Pages

सोमवार, ८ ऑक्टोबर, २०१८

हवे होते

हवे होते


एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला.
दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो.
काहीतरी दुसरे घेऊन बाहेर पडतो आपण.
परतताना मनात विचार येतो
तो ड्रेस घ्यायला हवा होता

सिग्नलला गाडी थांबते,
चिमुरडी काच ठोठावते.
गोड हसते, पण भिक मागत आहे
हे लक्षात घेऊन त्या हसण्याकडे फार लक्ष देत नाही आपण.
२-३ रुपये द्यावे असे मनात येते.
रेंगाळत सुटे शोधता शोधता ‘देऊ का नको हा धावा मनात सुरू असतो.
तेवढ्यात सिग्नल सुटतो,
गाडी पुढे घ्यायची वेळ येते.
थोडे पुढे गेल्यावर मन म्हणते,
सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला

जेवणाच्या सुट्टीत ऑफिसातला मित्र त्याच्या घरातला त्रास फार विश्वासाने सांगतो,
त्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात.
वाईट वाटते खूप, नशीब आपण त्या परिस्थितीत नाही असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळे होतो.
काही मदत हवी का?’ असे विचारायचे असूनही आपण गप्प राहतो.”
जेवणाची सुट्टी संपते.
तो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो.
क्षणभर स्वत:वर राग येतो, ‘मदत तर विचारली नाही
निदान खांद्यावर सहानुभूतीचा हात तरी ठेवायला हवा होता मी!’

असेच होते नेहमी,
छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात.
खरं तर या छोट्या गोष्टीच जगण्याचे कारण असतात.

गेलेले क्षण परत येत नाहीत,
राहतो तो ‘खेद, करता येण्यासारख्या गोष्टी न केल्याचा.

जगण्याची साधने जमवताना जगणेच राहून जात नाहीये ना ते ‘चेक करा.
आनंद झाला तर हसा, वाईट वाटले तर डोळ्यांना बांध घालू नका

चांगल्या गोष्टीची दाद द्या,
आवडले नाही तर सांगा,
घुसमटू नका.”

त्या त्या क्षणी जे योग्य वाटते ते करा.
नंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही.

आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या,
त्या छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात गुंफणे म्हणजेच जगणे.”

आवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली तर ‘लाईफ कसले?
आपल्यांच्या दु:खात डोळे नाही भरले तर ‘लाईफ कसले?
मित्रांच्या फालतू विनोदांवर पोट दुखेस्तोवर हसलो नाही तर ‘लाईफ कसले?
आनंदात आनंद आणि दु:खात दु:ख नाही जाणवले तर ‘लाईफ कसले?

अप्रूप


अप्रूप
 Click Here

 माणसाला ना, जे मिळत नाही तेच हवं असतं, अप्रूप असतं..
 सरळ केस असतील तर कुरळे छान वाटतात,
जाड असेल तर बारीक लोकांचं कौतुक असतं ,
 आणि ज्यांना भयंकर फिरायला आवडतं त्यांना कधी फारसं बाहेर पडायला होत नाही ..
 यालाच जीवन ऐसे नाव  !
 आता संसार हा दोन चाकी रथ आहे, दोन्ही चाकं एकाच दिशेत, एकाच वेगात चालली पाहिजेत,बरोबर ना ?
पण मग जोड्या जमतात त्या मात्र एकदम विरूद्ध स्वभावधर्माच्या !
 आणि असेच संसार यशस्वी होतात...
 बायको खूप हौशी असेल तर नवरा जरा पडेल असतो,
 नवरा सोशल असेल तर बायको अतिशय मर्यादित असते,
  बायको बडबडी तर नवरा अबोल,
 नवरा भटकंती स्पेशल तर बायको घरकोंबडी ,
  बायकोला लॉंग ड्राईव्हला जायला आवडते तर नवरा टीवी पाहणं पसंत करतो,
 त्याला खूप मित्र तर हिला लोकांची अँलर्जी,
 ती उत्सव प्रिय तर त्याला अजिबात आवड नाही,
 फिरायला जायचं तर त्याला निवांत समुद्र किनारा आणि तिला निसर्गरम्य किंवा भरपूर स्थलदर्शन आवडतं,
 त्याला एकदम मॉडर्न राहायला आवडतं तर ती एकदम साधी,
 ती अतिशय सडेतोड तर तो एकदम भिडस्त ,
  हॉटेलमधे तिला कॉंटिनेंटल तर त्याला थाळी आवडते,
 ती फ्रिकाऊट तर तो एकदम शांत....
 असंच असतं सहसा, नाही का ?
  पण मग तरीही अशाच जोड्या अतिशय छान संसार करतात - का बरं ?
 म्हणतात ना, opposite poles attract......-
 विजोड जोड्या नाही म्हणायचं .. उलट भिन्न स्वभावधर्माच्या जोड्या असतील तर संसारात मजा आणि थोडा खमंगपणा असतो..
 दोघंही जर शांत असतील तर मग घरात बोलणार कोण ? दोघंही मित्र मंडळीत रमणारे असतील तर घर बघणार  कोण ?
दोघंही भटके असतील तर घराला घरपण आणणार कोण ? आणि दोघंही परफेक्शनिस्ट असतील तर चुका काढणार कोण ? 😀
 आणि दोघंही समान पातळीवर असतील तर समतोल साधायला काहीच उरणार नाही..
  थोडं पुढे - मागे, अधिक - उणं झाल्याशिवाय मजाच नाही ना ! सारं कसं शांत - शांत !
 मग ते घर नाही, संन्याशाची मठी वाटेल😀..
 एकमेकांना समजून घेण्यात, एकमेकांच्या आवडी-निवडी जपण्यात, आणि एकमेकांना आहे तसं स्वीकारतानाच आपले मीपण जपण्यात खरी मजा आहे - जगण्याची -
 नाही का ?
म्हणून तर म्हणायचं -
 *घर दोघांचं असतं दोघांनी सावरायचं असतं,
एकानी पसरलं तरी दुसऱ्यानी आवरायचं असतं*


चला अभ्यास सोप्पा करूया

चला अभ्यास सोप्पा करूया 


तुमचं वय कांहीही असू देत,तुम्ही जर विद्यार्थी असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे.

जानेवारी महिना संपत आला आहें. मार्च, एप्रिल,मे हे परीक्षांचे महिने जवळ येत आहेंत. अनेकांचे धाबे दणाणले असणार. वाया गेलेला / घालवलेला, काळ आपल्यालाच वाकुल्या दाखवतोय असा भीतिदायक भास ही तुमच्या पैकी अनेकांना होत असणार. स्मरणशक्ती चे अभ्यासवर्ग घेतांना विद्यार्थ्याचे हे अनुभव मला नेहमीच ऐकायला मिळतांत.

खरेंतर जो परिश्रम, सातत्य व एकाग्रतेने केला जातो तोच खरा अभ्यास. तरीही कांही गोष्टींकडे थोडं नीट लक्ष दिलं तर शाळा कॉलेजचीच नव्हें तर ..... आयुष्याची परीक्षा सुद्धा चांगल्या मार्कांनी पास होणें सहज शक्य आहे.

कोणतीही परीक्षा द्यायचा निर्णय एकदां झाला कीं इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा अभ्यासलाच अग्रक्रम दिला गेला पाहिजे. ह्याचा अर्थ असा नव्हें कीं रात्रंदिवस, उठता बसता .... फक्त अभ्यास एके अभ्यासच करायचा आहें.
पण विषयवार वाचन, लेखन, मनन हे नियमितपणे झालेच पाहिजे.

💠    विद्यार्थ्याने सर्वप्रथम स्वतःचे ध्येय निश्चित करायचे असतें. जोपर्यंत तुमचे शिक्षण घेण्या मागचे उद्दिष्ट तुम्ही नक्की करणार नाही, तोपर्यंत अभ्यासा साठी लागणारी प्रेरणा ही तुमच्यांत येणार नाही.

ह्यानंतर महत्वाचे म्हणजे स्वतःची दिवसभरांतील एकवेळ निश्चित करावी. मात्र एकदां अभ्यासाची वेळ ठरवली कीं ती चुकू देवू नये.  ह्यावेळी भरपेट जेवू नये, तसेंच अर्धपोटी / उपाशीपोटी ही राहू नये. असे पदार्थ खाण्यात ठेवावेत जे उष्मांक तर देतील पण शरीरांत जडपणा आणणार नाहीत. मन आणि शरीराला पोषण देणाऱ्या पदार्थांचेच सेवन करावें. उदा. ताजे सात्विक अन्न, जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश, सॅलडस, शक्य असेल तर थोडा सुकामेवा, तीळ, शेंगदाणे,(शिजवून घेतलेली) मोड आलेली कडधान्यें, फळें इत्यादींचा समावेश असावा. तळलेले पदार्थ फास्टफूड / जंकफूड, कोल्ड्रिंक्स तर  उत्तम मार्क्स घेण्याची ईच्छा असणाऱ्यांनी वर्ज्यच समजावेत.

💠   स्वतःच्या अभ्यासाचा एक विषयवार टाईमटेबल तयार करून घ्यावा. ह्यांत नावडता विषय सर्वांत अगोदर तर आवडता विषय सगळ्यांत शेवटी ठेवावा. ( एरव्ही आपण नेमकं ह्या उलट करतो.) कोणत्याही विषयाला सलग 2 - 3 तास कधींच देवू नये. तासाभराच्या आत एक टॉपिक पूर्ण करावा. नंतर थोडा ब्रेक घ्यावा. त्यानंतर दुसरा विषय किंवा टॉपिक अभ्यासाला घ्यावा. झोप घालावण्या साठी चहा, कॉफी चालेल पण ह्या पेयांचा अतिरेक मात्र टाळावा. ह्या काळांत पोषकद्रव्ये असलेला, व्हिटॅमिन्स, खनिजें व कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा. पाणी भरपूर प्यावे.

💠   अधुन मधुन सर्व शरीराला व्यायाम म्हणून चालणें, फिरणें, खेळणे 🏀⚽🚴 असावें. अभ्यासाचा वेळ मात्र पूर्णपणे TV, Mobile free असावा. ह्यावेळी सुद्धां सोशल नेटवर्किंग साईट्स शिवाय राहत येत नसेल तर मात्र कांही खरें नाही. अभ्यास करतांना टेबल खुर्चीचा / जमिनीवरील भारतीय बैठकीचा वापर करावा.
बऱ्याच लोकांना अंथरुणावर बसून / पडून  अभ्यास करण्याची संवय असतें. ही पद्धत चुकीची आहे. ही संवय तुम्हाला असेल तर ती आधी सोडा. जिथे बसून अभ्यास करायचा ती जागा खोली देखील स्वच्छ, प्रदूषणमुक्त असावी. 
परिक्षार्थींची झोपही पूर्ण व्हायलाच हवी. बरेचदा विद्यार्थी / विद्यर्थिनी पेपरच्या अगदी ऐन वेळेपर्यंत वाचत असतांत पण तसें करू नका. पेपरच्या आदल्या रात्रीही तुम्ही जागरण न करता  छान झोप घ्यायची आहें. 
💠    अभ्यासाला बसताना .....वही, पेन, पेन्सिल, खोडरबर, स्केल व पाण्याची बॉटल हाताशी ठेवावें. असें केलें नाही तर ह्यापैकी एकेका वस्तु साठी उठावे लागल्याने अपेक्षित एकाग्रता सतत ब्रेक होत राहील.
आतां प्रत्येक chapter वाचल्यानंतर , त्यातील महत्वाच्या मुद्द्यांच्या नोट्स लिहून काढाव्यात.  आवर्जून सांगतेय कीं भाषा स्वतःची असावी. शब्द स्वतःचे असावेत. महत्वाचे "दिशादर्शक" शब्द अधोरेखित करावेत. न समजलेलें words/ theorems/ phrases/ formulas/ methods हे सगळे वेगळें लिहून काढून आत्मसात करावेत. लिहिलेले मुद्दे न बघतां आठवण्याची संवय करावी. मागील परीक्षांचे प्रश्नसंच मिळवून ते सोडवावेत. हे प्रश्नसंच सोडविण्याच्याही कांही पद्धती आहेत. 
💠    केलेल्या अभ्यासाची एक उजळणी पहिल्या 24 तासांत तर दुसरी 72 तासांत व तिसरी 7 दिवसांत करावी. जमले नाही तरी प्रयत्न सुरू ठेवावेत. विद्या / ज्ञान परिश्रमानेच साध्य होतें. एक छोटीशी मुंगी सुद्धा तिच्या जिद्द व चिकटीनेच जीवन संघर्षांत यशस्वी होतें, तर आपण कां नाही ? 
 सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पॉझिटीव्ह अर्थात सकारात्मक विचार ठेवावेत. हे मला जमेलच ही भावना ठेवावी. अपयश आलें तरी खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने सराव चालुच ठेवावा. 
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर चांगल्या गोष्टी शिकवणारे कांही लोक भेटत असतांतच. त्या सर्वां विषयी आदराची भावना असावी. अगदी आई, वडिल गुरुजनां पासून ते पार एकाद्या अनोळखी हितचिंतका पर्यंत ..... सर्वांविषयी !
मदत करणाऱ्यांवर हक्क गाजवण्याची, रागावण्याची भूमिका तर अगदी चूकच.
ह्या बाबीं तसेंच चिकाटी आणि मानसिक स्थिरतेचा अभाव .... ह्या उणीवा आयुष्याची परीक्षा पास होण्याच्या मार्गातील अडथळे आहेंत. 
💠    सरसकटपणे आपली सर्वांची स्मरणशक्ती अप्रशिक्षित (untrained) असतें. तिला प्रशिक्षित (trained) केलें की अभ्यास सोप्पा. त्या साठी माझ्या कार्यशाळेत विविध तंत्रांचा यशस्वीरित्या वापर केला जातो. एक छोटासा प्रयोग तुम्हीही करून बघा : 
एका टेबलवर 10 - 15 वस्तु लावून ठेवायला कोणालातरी सांगा. आतां तुम्ही ह्या वस्तुंना एकदाच कांही सेकंद बघा. आतां वस्तूंकडे अजिबात न बघता, सर्व वस्तु ज्या क्रमाने लावल्यात, त्याच क्रमाने लिहून काढण्याचा प्रयत्न करा. वस्तु आणि क्रम बिनचूक लिहिता येईपर्यंत हा प्रयोग रिपीट करत रहा.

मानसिक डाएट


मानसिक डाएट


ही कन्सेप्ट जरा नविन आहे,
पण ती तुम्ही समजुनं घ्याल ही खात्री सुदधा आहे.

म्हणजे बघाना,
आपलं वजन वाढतं,
आयुष्याच्या फिगरवर परिणाम होतो,
बीपीच्या गोळ्या सुरु होतात,
शुगर डिटेक्ट होते.
किंवा कधी कधी स्वत:ची आगाऊ काळजी म्हणुन सुद्धा
किंवा कधी कधी तर चक्क फॅशन म्हणुन
आपण डाएट करायचा प्रयत्न करतो.

हे सगळ करतं असताना आपण आपल्या मानसिक आरोग्या कडे पुर्णपणे दुर्लक्ष करतो.

मी कुठेतरी वाचलं होतं की
"तुमच्या मनातल्या विचारांचा प्रचंड प्रभाव तुमच्या शरीरावर असतो"

ते वाक्य मनाला प्रचंड भिडलं त्या वेळी मग खरंच विचार केला, की आपल्या मनाला सुद्धा डाएटिंग ची तेवढीचं गरज आहे का?
जेवढी शरीराला आहे.
अफसोस !
असे बोर्ड्स अजुन दिसले नसतील ना मार्केटमधे;
"इथे मानसिक डाएट प्लॅन करून मिळतील".
अवघंड आहे असं होणं,

मानसिक डाएट म्हणजे काउंसिलींग नव्हे.
मी बोलतोय ते एका टेस्टी आयुष्याची चव घेण्याकरता केलेल्या डाएट बद्दल !
हल्ली सगळ्यांना सगळं कसं टेस्टी लागतं
स्वत:च तोंड कडु का असेना,
पण लाईफ मधे स्पाईस महत्वाचा आहे बाॅस !
स्वत:च अवघं आयुष्य बदलुन टाकायची ताकद आपल्या विचारांमधे असते.
मग त्यांना चांगलं हेल्दी ठेवायची जबाबदारी आपलीचं असते.
तर मानसिक डाएट म्हणजे काय करायचं
तरं आपले विचार आधिकाधीक फिल्टर्ड कसे रहातील ह्याचा प्रयत्न करायचा,

तेलकट-तुपकट म्हणजे फडतुस-निगेटिव्ह विचार आपण करणार नाही,

अती-गोड म्हणजेच स्वत:च्या आनंदात दुसर्याला विसरुन जाणारे विचार आपण जवळ येऊ देणार नाही.

दररोज एका व्यक्तिला तरी आपण एक छान स्माईल देऊन खुष करु,

दुसर्‍यांच्या पर्सनल आयुष्यात डोकावुन मजा घ्यायला लावणारे कुचके-नासके विचार फेकुन देऊ,

आठवड्यातुन एकदा तरी साध्या विचारांची खिचडी-कढी खाऊ

या अशा मुल्यशिक्षणा बरोबरंच महत्वाचं आहे ते स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरकं ओळखुन स्वत:ला "रीझनेबल" बनवणं,
दुसर्‍यांच्या मतांना आदर देणं,
दुसर्‍यांना वेळ देणं, संवाद चालु ठेवणं,
मनाचं वातावरण नेहमी हलकं फुलकं ठेवणं,
एकमेकांच्या अस्तित्वाची जाणिव ठेवणं
आणि बरंचकाही.

या सगळ्यातला समतोल हरवला ना
की आपल्या नात्यांना अपंगत्व येणारंच
आणि मग नीट डायग्नोसीसंच झालं नाही
म्हणुन मनाला कायमची बेडरेस्ट पण मिळु शकते.

माणुस आहे,
मनं पण थकतं हो कधीकधी,
त्याला इंस्टंट एनर्जी मिळते ती फक्त एक कप काॅन्फिडन्सच्या चहाने,
वाह ताज !!!

सगळ्यात महत्वाचं
कि आपल्या डाएट चे साईड इफेक्ट्स खुप मस्त असतातं.

लोकं प्रेमात पण पडु शकतात तुमच्या.
तुमच्या चेहर्‍या वरचा ताण कमी होतो,
तुम्ही यंग वाटू लागता, टेंन्शन कमी होतात, लाईफ पाॅपकाॅर्न इतकंच हलकं होतं.
वास्तविक, मन ओके असेल
तरचं लाईफ ओके असतं, नाही कां?

असं ह्या डाएट चं व्रत
हे आजच्या सॅन्डव्हिच जीवनशैली मधे एक संजीवनी देईल हे नक्की.

साध्या आणि ताज्या विचारांच सॅलड आपली नक्की काळजी घेईल.

शाकाहारी विचार लंबी ऊम्र देऊन जातील.
बदल हा नेहमीच चांगला असतो.

असा मानसिक डाएट एकदा करुन बघायला काय हरकतं आहे ना ?

कारण गुगलवर "एव्हरेस्ट" बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघण्यातं जास्त मजा आहे
आणि त्या एव्हरेस्टवर जायला आपलं मनंच खरी ताकद देणार आहे.


मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

झरा


झरा 

शांत डोहावर कधी विश्वास ठेवू नये.. खोल बरच काही कुजलेलं मिळतं. उथळ वहणारं नितळ पाणीच उत्तम पिण्यायोग्य असतं.

माणूसही तसाच असावा, त्याच्या स्वभावात खळखळाटच असावा असं नाही पण कमालीचा सायलेंटपणा मात्र मुळीच नसावा, कधी कधी या सायलेंटखाली त्याचं दबलेलं पुर्वआयुष्य मिळेल. उलट  कधी पुर्णत: घमेंड, कुजकेपण याचा दर्प खोल आत दिसेल.

सतत वाहत रहावं नितळ -यासारखं, लोकं म्हणु देत उथळ पाण्याला खळखळाट फार... तो खळखळाटच पाणी शुद्ध ठेवतो. डोह कधी कधी तळाशी घमेंड, कुजकेपणा या असल्या पदर्थांनी कुजका निघु शकतो.

बेफिकीर पणे  मांडावं आपण आहोत तसे, लोकं मग ठरवतील तुमचा बरे वाईटपणा... स्वच्छंदीपणा हवा जगण्यात वागण्यात फक्त नैतिकतेचा लगाम हवा त्याला.. बाकी उधळा जगणं मुक्त हस्ताने... आयुष्य फार सुंदर आहे, ते असं कुजकेपणाणे कुणी वाया घालू नये .

बिनधास्त तारीफ करा, एखाद्या सुंदरतेची एखाद्या फुलाची, वेलाची, निसर्गाची आणि सुंदर एखाद्या मुलीचीही बरं का.. तिला तिची सुंदरता कळू द्या.. आवडली तर आवडली म्हणा, बिनधास्त... सगळे विकार अपेक्षा बाजूला ठेवुन मात्र..!!

कुढुन मुळीच जगू नका, आयुष्य विश्वाचा वेळ पाहता फक्त तसूभर आहे... दिलखुलास जगा.

सगळं उपभोगलं पाहीजे. थरार, आनंद, सुंदरता, आव्हानांना सामोरं जाण्यात आणि त्यानंतरच्या जिंकलेपणात जो आनंद असतो तोसुद्धा वेचता आला पाहीजे. डब्यासारखं एकाच ठिकाणी बसून जमत नाही. चारीआर मनाला घुमवलं पाहीजे. वैराग्याची भगवी वस्त्रे कधीच परिधान करु नका. कारण ती घातल्याने आतल्या चेतना मरत नाहित.

सर्व आसक्ती जीवंत असू द्या, त्या जिवंत असणं हे आपण जिवंत असण्याचं लक्षण आहे. त्यांना फक्त सुंदरतेची झालर असू द्या, मग त्यांचं उपभोगणंही सुंदर होवून जाईल .जगणही सुंदर होवून जाईल...!!

खळखळत जगा..
नितळ -यासारखं  शुद्ध..!!

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा