Pages

रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

दिपावली संदेश!

 


सर्व प्रथम सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण आपणां सर्वांना सुख-समृध्दी, भरभराटी तसेच आरोग्यमयी जावो हीच सदिच्छा.

अंधार म्हणजे अज्ञान, दु:ख, मनाची मरगळ. हया सगळयावर मात म्हणजे प्रकाश. सुर्यापासून आपल्याला जो प्रकाश मिळतो, तो असतो ही मरगळ दुर करणारी निसर्गाची देणगी. म्हणून अंधाररुपी दु:खावर मात करण्यासाठी अंधारानंतर प्रकाश येत असतो. प्रकाशाचा उत्सव म्हणजे दिवाळी.

दिवाळी म्हणजे केवळ नवनवीन खरेदी नाही तर उत्साह आणि आनंदाची अनुभूती. मनातला राग, निराशा जाळून टाकून नव्या दमाने नव्या उत्साहाने आपले जीवन उजळणारा सणांचा राजा.

पण...... ही दिवाळी सर्वांसाठी सारखी नसते. कुणाच्या नशीबी एखादा दु:खाचा प्रसंगही आला असू शकतो. किंवा कुणी चिंतेने दु:खी असतो. आजूबाजूला होणारी आतषबाजी आणि नवनवीन खरेदी, जल्लोश पण तो आपल्याला झेपत नसल्याने आलेली निराशा, हताशपणाही असू शकतो. आपण एक सुज्ञ नागरीक आणि चांगल्या मनाचे माणूस म्हणून का असेना थोडीशी मदत करावी. आणि आनंद द्विगुणीत करुया.

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०२५

मानवाने कपडे घालायला सुरुवात कधी केली? — एक रंजक इतिहास

 

कपडयांचा इतिहास

आपण दररोज कपडे घालतो, पण कधी विचार केला आहे कामाणसाने कपडे घालायला सुरुवात कधी आणि कशी केली?
या मागे एक अतिशय जुनी आणि रंजक कहाणी दडलेली आहे.

🌨️
थंडीपासून सुरुवात 
सुमारे ,५०,००० वर्षांपूर्वी, पृथ्वीवर थंडी वाढू लागली. हिमयुग सुरू झाले
त्यावेळी माणूस झाडांच्या सावलीत, गुहांमध्ये राहत होता
थंडी, पाऊस, आणि वाऱ्यापासून संरक्षणासाठी त्याने शरीर झाकायला काहीतरी शोधले
तेव्हाच कपड्यांची सुरुवात झाली

सुरुवातीला माणूस प्राण्यांची कातडी, पानं, आणि गवत वापरत होता
हे कपडे शिवलेले नव्हतेफक्त बांधलेले किंवा गुंडाळलेले असायचे

🪡
शिवणकलेचा जन्म 
नंतर, कपडे टिकावेत म्हणून माणसाने हाडाच्या सुई बनवल्या
या सुईंचा वापर करून त्याने कातडी एकमेकांना जोडायला सुरुवात केली
हेच प्रथम शिवणकाम होते

शास्त्रज्ञांना ३०,००० ते ४०,००० वर्षांपूर्वीच्या हाडाच्या सुई सापडल्या आहेत
दोऱ्यांसाठी तो प्राण्यांच्या अंतड्या किंवा वनस्पतींचे तंतू वापरत असे

🧶
कापडाचा शोध 
हळूहळू माणसाला वनस्पतींच्या तंतूपासून कापड तयार करता येते हे कळले
भांग, ज्यूट, फ्लॅक्स आणि कापूस यांच्यापासून दोरे तयार करण्यात आले

सर्वात जुना विणलेला कापडाचा तुकडा ..पू. ७००० वर्षांपूर्वीचा तुर्की आणि इजिप्तमध्ये सापडला आहे
पण भारताने सर्वात आधी कापसाचे कापड तयार केले
सिंधू संस्कृतीत (..पू. ३३०० च्या सुमारास) लोक कापूस वापरत होते
म्हणून भारताला कापसाचा जन्मदाता देश म्हटले जाते

🧵
शिलाईचा विकास 
हाताने शिवण केल्यानंतर माणसाने चरखा आणि विणकराचे यंत्र तयार केले
काळाच्या ओघात शिलाईकला सुधारत गेली

१८३० साली Barthélemy Thimonnier (फ्रान्स) यांनी पहिले यांत्रिक शिवणयंत्र तयार केले
यानंतर Elias Howe आणि Isaac Singer यांनी आधुनिक शिवणयंत्र विकसित केले
यामुळे वस्त्रोद्योगात मोठी क्रांती झाली

👗
कपड्यांचा सामाजिक अर्थ 
सुरुवातीला कपडे उब आणि संरक्षणासाठी वापरले जात
पण नंतर ते सौंदर्य, ओळख, आणि प्रतिष्ठा दाखवण्यासाठी वापरले जाऊ लागले
वेगवेगळ्या संस्कृतींनी आपापली वेगळी वेशभूषा तयार केली — 
जसे भारतात साडी, धोतर, पायजमा, कुरता इत्यादी

📜
वेळरेषा (Timeline)
,५०,००० वर्षांपूर्वीप्राण्यांच्या कातड्यांपासून कपड्यांची सुरुवात 
४०,००० वर्षांपूर्वीहाडाच्या सुईंचा वापर 
,००० ..पू. — विणलेले कापड तयार 
३३०० ..पू. — सिंधू संस्कृतीत कापसाचा वापर 
१८३०पहिले यांत्रिक शिवणयंत्र 

🔍
निष्कर्ष 
कपड्यांचा इतिहास म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहासच आहे
थंडीपासून वाचण्यासाठी घातलेले कपडे आज फॅशन आणि ओळखीचे प्रतीक बनले आहेत
माणसाने कपड्यांमधून केवळ शरीर झाकले नाही, तर स्वतःची संस्कृतीही घडवली.


सध्याच्या फॅशन साठी भेट द्या 


मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०२५

टिव्हीचा रिमोट कोणाच्या हातात- घरातलं सर्वात मोठं राजकारण!

 

remote control

टिव्हीचा रिमोट कोणाच्या हातात- घरातलं सर्वात मोठं राजकारण!

भारतात घराघरात एक राजकारण असतं-  आणि ते म्हणजे टीव्हीच्या रिमोटचं!

पंतप्रधान बदलले तरी चालतील, पण रिमोटचा मालक बदलला की घरात खळबळ माजते.

रिमोट हा असा विषय आहे की जो हातात असेल त्याची सत्ता चालते.

कोणता चॅनेल लावायचं? हा प्रश्न म्हणजे एकदम लोकशाही संकटच!

आईला सिरीयल, वडिलांना बातम्या, आणि मुलांना कार्टून किंवा क्रिकेट.

शेवटी टीव्हीवर असतं- सगळयांच्या मनाविरुध्द काहीतरी.

रिमोटच्या सत्तेचे तीन मुख्य प्रकार

1.   आईची सत्ता :

रिमोट हातात घेतल्यावर सिरीयल सुरु होते.

बाकी घरचे लोक पुन्हा तेच! म्हणत सोफ्यावरुन उठतात.

पण आईचं एकच वाक्य- मी दिवसभर काम करते, थोडा वेळ माझा!

झालं, बाकी कुणी बोलत नाही!

2.   वडिलांचं राजकारण:

बातम्या पाहताना ते म्हणतात, देशात काय चालचं ते समजलं पाहिजे!

पण न्युजपेक्षा जास्त वादविवाद आणि जाहिरातींमुळे बाकी लोक कंटाळतात.

तरीही वडील म्हणतात – सगळं बघायलाच लागतं!

3.   मुलांची  क्रांती :

शनिवार -  रविवार म्हणजे मुलांचं राज्य!

कार्टून, क्रिकेट, आणि YouTube- सगळं त्यांचच.

बाकी सगळे फक्त बघत बसतात, जणू टीव्हीवर नाही तर मुलांवरच लाईव्ह शो चाललाय!

रिमोट हरवला की सगळयांची एकजूट

जेंव्हा रिमोट सापडत नाही, तेंव्हा सगळे घरचे एकत्र येतात- अरे कुणी बघितलास का? तो मिळेपर्यंत एकजुटीचं वातावरण असतं,

पण मिळताच पुन्हा सुरु होतं रिमोटचं युध्द!

निष्कर्ष

टीव्हीचा रिमोट हा छोटा दिसतो, पण त्यात मोठं पॉवर असतं.

तो घरात शांतता ठेवू शकतो किंवा गोंधळ माजवे शकतो.

म्हणून पुढच्या वेळी टीव्हीवर काय लावायचं हा वाद सुरु झाला की,

फक्त लक्षात ठेवा – रिमोट महत्वाचा नाही, साथ महत्त्वाची!


मी कोण आहे?

  मी कोण आहे ? #motivationmarathi #selfawareness #selfgrowth #innerpeace #mindsetshift #deepthoughts #knowyourself #personalitydevelopment ...

आणखी पहा