सुप्रसिद्ध साहित्यिक चेतन भगत यानी सांगितलेला हा किस्सा आहे.
-----------------------
मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्या समोर एक टॅक्सी येऊन उभी राहीली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालुन माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे. त्याने स्वच्छ धुतलेला व इस्री केलेला पांढरा शर्ट घातला होता. तशीच इस्त्री केलेली काळी पँट होती. टाय लावलेला होता व पायात चकचकीत पॉलीश केलेले बुट होते. त्याने आदराने माझ्यासाठी टॅक्सीचे मागील दार उघडले व माझ्या हातात एक लॅमीनेट केलेले कार्ड देत म्हणाला, ‘ सर! माझे नाव वासु ! मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर. मी तुमचे सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत आपण हे माझे मिशन स्टेटमेन्ट कृपया वाचावे.’
‘मिशन स्टेटमेन्ट ?’ मला गंमत वाटली व मी त्या कार्डावर नजर टाकली. त्यावर सुरेख व ठळक अक्षरात छापले होते. ‘वासुचे मिशन स्टेटमेन्ट ! माझ्या टॅक्सी मधील प्रवाशांना कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात, सुरक्षितपणे त्यांच्या इच्छीत स्थळी पोचवणे व ते सुद्धा मैत्रीपूर्ण वातावरणात!’
मला गंमत वाटली. मी टॅक्सीत बसलो व मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण टॅक्सी आतुन सुद्धा बाहेरच्या सारखी चकचकीत स्वच्छ होती.
वासुने त्याच्या ड्रायव्हरच्या सिटवर बसता बसता विचारले, ‘सर! आपण कॉफी घेणार ? माझ्याकडे थर्मासमध्ये रेग्युलर तसेच ‘डिकॅफ’कॉफीआहे!’
मी सहज गंमत करावी म्हणून म्हणालो, ‘नको! मला कॉफी नको! काहीतरी थंड पेय हवे आहे!’
‘काही हरकत नाही!’ वासु म्हणाला, ‘माझ्याकडे पुढे कुलर आहे. त्यामध्ये रेग्युलर व डायट कोक, लस्सी, पाणी व ऑरेंज ज्युस आहे.’
‘मला लस्सी चालेल!’ मी म्हणालो पण माझ्या चेहेऱ्यावरचे आश्चर्य काही लपत नव्हते.
माझ्या हातात लस्सी देताना वासु म्हणाला, ‘आपल्याला जर वाचायला काही हवे असेल तर टॅक्सीमध्ये द हिन्दु, टाईम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स व इंडिया टुडे आहे.’
माझ्या हातात अजुन एक लॅमिनेटेड कार्ड देत वासु म्हणाला, ‘ही रेडियो स्टेशन्स व त्यावर असलेल्या कार्यक्रमांची यादी, जर आपल्याला रेडीयो ऐकायचा असेल तर!’ मला वासुचे कौतुक वाटु लागले होते. टॅक्सी सुरु करताना वासु म्हणाला, ‘मी एअर कंडीशनींग चालु केले आहे. टेम्परेचर योग्य आहे ना व आपल्याला कंफर्टेबल वाटते ना? का यात ऍजेस्ट करू?’
वासुने मला त्यावेळी माझ्या इच्छीत स्थळी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे सांगीतले. तसेच वाटेत कोण कोणती प्रेक्षणीय स्थळे लागतात याची पण माहिती दिली.
‘आपणास हरकत नसेल तर आपण माझ्याशी गप्पा मारू शकता. पण आपल्याला जर एकांत हवा असेल तर मी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही’वासु म्हणाला.
‘मला एक सांग वासु!’ मला माझे आश्चर्य अजुनही लपवता येत नव्हते, ‘तु तुझ्या ग्राहकांना नेहमी अशीच सेवा देत असतोस?’
वासुच्या चेहेऱ्यावर हास्य पसरले. ‘नाही सर! गेल्या दोन वर्षांपासुनच मी हे सुरु केले. या आधीची पाच वर्षे मी इतर सर्व सामान्य टॅक्सीड्रायव्हर सारखाच होतो. गबाळा, अनुत्साही, सतत कसल्या ना कसल्या तरी तक्रारी करत बसणारा! पण एक दिवशी मला ‘पॉवर ऑफ चॉइस’बद्दल कळले!’
‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे ?’ मी उत्सुकतेने विचारले
‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे तुम्ही बगळा व्हायचे का गरुड व्हायचे याचा चॉइस!’ वासु म्हणाला, ‘तुम्ही सकाळी उठलात व म्हणालात की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही तर तुमची कधीच निराशा होणार नाही. तक्रारी करण्याचे थांबवा ! गरूड व्हा, बगळा होऊ नका! कारण बगळा सतत ‘क्वॅक क्वॅक’करत असतो म्हणजे तक्रारी करत बसतो. तर गरुड येणाऱ्या सर्व अडचणी, अडथळे, संकटे यावर मात करत आकाशात उंच भरारी घेत असतो, ढगांच्यावर जात असतो. माझ्या डोक्यात हे वाक्य पक्के बसले’वासु म्हणाला
‘आता मी माझीच गोष्ट सांगतो. मी आधी बगळा होतो. सतत तक्रारी करत बसायचो. पण मग मी माझ्या मनोवृत्तीत बदल करायचे ठरवले. बगळा न होता गरुड व्हायचे ठरवले. मी आजु बाजुला निरिक्षण करायला सुरवात केली. बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर गबाळे व गलीच्छ असतात, ग्राहकांची काळजी न घेणारे असतात. ग्राहक नेहमी त्यांच्या बद्दल तक्रारी करत असतात. त्यांच्या गाड्या पण खराब व अस्वच्छ असतात. मी माझ्या बाबतीत काही बदल करायचे ठरवले. थोडे थोडे बदल करत गेलो!’ वासु सांगत होता.
‘मग याचा तुला चांगला फायदा झाला असेल नाही का?’ मी वासुला विचारले.
‘झाला तर!’ वासु उत्साहाने सांगू लागला. ‘मी गरुड व्हायचे ठरवल्यावर पहिल्या वर्षीच माझे उत्पन्न आधीच्या वर्षा पेक्षा दुपटीने वाढले या वर्षी कदाचित माझे उत्पन्न चौपट वाढेल. माझ्या अनेक ग्राहकांनी माझा सेल फोन नंबर घेतला आहे. ते माझीच टॅक्सी हवी म्हणून फोन करत असतात. बहुतेक वेळा माझी टॅक्सी ऍडव्हान्समध्ये बुक होते.’
गरुड व्हा, बगळा होऊ नका !
वासुने वेगळा चॉइस केला. त्याने किरकिर करणारा बगळा न होता आकाशात उंच भरारी घेणारा गरूड व्हायचे ठरवले. त्याचे फळ त्याला मिळाले.
बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हा चॉइस देवाने प्रत्येकालाच दिलेला आहे, अगदी जन्मा पासून ते मरे पर्यंत!
आता आपण बगळा व्हायचे का गरुड व्हायचेहे ज्याचे त्याने ठरवायचे नाही का ?
B+tive
एख्याद्याच्या सहवासाने,बोलण्याने बरं वाटत. दुःखाला सामोरे जाण्याला हिम्मत येते. स्वतः मधील सुप्त शक्तीची जाणीव होते. आणि मग पुन्हा एकदा नव्या उमेदीने आपण जीवन जगायला, संकटांना सामोरे जायला तयार होतो. या ब्लॉग च्या माध्यमातून मला आवडलेले विचार तुमच्याशी शेअर करून हीच भूमिका निभावण्याची प्रयत्न करीत आहे.
Pages
मंगळवार, ७ एप्रिल, २०२०
पॉवर ऑफ चॉइस
पॉवर ऑफ चॉइस
सोमवार, ६ एप्रिल, २०२०
मराठीची अवखळ वळणे
मराठीची अवखळ वळणे....
ज्यांना तोंडावर
"बोलून टाकणं" जमत नाही ते पाठीमागे
"टाकून बोलत" राहतात.
शहाणा माणूस
"पाहून हसतो", निर्मळ माणूस
"हसूनपाहतो".
काम सोपं असेल तर ते आपण
"करून पाहतो", अवघड असेल तर
"पाहून करतो".
स्वयंस्फूर्त लेखक आणि उचलेगिरी करणारा उचल्या ह्यांच्यात फारसा
फरक नसतो...
एकजण "लिहून बघतो" तर दुसरा "बघून लिहितो"..
ही अशी सुंदर, लवचीक,
अवखळ मराठी आणि
आपणच तिची पायमल्ली करत असतो, नाही का?
आता हेच बघाना,
एखाद्याचा सत्कार करताना आपण देतो श्रीफळ, तर हकालपट्टी करताना देतो नारळ!!
गुरुवार, ४ जुलै, २०१९
तुला माझ्या बद्दल काय वाटतं ?
तुला माझ्या बद्दल काय वाटतं ?
लग्नाला पंचवीस वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ...
"तुला माझ्या बद्दल काय वाटतं ?"
पण मग लग्न झालं ...
संसार नावाची प्रश्न पत्रिका सोडवता सोडवताही असली तोंडी परीक्षा
पार विस्मरणात गेली ...
आणि काल परवा अचानक हा गुगली पडला ...
त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती ..
हातात लाटणं ...
समोर तापलेला तवा ...
त्यानं संभाव्य धोका ओळखला
..
आणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे ..
संध्याकाळी सावकाशीनं सांगतो
...'
असं म्हणून तो कामावर सटकला
... !
पण घर काही डोक्यातून बाहेर पडलं नव्हतं .. !
अख्खा दिवस शब्दांची जुळवा जुळव करण्यात गेला ...
कठीण असतं हो ...
नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण
असतं ..
तो विचार करत होता ..
काय सांगावं .. ?
नको .. फार फिल्मी वाटतं ..
असं म्हणावं ... नको
...
तिला ते फारच रुक्ष वाटण्याची शक्यता आहे ..
समजूतदार सहनशील वगैरे म्हणावं ...
तर ती नक्की म्हणेल ...
राजकारण्यांसारखी उत्तरं देऊ नकोस ...
त्याला काहीच सुचेना ...
बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं ... हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ...
लाईन लागेल नवऱ्यांची ...
त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..
घरी जायची वेळ झाली ..
आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्याची भुवईवर जाणार ...
याची त्याला खात्री होती
...
घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा
चेहरा झाला होता ...
त्यानं बेल वाजवली ..
अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही ..
त्याच्या मुलानं दार उघडलं
... आणि पुढच्याचक्षणी
कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला ...
त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं ...
इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया
... ?
आणि ती बोलतच होती ...
"काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं
मला विचारलं ...
तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं ... ? "
पण मला काही सांगताच येईना
...
मग भीति वाटली ...
माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय .. ?
अपराधी वाटायला लागलं – काय करावं कळेना ...
मला स्वतः विषयी शंका होती पण पंचवीस वर्षानंतरही तुझं प्रेम
कणभर ही आटलेलं नाही याची खात्री होती.
म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला ...
वाटलं .. तुला उत्तर देता आलं तर आपण 'Fault' मध्ये आहोत ..
पण नाही ... तुलाही उत्तर देता आलं नाही ...
म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत ...
जिथे फक्त 'वाटणं'
संपून 'वाटून घेणं' सुरु झालंय ...
आता शब्द सापडत नाहीत ... आणि त्याची गरजही वाटत नाही ...
कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिध्द करण्याची धडपड संपलीय ... "
शपथ सांगतो ...
त्याच्या पंचवीस वर्षाच्या संसारा मधला सगळा खमंगपणा त्या भजीत
उतरला होता !!!
~~अनामिक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर
A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...
आणखी पहा
-
सोने येवढे महाग का होत आहे? #goldprice #gold #golden #gold # jewelry लाखाचा टप्पा पार करुन सोने 1,35000/- पर्यंत प...
-
येत्या काही वर्षांमधे एक आधीची पिढी हे जग सोडणार आहे. कटू असलं तरी सत्य आहे, कारण जगरहाटी कोणी थांबवू शकत नाही. या पिढीतले लोक थोडे व...
-
A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

