Pages

गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

मूल्य आणि शुल्क


व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर
कामाचे मूल्य (Value) आणि शुल्क (Price) यातला फरक ओळखा

Value vs. Price

एका जहाजामध्ये काहीतरी बिघाड होतो. यामुळे जहाज समुद्रात नेणे अशक्य होऊन बसते. जहाजाचे कर्मचारी सगळं जहाज तपासून पाहतात, पण त्यांना दोष काही सापडत नाही. अथक प्रयत्न करूनही जेव्हा त्यांना अपयशच येतं तेव्हा ते जहाज बांधणी मधील तज्ञ व्यक्ती ला बोलावतात. तो इंजिनियर येतो संपूर्ण तपासणी करतो... जहाजाच्या एका पॅनल मधील स्क्रू ढिल्ला झालेला असतो, त्यामुळे संपूर्ण बॉडी मध्ये प्रॉब्लेम तयार झालेला असतो. इंजिनियर तो स्क्रू पुन्हा पक्का बसवतो आणि जहाज पूर्ववत होते.
जाताजाता तो इंजिनियर त्याचे बिल जहाज कंपनीकडे सुपूर्द देतो आणि निघून जातो. ते बिल असतं दहा हजार रुपयांचे. एक स्क्रू पक्का बसवण्यासाठी दहा हजार रुपये कंपनीला जरा जास्त वाटतात म्हणून ते त्यांच्या एका कर्मचाऱ्याला त्या इंजिनियर कडे बिल दुरुस्त करायला पाठवतात. कर्मचारी जातो आणि इंजिनियर ला एक स्क्रू पक्का बसवण्याचे इतके बिल होऊ शकत नाही, बिल कमी करा असे सांगतो.

इंजिनियर त्या कर्मचाऱ्याच्या हातात नवीन बिल सोपवतो.
त्यात लिहिलेले असते स्क्रू पक्का बसवण्याचे शुल्क रु. १/- आणि कोणता स्क्रू ढिल्ला आहे हे शोधण्याचे मूल्य ९,९९९/-

यावरून तुम्हाला मूल्य आणि शुल्क (किंमत) यातला फरक लक्षत आला असेल अशी अपेक्षा करतो. पण ते शुल्क नसते तर मूल्य असते ज्ञानाचे, बुद्धीचे आणि वेळेचे. ग्राहक म्हणून आपल्या फी ला शुल्क म्हणून पाहत असतात आणि आपण व्यवसायिक म्हणून आपले मूल्य ठरवत असतो.
. तुम्हाला तुमच्या कामाचे मूल्य ओळखता आले पाहिजे. कित्येक ठिकाणी तुम्ही पहिले असेल कि पारंपरिक कला असलेल्या लोकांकडून हाताने बनविलेल्या वस्तू अतिशय कमी किमतीत घेतल्या जातात. त्या उत्पादकांना आपल्याकडून पन्नास रुपयांना घेतलेली कलाकुसर बाहेर मार्केटमधे हजार रुपयांना विकली जाते हे माहीतही नसते. ते मिळेल तेवढे पैसे घेतात याचे कारण त्यांना त्यांच्या कौशल्याचे मूल्य माहित नसते. त्यांना फक्त त्यांच्या कामाची किंमत माहित असते. एखादा कलाकुसरीचा टेबल हजार रुपयांना मिळत असेल तर तोच टेबल एखाद्या मोठ्या ब्रॅण्डच्या नावाखाली लाख रुपयाला सुद्धा विकला जाऊ शकतो. कारण त्या ब्रँड ने आपल्या वस्तूचे मूल्य ठरवलेले असते किंमत नाही. रोल्स रॉयस कार मध्ये सात आठ कोटी खर्च करावेत असं काही नाही पण त्या ब्रँड चे मूल्यच इतके मोठे हे कि ती किंमतही तुम्हाला त्या गाडीसमोर फिकी वाटते. एखादी पेंटिंग  करोडो रुपयांना विकली जाते याचे कारण तिचे मूल्य आहे, किंमत नाही.

कामाचे मूल्य मिळणं हि तशी सोपी गोष्ट नाही. यासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागते, इतरांपेक्षा वरचढ व्हावे लागते, स्वतःचा ब्रँड बनवावा लागतो, इतरांकडे नसेल असे ज्ञान कौशल्य मिळवावे लागते... हे ज्यांच्यासाठी अवघड आहे त्यांना तसंही यश कमीच मिळतं. त्यामुळे यात तडजोड होऊ शकत नाही 

कष्टाची किंमत मिळते, कौशल्याचे मूल्य मिळते. म्हणून कौशल्य आत्मसात करा. ज्या क्षेत्रात असाल त्यातले तज्ञ व्हा. अगदी बूट पॉलीश जरी करत असाल तरी त्यातले कौशल्य आत्मसात करा. लोक पॉलिश साठी दोन नाही दोनशे रुपये सुद्धा देतील.

आपल्या कामाचे मूल्य ओळखा, किंमत तर सगळेच करतात. तुम्हाला तुमच्या कामाचा परतावा शुल्क म्हणून नाही तर मूल्य म्हणून ज्यावेळी मिळायला लागतो त्यावेळी तुमची यशाकडे भक्कम वाटचाल सुरु झालेली असते हे लक्षात घ्या.


देवाचा मित्र


अतिशय छान आहे एकदाच वाचा

देवाचा मित्र
एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, ""काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ""अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, ""काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो.
.
स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार?

देवाचा मित्र व्हा

देवाचा मित्र होण्यासाठी शुभेच्छा

आमचं फार पटतं


आमचं फार पटतं,
We are very close friends
जवळपास ही वाक्यं बऱ्यापैकी नक्कीच खोटारडी वाटतात!

माणसाचं दुःख कमी होण्यासाठी
हल्लीच्या तकलादू  Relations चा काहीही उपयोग नाही..

उपयोग का नाही ?
कारण मित्र कितीही Close असोत, हल्ली फक्त Get together करतात, शेक हॅन्ड करतात, आपलं यश सांगतात, त्याचं आवर्जून प्रदर्शन करतात, पण कोणीही कुणाला आपलं दुःख सांगत नाही, त्यात मात्र कमीपणा मानतात, स्वत:चं अपयश समजतात..!
खाणे-पिणे, हसणे-खिदळणे
किंवा एखाद्या रेकॉर्डेड गाण्यावर
सर्वांनी मिळून डान्स करणे
हे सुख नाही, हा फक्त सुखाचा आभास निर्माण करण्याचा प्रयास आहे..
याचा अर्थ या गोष्टी करू नयेत असा नाही.
परंतु जोपर्यंत माणसं खरं दुःख एकमेकाला सांगणार नाहीत,  मनमोकळं रडणार नाहीत,
तोपर्यंत आपल्याला कधीही हलकं वाटणार नाही..!
आजूबाजूला काय दिसतंय.?
चेहरे चिंताग्रस्त आहेत
मुखवटे मात्र हसत असतात.
म्हणून आजकाल माणसं
खूप दुःखी दिसतात.
मग यावर उपाय.. ?
उपाय नक्कीच आहे
आपल्या दुःखाला कुणी हसणार नाही, माघारी टिंगल टवाळी करणार नाही हा विश्वास आपल्याला निर्माण करावा लागेल.
तरंच आपल्या भेटण्याला काही तरी अर्थ असेल !

हसणे आणि रडणे या क्रिया जोपर्यंत खळखळून होणार नाहीत तोपर्यंत आनंदी किंवा Fresh चेहरे कधीही दिसणार नाहीत!

मनातल्या मनात दुःख कोंडल्यामुळे किंवा भावभावनांचा निचरा न झाल्यामुऴेच रक्त वाहिन्या मध्ये ब्लॉकेजेस होतात,
आणि
दिवसेंदिवस आपल्याशी मनापासुन गोड बोलणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे असं वाटत असल्यामुळेच शुगरही वाढत असावी कदाचित..

एक लक्षात घ्या
ब्युटी पार्लरमधे गेल्यामुळे चेहरे तेजस्वी होत नसतात.
आणि मसाज केल्यामुळे
वेदनाही कमी होत नसतात ..

पूर्वी आपण एकाद्याकडे पाहुणे होऊन जायचो, जे देतील ते आनंदाने खायचो..
ओसरीवर, बैठकीत, एकत्र झोपायचो..
खळखळून हसायचो..
एकमेकाला दुःख सांगून
गळा काढून मग मन मोकळे रडायचोही..
हुंदक्यांमागे हुंदके यायचे
आणि Automatic कपालभाती होवून जायची..

कुणीतरी जवळ घ्यायचं,
पाठीवरून हात फिरवायचं,
रडू नको म्हणत म्हणत
घट्ट कवटाळून धरायचं..
खूप मोठा आधार वाटायचा,
हत्तीचं बळ यायचं.
माझ्याबरोबर सगळे आहेत
असं मनापासून वाटायचं..

काळवंडलेले चेहरे
एकदम खुलून जायचे.
चेहरे एकदम Fresh आनंदी
दिसायचे..

मित्रहो
आपल्यालाही तेच करावं लागेल
दुसरं काहीही नाही,
नाहीतर नसते खोटारडे सुखी चेहरे घेऊन केलेल्या दिखाऊ Good Morning,
तसेच
Get Togethers ना
कांहीही अर्थ नाही.!!

'ती' घरीच असते.😳


छान आहे वाचा बर का...
" कारण तु घरीच असते !!!!!!! "

अगं ऐकलंस का.......?
आज बंटीची बस येणार नाहीए.
मला वेळ नाही.
त्याला शाळेतुन तुच आण.
कारण तु घरीच असते.....🙄

अगं माझा मोबाईल चार्जर सापडत नाही,
battery low आहे,
तुझा फोन नंतर लाव.
तुझा चार्जर मला दे.
कारण तु घरीच असते......🙄

आज मला लवकर office ला जायचे आहे ,
आधी पेपर मला दे.
तु नंतर कधीही वाच.
कारण तु घरीच असते.....🙄

उद्या माझा boss येणार आहे.
पिंकीची exam आहे .
तिचा अभ्यास तुच घे.
कारण तु घरीच असते......🙄

दोन/तीन दिवस खुप busy आहे .
Month end आहे.
आई - बाबांची औषधे तुच आण.
कारण तु घरीच असते ....🙄

बंटी-पिंकीची अंघोळ,
त्याचा डबा, माझा नाश्ता,
तयारी आधी करत जा.
तुझी घाई मधेच कशाला?
कारण तु घरीच असते .....🙄

office मधे work load आहे.
मुलांच्या parents meeting ला 👩‍👧‍👦
मला जमणार नाही.
तुच attend कर.
कारण तु घरीच असते ....🙄

👩🏻 ए आई, remote दे.
मला TV बघायचा आहे.
नंतर मला class आहे.
तु नंतर बघ ना ,तुझी serial repeat.
कारण तु घरीच असते .....🙄

आज colleague बरोबर
बाहेर जातोए जेवायला.
मुलांना तुच garden मध्ये घेउन जा .👩‍👧‍👦
कारण तु घरीच असते .....🙄

पुण्याचे मामा-मामी येताएत लग्नाला.
मी तर office मध्ये असतो, पण त्यांना म्हटलं उतरा आमच्या कडे.
कारण तु घरीच असते ....🙄

मुले शाळेतुन आल्यावर आज पावभाजी कर.
पिंकीचा वाढदिवस आहे ना !
आराम तर रात्री ही होईल.
जमलस तर cake पण कर.
कारण तु घरीच असते ....🙄

अग ऐकलंस का ?
खुप दमुन आलोय.
एक कडक चहा ☕दे आणि
जेवायलाही लवकरच वाढ. होईल न स्वयंपाक पटकन ?
कारण तु घरीच तर असते....😟

घराबाहेर पडणाऱ्यांची 👨‍💼
प्रत्येक गोष्ट प्रथम महत्त्वाची.
'ति'च्या प्रत्येक इच्छेला,
प्रत्येक  आवडीनिवडीला दुय्यम स्थान !!
कारण 'ती' घरीच असते.😳

खरंच का एवढ सोप्प आहे ?
घरी राहणं 😟 ??????

मनाला भावलेली एक हळवी पोस्ट 💕
सगळ्यांसाठी 🙏
समजून घ्या ,उमजुन घ्या .....👩‍🍳
*स्रियांचा सन्मान करायला शिका....करण 👸🏼
'ती' घरी असते 'म्हणून घर घर असते

‘क्वालिटी टाइम’



मी माझ्या लेकीला विचारलं,
चल, भेळ खायची?’
लेकीच्या ड्रॉइंग क्लासमध्ये अलीकडेच एक कार्यक्र म होता. घरापासून फार लांब नाहीये तिचा क्लास. जाताना आम्ही गाडी घेऊन गेलो; पण तिला आणायला गेले तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती.
सहज लक्षात आलं, बरेच दिवसात भेळ खाल्ली नाही. बाहेर पडल्यावर लेकीला विचारलं,
भेळ खायची का?’
ती आश्चर्यानं माझ्याकडे बघतच राहिली.
आई, तू बरी आहेस ना?’
...तिच्या चेहऱ्यावरून आनंद नुसता झरझरत जाताना दिसला... साधी भेळ ती काय, किती छोटीशी गोष्ट; पण आनंद किती !
गाडी नव्हती, म्हणून दोघीही चालत निघालो. लेक मला बिलगली, म्हणाली ‘‘छोटू नाहीये आज, त्यामुळे तू अख्खी मला एकटीला मिळाली आहेस, आय अ‍ॅम सो हॅपी’’
...ती अक्षरश: विहरत होती. दोन मिनिटात आम्ही नेहमीच्या भेळवाल्यापाशी पोहोचलो; पण तो नव्हता. मग लेकच म्हणाली, ‘‘आई, आपल्या घरापाशी आहे, तिथे खाऊ.’’
चल, चालत जायचं का? - मी सहज विचारलं, तर आनंदाने शिगोशीग भरलेला मोठ्ठा होकार आला. जिथे दमल्यासारखं वाटेल, तिथून रिक्षा करायची, असं ठरलं.
पूर्ण रस्ता बाजारपेठेतून जाणारा. पहिल्याच दुकानापाशी ‘विंडो शॉपिंगची आयडिया सुचली. आणि कॉलेजातल्या मैत्रिणींनी ताळतंत्र सोडून निर्भर भटकंतीला निघावं तसा दंगा करीत या दुकानासमोर थांब, त्याच दुकानात लावलेले डेÑसेस बघ, आवडत्या रंगांच्या शेड्सवरून उगीच वाद घाल, आजूबाजूला दिसणाºया गर्दीतल्या अनोळखी माणसांकडे बघून एकमेकींच्या कानात खुसखुस बोल.. अशी धम्माल करत आम्ही रमतगमत निघालो.
माझ्या लेकीला आजूबाजूचं भानच नव्हतं. ती तिच्या आनंदात होती आणि मस्त मजा करत होती. काही क्षणात हे असले झुळझुळ झरे कुठून आले आमच्यात कोण जाणे, पण फार धमाल येत होती.
अर्ध्याहून जास्त अंतर चालल्यावर दुकानं संपली आणि आपण किती चाललोय हे लक्षात आलं. पुन्हा लेकीनं आश्चर्यानं विचारलं, ‘आई, आपण एवढं लांब चालत आलो? वाटलंच नाही. मजा येतेय, नको रिक्षा करायला. चल, आपण चालतच जाऊ.’
मला हा आश्चर्याचा धक्काच होता!
एरवी गाडीशिवाय घराबाहेर पडायला कुरकुरणारी माझी लेक, आज तिला पायीच चालायचं होतं.
.. परत चालायला सुरुवात केली. एव्हाना दुकानं संपली होती. त्यामुळे विंडो शॉपिंगची धमाल संपली आणि गप्पा सुरू झाल्या. मी फक्त ऐकत होते, लेकच बोलत होती. नुसता धबधबाच उसळला होता... तिच्या मैत्रिणी, शाळा, स्कूलबस असे बरेच विषय होते. कधी निमित्ताने खोदून, खणूनही मला न कळलेल्या, तिच्या मनातून काढता न आलेल्या कितीतरी गोष्टी मला अलगद मिळत/कळत होत्या.
हीच का माझी लेक..?
- आठवीत गेल्यापासून का कोण जाणे, जरा तुटकशीच वागायला लागलेली? ही इतकी गप्प, इतकी ‘सिक्रेटिव्ह का होत चाललीय म्हणून आईच्या पोटात उगीच धास्तीचा खड्डा पाडणारी?
तिच्या पोटात शिरायची, तिच्या बदलत्या फुलपंखी आयुष्यात ‘असण्याची किती धडपड केली होती मी गेले काही दिवस..!
नकोशा दुराव्याची ती नकोशी शंका अशी अचानकच फिटली आणि माझ्या मनावरचं ओझंच उतरलं.
बोलता बोलता घराजवळचं भेळीचं दुकान आलं, आम्ही आत जाऊन बसलो. ऑर्डर केली. मूड छान होता त्यामुळे असेल कदाचित पण भेळ आणि पाणीपुरी फारच टेस्टी होती, मग परत ऑर्डर केली.
आम्ही दोघी अखंड हसत होतो.
गप्पांना अंत नव्हता.
निघताना लक्षात आलं, आपण सेल्फी नाही काढला !
पण लेकीला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता, कारण ती आज खूप वेगळा आणि बहुदा तिला हवा असणारा आनंद घेत होती.
नाहीतर सतत वेगवेगळ्या पोझमध्ये सेल्फी काढणारी माझी लेक म्हणाली,
जाऊ दे आई, चल.
- हा मला सुखद धक्काच होता !
पुन्हा हसत, खिदळत चालायला सुरुवात झाली. घरी पोहचलो तेव्हा एवढं चालून आलो होतो, तरी दमलो नव्हतो. हाशहुश झालं नव्हतं.
उलट आमचे आनंदाने ओसंडणारे चेहरे बघून घरातल्यांच्या भुवया वर गेल्या.
नक्की केलंत काय?’ या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही गुलदस्त्यातच ठेवलं. माझ्या लेकीच्या मोठ्या आनंदाची किंमत एवढी छोटीशी होती, हे समजायला १३ वर्षं का लागली असतील? आनंदानं हलकं झालेलं मन मग कितीतरी वेळ चुटपुटत राहिलं.
... मुलांच्या अपेक्षा केवढ्या लहान असतात ! पण, रोजच्या धावपळीत आपल्याच लक्षात येत नाही.
आजवर कितीदातरी वाचलं होतं, ‘पालकांनी मुलांना ‘क्वालिटी टाइम द्यावा.’
क्वालिटी म्हणजे काय, ते आज कळलं, एवढंच!

ध्येय





गाढव वाघाला बोलतो गवत पिवळ असत. वाघ बोलतो गाढवाला गवत हिरव असत. त्यांच्यात वाद होतो. ते सिंहाकडे जातात निवाडा करायला. दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांचा समोर सिंहाला बोलतो कि गवत पिवळ असत आणि हा वाघ बोलतो की हिरव असत......तुम्ही आता सांगा की खर काय आणि खोट काय. सिंह स्मितहास्य करतो आणि सर्वांचा समोर सांगतो की गाढव बरोबर बोलतो. गवत पिवळ असत........आणि वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो. गाढव आनंदाने उड्या मारत जंगलात निघून जाते.
सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो की तुम्हाला माहित आहे ना की गवत हिरव असत, तरीही का मला शिक्षा केली...............सिंह बोलला, मी शिक्षा तुला ह्यासाठी केली कारण तो गाढव आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. आणि गवत हिरवच आहे ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास म्हणून तुला शिक्षा दिली.....
Moral of the Story : ध्येय गाठायच असेल तर वाटेत येऊन भुकणाऱ्या कुत्र्यांन कडे दगड न फेकता बिस्कीट फेका.आणि पुढे व्हा कारण पुढे ध्येय महत्वाचं आहे..!

केळवण -



केळवण --------------------
मराठी घरात लग्न किंवा मुंज यांसारखे मंगल कार्य ठरले, की लगेच केळवणाची आमंत्रणे येण्यास सुरुवात होते. केळवण हा लग्न, मुंज यांसारख्या मंगलकार्यापूर्वी होणारा समारंभ आहे. त्यामध्ये वधू आणि वर यांच्या स्वतःच्या घरी स्वतंत्रपणे थाटाने मेजवानी करून नातेवाईकांना जेवायला घातले जाते. तसेच, नातलगही त्यांच्या त्यांच्या घरी वधूला किंवा वराला मेजवानी देतात आणि भोजनोत्तर घरचा अहेरही देतात. त्याला यजमानांनी केळवण केले असे म्हटले जाते. ते सहसा वधुवरांचे नातेवाईक व मित्रमंडळी यांजकडून होत असते. लग्नासाठी तयार (वॉर्मअप) करण्याचा हा प्रकार!
केळवण याचा एक अर्थ काळजी घेणे किंवा काळजीपूर्वक सांभाळणे असाही आहे. केळीच्या पिकाची काळजी घेऊन मशागत करावी लागते. नाहीतर केळीची रोपे सुकून जातात. त्यामुळे लग्न ठरलेल्या वधूची माहेरी जशी काळजी घेतली जाते तशीच सासरीही घेतली जावी हाही केळवण करण्यामागचा हेतू असावा.
केळवणाला गडगनेर असेही म्हटले जाते. गडगनेरचा गडंगनेर किंवा गडंगणेर असे दोन्ही उच्चार आढळतात. गडू आणि नीर यांपासून गडगनेर हा शब्द बनला आहे. गडू म्हणजे पाण्याचा तांब्या आणि नीर म्हणजे पाणी. परंतु गडगनेर याचा शब्दशः अर्थ नुसता पाणी भरलेला तांब्या असा धरला जात नाही तर तो शब्द पाहुण्यांना देण्याची मेजवानी अशा अर्थाने येतो.
महाराष्ट्रात जेवणाच्या पंगतीसाठी केळीची पाने वापरण्याची प्रथा आहे. मुळात केळीचा उगम भारतात, विशेषतः पश्चिम घाट आणि ईशान्य भारत येथे झाला. मुसा ऍक्युमिनाटा आणि मुसा बाल्बिसिआना ह्या प्रजाती केळ्यांच्या मूळ जाती समजल्या जातात. जगातील केळीच्या उत्पादनाचा अठरा टक्के वाटा भारताचा आहे.
केळवण झालेल्या मुलीस केळवली असे म्हणतात. तिला सासरचे वेध लागलेले असतात. तिचे मन सासरी धाव घेऊ लागते. केळवली नवरीची ती भावावस्था ज्ञानेश्वरांनी एका ओवीत टिपली आहे. त्यांनी ज्ञानी व्यक्तीचे वर्णन करताना म्हटले आहे - केळवली नवरी माहेराविषयी जशी उदासीन असते तसा ज्ञानी माणूस जगण्याविषयी उदासीन असतो आणि तो त्याच्या अंतःकरणाला न मरताच मृत्यूची सूचना देतो. ज्ञानेश्वरीतील ती ओवी अशी –
ना तरी केळवली नोवरी |
कां सन्यासी जियापरी |
तैसा न मरतां जो करी |
मृत्युसूचना || 13.451 ||
केळवण घालण्याची प्रथा महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांच्या आधी काही शतके रूढ होती एवढे त्यातून दिसून येते. केळवण हा अस्सल मराठी शब्द आहे.

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा