकदम विरूद्ध स्वभावधर्माच्या !
 आणि असेच संसार यशस्वी होतात...
 बायको खूप हौशी असेल तर नवरा जरा पडेल असतो,
 नवरा सोशल असेल तर बायको अतिशय मर्यादित असते,
  बायको बडबडी तर नवरा अबोल,
 नवरा भटकंती स्पेशल तर बायको घरकोंबडी ,
  बायकोला लॉंग ड्राईव्हला जायला आवडते तर नवरा टीवी पाहणं पसंत करतो,
 त्याला खूप मित्र तर हिला लोकांची अँलर्जी,
 ती उत्सव प्रिय तर त्याला अजिबात आवड नाही,
 फिरायला जायचं तर त्याला निवांत समुद्र किनारा आणि तिला निसर्गरम्य किंवा भरपूर स्थलदर्शन आवडतं,
 त्याला एकदम मॉडर्न राहायला आवडतं तर ती एकदम साधी,
 ती अतिशय सडेतोड तर तो एकदम भिडस्त ,
  हॉटेलमधे तिला कॉंटिनेंटल तर त्याला थाळी आवडते,
 ती फ्रिकाऊट तर तो एकदम शांत....
 असंच असतं सहसा, नाही का ?
  पण मग तरीही अशाच जोड्या अतिशय छान संसार करतात - का बरं ?
 म्हणतात ना, opposite poles attract......-
 विजोड जोड्या नाही म्हणायचं .. उलट भिन्न स्वभावधर्माच्या जोड्या असतील तर संसारात मजा आणि थोडा खमंगपणा असतो..
 दोघंही जर शांत असतील तर मग घरात बोलणार कोण ? दोघंही मित्र मंडळीत रमणारे असतील तर घर बघणार  कोण ?
दोघंही भटके असतील तर घराला घरपण आणणार कोण ? आणि दोघंही परफेक्शनिस्ट असतील तर चुका काढणार कोण ? 😀
 आणि दोघंही समान पातळीवर असतील तर समतोल साधायला काहीच उरणार नाही..
  थोडं पुढे - मागे, अधिक - उणं झाल्याशिवाय मजाच नाही ना ! सारं कसं शांत - शांत !
 मग ते घर नाही, संन्याशाची मठी वाटेल😀..
 एकमेकांना समजून घेण्यात, एकमेकांच्या आवडी-निवडी जपण्यात, आणि एकमेकांना आहे तसं स्वीकारतानाच आपले मीपण जपण्यात खरी मजा आहे - जगण्याची -
 नाही का ?
म्हणून तर म्हणायचं -
 *घर दोघांचं असतं दोघांनी सावरायचं असतं,
एकानी पसरलं तरी दुसऱ्यानी आवरायचं असतं*


चला अभ्यास सोप्पा करूया

चला अभ्यास सोप्पा करूया 


तुमचं वय कांहीही असू देत,तुम्ही जर विद्यार्थी असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

जानेवारी महिना संपत आला आहें. मार्च, एप्रिल,मे हे परीक्षांचे महिने जवळ येत आहेंत. अनेकांचे धाबे दणाणले असणार. वाया गेलेला / घालवलेला, काळ आपल्यालाच वाकुल्या दाखवतोय असा भीतिदायक भास ही तुमच्या पैकी अनेकांना होत असणार. स्मरणशक्ती चे अभ्यासवर्ग घेतांना विद्यार्थ्याचे हे अनुभव मला नेहमीच ऐकायला मिळतांत.

खरेंतर जो परिश्रम, सातत्य व एकाग्रतेने केला जातो तोच खरा अभ्यास. तरीही कांही गोष्टींकडे थोडं नीट लक्ष दिलं तर शाळा कॉलेजचीच नव्हें तर ..... आयुष्याची परीक्षा सुद्धा चांगल्या मार्कांनी पास होणें सहज शक्य आहे.

कोणतीही परीक्षा द्यायचा निर्णय एकदां झाला कीं इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अभ्यासलाच अग्रक्रम दिला गेला पाहिजे. ह्याचा अर्थ असा नव्हें कीं रात्रंदिवस, उठता बसता .... फक्त अभ्यास एके अभ्यासच करायचा आहें.
पण विषयवार वाचन, लेखन, मनन हे नियमितपणे झालेच पाहिजे.

💠    विद्यार्थ्याने सर्वप्रथम स्वतःचे ध्येय निश्चित करायचे असतें. जोपर्यंत तुमचे शिक्षण घेण्या मागचे उद्दिष्ट तुम्ही नक्की करणार नाही, तोपर्यंत अभ्यासा साठी लागणारी प्रेरणा ही तुमच्यांत येणार नाही.

ह्यानंतर महत्वाचे म्हणजे स्वतःची दिवसभरांतील एकवेळ निश्चित करावी. मात्र एकदां अभ्यासाची वेळ ठरवली कीं ती चुकू देवू नये.  ह्यावेळी भरपेट जेवू नये, तसेंच अर्धपोटी / उपाशीपोटी ही राहू नये. असे पदार्थ खाण्यात ठेवावेत जे उष्मांक तर देतील पण शरीरांत जडपणा आणणार नाहीत. मन आणि शरीराला पोषण देणाऱ्या पदार्थांचेच सेवन करावें. उदा. ताजे सात्विक अन्न, जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश, सॅलडस, शक्य असेल तर थोडा सुकामेवा, तीळ, शेंगदाणे,(शिजवून घेतलेली) मोड आलेली कडधान्यें, फळें इत्यादींचा समावेश असावा. तळलेले पदार्थ फास्टफूड / जंकफूड, कोल्ड्रिंक्स तर  उत्तम मार्क्स घेण्याची ईच्छा असणाऱ्यांनी वर्ज्यच समजावेत.

💠   स्वतःच्या अभ्यासाचा एक विषयवार टाईमटेबल तयार करून घ्यावा. ह्यांत नावडता विषय सर्वांत अगोदर तर आवडता विषय सगळ्यांत शेवटी ठेवावा. ( एरव्ही आपण नेमकं ह्या उलट करतो.) कोणत्याही विषयाला सलग 2 - 3 तास कधींच देवू नये. तासाभराच्या आत एक टॉपिक पूर्ण करावा. नंतर थोडा ब्रेक घ्यावा. त्यानंतर दुसरा विषय किंवा टॉपिक अभ्यासाला घ्यावा. झोप घालावण्या साठी चहा, कॉफी चालेल पण ह्या पेयांचा अतिरेक मात्र टाळावा. ह्या काळांत पोषकद्रव्ये असलेला, व्हिटॅमिन्स, खनिजें व कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा. पाणी भरपूर प्यावे.

💠   अधुन मधुन सर्व शरीराला व्यायाम म्हणून चालणें, फिरणें, खेळणे 🏀⚽🚴 असावें. अभ्यासाचा वेळ मात्र पूर्णपणे TV, Mobile free असावा. ह्यावेळी सुद्धां सोशल नेटवर्किंग साईट्स शिवाय राहत येत नसेल तर मात्र कांही खरें नाही. अभ्यास करतांना टेबल खुर्चीचा / जमिनीवरील भारतीय बैठकीचा वापर करावा.
बऱ्याच लोकांना अंथरुणावर बसून / पडून  अभ्यास करण्याची संवय असतें. ही पद्धत चुकीची आहे. ही संवय तुम्हाला असेल तर ती आधी सोडा. जिथे बसून अभ्यास करायचा ती जागा खोली देखील स्वच्छ, प्रदूषणमुक्त असावी. 
परिक्षार्थींची झोपही पूर्ण व्हायलाच हवी. बरेचदा विद्यार्थी / विद्यर्थिनी पेपरच्या अगदी ऐन वेळेपर्यंत वाचत असतांत पण तसें करू नका. पेपरच्या आदल्या रात्रीही तुम्ही जागरण न करता  छान झोप घ्यायची आहें. 
💠    अभ्यासाला बसताना .....वही, पेन, पेन्सिल, खोडरबर, स्केल व पाण्याची बॉटल हाताशी ठेवावें. असें केलें नाही तर ह्यापैकी एकेका वस्तु साठी उठावे लागल्याने अपेक्षित एकाग्रता सतत ब्रेक होत राहील.
आतां प्रत्येक chapter वाचल्यानंतर , त्यातील महत्वाच्या मुद्द्यांच्या नोट्स लिहून काढाव्यात.  आवर्जून सांगतेय कीं भाषा स्वतःची असावी. शब्द स्वतःचे असावेत. महत्वाचे "दिशादर्शक" शब्द अधोरेखित करावेत. न समजलेलें words/ theorems/ phrases/ formulas/ methods हे सगळे वेगळें लिहून काढून आत्मसात करावेत. लिहिलेले मुद्दे न बघतां आठवण्याची संवय करावी. मागील परीक्षांचे प्रश्नसंच मिळवून ते सोडवावेत. हे प्रश्नसंच सोडविण्याच्याही कांही पद्धती आहेत. 
💠    केलेल्या अभ्यासाची एक उजळणी पहिल्या 24 तासांत तर दुसरी 72 तासांत व तिसरी 7 दिवसांत करावी. जमले नाही तरी प्रयत्न सुरू ठेवावेत. विद्या / ज्ञान परिश्रमानेच साध्य होतें. एक छोटीशी मुंगी सुद्धा तिच्या जिद्द व चिकटीनेच जीवन संघर्षांत यशस्वी होतें, तर आपण कां नाही ? 
 सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पॉझिटीव्ह अर्थात सकारात्मक विचार ठेवावेत. हे मला जमेलच ही भावना ठेवावी. अपयश आलें तरी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने सराव चालुच ठेवावा. 
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर चांगल्या गोष्टी शिकवणारे कांही लोक भेटत असतांतच. त्या सर्वां विषयी आदराची भावना असावी. अगदी आई, वडिल गुरुजनां पासून ते पार एकाद्या अनोळखी हितचिंतका पर्यंत ..... सर्वांविषयी !
मदत करणाऱ्यांवर हक्क गाजवण्याची, रागावण्याची भूमिका तर अगदी चूकच.
ह्या बाबीं तसेंच चिकाटी आणि मानसिक स्थिरतेचा अभाव .... ह्या उणीवा आयुष्याची परीक्षा पास होण्याच्या मार्गातील अडथळे आहेंत. 
💠    सरसकटपणे आपली सर्वांची स्मरणशक्ती अप्रशिक्षित (untrained) असतें. तिला प्रशिक्षित (trained) केलें की अभ्यास सोप्पा. त्या साठी माझ्या कार्यशाळेत विविध तंत्रांचा यशस्वीरित्या वापर केला जातो. एक छोटासा प्रयोग तुम्हीही करून बघा : 
एका टेबलवर 10 - 15 वस्तु लावून ठेवायला कोणालातरी सांगा. आतां तुम्ही ह्या वस्तुंना एकदाच कांही सेकंद बघा. आतां वस्तूंकडे अजिबात न बघता, सर्व वस्तु ज्या क्रमाने लावल्यात, त्याच क्रमाने लिहून काढण्याचा प्रयत्न करा. वस्तु आणि क्रम बिनचूक लिहिता येईपर्यंत हा प्रयोग रिपीट करत रहा.

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा