Pages

सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

आलिया भट्टचा साडीमध्ये हटके लूक

 आलिया भट्टचा साडीमध्ये हटके लूक


बॉलिवूडमधील आजच्या पिढीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे आलिया भट्ट. स्टुडंट ऑफ इयर मधील तिच्या डेब्यूपासून ते गंगूबाई काठियावाडी मधील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या भूमिकेपर्यंत, आलियाने तिच्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच तिची फॅशन, ब्युटी आणि फिटनेस लाईफस्टाईल चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरते.

(Disclosure : As an Amazon associate I earn from qualifying purchase)

आलियाचा फॅशन सेन्स साधा, ट्रेंडी आणि एलिगंट असतो. कधी जीन्स-टीशर्टमध्ये कॅज्युअल लूक तर कधी पारंपरिक साडी-कुर्तीमध्ये ग्लॅमरस अवतार, ती नेहमीच आकर्षक दिसते.



रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

किंमत

 

किंमत

 

सोशल मिडीयावर एक व्हिडीओ पाहिला. पंगतीत बसलेला एक गरीब माणूस जेवणानंतर आजु बाजूला उडालेले भाताची शिते उचलून खात होता. सोशल मिडीयावर व्हिडीओ टाकणाऱ्या व्यक्तीने अन्न वाया घालवू नका वगैरे कॅप्शन दिले होते. संदेश खुपच बोलका होता.

पण खरी गंमत वेगळीच होती. व्हिडीओ मधला तो माणूस काही गरीब म्हणजे कबाड कष्ट करुन शहरात राहणारा नव्हता. तो होता कष्टाने घाम गाळून धान्याचा एक एक दाणा गोळा करणारा शेतकरी. शेतकरी शेती पिकवितो आणि धान्य गोळा करतो. खळयात बसून सारवलेल्या जमीनीवी बसणारी ती माणसे. उन पाऊस झेलून जेंव्हा पीक तयार होते. तेंव्हा एका एका दाण्याची किंमत त्याला ठाऊक असते. म्हणून तो जेवताना भाताचा शीत खाली पडल्यावर तो वेचतो. त्याला त्यात वावगं काहीच वाटत नाही. घाणही वाटत नाही. पण ते धान्य जेंव्हा शहरातील माणूस विकत घेतो तेंव्हा त्या धान्याची किंमत तो किलो मध्ये मोजतो. त्याच्या दृष्टीने शीताची किंमत फारशी नसतेच.

वेळेची किंमत त्यालाच समजते ज्याचा जीव काही सेकंदासाठी वाचलेला असतो. अशीही किंमत प्रत्येक वस्तूला असते. किंमत फक्त वस्तुचीच असत नाही तर माणसाचीही असते. एखादयाची किंमत करण्याचे निकष बदलले आहेत. समोरच्या व्यक्तीचा रंग, रुप, पेहराव बघून त्याप्रमाणे त्याला वागणूक दिली जाते. पुर्वी अस म्हणतात की, ज्ञानी माणसाचा आदर राखला जायचा. त्याच्याकडे संपत्ती नसली तरी त्याचे गुण स्वभावाला किंमत असायची. हल्लीच्या भपक्या जगात दाखवण्यावरुन एखादयाची किंमत ठरवली जाते. ओळखीचा माणूस असेल तर त्याच्याकडे किती संपत्ती आहे, यावरुन त्याची किंमत ठरते. अनोळखी व्यक्ती असेल तर, त्याचा पेहराव, त्याची गाडी, त्याची त्वचा यावरुन त्याची किंमत ठरवली जाते.

साध्या चेहराऱ्याची, साधारण कपडे घालणाऱ्या लोकांना मोठया समारंभात, हॉटेल, किंवा इतरत्र ही दुर्लक्षीत केलं जाते. त्यामुळे एक नवा ट्रेंड तयार झाला आहे. कुछ भी करो पण पैसा कमवा. आणि इभ्रत मिळवा. त्यासाठी कोणत्याही थराला लोकांची जायची तयारी असते. खरचं हे समाजासाठी चांगला संदेश आहे का. हया कुछ भी करो हया नादात उमेदीची, मज्जा करण्याची वर्षे वाया जातात. आणि जेंव्हा संपत्ती मिळते, तेंव्हा शरीर साथ देत नाही. खरोखरचं गरज आहे का स्पर्धेत उतरायची. जीथे नसेल किंमत तिथे जावे. इतरही लोक आहेतची की. तिथे जाऊ. कशाला हवी ओढाताण. आणि ही किंमत किती दिवसांसाठी असते. आपली खरी किंमत सोडून लेबल लावलेली किंमतीचा एवढा अट्हास कशासाठी. माणूस हा काही वस्तू नव्हे. विद्यात्याची सर्वोत्तम अशी रचना आहे. त्यामुळे आपली किंमत ओळखा. जिथे किंमत नाही तिथे जायचे नाही. आणि जिथे आपली वाट पाहिली जाते तिथे आवर्जुन बोलावता जा.


A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा