Pages

रविवार, २ सप्टेंबर, २०१८

Be the CEO of your own Life ...


अप्रतिम लेख .........परत परत वाचा  नक्की वाचा......

 Be the CEO of your own Life ...


बघा फरक पडेल आपल्या आयुष्यात... 
प्रत्येकाने वाचावा असा अप्रतिम लेख...
 दोन दिवसांपूर्वीची गोष्ट..
कुटुंबासह कुठल्यातरी मॉलमध्ये होतो.
मुलगाप्ले झोन मध्ये, सौ. (विन्डो) शॉपिंगमध्ये आणि मी एसी ची छान गार हवा अंगावर घेत एका कोपऱ्यात पेपर वाचत बसलो होतो.
पेपर खरं तर, नांवाला.
माणसं वाचत बसलो होतो.
विविध चेहऱ्यांची, आकारांची
माणसं जणूआज जगाचा शेवटचा दिवस असावा असे भाव आणून शॉपिंग करत होती.
(एवढ्या वस्तू विकत घेऊन माणसं त्या वस्तू घरात कुठे ठेवतात, हा मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम सतावतो. असो.)

माझंमाणसं-वाचन चालू असतानाच माझ्या शेजारी एक तरुण येऊन बसला.
जेमतेम चाळीशीचा असावा.
जीन्स आणि खोचलेला टी शर्ट. पायात बूट.
अंगावर ब्रुट.
हातात मराठी पुस्तक.
खिशातला शुभ्र रुमाल काढून त्याने कपाळावरचा घाम पुसला.
रुमालाची (होती तशी) व्यवस्थित घडी घातली आणि (त्याच) खिशात ठेवली. त्याच्या हालचाली शांत झाल्यावर त्याने पुस्तक उघडले.  ते पुस्तक माझ्या आवडत्यांपैकी एक होतं.
राहवून मी म्हटलं, ‘मस्त पुस्तक आहे.’ त्याने माझ्याकडे बघत हसून मान हलवली..

पाच एक मिनिटांनी तो माझ्याकडे वळून म्हणाला, ’वाचन आवडतं?’

प्रचंड. रीडिंग इज मायफर्स्ट लव्ह.
आजूबाजूलासौ नाही हे बघत मी म्हटलं.

किती वाचता रोज?’
रोज असं नाहीअं.. अंकाही खास ठरवलेलं नाही.
इच्छा झाली की वाचतो.’
अनपेक्षित योर्करला कसंबसं खेळत मी म्हटलं.

खायला आवडतं?’
 कॉन्जीक्युटीव्ह योर्कर.

प्रचंड. इटिंग इज मायसेकंड लव्ह.’

हो?  मग रोज जेवता की इच्छा होईल तेव्हा.?’

नाही नाहीरोज दोन वेळा..
आणि मधे-मधे काहीना काही खादाडी चालू असतेच..
हिट विकेट !

तो तरुण हसला. म्हणाला, ‘मी दिवसभरात एक तास वाचतो. वाचल्याशिवाय झोपत नाही. आंघोळ, जेवण.. तसंच वाचन !’

बरा वेळ मिळतो तुम्हाला.’
दयनीय चेहरा करत मी म्हटलं..

वेळ मिळत नाही. मी काढतो.
वेळ ही जगातली सगळ्यातटेकन फॉर ग्रान्टेड गोष्ट आहे असं मी मानतो..

फॉर दॅट मॅटर, आयुष्यच घ्या ना !
फारच गृहीत धरतो आपण आयुष्याला !
मी रिटायर झाल्यावर भरपूर वाचन करणार आहे' असं कोणी म्हटलं नां! की माझी खात्री होते, नवज्योत सिंग सिद्धूसारखा रेड्यावर हात आपटत तोयम त्याला हंसत असेल !’

मी हसलो. तसा किंचित गंभीर होत त्याने विचारलं, ‘तुम्ही कधी पाहिलंय यमाला?’

मी आणखी हसू लागलो. ‘आय ऍम प्रीटी सिरीयस.. तुम्ही पाहिलंय यमाला ?

हो, मी पाहिलंय. दोन वर्षांपूर्वी.
रस्ता क्रॉस करत होतो. समोरून भरधाव गाडी आली. त्या दिव्यांच्या प्रकाश झोतातही मी अंधार पाहिला. त्या दोन सेकंदात मलामृत्यूने दर्शन दिलं. त्यानंतर जागा झालो तो हॉस्पिटलमध्येच.
गंभीर इजा होऊन सुद्धा मी कसाबसा वाचलो होतो..

हॉस्पिटलमधून घरी आलो तो नवा जन्म घेऊन..
मीदेव पाहिला नव्हता पणमृत्यू पाहिला होता. मृत्यू तुम्हाला खूप शिकवतो.

माझी मृत्यूवर श्रद्धा जडली. आजूबाजूला रोज इतके मृत्यू दिसत असूनहीमी अमर राहणार असं ज्याला वाटतं, तो माणूस !

तुम्हाला माहितीय, माणूस मृत्यूला का घाबरतो?’

अर्थात ! मृत्यूनंतर त्याचे सगे सोयरे कायमचे दुरावतात..
मृत्यूमुळे माणसाच्या इच्छा अपूर्ण राहतात.’ मी म्हटलं..

साफ चूक' !  माणूस यासाठी घाबरतो कारण मृत्यूनंतरउद्या नसतो !’

मी समजलो नाही.’

प्रत्येक काम आपल्यालाउद्यावर टाकायची संवय असते..
वाचन, व्यायाम, संगीत ऐकणे
गंमत म्हणजे, आहेत ते पैसे देखील आपणआज उपभोगत नाही..
ते कुठेतरी गुंतवतो.....  भविष्यातडबल होऊन येतील म्हणून !

याउद्या वर आपला फार भरवसा असतो..
मग तो आपल्या जगण्याचा एक भाग बनतो..

आपण मृत्यूला घाबरतो कारण मृत्यू तुम्हाला हाउद्या बघायची संधी देत नाही !

मृत्यू म्हणजेआहोत तिथे,
आहोत त्या क्षणी फुल स्टॉप !

खेळ ऐन रंगात आला असताना कुणीतरी येऊन तुम्हाला खेळाच्या बाहेर काढावं, तसा मृत्यू तुम्हाला या जगातून घेऊन जातो.

तुमच्यावरील याअन्याया विरुद्ध आवाज उठवायला देखील तुम्ही उरत नाही..

माझ्या मृत्यूनंतर मी माझा लाडकाउद्या पाहू शकणार नाही, या हतबलतेला माणूस सगळ्यात जास्त घाबरतो..

म्हणून हॉस्पिटलमधून घरी आल्यावर ठरवलं, यापुढचं आयुष्य उघड्या डोळ्यांनी जगायचं..

इतके दिवस जेवण नुसतंचगिळलं.
या पुढे एकेका घासाची मजा घ्यायची..
आयुष्याचीचव घेत जगायचं. ’

म्हणजे नक्की काय केलं?’
माझी उत्सुकता आता वाढली होती.

माझ्या आयुष्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतली..

मी माझ्या आयुष्याचा Chief Executive Officer झालो !’

कंपनीचा सीईओ इतपत ठीक आहे. आयुष्याचासीईओ वगैरे जरा जास्तच होत नाही का?’ मी विचारलं.

वेल तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्वाचं नाही..

आयुष्य कसं जगायचं याचे नियम मीमाझ्यापुरते केलेत त्यामुळे…’
मग..तुमच्या कंपनीत किती माणसं आहेत?’ त्याला मधेच तोडत, मस्करीच्या सुरात मी विचारलं.

म्हटलं तर खूप, म्हटलं तर कोणीच नाही.’ तो खांदे उडवत म्हणाला.

मला कळल्याचं पाहून तो पुढे बोलू लागला..
मी फक्त माझ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत डील करतो..

दे व्हर्च्युअली कंट्रोल माय लाईफ.

माझ्या बोर्डवर विविध माणसे डायरेक्टर आहेत..

फरहान अख्तर,
शिवाजी महाराज,
अब्दुल कलाम,
डॉ.बी आर आंबेडकर
चार्ली चॅप्लीन,
महात्मा गांधीजी,
अमिताभ,
हेलन केलर,
जे आर डी टाटा
इत्यादि इत्यादि....

माझ्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव न्याहाळत त्याने आणखी काही नावे घेतली.

या लोकांबद्दल वाचलं तेव्हा एक लक्षात आलं.
या प्रत्येकामध्ये काहीना काही वैशिष्ट्य आहे.
काही क्वालिटीजमुळे मला ही माणसं ग्रेट वाटतात.

मी काय करतो अंउदाहरण देतो
समजा खोटं बोलण्यावाचून पर्याय नाही अशा परिस्थितीत सापडलो की माझेएथिक्स डायरेक्टर गांधीजींना विचारतो, काय करू?

मग ते सांगतील ते करतो.

व्यायाम करायला जाताना सकाळी उठायचा कंटाळा आला तर माझेहेल्थ डायरेक्टर फरहान अख्तर मला काय म्हणतील, या विचाराने मी उठून बसतो आणि व्यायाम करायला जातो.

कधीतरी काहीतरी घडतं आणि खूप निराश वाटतं.

मग माझ्याइन्स्पीरेशन डायरेक्टर हेलन केलरना पाचारण करतो. त्यांना भेटून आपल्या अडचणी फारच मामुली वाटू लागतात.

कधी दुःखी झालो तरइंटरटेनमेंट डायरेक्टर चार्ली चॅप्लीन भेटायला येतात…’

माझ्या चेहऱ्यावरील विस्मयचकित भाव पाहून तो म्हणाला..
मला माहितीय की ऐकायला हे सगळं विचित्र वाटत असेल'.
पण एक गोष्ट सांगतो. आयुष्य जगणं ही जर परीक्षा असेल, तर प्रत्येक माणसाने स्वतःचासीलॅबस बनवावा हे उत्तम !
आपण अनेकदाइतरांप्रमाणे आयुष्य जगायचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो..

जगायचं कसं? या प्रश्नावर चिंतन करणारी लाखो पुस्तके आज बाजारात आहेत.

हजारो वर्षे माणूस या प्रश्नाचं उत्तर शोधतोय..

गौतम बुद्धांनी मात्र फक्त चार शब्दांत उत्तर दिलं -Be your own light..

मला तर वाटतं, याहून सोपं आणि याहून कठीण स्टेटमेंट जगात दुसरं नसेल !’

मी त्या तरुणाला नांव विचारलं, त्याने लगेच सांगितलं. आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

चार पावलं चालून गेल्यावर तो तरुण पुन्हा वळून माझ्याकडे आला. म्हणाला, ‘सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं.

मी एका ऍक्सिडेंटमध्ये वाचलो आणि इतकं काही शिकलो.

तुम्हीप्लीज..कुठल्या ऍक्सिडेंटची वाट पाहू नका !’ आम्ही दोघेही हसलो.

अपघात फक्त वाहनांमुळेच होतात, असं थोडीच आहे?
ओळखपाळख नसलेला तो तरुणही अपघातानेच भेटला की !

घरी जायला आम्ही रिक्षात बसलो. ‘प्ले झोन मध्ये खेळून पोरगं आधीच दमलं होतं..
वाऱ्याची झुळूक रिक्षात येऊ लागली..

मांडीवर बसल्या बसल्या मुलगा झोपून गेला होता..

त्याच्या मऊ मऊ केसांमधून हात फिरवताना संध्याकाळच्या गप्पा आठवत होत्या.

मनात आलं, ‘आपल्या पोराने जर असेबोर्ड ऑफ डायरेक्टर्स नेमले, तर त्यातत्याचा बाप असेल का?’

परवाच्या रात्री बराच वेळ जागा राहिलो.

कोण जाणे, कदाचित हाच प्रश्न यापुढील आयुष्यचवीने जगत राहायची उर्जा देत राहील !

प्रत्येकाने वाचावा असा हा अप्रतिम लेख ....
.....परत परत वाचा 
नक्की वाचा......

Be the CEO of your own Life



गरुडाकडून शिकायला मिळणारी सात प्रमुख नेतृत्व कौशल्य


गरुडाकडून शिकायला मिळणारी सात प्रमुख नेतृत्व कौशल्य ....


1. गरुड नेमही अतिशय उंच आकाश पातळीवर एकटा भरारी घेतो.
तो चिमण्या, कावळ्या आणि इतर लहान पक्ष्यांबरोबर उडत नाहीत.
 @ - संकुचित वृत्तीच्या लोकांपासून दूर राहा, जे तुम्हाला खाली ओढण्याचा प्रयन्त करत असतात.
लक्ष्यात ठेवा गरुडासोबत फक्त गरुडच उडू शकतो उडतो.

2. गरुडाची नजर इतकी  तीक्ष्ण आणि अचूक असते की तो 5 किलोमीटर वर असलेल्या गोष्टींवर देखील लक्ष केंद्रित करू शकतो. शिकार करताना कितीही अडथळे आले तरी आपले भक्ष्य पकडल्या शिवाय त्यावरचे एकाग्र लक्ष हटू देत नाही.
 @- निश्चित द्येय, त्या प्रति सकारात्मक दृष्टीकोन आणि  कितीही अडथळे आले तरी द्येयापासून  विचलित न होण्याची क्षमता हे गुण म्हणजे तुमच्या यशाचे आधारस्तंभ आहेत.
3. गरुड मृत किंवा आयते भक्ष कधीच खात नाही. तो फक्त ताज्या शिकारानेच खाद्य खातो.
 @- आपल्या मागील यशावर विसंबून राहू नका, जिंकण्यासाठी नवीन सीमेकडे पहात रहा. भूतकाळातील तुमचे यश मागे सोडून द्या. नवीन संधी  शोधत रहा आणि आपल्या यशस्वीतेच्या नव्या   आनंदाचा रोज आस्वाद घ्या.
4. गरुडांना झंझावाती वादळे खूप आवडतात, आकाशातील अस्ताव्यस्त झालेल्या ढगांकडे पाहून ते  अधिक उत्साही होतात. वादळांना पाहून ते आकाशात उंच झेपावतात आणि वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा उपयोग करून ते ढगांच्याही वर जाण्याचा प्रयत्न  करतात,
भर वादळातीळ भरारीने गाठलेल्या इच्छित गगनचुंबी उंचीनंतर वाहणाऱ्या वाऱ्याचा उपयोग करून घेऊन  स्वतःच्या पंखांना विश्रांती  देतात, जेव्हा इतर छोटे-मोठे पक्षी वादळाला करून झाडांवरच्या पानांमागे लपून बसलेले असतात.
@- आयुष्यात येणारी अशी वादळे/अडचणी ही तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतात हे जाणून घ्या आव्हानांना तोंड द्या. यशस्वितेच्या खेळातला खरा खेळाडू आव्हानांना संधी समजून त्याचा फायदा करून घेतो जेव्हा इतर जण त्यांना अडचणींनी समजून डगमगून जातात.
5. जेव्हा मादी गरुड आणि नर गरुड एकमेकांना भेटतात आणि त्यांना संयोग करायचा असतो. तेव्हा मादी गरुड जमिनीवर उतरते, गवताची एक काडी उचलून ती पुन्हा हवेत उंच भरारी घेते आणि  आवश्यक उंची गाठल्यानंतर  ती काडी हवेत सोडून देते आणि तिच्याकडे पहात राहते. नर गरुड ती खाली जमिनीवर पोहोचण्याआधी पकडतो  आणि पुन्हा मादीकडे आणून देतो, मादी पुन्हा उंच भरारी घेते आणि पुन्हा ती काडी खाली सोडते नर  पुन्हा ती काडी जमीनी वर पोहोचण्या आधी तिच्याकडे आणून देतो. आणि हा खेळ काही तास अधिकाधिक उंचीवर  जात असाच चालू राहतो. जेव्हा मादीला नराच्या ती  पकडण्याच्या क्षमतेची,  चिकाटीची आणि तिच्याशी असलेल्या बांधिलकीची खात्री पटते तेव्हाच ती संयोगासाठी तयार होते.

@- आपल्या वैयक्तिक जीवनात असो किंवा व्यवसायामध्ये असो, समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या प्रथम दर्शनी सादरीकरणाने प्रभावित न होता, त्यांच्या वचनबद्धतेची चाचणी घेत जा.
6. पिल्लांना जन्म दिल्यानंतर गरुड त्याच्या घरट्यातील  पिसे आणि मऊ गवत बाजूला काढून टाकतो जेणेकरून त्याचा नवतरूण पिलांना अस्वस्थ वाटून ती उडण्यासाठी लगेच तयार होतील.
@- व्यवसायातील असो किंवा स्वतःच्या कुटुंबातील   प्रत्येकाला आणि स्वतःला त्यांच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढा, हे तूमच्या यशात कोणत्याही प्रकारची वाढ करत नाहीत.
7. जेव्हा गरुड म्हातारा होतो त्याचे पंख कमकुवत होतात आणि ते त्याला त्याच्या सर्वशक्तीनिशी उडू देत नाहीत, तेव्हा गरुड एकांतात असलेल्या उंच शिखरावर जाऊन  स्वतःची सर्व पिसे उपटून टाकतो,  चोच खडकावर आपटून मोडून टाकतो, अशा रक्तरंजित अवस्थेत तो त्या पहाडावर एकांतात राहतो.
जेव्हा अधिक क्षमतेचे नवे पंख आणि नवीन चोच येते नाही तेव्हाच तो गरुड  पहिल्यापेक्षा अधिक शक्तीनिशी परततो.

 @- आपल्याला नवीन युगामध्ये नव्या पिढी बरोबर स्वतःच्या शक्ती सहित टिकून राहण्यासाठी, जुन्या सवयी, जुनी मूल्ये आणि संस्कृतीचा मर्यादा मनातून काढून टाकून नवीन गोष्टी शिकुन स्वतःला शक्तिशाली बनविण्यासाठी तुम्ही सतत तयार असले पाहिजे.
*कधी हार म्हणू नका !
स्वतःलाच गरुडासारखे मजबूत बनवा!





कृष्ण भेटायलाच पाहिजे.


कृष्ण भेटायलाच पाहिजे.
आयुष्यात प्रत्येक वळणावर
कृष्ण भेटायलाच पाहिजे.
मनातलं बोलायला,
लिहिलेलं वाचायला,
रेखाटलेलं दाखवायला,
अन् कधी गायलेलं ऐकवायला ....
हक्काचा सवंगडी पाहिजे
आणि म्हणूनच प्रत्येकाला
एक कृष्ण भेटायलाच पाहिजे
मुळात नात्यांच्या पलिकडचे
भावबंध जोडणारा
एक हक्काचा
सवंगडी पाहिजे.....
लहानपणापासून जपलेल्या
अनेक नात्यांचीही
वयं वाढत असतात
त्या नात्यांचे काळाप्रमाणे
अर्थ बदलंत असतात
तस्संच....ते...पूर्वीचं...निर्व्याज.... अबोध नातं
पुन्हा जमायला पाहिजे
आणि याकरताच
आयुष्यात कृष्ण
भेटायला पाहिजे......
"तो" कृष्ण "ती" ही
असु शकते.
आपल्या मनातलं
सारं जाणणारी ती असते
कधीही आपलं खोलवर मन
रीतं करता आलं पाहिजे
असा हक्काचा...विश्वासाचा
कृष्ण भेटलाच पाहिजे........
आपल्या आजुबाजुला
तो सापडेलंच असं नाही
जोडीदारामध्ये तो गवसेलंच
असंही नाही
कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही उर्मी देणारी पाहिजे
मात्र कधी मनाचा पेंद्या
झाला नाही पाहिजे....
सुंदर विचारांची
रम्य मुरली छेडणारा तो......
आयुष्यात प्रत्येकाला
कृष्ण भेटला पाहिजे.
खरंच त्या मुरलीधराकडे
मुरली होती का?
की अनेकांच्या मनात रुंजणारी
त्याची ती आश्वस्त
मैत्री होती का?
त्याच्या अस्तित्वाने अनेक मनांतून उमटत असाव्या आनंदलहरी
आणि त्यांचीच ऐकु येत असावी रुंजणारी मुरली...
अनेकांच्या मनामधे मुरणारा
तो मुरलीमनोहर
प्रत्येकाला भेटायला पाहिजे
आयुष्यात प्रत्येक वळणावर
कृष्ण भेटायला पाहिजे......







शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

स्वतःची लढाई स्वत:च लढा !!!.

श्रीकृष्णाची चरित्र कथा सांगते कि तो जन्माला येण्याआधीच त्याला ठार करायची तयारी झाली होती.

 त्यातून तो वाचला. पुढे सतत जीवावर संकटं आली.
 तो लढत राहिला. काही ना काही युक्ती करून वाचला.

 प्रसंगी पळसुद्धा काढला.
पण संकटं टाळावीत म्हणून स्वतःची कुंडली घेवून त्याने ज्योतिषी गाठला नाही, 

ना उपास केले. 
ना अनवाणी पायाने फिरला.. 

त्याने पुरस्कार केला फक्त " कर्मयोगाचा!! "

भर रणांगणात अर्जुनाने धनुष्य खाली टाकला.
तेव्हा कृष्णाने, ना अर्जुनाची कुंडली मांडली, 
ना गंडे-दोरे बांधले.

 तुझं युद्ध तुलाच करावं लागेल असं त्याने
 अर्जुनाला ठणकावून सांगितलं.

 अर्जुनाने धनुष्य खाली टाकलं ....
तेव्हा श्रीकृष्णाने ते उचलून स्वतः 
अर्जुनातर्फे लढाई केली नाही. .....

श्रीकृष्ण हा सर्वात शक्तिशाली योद्धा होता. 
त्याने मनात आणलं असतं तर एकट्याने कौरवांचा पराभव केला असता. . . 

 पण श्रीकृष्णाने शस्त्र हाती धरलं नाही.
 जर अर्जुन लढला तरच त्याने अर्जुनाचा सारथ्य करण्याची तयारी दाखवली. .
एक महान योद्धा सारथि बनला. 
अर्जुनाला स्वतःची लढाई ,
स्वतःलाच करायला लावली.. . . 
 ह्या कृतीतून संदेश दिला कि ,
जर तुम्ही स्वतःचा संघर्ष करायला,
 स्वतः सज्ज झालात तरच
 मी तुमच्या पाठीशी आहे .. . 
मी तुमचा सारथि  बनायला तयार आहे..

 पण तुम्ही लढायला तयार नसाल,
 तर मी तुमच्या वतीने संघर्ष करणार नाही . . . 

तुमच्या पदरात फुकट यश टाकणार नाही.

कोणत्याही देवाचा-देवीचा . . 
आशीर्वाद घ्यायला जाल तेव्हा ..
श्रीकृष्णाला विसरू नका. 

अनवाणी चालत जायची गरज नाही. . . 
उपाशी राहायची गरज नाही...
 शस्त्र खाली टाकू नका. . . 

प्रत्येक व्यक्तीकडे गुणांचं शस्त्र आहे. . . 
नेमकं तेच शस्त्र काढा  . . 
आणि त्याचा उपयोग करून लढा. . . . 
कोणताही देव-देवी तुमची लढाई लढणार नाही. . . 

तुमची स्वप्नं फुकटात पूर्ण करून देणार नाही. 
स्वतःची लढाई स्वत:च लढा !!!.



A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा