Pages

सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

ओढ निसर्गाची

 ओढ निसर्गाची

                     



The road with flowers

पावसाळा संपता संपता उन पावसांचा खेळ सुरु होतो. थोडयाशा पावसाने भिजलेले रस्ते, पायवाटा उन्हात ओलसर सुक्या होतात. खेडयातील हया पायवाटा तर एवढया सुंदर वाटतात, की अगदी भान हरपून जाते.

ओठी नकळत मराठी गाणं येते.

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा......

माझ्या मनातला का तेथे असेल रावा.......


                 
 गवत वाढलेलं असतं. गवताचे तुरे वाटेवर आडवे झालेले असतात. गवताच्या तुऱ्याला पण फुलोरा आलेला असतो. सहजच नजर फिरवली तर अशी असंख्य रान वनस्पती फुललेल्या असतात. पण आपण त्याची कधी दखलच घेतलेली नसते. पण जर का तुम्ही निरखुन पाहिली नं तर निसर्गाची कलाकृती पाहून खरच दंग व्हायला होत. माणसाने इंद्रधनुष्याचे रंग बनविले. निळा, पिवळा, लाल, पांढरा, काळा, हिरवा इ. पण हेच रंग निसर्गाच्या कुंचल्यातुन हया झाडा-फुलांवर रेखाटलेले असतात ना त्यांत जिवंतपणा जाणवतो.

                  आपल्याला गुलाब, जाई, मोगरा, केवडा तसेच जास्वंद, तगर, रातराणी, शेवंती ही फुले परिचित असतात. पण अशी असंख्य निनावी फुले रानावनात फुलत असतात.

flowers

flowers


 मला त्यांची नावे शोधण्यात रस नाही. पण त्यांच सौंदर्य न्याहाळण्यात आनंद वाटतो. निरोपयोगी गवत म्हणून वाढलेली वनस्पती इतकी सौंदर्य असू शकते. मुळात निसर्गात असलेली कोणतीही वनस्पती निरोपयोगी नसतेच. हे फक्त माणसाला उपयोग नसतो किंवा माहित नसतो म्हणून आपण निरोपयोगी ठरवतो.

                   अशा रंगबेरंगी वनस्पतींच्या फुलांनीच तर निसर्ग बहरतो आणि आपल्याला भावतो. संसाराच्या रहाटगाडग्यात अस्वस्थता, ताण घालवायला निसर्ग हवाच. अशाच काही निनावी वनस्तींची टिपलेली छायाचित्रे. पिवळया पाकळयांचा मध्ये मातकट पुंकेसर असलेली रानभेंडीचे फुल न्याहाळताना अगदी भारीच वाटतो.

ladies finger flower

 त्यातच कुरडूच्या फुलांचा मनोरा डोलत असतो. पांढरत काहीसा लालसर छटा असलेला तुरा.




 छोटी छोटी पिवळी फुलांचा हिरव्या पानांवर पसरलेला सडा.





 तर कुठे तेरडयाचा गुलाबी रंग व्यापलेला. मध्येच निळया पांढऱ्या फुलांनी ठिपक्या सारख्या सजवलेला साज. 





अगदी मनमोहकच. बधा एकदा निरखुन तुम्हालाही त्याची अनुभूती येईल. व्हा समरस निसर्गाशी. संवाद साधा निसर्गाशी. आणि आम्हालाही कळवा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा